Home » Sports » Latest News » Shahid Afridi Once Again Selectin In Pak Odi Team

शाहिद आफ्रिदीचे पाक वनडे टीममध्‍ये पुनरागमन

वृत्तसंस्‍था | Feb 21, 2013, 16:49PM IST
शाहिद आफ्रिदीचे पाक वनडे टीममध्‍ये पुनरागमन

कराची- दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्‍या आगामी वनडे मालिकेसाठी अष्‍टपैलू क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचे पाकिस्‍तान संघात पुनरागमन झाले आहे. चौतीस वर्षीय आफ्रिदीचा गतवर्षी डिसेंबरमध्‍ये झालेल्‍या भारताविरूद्धच्‍या मालिकेसाठीही टीममध्‍ये समावेश करण्‍यात आला नव्‍हता. मात्र, त्‍याला टी-20 सामन्‍यात खेळण्‍याची संधी मिळाली होती.

आफ्रिदीला टीमसाठी आपली उपयोगिता सिद्ध करण्‍याची शेवटची संधी असेल, असे मुख्‍य निवडकर्ता इक्‍बाल कासिम यांनी म्‍हटले.
'गेल्‍या काही महिन्‍यांपासून तो खराब फॉर्ममध्‍ये आहे. परंतु, त्‍याच्‍यावर आम्‍हाला विश्‍वास दाखवला पाहिजे. आम्‍हाला आशा आहे की, अफगाणिस्‍तानविरूद्ध पाकिस्‍तान अ संघाकडून खेळल्‍यामुळे त्‍याचा आत्‍मविश्‍वास वाढला असेल', अशी आशा कासिम यांनी यावेळी व्‍यक्‍त केली.


Email Print
0
Comment