Home » Sports » Other Sports » Malga Defeat;Bursilona In Fc Semifinal

मलगाचा पराभव; बार्सिलोना एफसी सेमीफायनलमध्ये

वृत्तसंस्था | Jan 26, 2013, 03:02AM IST
मलगाचा पराभव; बार्सिलोना एफसी सेमीफायनलमध्ये

मलगा- येथील मैदानावर पाहुण्या बार्सिलोना फुटबॉल क्लबने स्पॅनिश फुटबॉल लीगमध्ये यजमान मलगाला 4-2 ने धूळ चारली. या विजयासह गतविजेत्या बार्सिलोनाने लीगच्या उपांत्य फेरीत धडक मारली. इनेस्टा (76 मि) व लियोनेल मेसी (80 मि.) यांनी केलेल्या सुरेख गोलच्या बळावर बार्सिलोनाने विजय मिळवला. मलगा एफसीकडून जोआक्वीन (12 मि.) व सांता क्रूझ (68 मि.) यांनी केलेली कामगिरी व्यर्थ ठरली.

पाहुण्या बार्सिलोनाने दमदार सुरुवात करून सामन्यावर अवघ्या आठ मिनिटांत पकड घेतली. स्टार खेळाडू पेड्रोने गोलचे खाते उघडून गतविजेत्या संघाला आघाडी मिळवून दिली. मात्र, या आघाडीचा आनंद बार्सिलोनाला टिकवून ठेवता आला नाही. त्यानंतर अवघ्या चार मिनिटांत गोल करून जोआक्वीनने यजमान संघाला लढतीत 1-1 ने बराबेरी मिळवून दिली. मध्यंतरापर्यंत हा सामना 1-1 ने बरोबरीत खेळवला. दुस-या हाफमध्ये पिक्युईने 49 व्या मिनिटाला गोल करून बरोबरीची कोंडी फोडली. या गोलच्या बळावर त्याने बार्सिलोनाला 2-1 ने आघाडी मिळवून दिली. सांता क्रूझने 68 व्या मिनिटाला केलेल्या गोलच्या बळावर मलगाने पुन्हा सामन्यात 2-2 ने बरोबरी मिळवली. त्यानंतर इनेस्टा व मेसीने गोलचा धमाका करून बार्सिलोनाचा मोठ्या फरकाने विजय निश्चित केला.

Email Print
0
Comment