Home >> Business >> Industries

Industries News

 • Spice Jet ने लाँच केली अवघ्या 699 रुपयांची मॉनसून ऑफर, मोफत युरोप दौऱ्याचीही संधी
  नवी दिल्ली - देशातील मोठ्या डॉमेस्टिक एयरलाईन्स कंपन्यांपैकी एक स्पाईसजेटने आपले मॉनसून ऑफ नुकतेच लाँच केले आहे. यात फक्त 699 रुपये देऊन आपणही तिकीट बुक करून घेऊ शकता. ही ऑफर डॉमेस्टिक उड्डानांसाठी आहे. याचा लाभ घेण्यासाठी आपल्याला 28 जून ते 4 जुलै दरम्यान तिकीट बुक करावे लागणार आहे. स्वस्त हवाई सफर देणाऱ्या स्पाईसजेटने सोबतच आपल्या प्रवाश्यांसाठी एक बंपर योजना सुद्धा लाँच केली. त्यामध्ये मोफत युरोप दौऱ्याचाही समावेश आहे. पुढे... या आहेत बंपर ऑफर्स आणि अटी...
  June 28, 07:30 PM
 • GST: 1 जुलैनंतर असा खरेदी करा किराणा, 18% पर्यंत होईल बचत...
  नवी दिल्ली - गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स अर्थात जीएसटीच्या परिघात येणाऱ्या अशा अनेक वस्तू आहेत ज्यांच्यावर थोडा जरी परिणाम झाला तरी त्यांच्या किमतीत मोठा फरक पडतो. उदाहरणार्थ, काजूवर सध्या 5 टक्के जीएसटी निश्चित करण्यात आला आहे. परंतु यावर मीठ लागलेले असेल तर यावर सरळ 18 टक्के जीएसटी लागेल आणि त्याची किंमत तुम्हालाच द्यावी लागेल. आम्ही तुम्हाला अशा प्रॉडक्ट्सबद्दल सांगत आहोत ज्यांच्यामुळे तुमचे भरपूर पैसे वाचतील. पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, महिन्याच्या किराणातील अशाच काही...
  June 27, 07:23 AM
 • GST: 1 जुलैनंतर टाळा या चुका, अन्यथा होईल 5 वर्षांचा तुरुंगवास...
  नवी दिल्ली - मोदी सरकारने 1 जुलैपासून GST लागू करण्याची घोषणा केली आहे. 1 जुलैनंतर देशात नवा कर कायदा लागू होईल. GSTमध्ये एखाद्याने करचोरी अथवा गैरव्यवहार केला, तर तुरुंगातही जावे लागू शकते. सरकार GSTशी संबंधित आणखी काही कायदे पारित करणार आहे. याअंतर्गत एखाद्याने फसवणूक केल्यास शिक्षा होऊ शकते. या चुकांमुळे होऊ शकते शिक्षा... - जीएसटी कायद्यानुसार एखाद्याने फसवणूक किंवा करचोरी केली तर त्याला शिक्षा होईल. - पावतीमध्ये छेडछाड, कर अधिकाऱ्यांना चुकीची माहिती देणे किंवा कर भरताना काही गडबड करणे...
  June 26, 05:30 PM
 • GST: सोन्याची खरेदी-विक्री नाही राहणार सोपी, 1 जुलैनंतर बदलतील हे नियम...
  नवी दिल्ली - गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स (GST) लागू झाल्यानंतर सामान्यांसाठी सोने, चांदी, हिरे आदी दागिन्यांची खरेदी-विक्री महाग होईल. एवढेच नाही, तर रोख खरेदीपासून ते दागिन्यांची रोख विक्री करण्यात अनेक नियमांचे पालन करावे लागेल. म्हणूनच 1 जुलैनंतर दागिन्यांची खरेदी-विक्री करण्यासाठी या नियमांची माहिती असणे सर्वांसाठी आवश्यक आहे. दागिने, आभूषणे विक्रीवर चेकने पेमेंट होईल. ग्राहकाला रोख रक्कम मिळणार नाही. GST जुने दागिने विक्रीवरही टॅक्स द्यावा लागेल. दागिने खरेदीवर आता पूर्वीपेक्षा जास्त...
  June 25, 12:10 AM
 • 30 जूननंतर असा रिकामा होईल खिसा, या वस्तूंवर आहे 18% जीएसटी...
  नवी दिल्ली - गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स म्हणजेच जीएसटी आता वास्तवात आला आहे. सर्वांना हे माहितीये की सरकारने या कराचे 4 टप्पे पाडले आहेत. यात वेगवेगळ्या वस्तूं आणि सेवांवर 0 ते 28 टक्के टॅक्स निश्चित करण्यात आला आहे. एक ग्राहक म्हणून तुम्हाला हे माहिती पाहिजे की कोणत्या वस्तूवर किती जीएसटी निश्चित करण्यात आला आहे. यामुळे योग्य रीतीने तुम्ही तुमच्या खर्चाचे नियोजन करू शकाल. पाहूयात काही अशा वस्तूंविषयी ज्यांच्यावर 18 टक्के जीएसटी लागणार आहे. पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा आणखी कोणत्या...
  June 24, 05:13 PM
 • सामान्यांच्या खिशाला मोठा दिलासा, या वस्तूंवर आहे 0% GST
  नवी दिल्ली - केंद्र सरकारने अनेक उत्पादनांना जीएसटीच्या परिघाबाहेर ठेवले आहे. एक जुलैपासून या उत्पादनांवर 0% जीएसटी लागेल. याचा अर्थ हाच की, तुमच्या खिशाला यामुळे झळ बसणार नाही. सरकारने ज्या वस्तूंना जीएसटी बाहेर ठेवले आहे, त्यात बहुतांश दैनंदिन वापराच्याच वस्तू आहेत. सेंट्रल बोर्ड ऑफ एक्साइज अँड कस्टम्सने याची सूची जारी केली आहे. यापैकी जास्त वापरल्या जाणाऱ्या वस्तूंची यादी आम्ही येथे बनवली आहे. यामुळे खरेदी करताना तुम्हाला माहिती असेल की कुठली वस्तू खरेदी करायची अथवा कुठली नाही....
  June 22, 01:16 PM
 • तंबाखूने टळू शकतो पावसातील कार अपघाताचा धोका, असा करा वापर....
  नवी दिल्ली - सध्या मान्सून सुरू आहे. अशात पावसादरम्यान ड्राइव्ह करणे महाकठीण होऊन जाते. भलेही तुम्ही वायपर वापरा, पण पावसाचे पाणी कारच्या काचांवरून पूर्णपणे साफ होत नाही. यामुळे बाहेरचे स्पष्ट दिसत नाही अन् अपघाताचे चान्सेस वाढतात. म्हणूनच पुढच्या स्लाइडमध्ये पाहा अशा 3 देशी जुगाडांबद्दल जे सहज उपलब्ध होतात आणि उत्तम कामही करतात. पुढच्या स्लाइडमध्ये पाहा, कोणते आहेत हे देशी जुगाड...
  June 22, 11:21 AM
 • एका रात्रीत उडवले तब्बल 52 कोटी रुपये, हे आहेत सौदी अरबचे नवे क्राऊन प्रिन्स...
  नवी दिल्ली - सौदी अरबचे किंग सलमान यांनी सध्याचे क्राऊन प्रिन्स आणि आपला पुतण्या मोहम्मद बिन नायेफ (57) यांना पदावरून हटवले आहे. किंगने त्यांच्या जागी आपला 31 वर्षीय मुलगा मोहम्मद बिन सलमानला देशाचा नवा क्राऊन प्रिन्स घोषित केले आहे. क्राऊन प्रिन्स सलमानला यासह देशाचे पंतप्रधानही करण्यात आले आहे. याआधी ते उपपंतप्रधान आणि संरक्षण मंत्रिपदाचा पदभार सांभाळत होते. - माध्यमांतील रिपोर्टनुसार, क्राऊन प्रिन्स सलमानला दोन वर्षांपूर्वी कोणीही ओळखत नव्हते. - परंतु वडील किंग बनल्यानंतर त्यांनी...
  June 22, 10:31 AM
 • GST : या 5 चुकांमुळे तुम्ही ठराल गुन्हेगार, 1 जुलैनंतर या टाळणेच योग्य राहील...
  नवी दिल्ली - मोदी सरकारने 1 जुलैपासून गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स (GST) लागू करण्याची घोषणा केली आहे. यानंतर पूर्ण देशात एकसमान टॅक्स पद्धत लागू होईल. GST कायदा लागू होताच अप्रत्यक्ष कराशी जोडलेले डझनभर कायदे रद्द होतील. 1 जुलैपासून या सर्वांच्या जागी फक्त GSTचा कायदा व्यवहारात राहील. बदलून जाईल गुन्ह्याची व्याख्या... - जीएसटी लागू झाल्यानंतर टॅक्सशी जोडलेली गुन्ह्याच्या परिभाषा बदलून जाईल. - जर तुम्ही 1 जुलैपासून टॅक्सशी निगडित एखादा अपराध केला तर तुमच्यावर जीएसटीनुसार कारवाई केली जाईल. -...
  June 20, 04:51 PM
 • GST: नफेखोरीची तक्रार योग्य असल्यास कंपनी ग्राहकाला पैसे परत करणार
  नवी दिल्ली - जीएसटी परिषदेने रविवारी नफेखोरी रोखणाऱ्या कायद्याच्या मसुद्याला मंजुरी दिली. यामध्ये त्रिस्तरीय चौकशीची व्यवस्था आहे. अर्थमंत्री अरुण जेटली महसूल सचिव हसमुख अढिया यांनी सांगितले की, या कायद्यात स्वत:हून दखल तसेच तक्रार अशा दोन्ही पद्धतीने कारवाई होईल. तक्रारीत तथ्य आढळल्यास व्यावसायिक किंवा कंपनीला अयोग्य पद्धतीने कमावलेला नफा ग्राहकांना परत करावा लागेल. जिथे ग्राहकांना पैसे परत करणे शक्य होणार नाही तिथे ही रक्कम ग्राहक कल्याण कोशात जमा होईल. कर कमी केल्यामुळे...
  June 19, 10:59 AM
 • आधार, ईपीएफओच्या UAN डेटात तफावत; 1 लाख सदस्यांचे PF क्लेम अडकले
  नवी दिल्ली- आधार आणि ईपीएफओच्या युनिवर्सल अकाउंट नंबर (UAN) च्या डेटामध्ये तफावत तसल्याने एक लाखाहून अधिक जणांचा PF क्लेम अडकला आहे. हे सर्व जण रोजगार प्रोत्साहन योजना (PMRPY) आणि प्रधानमंत्री परिधान रोजगार प्रोत्साहन योजनेशी (PMPRY) निगडीत आहेत. ईपीएफओ करत आहे व्हेरिफिकेशन सरकारने ऑगस्ट 2016 मध्ये संघटित क्षेत्रातील नोकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या हेतुने याची सुरुवात केली होती. योजनेतंर्गत ईपीएफ अकाउंट असणाऱ्या नव्या कर्मचाऱ्यांना सरकारकडुन सुरुवातीच्या तीन वर्षात 8.33 दराने कॉन्ट्रिब्यूशन...
  June 14, 10:58 AM
 • एनपीएवर 12 जून रोजी अर्थमंत्र्यांची बैठक
  नवी दिल्ली - बँकिंग क्षेत्रातील वाढलेल्या एनपीएसंदर्भात अर्थमंत्री अरुण जेटली १२ जून रोजी बैठक घेणार आहेत. या बैठकीमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील सर्व बँकांचे प्रमुख सहभागी होणार आहेत. बँकांनी आतापर्यंत एनपीए वसूल करण्यासाठी कोणते निर्णय घेतले, तसेच पुढील काळात काय करणार आहेत, यावर या बैठकीत चर्चा होणार आहे. डिसेंबर २०१६ मध्ये एनपीए ६ लाख कोटी रुपयांवर होता.
  May 27, 03:00 AM
 • ऑस्ट्रेलियन प्रकल्पात अदाणींना सवलत नाही, कंपनीकडून रॉयल्टीचा पैसा करणार वसूल
  मेलबर्न- अदाणी समूहाला कार्मिकल कोळसा प्रकल्पात रॉयल्टीमध्ये सूट मिळणार नाही. ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड राज्य सरकारने शुक्रवारी हा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पात रॉयल्टीमध्ये कोणत्याही प्रकारची सूट देण्यात येणार नसल्याचे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर जाहीर करण्यात आले आहे. कंपनीसाठी हा खूप मोठा झटका असल्याचे मानले जात आहे. या निर्णयाची औपचारिक माहिती मिळाल्यानंतरच या विषयावर विचार करण्यात येणार असल्याचे अदाणी ऑस्ट्रेलियाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
  May 27, 03:00 AM
 • रोजगार कमी झाल्याने घरांची मागणी घटणार, आयटी क्षेत्राबाबत जेएलएलचा अहवाल
  मुंबई - आयटी क्षेत्रातील रोजगार जात असल्यामुळे नवीन घरांची मागणी कमी होत आहे. मालमत्ता कन्सल्टन्सी संस्था जोन्स लांग लासेलने (जेएलएल) अापल्या अभ्यास अहवालात हा दावा केला आहे. या अहवालानुसार बंगळुरू, हैदराबाद, पुणे, नवी मुंबई, नोएडासारख्या आयटी हबमध्ये नोकरी जाण्याचा परिणाम दिसेल. बंगळुरू आणि पुणे ही दोन्ही शहर नवीन नोकरीसाठीच नाही तर नवीन घरांच्या निर्मितीसाठीही आयटी कंपन्यांवर अवलंबून आहेत. त्यामुळे आयटी क्षेत्रात अलीकडेच आलेल्या मेल्टडाऊनचे या शहरातील घरांच्या मागणीसाठीही...
  May 27, 03:00 AM
 • जीएसटी लागू झाल्यानंतर दोन महिन्यांत कंपन्यांचे 50 हजार कोटी अडकतील
  नवी दिल्ली - जीएसटी लागू झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात कंपन्यांसमोर खेळत्या भांडवलासंदर्भात काही अडचणी येऊ शकतात. त्यामुळे दोन चार महिन्यांसाठी रोख वाढण्यासंदर्भात उपाय व्हायला हवे, असे इंडिया रेटिंग्ज रिसर्चने एका अहवालात म्हटले आहे. या संस्थेने सुमारे ११ हजार कंपन्यांच्या अध्ययनाच्या निष्कर्षातून हा दावा केला आहे. त्यांच्या मते इनपुट क्रेडिटमध्ये या कंपन्यांचे सुमारे ५० हजार कोटी रुपये अडकतील. सेवाकर १५ वरून १८ टक्क्यांवर गेल्याने कंपन्यांच्या अल्पमुदतीच्या खेळत्या...
  May 23, 03:00 AM
 • रॉयल्टीमुळे अदाणींनी टाळली ऑस्ट्रेलियातील गुंतवणूक
  मेलबर्न - अदाणी समूहाने ऑस्ट्रेलियातील कार्मिकल काेळसा खाणीत गुंतवणूक करण्याचा निर्णय मागे घेतला आहे. अनेक दिवसांपासून सतत वादातच अडकलेल्या क्वीन्सलँडमधील या प्रकल्पाची किंमत १४ कोटींच्या घरात आहे. कंपनीच्या प्रवक्त्यांच्या मते, क्वीन्सलँड सरकारला याच महिन्यात रॉयल्टीबाबतचा निर्णय घ्यायचा होता. परंतु, त्यांनी कोणताच निर्णय न घेतल्यामुळे अदाणी समूहाने हा निर्णय घेतला आहे. क्वीन्सलँडच्या मुख्यमंत्री अॅनास्टेसिया पलासजुक यांनी सांगितले की, या मुद्यावर अद्याप कॅबिनेटचा...
  May 23, 03:00 AM
 • प्लास्टिक उद्योगात 10 लाख अभियंत्यांची गरज
  गृहोपयोगी वस्तूंपासून ते मोठमोठ्या औद्याेगिक आस्थापनांमध्ये वापरण्यात येणाऱ्या वस्तूंत प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. दैनंदिन जीवनात उपयोगी पडणाऱ्या बहुतांश वस्तू प्लास्टिकपासून निर्मित आहेत. याचा वापर वाढल्याने प्लास्टिक उद्योगही वाढत आहे. मात्र यात काम करणाऱ्यांची कमतरता भासत आहे. अभियांत्रिकीत रस असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा चांगला पर्याय असू शकतो. देशभरात प्लास्टिक प्रक्रिया करणारे ३० हजार प्रक्रिया प्रकल्प आहेत. यात ४० लाख कर्मचारी काम करतात. पैकी ८५ ते ९०...
  May 22, 07:28 AM
 • मुंबईतील शोसाठी बीबर घेणार 20 कोटी रुपये, सर्वात महागड्या तिकीटाची किंमत 76 हजार
  नवी दिल्ली - पॉप स्टार जस्टिन बीबर 10 मे रोजी मुंबईत होणाऱ्या कॉन्सर्टसाठी 20 कोटी रुपये घेणार आहे. moneybhaskar.com मिळालेल्या एक्सक्लूझिव्ह माहितीनुसार, बीबरचा हा शो देशातील आतापर्यंतच्या शोमध्ये सर्वात महागडा असणार आहे. कॉन्सर्टसंबंधीच्या कंपनीच्या सूत्रांनी moneybhaskar.com ला सांगितले, की या शोवर जवळपास 100 कोटी रुपये खर्च होणार आहे. यात बीबरलाच 20 कोटी रुपये दिले जाणार आहे. 100 कोटींचा असेल मेगा शो - जस्टिन बीबरचा शो आयोजित करणारी कंपनी आणि इव्हेंट मॅनेजमेंट इंडस्ट्रीच्या सूत्रांच्या माहितीनुसार,...
  May 9, 08:51 PM
 • स्टार्टअप्ससाठी कंपनी झटपट बंद करणे शक्य, छोट्या कंपन्या, एलएलपीच्या नियमांत बदल होणार
  नवी दिल्ली- स्टार्टअप्स व छोट्या कंपन्यांसाठी आता व्यवसाय बंद करणे अधिक सोपे होणार आहे. या प्रक्रियेला गती देण्यासाठी इन्सॉल्व्हन्सी व बँकरप्सी (आयबीबीई) नियमांत बदल केले जाणार आहेत. त्यानुसार आयबीबीईच्या नव्या नियमांचा मसुदा तयार करण्यात आला आहे. स्टार्टअप्स व छोट्या कंपन्यांसाठी लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप (एलएलपी) फर्मलादेखील त्यात सामील करून घेतले जाणार आहे. नव्या मसुद्यासाठी ८ मेपर्यंत सर्व पक्षांना आपला सल्ला देता येऊ शकेल. आयबीबीई कंपन्यांसंबंधीच्या मंत्रालयाच्या...
  April 24, 08:56 AM
 • केअर्न एनर्जीला प्राप्तिकर विभागाची 30,700 कोटी दंड भरण्याची नोटीस
  नवी दिल्ली - प्राप्तिकर विभागाने ब्रिटिश संस्था केअर्न एनर्जीला नवीन नोटीस पाठवली आहे. ही नोटीस ३०,७०० कोटी रुपयांच्या दंडाची आहे. देशाच्या इतिहासातील ही सर्वात मोठ्या दंडाची नोटीस असण्याची शक्यता आहे. विभागाने कंपनीला आधी १०,२४७ कोटी रुपये भांडवली लाभ कराची (कॅपिटल गेन्स) नोटीस पाठवली होती. ही रक्कम भरण्यात आली नसल्याने तिप्पट दंड आकारण्यात आला आहे. प्राप्तिकर लवादाने ९ मार्च रोजी १०,२४७ कोटी रुपयांच्या रेट्रोस्पेक्टिव्ह (आधीच्या तारखेपासून) कर योग्य असल्याचा निकाल दिला होता,...
  April 21, 04:00 AM
 
जाहिरात
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
जाहिरात
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 

हास्ययात्रा