Home » Sports » Other Sports » Sania-Mirza-Wins-French-Open-Doubles-Title

PHOTOS: फ्रेंच ओपन टेनिसची चॅम्पियन सानियाच्‍या टॉप पाच गोष्‍टी

दिव्‍यमराठी वेब टीम | Jun 08, 2012, 14:59PM IST
1 of 5

पॅरिसच्या लाल मातीवर भारताच्या सानिया मिर्झा-महेश भूपतीने गुरुवारी इतिहास घडवला. फ्रेंच ओपन स्पर्धेच्या मिश्र दुहेरीत धडाकेबाज विजय मिळवत सानिया-भूपतीने आपले दुसरे ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळवले. अंतिम फेरीत भारतीय जोडीने क्लॉडिया जॅन्स-इग्नासिक आणि सॅँटियागो गोन्झेंल्स यांना 7-6, 6-1 अशा सरळ सेट्समध्ये धूळ चारली.

फ्रेंच ओपन टेनिसमध्‍ये पहिल्‍यांदाच मिश्र दुहेरीच्‍या अंतिम फेरीत भारतीय जोडी पोहोचली आणि विजेतेपददेखील त्‍यांनी पटकाविले. पहिल्‍या सेटमध्‍ये त्‍यांना ट्रायबेकरमध्‍ये खेळावे लागले. परंतु, दुसरा सेट त्‍यांनी खूप सहजपणे जिंकला. यापूर्वी सानिया-भूपती जोडीने सन 2009मध्‍ये ऑस्‍ट्रेलियन ओपनच्‍या मिश्र दुहेरीचे विजेतेपद पटकाविले होते.

Email Print
0
Comment