जाहिरात
Home » Sports » Other Sports » Serena Azrenka Ahead In Aus Tenins Open

ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत अझारेंका, सेरेनाची आगेकूच

वृत्तसंस्था | Jan 18, 2013, 12:25PM IST
ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत अझारेंका, सेरेनाची आगेकूच

मेलबर्न -  तिसरा मानांकित इंग्लंडचा अँडी मुरे, महिला गटातील अव्वल मानांकित बेलारूसची व्हिक्टोरिया अझारेंका आणि तिसरी मानांकित अमेरिकेच्या सेरेना विल्यम्स यांनी  ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या तिस -या   फेरीत प्रवेश केला. पुरुष दुहेरीत भारताचा लिएंडर पेस आणि स्तेपानेकर यांना मात्र पराभवाचा सामना करावा लागला.  
वर्षाच्या पहिल्या ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या दुस -या   फेरीत मुरेने जाये सोंगाला दोन तास आणि 21 मिनिटांच्या संघर्षानंतर सरळ सेटमध्ये हरवले. मुरेने 6-2, 6-2, 6-4 ने ही लढत जिंकली. सोंगावर मात करण्यासाठी मुरेला फार परिश्रम घ्यावे लागले नाहीत. त्याने पहिला सेट 31 मिनिटांत, दुसरा सेट 33 मिनिटांत आणि तिसरा सेट 37 मिनिटांत आपल्या नावे केला.   

पुरुषांच्या इतर सामन्यात सातवा मानांकित फ्रान्सच्या जो विल्फ्रेड सोंगाने जपानच्या गो साएदाला 6-3, 7-6, 6-3 ने हरवले. पुरुष गटातच 12 वा मानांकित क्रोएशियाचा मारिन सिलीच, 13 वा मानांकित कॅनडाचा मिलोस रायोनिक, 17 वा मानांकित जर्मनीचा फिलिप कोलश्वेबर आणि आंद्रेस सेप्पी यांनी तिस -या   फेरीत प्रवेश केला.   
 महिला गटाचे सामने
महिला गटात जागतिक क्रमवारीतील नंबर वन खेळाडू व्हिक्टोरिया अझारेंकाने ग्रीसच्या एलिना दानीलिदोऊ हिला सोप्या लढतीत 6-1, 6-0 ने हरवले. अझारेंकाने ही लढत अवघ्या 55 मिनिटांत जिंकली. याशिवाय महिला गटात विजेतेपदाची प्रबळ दावेदार सेरेनाने मुगुरुजाला 6-2, 6-0 ने हरवले. तिने ही लढत एक तास आणि 15 मिनिटांत जिंकली.   
वोज्नियाकी, किरिलेंकोसुद्धा विजयी
महिला गटात 10 वी मानांकित कॅरोलिन वोज्नियाकी, 14 वी सिडेड मारिया किरिलेंको, 16 वी मानांकित रॉबर्टा विन्सी आणि 20 वी मानांकित यानिना विकमेयर यांनीसुद्धा पुढच्या फेरीत प्रवेश केला. इतर लढतीत रशियाची स्वेतलाना कुज्नेत्सोवाने 26 मानांकित चीन तैयपैच्या सु वी सिह आणि रशियाच्या एलिना वेस्निनाने 21 वी सिडेड अमेरिकेच्या वावरिंका लेपचेंकोला पराभूत केले.

Ganesh Chaturthi Photo Contest
वाचकांचे विचार
 
तुमचे विचार पोस्ट करण्यासाठी लॉग ऑन करा.

लॉग ऑन करा:
किंवा
तुमच्याबद्दल सांगा
 
 

दाखविले जाईल

 
 

दाखविले जाईल

 
Code:
2 + 1

 
 
 
जाहिरात
Ganesh Chaturthi Photo Contest

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

बॉलिवूड

 

जीवनमंत्र

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
 
Email Print Comment