जाहिरात
 
 
 

पाकविरुद्ध इंग्लंडचा 4-0 ने मालिका विजय

 
Source: वृत्तसंस्था   |   Last Updated 23:36(22/02/12)
 
 
 

दुबई - मध्यमगती गोलंदाज जेड डर्नबॅच (4/45) आणि स्टार फलंदाज केविन पीटरसन (130) च्या शतकी खेळीच्या बळावर इंग्लंडने मालिकेतील चौथ्या आणि अखेरच्या वनडेत पाकिस्तानवर 4 गड्यांनी विजय मिळवला. या विजयासह इंग्लंडने 4-0 ने मालिका आपल्या नावे केली.  

दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत सर्वबाद 237 धावा काढल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने हे लक्ष्य 49.2 षटकांत 6 गड्यांच्या मोबदल्यात गाठले. शानदार शतकी खेळी करून संघाचा विजय निश्चित करणा-या पीटरसनला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.  इंग्लंडचा कर्णधार अ‍ॅलिस्टर कुकने मालिकावीराचा पुरस्कार पटकावला.  

एकटा पीटरसन झुंजला-  इंग्लंड संघाकडून धावांचा पाठलाग करताना सलामीवीर केविन पीटरसन एकटाच झुंजला. पीटरसनने 153 चेंडूंचा सामना करताना 2 षटकार आणि 12 चौकार मारले. संघाच्या अवघ्या 4 धावा झाल्या असताना कुक बाद झाला. यानंतर पीटरसन-ट्रॉट यांनी दुस-या गड्यासाठी 46 धावांची भागीदारी केली. ट्रॉट 15 धावा काढून बाद झाला. चौथ्या क्रमांकावरील फलंदाज इयान मोर्गनही 15 धावा काढून चालता झाला. पाचव्या क्रमांकावर आलेल्या बटलरला तर भोपळासुद्धा फोडता आला नाही.

इंग्लंडचा संघ 4 बाद 68 धावा असा संकटात सापडला होता. यानंतर पीटरसन-केसवेटर या जोडीने संघाचा डाव सावरला. दोघांनी पाचव्या विकेटसाठी 109 धावांची भागीदारी केली. या भागीदारीने इंग्लंडचा विजय दृष्टिपथात आला. केसवेटरने 62 चेंडूंत 4 चौकारांसह 43 धावा काढल्या. संघाच्या 236 धावा झाल्या होत्या. समित पटेलने नाबाद 17 आणि टीम ब्रेसननने नाबाद 4 धावा काढून संघाचा विजय निश्चित केला. पाकिस्तानकडून सईद अजमलने 62 धावांत 3 गडी बाद केले.  

पाककडून अझहर, शफिक चमकले - तत्पूर्वी, पाकिस्तानकडून अझहर अली (58) आणि असद शफिक (65) यांनी  दमदार खेळी करून अर्धशतके ठोकली. इंग्लंडकडून डर्नबॅचने 4 विकेट घेतल्या. 

संक्षिप्त धावफलक  - पाकिस्तान 237. (अझहर अली 58, असद शफिक 65, मिसबाह 47, 4/45 डर्नबॅच.) पराभूत विरुद्ध इंग्लंड 6 बाद 241 धावा. (केविन पीटरसन 130, केसवेटर 43, 3/63 सईद अजमल.)

 
 
 
 
 
 
 
 
 
वाचकांचे विचार

 
कोड :
7 + 5

 
 
जाहिरात
 
 
 
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
 
 
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 
 
 
 

हास्ययात्रा

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
| Email  Comment
| Email  Comment