जाहिरात
Home » Sports » From The Field » Virender Sehwag Dropped From India's Home ODI Series Against England

इंग्‍लंडविरुद्ध वन डे मालिकेसाठी वीरेंद्र सेहवागला डच्‍चू, पुजाराचा संघात समावेश

वृत्तसंस्‍था | Jan 07, 2013, 04:16AM IST
इंग्‍लंडविरुद्ध वन डे मालिकेसाठी वीरेंद्र सेहवागला डच्‍चू, पुजाराचा संघात समावेश

नवी दिल्ली - इंग्लंडविरुद्ध पहिल्या तीन वनडेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. संघात वीरेंद्र सेहवागच्या जागी चेतेश्वर पुजाराला संधी देण्यात आली आहे. सेहवागला एकाच दिवसात दोन धक्के बसले. रविवारी पाकिस्तानविरुद्ध झालेल्या वनडेत त्याला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आले. यानंतर मॅच जिंकल्यानंतर टीम इंडियाची घोषणा झाली तर त्यात वीरूचे नाव नव्हते.   

यामुळे सेहवाग झाला बाहेर  - मागच्या पाच वनडेत सेहवागची कामगिरी - श्रीलंकेविरुद्ध 24 ते 31 जुलैदरम्यान झालेल्या तीन वनडेत 15, 03, 34 धावा काढल्या. पाकिस्तानविरुद्ध चेन्नई आणि कोलकाता वनडेत 04 आणि 31 धावांचे योगदान दिले. मागच्या दहा वनडेत सेहवागने 23.80 च्या सरासरीने अवघ्या 238 धावा काढल्या.  

यामुळे झाली  पुजाराची निवड  - रणजी करंडकात नुकत्याच झालेल्या सामन्यात मध्य प्रदेशविरुद्ध द्विशतक ठोकले. त्याने नाबाद 203 धावा काढल्या. वनडे क्रिकेटसाठी आवश्यक असलेले सर्व फटके त्याने या खेळीत मारले. दीडशे ते दोनशेदरम्यानच्या 50 धावा त्याने अवघ्या 17 चेंडूत काढल्या होत्या.  

इंग्लंडविरुद्ध वनडे संघ असा  - महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), चेतेश्वर पुजारा, गौतम गंभीर, विराट कोहली, रोहित शर्मा, युवराजसिंग, सुरेश रैना, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, ईशांत शर्मा, अजिंक्य रहाणे, अशोक डिंडा, भुवनेश्वर कुमार, शमी अहमद, अमित मिश्रा.

BalGopal Photo Contest
वाचकांचे विचार
 
तुमचे विचार पोस्ट करण्यासाठी लॉग ऑन करा.

लॉग ऑन करा:
किंवा
तुमच्याबद्दल सांगा
 
 

दाखविले जाईल

 
 

दाखविले जाईल

 
Code:
7 + 4

 
 
 
जाहिरात
BalGopal Photo Contest

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

बॉलिवूड

 

जीवनमंत्र

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
 
Email Print Comment