क्वालालांपूर - समी असलमचे शतक आणि शानदार गोलंदाजीच्या बळावर पाकिस्तानने अंडर-19 आशिया चषकाच्या रोमांचक मुकाबल्यात भारताचा एका रनने पराभव केला. सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर भारतीय संघाला दोन रन्सची गरज होती. मात्र, भारतीय फलंदाज निष्प्रभ ठरले आणि पाकिस्तानने सामना जिंकला. पाकिस्तानच्या समी असलमने तडाखेबाज १२१ रन्स केले, तो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला.