Home » Sports » Other Sports » Like Yuvraj Singh I Make My Name In Hokey Said By Yuvraj Valmiki

‘क्रिकेटच्या युवराजप्रमाणे हॉकीत नाव उज्ज्वल करणार’ - युवराज वाल्मीकी

एकनाथ पाठक | Apr 26, 2012, 00:52AM IST
‘क्रिकेटच्या युवराजप्रमाणे हॉकीत नाव उज्ज्वल करणार’  - युवराज वाल्मीकी

पुणे - क्रिकेट विश्वात युवराजसिंगने ज्याप्रमाणे दमदार कामगिरी करून नाव कमवले, त्याचप्रमाणे मला हॉकीत नाव उज्ज्वल करायचे असल्याची प्रतिक्रिया पुण्याच्या बालेवाडी स्टेडियमवर ‘दिव्य मराठी’शी बोलताना युवा भारतीय हॉकीपटू युवराज वाल्मीकीने व्यक्त केली. क्रिकेटपटू युवराजच्या नावाचे साधर्म्य असल्याने मला त्याच्याकडून नेहमी संघर्षावर मात आणि चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा मिळते, असेही या वेळी या हॉकीपटूने नमूद केले.

गेल्या दोन आठवड्यांपासून भारतीय हॉकी संघाचे सराव शिबिर राष्ट्रीय प्रशिक्षक मायकेल नोब्स यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. युवराज वाल्मीकीही या शिबिरात सहभागी झाला आहे.

‘गेल्या आठ महिन्यांत भारतीय संघाच्या कामगिरीचा दर्जा उंचावला आहे. मागच्या पाच आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धेत भारतीय संघाने अपूर्व अशी कामगिरी करून दाखवली आहे. अव्वल पाचमध्ये स्थान पटकावण्याचे लक्ष्य आम्ही ठरवले आहे. सध्या सगळ्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. हा उत्साह लंडनमध्ये निश्चितपणे इतिहास घडवणार’, असे या वेळी वाल्मीकीने म्हटले.

त्या जिगरबाजाला सलाम - आपल्या झंझावाती फलंदाजीच्या बळावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे मैदान गाजवणा -यायुवराजने कॅन्सरच्या आजारावर मात केली. जिगरबाज युवीला सलाम. क्रिकेटपटू युवराजसिंग माझा आदर्श आहे. दोघांचे नाव एकच असल्याने मला नेहमी त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची प्रेरणा आणि मेहनत, झुंज, चिकाटीची ऊर्जा मिळते.

दुखापतीमुळे अझलन शाह हॉकी स्पर्धेला मुकणार - येत्या 24 मेपासून मलेशियात सुलतान अझलन शाह हॉकी स्पर्धेला सुरुवात होत आहे. मात्र, या स्पर्धेला मुंबईचा स्टार हॉकीपटू युवराज वाल्मीक मुकणार आहे. गेल्या महिन्यात ऑलिम्पिक पात्रता फेरीच्या हॉकी स्पर्धेत खेळताना त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली. या दुखापतीतून सावरण्यासाठी त्याला किमान दोन-तीन आठवड्यांचा कालावधी लागणार आहे.

Email Print
0
Comment