Home » Sports » Latest News » New Zealand Cricketer Lou Vincent Retires

PHOTOS: भर मैदानात हे काय झाले...

दिव्‍य मराठी वेब टीम | Feb 21, 2013, 12:00PM IST
1 of 5

वेलिंग्‍टन- न्‍यूझीलंडचा क्रिकेटपटू ल्‍यू विन्‍सेटने आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. चौतीस वर्षीय विन्‍सेटने ट्विटरच्‍या माध्‍यमातून याची माहिती दिली. त्‍याने 23 कसोटी आणि 102 वनडे सामने खेळले आहेत.

आपल्‍या करिअरमधील त्‍याचा अनेक काळ आजारपणात गेला. त्‍याचा परिणाम आपल्‍या क्रिकेटवर पडल्‍याचे त्‍याने मान्‍य केले. विन्‍सेट आपल्‍या चपळ क्षेत्ररक्षणामुळे कायम चर्चेत राहिला. एका सामन्‍यात क्षेत्ररक्षण करताना त्‍याची पँट कंबरेवरून खाली घसरली. मात्र, त्‍याने न गडबडता पहिल्‍यांदा चेंडू थ्रो केला आणि नंतर त्‍याने पँट वर घेतली.

पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून जाणून घ्‍या किवीच्‍या या क्रिकेटपटूचे किस्‍से...

Email Print
0
Comment