जाहिरात
 
 
 

आयपीएलच्या धर्तीवर आता गोल्फमध्ये लीग

 
Source: वृत्तसंस्था   |   Last Updated 23:27(22/02/12)
 
 
 

नवी दिल्ली - इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या लोकप्रियतेची जादू आता कॉर्पोरेट जगतातील सर्वाधिक लोकप्रिय खेळ गोल्फवरही चढू लागली आहे. आयपीएलच्या धर्तीवर येत्या 5 ते 10 मार्चदरम्यान लुई फिलीप गोल्फ लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत देशातील विविध दहा देशांचे संघ सहभागी होतील. 

 स्पर्धेत एकूण एक कोटी 24 लाख रुपयांची बक्षीस रक्कम दिली जाईल. यातील विजेत्या संघाला 36 लाख, तर उपविजेत्या संघाला 24 लाख रुपये मिळतील. स्पर्धेचे आयोजन प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडिया, लुई फिलीप आणि ऋषी नारायण गोल्फ मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येत आहे. 

आरएनजीएमचे संस्थापक ऋषीनारायण यांनी एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ‘ही स्पर्धा गोल्फच्या विकासासाठी एक क्रांतिकारी पाऊल असेल. यात शहारावर आधारित दहा संघ खेळतील.’ या वेळी क्रिकेट वर्ल्डकप विजेता कर्णधार आणि गोल्फचा चाहता कपिल देव यांचीही उपस्थिती होती. ही स्पर्धा कर्नाटक गोल्फ असोसिएशनच्या कोर्टवर खेळवली जाईल. 

 या स्पर्धेत अनिर्वाण लाहिडी, ज्योती रंधवा, हिम्मत रॉय, एसएसपी चौरासिया, शिवकपूर, गगनजीत भुल्लरर आदी दिग्गज सहभागी होतील. प्रत्येक शहराच्या संघात तीन गोल्फपटू सहभागी होतील. यातील दोघांची निवड 2011 च्या रोलेक्स क्रमवारीच्या आधारावर केली जाईल. तिसरा खेळाडू प्रायोजकांकडून निवडला जाईल. 

असे असेल स्पर्धेचे स्वरूप - पाच ते 10 मार्चदरम्यान होणा-या या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी प्रो एम खेळवले जाईल. पुढच्या दोन दिवशी 36 होलचे स्ट्रोक प्ले असेल. यात सर्व दहा संघ सहभागी होतील. यातील सर्वश्रेष्ठ चार संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. गरज पडल्यास टायच्या परिस्थितीत सडन डेथ प्लेची मदत घेतली जाईल. फायनल 10 मार्च रोजी होईल.

 
 
 
 
 
 
 
 
 
वाचकांचे विचार

 
कोड :
2 + 4

 
 
जाहिरात
 
 
 
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
 
 
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 
 
 
 

हास्ययात्रा

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
| Email  Comment
| Email  Comment