Home » Sports » Latest News » Vishwanathan Anand Becomes World Champion For Fifth Time

विश्‍वनाथन आनंदचा 'पंच', पाचव्‍यांदा बनला विश्‍वविजेता

दिव्‍य मराठी वेब टीम | May 30, 2012, 18:41PM IST
विश्‍वनाथन आनंदचा 'पंच', पाचव्‍यांदा बनला विश्‍वविजेता

मॉस्‍कोः बुद्धिबळपटू विश्‍वनाथन आनंद पाचव्‍यांदा विश्‍वविजेता ठरला आहे. इस्रायलच्‍या बोरिस गेलफांद याचा त्‍याने टायब्रेकरमध्‍ये पराभव करुन विश्‍वविजेतेपद पटकाविले. आनंदने टायब्रेकरच्‍या 5 रॅपिड गेम्‍सपैकी 1 गे‍म जिंकला होता. अखेरचा गेम ड्रॉ करून त्‍याने विश्‍वविजेतेपदावर नाव कोरले.

नियमित 12 सामन्यांनंतर दोघेही प्रत्येकी 6 गुणांसह बरोबरीत राहिले होते. आनंद व गेलफांद यांच्यात 10 सामने ड्रॉ झाले. सातव्या सामन्यात गेलफांदने तर आठव्या लढतीत आनंदने विजय मिळवला होता. यानंतर पुन्हा अखेरच्या चार लढती ड्रॉ झाल्या. त्‍यानंतर टायब्रेकरमध्‍येही पहिला गेम ड्रॉ झाला होता. परंतु, आनंदने पुढचे 2 सामने जिंकून गेलफांदला पराभूत केले. टायब्रेकरमध्‍ये आनंदने 2.5-1.5 असा एक सामना जिंकला होता. आनंदने पाच वेळा विश्‍वविजेतेपदावर नाव कोरले आहे. तर यंदाचे विजेतेपद सलग चौथे ठरले आहे.

सातव्‍या डावात गेलफांदने आनंदवर विजय मिळविला होता. त्याने ही लढत 38 चालींच्या बळावर जिंकली. 1993 नंतर आनंदवर बोरिसचा हा पहिलाच विजय होता. परंतु, त्‍यानंतर आनंदने पराभव स्‍वीकारला नाही.

Email Print
0
Comment