Home » Sports » Cricket » Latest News » Laxman Become Comentator In Australia Test Matches

ऑस्ट्रेलियाविरूध्‍द कसोटी मालिकेत लक्ष्‍मण बनणार समालोचक

वृत्तसंस्था | Feb 22, 2013, 01:17AM IST
ऑस्ट्रेलियाविरूध्‍द कसोटी मालिकेत लक्ष्‍मण बनणार समालोचक

नवी दिल्ली - मागच्या दीड शतकापासून ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा कर्दनकाळ ठरलेला व्ही. व्ही. एस. लक्ष्मण भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान शुक्रवारपासून सुरू होत असलेल्या कसोटी मालिकेत समालोचकाच्या रूपात नव्या इनिंगला सुरुवात करेल.भारत-ऑस्ट्रेलिया चार कसोटी सामन्यांच्या मालिकेचे थेट प्रक्षेपण स्टार क्रिकेट, स्टार स्पोर्ट्सवर केले जाईल. लक्ष्मणशिवाय सुनील गावसकर, अ‍ॅलेन बॉर्डर सुद्धा कॉमेंट्री टीममध्ये सामील आहेत.
लक्ष्मणच्या 2434 धावा
लक्ष्मणने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 29 कसोटीत 2434 धावा काढल्या आहेत. यात त्याने सहा शतके ठोकली आहेत. लक्ष्मण, गावसकर, बॉर्डर यांच्याशिवाय स्टार स्पोर्ट्सच्या कॉमेंट्री टीममध्ये कपिल देव, नवज्योतसिंग सिद्धू, रमीज राजा, रवी शास्त्री, शेन वॉर्न, मॅथ्यू हेडन, वसीम अक्रम, हर्षा भोगले यांचाही समावेश आहे.

Email Print
0
Comment