टी-20 विश्वचषक: परविंदर, बिस्ला, धवनच्या कामगिरीमुळे कोण येणार अडचणीत?

नवी दिल्ली: चेन्नई सुपर किंग्जवर मात करून आयपीएल-5 च्या चषकावर कोलकाता नाइट रायडर्सने आपले नाव कोरले आहे. त्यानंतर पश्चिम बंगाल सरकारकडून कोलकाता संघाच्या झालेल्या शाही स्वागत सोहळ्याने आयपीएलचे पाचवे पर्व संपले.
आयपीएलच्या पाचव्या सत्रात भारतीय खेळाडूंनी शानदार कामगिरी केली. त्यात अजिंक्य राहाणे, शिखर धवन, परविंदर अवाना, मनविंद बिस्लाची कामगिरी कौतुकास्पद आहे. त्यामुळे श्रीलंकेत होणार्या टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघात त्यांचा समावेश होण्याची शक्यता बळवली आहे. त्यामुळे भारतीय संघातील कोणते खेळाडू अडचणीत येतात, आता हे काळच सांगणार आहे.
आयपीएल-5 मधील कामगिरीच्या आधारावर तुम्ही खालीलपैकी कोणत्या खेळाडूला टी-20 विश्वचषकात टीम इंडियामध्ये पाहण्याची इच्छा व्यक्त कराल?
वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, अंजिक्य राहाणे, शिखर धवन, दिनेश कार्तिक, मुरली विजय, सुरेश रैना, रोहित शर्मा, विराट कोहली, यूसुफ पठाण, महेंद्र सिंग धोनी, इरफान पठाण, मनविंदर बिस्ला, रवींद्र जडेजा, मनोज तिवारी, नमन ओझा, उमेश यादव, वरुण एरोन, लक्ष्मीपति बालाजी, इकबाल अब्दुल्ला, प्रवीण कुमार, परविंदर अवाना, हरभजन सिंग, प्रज्ञान ओझा, अंबाती रायडू, अशोक डिंडा, झहीर खान, मयंक अग्रवाल, विनय कुमार, आर. अश्विन आणि शादाब जकाती.
तुमच्या आवडीच्या खेळाडूंची एक टीम तयार करून खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. त्यात हे ही नमुद करा की, टी-20 विश्वचषकासाठी संघाचे नेतृत्त्व कोणाकडे द्यावे व का?






