Home » Sports » Other Sports » Sania Mirza Win First Cup In New Year

नव्या वर्षात सानिया मिर्झाचा विजेतेपदाने प्रारंभ..!

वृत्तसंस्था | Jan 06, 2013, 00:15AM IST
नव्या वर्षात सानिया मिर्झाचा विजेतेपदाने प्रारंभ..!

बिस्बेन- भारताची स्टार महिला टेनिसपटू सानिया मिर्झाने शनिवारी डब्ल्यूटीए ब्रिस्बेन आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा चषक जिंकून नववर्षाचा दणकेबाज  प्रारंभ केला. तिने बेथानी माटेकसोबत महिला दुहेरीच्या अंतिम सामन्यात  क्वेता पेश्चेक व अ‍ॅनालेना ग्रोनफिल्डचा 4-6, 6-4, 10-7 अशा फरकाने पराभव केला. दुस-या मानांकित सानिया-बेथानीचे यंदाच्या सत्रातील हे पहिले विजेतेपद ठरले, तर सानियाचा करिअरमधील हा 15 वा डब्ल्यूटीए किताब आहे.   


अंतिम लढतीच्या पहिल्या सेटमध्ये क्वेता-अ‍ॅनालेनाने 6-4 ने बाजी मारून आघाडी घेतली. दुस-या सेट 6-4 ने जिंकून सानिया-बेथानीने लढतीत बरोबरी मिळवली.


त्यानंतर तिस-या निर्णायक सेटमध्ये आक्रमक सर्व्हिस करत दुस-या मानांकित इंडो-अमेरिकन जोडीने बाजी मारली. त्यांनी हा सेट 10-7 अशा फरकाने जिंकून विजेतेपद आपल्या नावे केले.
 

वाचकांचे विचार
 
तुमचे विचार पोस्ट करण्यासाठी लॉग ऑन करा.

लॉग ऑन करा:
किंवा
तुमच्याबद्दल सांगा
 
 

दाखविले जाईल

 
 

दाखविले जाईल

 
Code:
4 + 6

 
 
 
जाहिरात

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

बॉलिवूड

 

जीवनमंत्र

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
 
Email Print Comment