Home » Sports » From The Field » Ranking Of Dhoni & Awards Of MOM

धोनीला दिलेला सामनावीर पुरस्कारही होता फिक्स? जडेजाची होती दावेदारी

दिव्य मराठी वेब टीम | Jan 08, 2013, 14:14PM IST
1 of 3
नवी दिल्‍ली- कर्णधार महेंद्रसिंग धोनीने पाकविरुद्ध वनडे मालिकेत केलेल्या चमकदार कामगिरी केली आहे. याच बळावर आयसीसीच्या ताज्या फलंदाजांच्या क्रमवारीत दोन स्थानांनी सुधारणा करत चौथे स्थान गाठले. पाकविरुद्ध तीन सामन्यांत धोनीने शानदार कामगिरी करत एक शतक व एका अर्धशतकाच्या जोरावर 203 धावा काढल्या. धोनी मालिकेत पहिल्या व तिसर्‍या लढतीत सामनावीर ठरला. तिसर्‍या सामन्यात मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याला शानदार कप्तानीमुळे मिळाला. असे असले तरी हा पुरस्कारसुद्धा फिक्स होता अशा अफवा पसरल्या आहेत. धोनीचे मनोबल वाढविण्यासाठी त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आल्याचे बोलले जात आहे. याआधी भारत-पाकिस्तान यांच्यातील दिल्लीतील तिसरा सामनाच फिक्स होता असा आरोप करण्यात आला होता. 
दिल्लीतील सामन्यात धोनीने भारतीय संघात सर्वांधिक ३६ धावा केल्या होत्या. मात्र त्याने यष्टीरक्षण खराब केले होते. त्याने पाकिस्तानचा कर्णधार मिस्बा-उल-हक याचा झेल सोडला होता. सूत्रांच्या माहितीनुसार, मॅन ऑफ द मॅच पुरस्कारासाठी धोनीची दावेदारी नव्हती. मात्र ऐनवेळी त्याच्या नावाची घोषणा करण्यात आली. 
 
मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देणा-या समालोचन करणा-या ज्यूरीने धोनीची एकमताने निवड केल्याचे म्हटले आहे. सूत्रांनी सांगितले की, धोनीची या ज्यूरीने एकमताने निवड केली होती. मात्र, धोनीला मत देणा-या एक समालोचकाने इंग्रजी वृत्तपत्राला सांगितले की, भारतीय संघ खराब कामगिरी करीत आहे. अशावेळी धोनीचे मनोबल वाढविण्यासाठी त्याचे नाव पुढे करण्यात आले. 
 
धोनीला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार दिल्यानंतर काही समालोचक हैरान झाले जे ज्या ज्यूरीत नव्हते. त्यांनी धोनीला पुरस्कार देण्यावरुन प्रश्न उपस्थित केले. तसेच मॅन ऑफ द मॅच पुरस्कार दिल्याने एखाद्याचे मनोबल कसे काय वाढते असा सवाल केला आहे. या सामन्यात समालोचन करणा-या एका समालोचकाने सांगितले की, या सामन्यात रविंद्र जडेजाला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार द्यायला हवा होता. त्याने आठव्या क्रमांकावर फलंदाजीला येत २७ धावा केल्या होत्या. तसेच त्याने उत्तम क्षेत्ररक्षण करताना धावाही रोखल्या. उमर गुलचा हवेत सूर मारुन जबरदस्त असा झेल टिपला होता. उमर अकमलसारख्या आक्रमक फलंदाजाला आपल्या गोलंदाजीवर बाद केले. याचबरोबर जडेजाने आपल्या दहा षटकात २ निर्धाव षटके टाकत केवळ १९ धावा दिल्या होत्या. त्यामुळे या पुरस्कारावर त्याची प्रबळ दावेदारी होती. असे असतानाही धोनीला हा पुरस्कार देण्यात आला. तसेच तो ही फिक्स होता असा आरोप होत आहे. 
 
 
एंड्राइड यूजर्स के लिए एंड्राइड यूजर्स के लिए
वाचकांचे विचार
 
तुमचे विचार पोस्ट करण्यासाठी लॉग ऑन करा.

लॉग ऑन करा:
किंवा
तुमच्याबद्दल सांगा
 
 

दाखविले जाईल

 
 

दाखविले जाईल

 
Code:
5 + 2

 
 
 
जाहिरात

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

बॉलिवूड

 

जीवनमंत्र

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
 
Email Print Comment