जाहिरात
 
 
 

कपिलच्‍या कारनाम्‍याची पुनरावर्ती करण्‍यापासून सचिनने ठेवले अश्‍विनला दूर

 
Source: दिव्‍य मराठी वेब टीम   |   Last Updated 17:39(22/02/12)
 
 
 

श्रीलंकेच्‍या डावातील 40 व्‍या षटकात फिरकीपटू आर.अश्‍विनने थिरीमनेस विनू मंकड स्‍टाईलने धावबाद केले. अश्‍विन चेंडू टाकण्‍यापूर्वीच थिरीमने क्रीजबाहेर जायचा. त्‍यामुळे विचलित झालेल्‍या अश्विनने पुढचा चेंडू टाकण्‍यापूर्वीच त्‍याच्‍या यष्‍टया उडवून पंचांकडे धावबादाचे अपिल केले.

मैदानावरील पंचांनी यासाठी तिस-या पंचांची मदत घेण्‍यापूर्वीच कर्णधार सेहवागने सचिन तेंडुलकरच्‍या सांगण्‍यावरून हे अपिल मागे घेतले.

विरोधी संघाच्‍या खेळाडूला असे बाद करणे टीम इंडियाला नवे नाही. यापूर्वीही कपिलदेवने मंकड स्‍टाईलने फलंदाजास धावबाद केले होते. वर्ष 1992-93 मध्‍ये पोर्ट एलिझाबेथ येथे झालेल्‍या एकदिवसीय सामन्‍यात कपिलने पीटर कर्स्‍टनला अशा पद्धतीने बाद केले होते.

विनू मंकड यांनी 13 डिसेंबर 1947 रोजी सिडनी कसोटीत बिल ब्राऊनला अशारितीने केले होते. म्‍हणून याला मंकड विकेट असे म्‍हणतात.

व्हिडिओमध्‍ये पाहा कपिलने कर्स्‍टनला कसे केले होते धावबाद...



















 
 
 
 
 
 
 
 
 
वाचकांचे विचार

 
कोड :
3 + 2

 
 
जाहिरात
 
 
 
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
 
 
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 
 
 
 

हास्ययात्रा

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
| Email  Comment
| Email  Comment