Home » Sports » Other Sports » Oscar Prisoriyas's Girlfriend Reva Murder Mistry Can Come Into Light By I Pod

ऑस्कर प्रिस्टोरियसची प्रेमिका रिवा स्टिनकेम्पच्या हत्येचे रहस्यभेद आयपॅडने शक्य

वृत्तसंस्‍था | Feb 20, 2013, 05:56AM IST
ऑस्कर प्रिस्टोरियसची प्रेमिका रिवा स्टिनकेम्पच्या हत्येचे रहस्यभेद आयपॅडने शक्य

जोहान्सबर्ग - दक्षिण आफ्रिकेचा पॅरालिम्पिक धावपटू ऑस्कर प्रिस्टोरियसची प्रेमिका रिवा स्टिनकेम्पच्या हत्येचे रहस्यभेद करण्यात तिचा आयपॅड मोलाची भूमिका पार पाडू शकतो. स्थानिक मीडियाने दिलेल्या माहितीनुसार स्टिनकेम्पचा आयपॅड पोलिसांच्या हाती लागला आहे. या आयपॅडवर एक माजी रग्बी खेळाडू फ्रान्सुआ होगार्डचा एक मॅसेज आहे. यामुळेच स्टिनकेम्पचा खून झाला असण्याची शक्यता आहे. हा आयपॅड ऑस्करच्या बेडरूममध्ये सापडल्याची चर्चा आहे. या आयपॅडशिवाय दोघांच्या मोबाइल फोनचा डाटाही पोलिस तपासत आहेत.

Email Print
0
Comment