Home » Sports » Other Sports » S.Africa's Pistorius Arrested After Killing Girlfriend

'ब्‍लेड रनर' ऑस्‍कर पिस्‍टोरियसने प्रेयसीलाच मारली गोळी

वृत्तसंस्‍था | Feb 14, 2013, 18:26PM IST
'ब्‍लेड रनर' ऑस्‍कर पिस्‍टोरियसने प्रेयसीलाच मारली गोळी

दक्षिण आफ्रिका- दक्षिण आफ्रिकेचा ऑलिपिंक धावपटू आणि 'ब्‍लेड रनर' अशी उपाधी मिळवलेल्‍या ऑस्‍कर पिस्‍टोरियसने चोर आल्‍याचे समजून आपल्‍या मैत्रिणीलाच गोळी मारल्‍याचे प्रकरण समोर आले आहे. पिस्‍टोरियसवर खुनाच्‍या गुन्‍ह्याची नोंद करण्‍यात आली आहे.

ही घटना नेमकी कशामुळे घडली याची विस्‍तृत माहिती मिळू शकलेली नाही. प्रिटोरिया येथील आपल्‍या राहत्‍या घरी प्रेयसी रीवा स्‍टीनकँपला गोळी त्‍याने गोळया मारल्‍या होत्‍या. यामध्‍ये तिचा मृत्‍यू झाला. 26 वर्षीय ऑस्‍करने गेल्‍यावर्षी लंडनमध्‍ये झालेल्‍या ऑलिंपिकमध्‍ये कृत्रिम पायांच्‍या साहाय्याने धावण्‍याच्‍या स्‍पर्धेत सहभाग घेऊन इतिहास नोंदवला होता.

मागच्‍याच वर्षी टाईम मॅग्‍झीनने जगातील 100 प्रभावशाली व्‍यक्‍तींच्‍या यादीत ऑस्‍करचा समावेश केला होता. त्‍याने 4x400 मीटर रिले पॅरॉलिंपिकमध्‍ये सुवर्ण पदक पटकाविले होते.

Email Print
0
Comment