Home » Sports » Other Sports » Kapil Dev Become Golf Team Owner

कपिल बनला गोल्‍फ टीमचा मालक

दिव्‍य मराठी वेब टीम | Jan 09, 2013, 15:26PM IST
कपिल बनला गोल्‍फ टीमचा मालक

नवी दिल्‍ली- टीम इंडियाचा माजी कर्णधार कपिल देव यांनी इंडियन प्रीमियर लीगच्‍या धर्तीवर सुरू होणा-या लुईस फिलिस कप गोल्‍फ टुर्नामेंटमध्‍ये चंदीगड टीमची फ्रँचायजी खरेदी केली आहे. देव एलोरा चंदीगड असे या संघाचे नाव आहे. जेपी ग्रीन्‍स ग्रेटर नोएडा येथे 11 ते 16 फेब्रुवारी दरम्‍यान होणा-या या टुर्नामेंटमध्‍ये भारताचे अव्‍वल गोल्‍फर सहभागी होणार आहेत. यामध्‍ये जीव मिल्‍खा सिंग, ज्‍योति रंधवा, गगनजीत भुल्‍लर, अनिर्बान लाहिडी आदी सहभागी होणार आहेत. कपिलच्‍या संघात अजितेश संधू, हरेंद्र गुप्‍ता आणि सुझान सिंग यांचा समावेश आहे.

या टुर्नामेंटमध्‍ये गतविजेता टीम नवरत्‍न अहमदाबाद यांच्‍यासह पुरावनकारा बेंगळूरू, टेक चेन्‍नई, एव्‍हीटी कोलकाता, जेपी ग्रीन्‍स ग्रेटर नोएडा, डीएलएफ गुडगाव आणि शुभकामना नोएडा या टीमचा समावेश आहे.

Email Print
0
Comment