टीम इंडियाच्या विराट कोहलीने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीने आपण भावी स्टार असल्याचे दाखवून दिले. त्याने श्रीलंकेविरूद्धच्या हंबनटोटा येथील पहिल्या वनडेमध्ये अर्धशतक लगावून एका खास विक्रमाशी बरोबरी केली. त्याचबरोबर वनडे कारकीर्दीमध्ये सर्वात वेगवान 12 शतके लगावणारा फलंदाजही ठरला आहे.
विराट कोहलीने वनडेमध्ये सलग 5 अर्धशतकीय खेळी केली आहे. यापूर्वी हा कारनामा सचिन तेंडुलकरने केला होता. 18 वर्षानंतर पुन्हा एकदा कोहलीने अशीच धमाल केली.
जाणून घेऊयात कोहलीच्या या विक्रमाशी निगडीत काही खास बाबी...