जाहिरात
 
 
 

लेवीच्या शतकामुळे द. आफ्रिकेचा एकतर्फी विजय !

 
Source: वृत्तसंस्था   |   Last Updated 05:47(20/02/12)
 
 
 

हॅमिल्टन: मालिकेतील दुसर्‍या टी-20 सामन्यात सलामीवीर आर. लेवीच्या तुफानी शतकी खेळीच्या बळावर दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडला 8 गड्यांनी पराभूत केले. या विजयासह आफ्रिकेने टी-20 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी केली आहे. मालिकेतील पहिला टी-20 सामना न्यूझीलंडने जिंकला होता. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 4 बाद 173 धावा काढल्या. प्रत्युत्तरात आफ्रिकेने हे लक्ष्य 4 षटके आणि 8 विकेट शिल्लक ठेवून सहजरीत्या गाठले.

आर. लेवीचे तुफानी शतक : धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या डावाची सुरुवात झाली नाही. त्यांचा भरवशाचा सलामीवीर हाशीम आमला अवघ्या 2 धावा काढून बाद झाला. त्याला नॅथन मॅक्लुमने बाद केले. तिसर्‍या क्रमांकावर खेळण्यास आलेला पार्नेलही अवघ्या 4 धावा काढून परतला. आफ्रिकेचा संघ 2 बाद 41 असा संकटात सापडला असताना युवा सलामीवीर लेवीने न्यूझीलंडची गोलंदाजी फोडून काढली. लेवीने अवघ्या 51 चेंडूंत नाबाद 117 धावा ठोकल्या. या खेळीत त्याने तब्बल 13 षटकारांचा पाऊस पाडला. य वेळी त्याचा स्ट्राइक रेट 229.41 इतका होता. लेवीने एबी डिव्हिलियर्ससोबत 133 धावांची अभेद्य भागीदारी करून संघाचा विजय निश्चित केला. लेवीच्या खेळीमुळे द. आफ्रिकेने 4 षटके शिल्लक ठेवून 174 धावांचे मोठे लक्ष्य गाठले. दुसरीकडे कर्णधार डिव्हिलियर्स 39 धावांवर नाबाद राहिला.

 
 
 
 
 
 
 
 
 
वाचकांचे विचार

 
कोड :
10 + 10

 
 
जाहिरात
 
 
 
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
 
 
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 
 
 
 

हास्ययात्रा

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
| Email  Comment
| Email  Comment