जाहिरात
 
 
 

वॉर्नरकडे नेतृत्व का नाही ? : स्टीव्ह वॉ

 
Source: वृत्तसंस्था   |   Last Updated 00:49(16/02/12)
 
 
 

सिडनी - नियमित कर्णधार मायकेल क्लार्क जखमी असताना उपकर्णधार डेव्हिड वॉर्नरकडे तिरंगी मालिकेत श्रीलंकेविरुद्ध  लढतीत नेतृत्व द्यायला हवे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ही जबाबदारी वॉर्नरऐवजी रिकी पॉँटिंगकडे का दिली ? असा प्रश्न माजी कर्णधार स्टीव्ह वॉ यांनी उपस्थित केला आहे.  

‘या सामन्यात पॉँटिंग संघाचे नेतृत्व करणार असला तरीही येत्या काळात ही जबाबदारी वॉर्नरकडेच येणार आहे. श्रीलंकेविरुद्ध सामन्यासाठी उपकर्णधार वॉर्नरकडे नेतृत्व का दिले गेले नाही याचे मला आश्चर्य वाटते,’ असे स्टीव्ह वॉने म्हटले.   क्रिकेट ऑस्ट्रेलियाने वॉर्नरमध्ये नेतृत्वाची क्षमता बघितली असेलच. यामुळेच त्याला उपकर्णधारपदाची जबाबदारी दिली. तो उपकर्णधार आहे तर मग तो कर्णधार का बनू शकत नाही ? वॉर्नर सध्या या जबाबदारीसाठी सज्ज नाही, असे बहुदा संघ व्यवस्थापनाला वाटले असावे. मग असे असेल तर त्याला उपकर्णधार का बनवले, असा प्रश्नही या वेळी त्यांनी उपस्थित केला.  

 वॉर्नरला त्याचे दु:ख नाही -  शुक्रवारी होणा-या सामन्यासाठी रिकी पॉँटिंगकडे संघाचे नेतृत्व सोपवल्याने वॉर्नरला कोणतेच दु:ख नाही. कर्णधारपद स्वीकारण्यासाठी मी मानसिकरीत्या तयार नाही. मी सध्या मायकेल क्लार्ककडून कर्णधारपदाचे गुण आत्मसात करीत आहे. पॉँटिंग संघाचा सर्वाधिक अनुभवी क्रिकेटपटू आहे. त्याच्याकडूनही मला बरेच काही शिकायला मिळेल. मी वनडेत अद्याप खूप धावा काढलेल्या नाही. यामुळे सध्या मी माझे लक्ष फलंदाजी सुधारण्यावर देत आहे, असे वॉर्नरने म्हटले.

 
 
 
 
 
 
 
 
 
वाचकांचे विचार

 
कोड :
4 + 10

 
 
जाहिरात
 
 
 
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
 
 
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 
 
 
 

हास्ययात्रा

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
| Email  Comment
| Email  Comment