Home » Sports » Other Sports » Saina Nehwal Sails Into Malaysia Open Quarters, Regains World No. 2 Ranking

सायनाने उपांत्यपूर्व फेरीत दिली धडक

वृत्तसंस्‍था | Jan 18, 2013, 13:01PM IST
सायनाने उपांत्यपूर्व फेरीत दिली धडक

क्वालालंपूर- भारतीय बॅडमिंटन स्टार आणि ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती महिला खेळाडू सायना नेहवालने मलेशियन सुपर सिरीज बॅडमिंटनच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली आहे. पुरुष गटात भारताच्या परुपल्ली कश्यपला दुसर्‍या फेरीत पराभवाचा सामना करावा लागला.

सायनाने हाँगकाँगच्या प्यू यीन यिप हिला 21-12, 21-9 ने पराभूत करीत उपांत्यपूर्व फेरी गाठली. तिने ही लढत अवघ्या अध्र्या तासात जिंकली. आता सायनाचा पुढचा सामना जपानच्या नाझोमी ओकुबुरा हिच्याशी होईल. पी. कश्यपला दुसर्‍या फेरीत सहावा मानांकित जॉन ओ जोर्गेनसेनकरवी 21-17, 21-14 ने पराभवाचा सामना करावा लागला.

क्रमवारीत प्रगती : सायना नेहवालने वर्ल्ड बॅडमिंटन क्रमवारीत तिसर्‍या स्थानावरून दुसर्‍या क्रमांकावर प्रगती केली आहे. ऑलिम्पिकचा क्वार्टर फायनलिस्ट परुपल्ली कश्यपने पुरुष गटाच्या टॉप-10 मध्ये स्थान मिळवण्यात बाजी मारली. त्यानेसुद्धा एका स्थानाची प्रगती केली.

Email Print
0
Comment