Home » Sports » Other Sports » Insatiable Serena Williams Hungry For More Glory

सेरेना बनली सर्वाधिक वयस्क नंबर वन टेनिसपटू

वृत्तसंस्था | Feb 16, 2013, 23:58PM IST
सेरेना बनली सर्वाधिक वयस्क नंबर वन टेनिसपटू

दोहा- अमेरिकेची टेनिसपटू सेरेना विल्यम्सने पुन्हा एकदा जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थानावर कब्जा निश्चित केला आहे. वयस्क टेनिसपटू म्हणून महिलांच्या जागतिक क्रमवारीत नंबर वन होण्याचा अनोखा विक्रम आता सेरेनाच्या नावे जमा झाला आहे. सेरेनाचे वय सध्या 31 वर्षे आहे. कारकीर्दीत ती सहाव्यांदा नंबर वनची खेळाडू होणार आहे.


कतार ओपन टेनिस स्पर्धेत तिने उपांत्यपूर्व लढतीत माजी विम्बल्डन चॅम्पियन चेक गणराज्यच्या पेत्रा क्वितोव्हाला 3-6, 6-3, 7-5 अशा फरकाने पराभूत केले. या विजयासह सेरेना उपांत्य फेरीत प्रवेश केला.


1975 मध्ये कॉम्प्युटर रँकिंग सुरू झाल्यानंतर 31 वर्षे, चार महिने आणि 24 दिवसांत नंबर वन होणारी सेरेना एकमेव वयस्कर खेळाडू आहे. तिने अमेरिकेच्या क्रिस एवर्टचा विक्रम मोडला. तिने 30 वर्षे, 11 महिने व तीन दिवसांचे असताना अव्वल स्थान गाठून विक्रम केला होता.


तिच्यासह बेलारुसची व्हिक्टोरिया अजारेंका, मारिया शारापोवा, एग्निजस्का रंदावांस्का यांनीही स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. अजारेंकाने सारा इराणीला 6-2, 6-2 ने नमवून सेमीफायनलमधील प्रवेश निश्चित केला.

Email Print
0
Comment