Home » Sports » Latest News » Pakistani Womens Cricket Matches May Be Held In Odisha

ओडिशामध्‍ये होणार पाकिस्‍तानचे सामने

वृत्तसंस्‍था | Jan 18, 2013, 19:25PM IST
ओडिशामध्‍ये होणार पाकिस्‍तानचे सामने

नवी दिल्‍ली- भारतात होणा-या महिला विश्‍वचषकातील पाकिस्‍तानचे सामने ओडिशामध्‍ये खेळवले जाण्‍याची शक्‍यता असल्‍याचे वृत्त एका वाहिनीने दिले आहे. ब गटातील हे सामने पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार मुंबईत होणार होते.

महिला क्रिकेट विश्‍वचषकाचे सामने 31 जानेवारीपासून सुरू होणार आहेत. गेल्‍या आठवडयात भारत पाकिस्‍तान संबंधात कटूता आल्‍यानंतर त्‍याचा परिणाम क्रिकेट संबंधांवरही झाला होता. पाकिस्‍तानने हे सामने दक्षिण आफ्रिकेत हलवण्‍याची मागणी केली होती. सुरूवातीला आलेल्‍या वृत्तानुसार पाकिस्‍तानचे सर्व सामने अहमदाबाद येथे होणार होते. मात्र, गुजरात क्रिकेट असोसिएशनने सामने आयोजनास नकार दिला होता.

Email Print
0
Comment