Home >> Mukt Vyaspith >> Mirchi By Vilas Phutane
मिरची: माणसं तडफडू लागली जनावरे टाहो फोडतात श्वेतधारी बगळे मात्र...
विलास फुटाणे
| Feb 17, 2013, 01:30AM IST

दुष्काळी भागाला
कोरड्या चकरा
श्रेयासाठी पक्षांच्या
आपसात टकरा !
माणसं तडफडू लागली
जनावरे टाहो फोडतात
श्वेतधारी बगळे मात्र
कोरडी भाषणे झोडतात !!
इंचा-इंचावर जमीन
लागली आहे फाटू
पाण्यावाचून विहिरी
लागल्या आहेत आटू !!!
Ad Link
जाहिरात
ठळक बातम्या
वाचकांची आवड
रंजक बातम्या
जाहिरात





