Home >> Divya Marathi Special
 • गरज नव्या ‘सत्यशोधक’ नजरेची
  आधुनिक भारताच्या सामाजिक जडणघडणीत महाराष्ट्राचा, विशेषतः पुण्याचा लक्षणीय वाटा आहे. १९ व्या शतकात पुणे हे भारतीय प्रबोधन चळवळींचे केंद्र होते. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, लोकहितवादी, न्या. रानडे, रमाबाई रानडे, पंडिता रमाबाई, आगरकर, महर्षी कर्वे, बायजा कर्वे, महर्षी शिंदे आदींनी सामाजिक परिवर्तनाच्या चळवळींना ऊर्जा पुरवली. यापैकी महात्मा फुले यांच्या निधनाला यंदा १२५ वर्षे पूर्ण होत आहेत. सव्वाशे वर्षांपूर्वीच्या या महात्म्याचा आज काय उपयोग? किती वर्षे त्यांच्या आरत्या...
  November 28, 06:29 AM
 • 'जीएसटी' म्हणजे काय रे भाऊ! हिवाळी अधिवेशनात तरी मंजुर होईल का?
  जीएसटी हा शब्द गेली आठ-नऊ वर्षांपासून आपण सातत्याने ऐकतो आहे. जीएसटी अर्थात गुड्स अॅण्ड सर्व्हिस टॅक्स (वस्तु व सेवा कर) विधेयक 6 मे 2015 रोजी लोकसभेत संमत झाले खरे. परंतु अजूनही देशात ते लागू झालेला नाही. जीएसटीचे भिजत घोंगडे पडले आहे. गुरुवारपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु झाले आहे. मात्र, हे अधिवेशन देशात वाढत्या असहिष्णुतेच्या मुद्द्यावरून वादळी ठरणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. तसेच जीएसटी सारख्या महत्त्वाचे विधेयक मंजुर करवून घेताना मोदी सरकारच्या तोंडाला फेस येणार आहे. दरम्यान,...
  November 27, 12:33 PM
 • यकृत, फुप्फुसांना नुकसान, क्षयही
  बालकामगारांचे वाढते प्रमाण चिंतेचा विषय बनला आहे. कारखान्यात खाणीतच नव्हे, तर फटाके बनवणे, हिऱ्याला पैलू पाडणे, सुतळीपासून वस्तू तयार करणे, विड्या वळणे, गालिचा तयार करणे अशा अनेक ठिकाणी लहान मुलांचा कामगार म्हणून वापर केला जातो. भारतात आठ कोटींच्या आसपास बालमजूर आहेत. जेव्हा चौदा वर्षांपर्यंतची कामे मुले कष्ट करून स्वत:चे वा इतरांचे चरितार्थ चालवण्यासाठी धडपडत असतात, तेव्हा ते बालमजूर ठरतात. चहाची दुकाने, टपऱ्या, छोटी मोठी गॅरेज, किराणा मालाची दुकाने, उपाहारगृहे अशा सर्व ठिकाणी...
  November 27, 01:58 AM
 • अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली विचारांवरील हल्ला धोकादायक
  विचार हीच माणसाची खरी शक्ती आहे. ही शक्तीच त्याला इतर प्राण्यांपासून वेगळे अस्तित्व निर्माण करून देते. विचारांच्या बळावरच माणसाने जगावर राज्य सुरू केले. त्याच्याशिवायच्या प्राणिमात्रांवर प्रभुत्व मिळवण्याची, त्यांच्यावर अंकुश ठेवण्याची आणि त्यांना आपल्या मनाप्रमाणे वाकवण्याची, फिरवण्याची ताकद माणसात विचारांमधून आली आहे. मनुष्य जसजसा विकसित होत गेला तसतसे त्याला विचारांचे सामर्थ्य कळत गेले. त्यातून अनेक चांगल्या गोष्टी घडत गेल्या. काही वाईट प्रथा, परंपराही निर्माण झाल्या....
  November 27, 01:41 AM
 • संविधान दिन: जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीची घटना तयार झाली 2 वर्षे 11 महिन्यात
  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्त्वातील घटना समितीने तयार केलेला मसुदा 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्विकारला गेला होता. 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. 1949 मध्ये या दिवसापासून नागरिकत्व, निवडणुका व अंतरिम संसदेविषयीचे आणि इतर काही तात्पुरत्या बाबी तत्काळ लागू झाल्या. संपूर्ण राज्यघटनेची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 रोजी झाली. या दिवसानिमीत्त divyamarathi.com भारतीय राज्यघटना आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी महत्त्वपूर्ण माहिती देत आहे. घटनासमितीने...
  November 26, 11:54 AM
 • बाजाराचे संसदेच्या हिवाळी अधिवेशनावर लक्ष
  देशातील अर्थव्यवस्थेत ट्रिगरची कमतरता आणि जागतिक बाजारात असलेल्या सतर्कतेमुळे गेल्या आठवड्यात देशातील शेअर बाजारात कमजोरी कायम राहिली. युरोपमधील काही देशांमध्ये दहशतवादी हल्ल्यांची शक्यता पाहता जगभरातील गुंतवणूकदारांच्या धारणेवर परिणाम झाला. वास्तविक अमेरिकी शेअर बाजारात गेला आठवडा खूपच चांगला राहिल्यानंतर काही सतर्क राहण्याची अपेक्षा होती आणि जगभरातील बाजारात कोणतीच सकारात्मक घडामोड नाही. या व्यतिरिक्त चीनची अर्थव्यवस्थेमुळे चिंता आहेच आणि फेडरल रिझर्व्हच्या पुढील...
  November 26, 01:45 AM
 • समग्र अहवालाच्या आधारेच आरक्षणाचे लाभ द्यावेत
  ओ बीसी आरक्षण म्हणजे काय ? ओबीसी आरक्षण हे सवर्णांचे आरक्षण आहे. ओबीसी आरक्षणात सोनार, जव्हेरी, सोनी, वाणी, वैश्यवाणी, लाडवाणी, लिंगायत वाणी, काथार वाणी, तेली, जैनशिंपी, जैन कोष्टी, यादव, क्षत्रिय कुर्मी, कोयरी, जाट, गुजर, लेवा पाटील, लेवा पाटीदार, भंडारी, आग्री, कुणबी, मराठा कुणबी, माळी, बारी, वंजारी, धनगर, हटकर, भावसार या उच्च व सवर्ण जातींचा समावेश आहे. ओबीसी जातींचा सामाजिक मागासलेपणा हा व्यावसायिक व आर्थिक मागासलेपणाचा परिणाम आहे. म्हणून ओबीसी जातींत जन्मलेले, परंतु आर्थिकदृष्ट्या प्रगत लोक...
  November 25, 01:55 AM
 • नगरच्या किल्ल्याच्या संवर्धनाचे पाऊल पडते पुढे..!
  महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशभरातील भुईकोट किल्ल्यांमध्ये लष्करीदृष्ट्या अद्वितीय आणि अभेद्य ठरलेल्या नगरच्या किल्ल्याच्या जतन व पर्यटन विकासाचे रखडलेले गाडे अखेर मार्गी लागत अाहे. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी संरक्षण मंत्रालय आणि राज्य सरकारमध्ये येत्या दाेन महिन्यांत सामंजस्य करार हाेत असल्याची ग्वाही दिल्यामुळे नगरचा हा मानबिंदू पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनणार हे अाता निश्चित. अहमद निझामशहाने सन १४९० मध्ये कोटबाग निझाम महाल बांधून त्याभोवती हा किल्ला बांधला....
  November 24, 03:28 AM
 • एक कोटी लोकांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींमुळे भेट
  सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी जशाच्या तशा मान्य केल्यास सरकारच्या खजिन्यावर १.०२ लाख कोटी रुपयांचे ओझे पडणार आहे. मात्र, याचा फायदा देशातील एक कोटीपेक्षा जास्त नागरिकांना मिळेल. यामध्ये ४८ लाख सध्याचे केंद्रीय कर्मचारी आणि ५५ लाख पेन्शनर यांचा समावेश आहे. या सर्वांची जवळपास २३.५ टक्क्यांनी पगारवाढ होणार आहे. नोकरदारांमध्ये वरच्या पातळीवर हे सर्वात जास्त तर खालच्या क्रमाने कमी होईल. असे झालेही पाहिजे. खालच्या पातळीवरील कर्मचारी प्रशिक्षणार्थीच्या पातळीवर असतो, तर वरच्या पदावरील...
  November 24, 02:19 AM
 • गृहकर्जानंतर सुखाच्या झोपेसाठी...
  एका सामान्य मध्यमवर्गीय व्यक्तीचे सर्वात मोठे कर्जदायित्व हे घरासाठी घेतलेले कर्ज हेच असल्याचे बहुतांबाबत आढळून येईल. अनेकांबाबत त्यांचा संपूर्ण कमावता काळ हा गृहकर्जाचे हप्ते चुकते करण्यात जातो. कुणाही व्यक्तीला कर्जाचे ओझे नको असते व त्यापासून मुक्त व्हावे अशीच त्याची स्वाभाविक अपेक्षा असते. कर्जभाराने मुक्त स्वमालकीचे घर ही कल्पना त्यांच्यासाठी निश्चितच सुखावणारी असते. परंतु आपले जीवन सरळमार्गी नसते. एका प्रसंगी अचानक मोठा आर्थिक लाभ होऊन कर्जफेड आंशिक का होईना लवकर...
  November 23, 02:00 AM
 • पहिल्या वर्षी नापास, नंतर कर्करोग उपचारात अव्वल
  विजयालक्ष्मी देशमाने, कर्करोगतज्ञ - जन्म- :१९५५ - आई :रत्नम्मा, वडील: बाबूरावमजूर, बहिणी एक भाऊ {शिक्षण:एमबीबीएस - कुटुंबीय:अविवाहित चर्चेत:प्रतिष्ठित किडवई रुग्णालयाच्या अाँकोलॉजी विभागाच्या एचओडी पदावरून देशमाने नुकत्याच निवृत्त झाल्या. कर्नाटकच्या कलबुर्गीतील गाझीपूरच्या नाटिकेरी या दाट वस्तीत विजयालक्ष्मी यांचा जन्म झाला. आई भाजी विकायची. लहान विजयालक्ष्मीही तिच्यासोबत डोक्यावर परडी घेऊन फिरायची. दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत होती. वडील एमएसके मिलमध्ये मजुरी करायचे. त्या...
  November 21, 08:02 AM
 • कंपनी मालकाने उमेदवार उतरवून जिंकली निवडणूक
  साबू जॅकब, एमडी, किटेक्स गारमेंट्स - वय -सुमारे ४५ - आई -एम.सी. जॅकब, भाऊ बबन - पत्नी-रंजनाजोसेफ - शिक्षण- केरळविद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवीधर. चर्चेत-त्यांच्या कंपनीनेकेरळ निवडणुकांत उमेदवार लढवून बहुतांश जागी विजय मिळवला. डाव्यांचा प्रभाव असलेल्या केरळमध्ये साबूंच्या कंपनीत एकही युनियन बनू शकली नाही. एखादी कंपनी देशाच्या निवडणुकीत भाग घेऊन आपले उमेदवार निवडून आणण्याची ही शक्यतो देशातील पहिलीच घटना असेल. साबू जॅकब यांनी ते सत्यात उतरवले आहे. साबूंच्या वडिलांनी १९६८ मध्ये...
  November 21, 07:54 AM
 • पंजाबमध्ये मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांनी सोमवारी पंजाबी जनतेची जाहीर माफी मागितली. एक वर्षापासून पंजाबमध्ये पवित्र गुरुग्रंथसाहिबचा अवमान करणाऱ्या घटना घडल्या. त्यातून हिंसाचार झाला. दिवाळीला झालेल्या सरबत खालसामुळे परिस्थिती आणखी बिघडली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना जाहीर माफी मागावी लागली. पं तप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी प्रकाशसिंग बादल हे नेल्सन मंडेला आहेत, असे विधान केले होते. या विधानाची भरपूर खिल्ली उडाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि प्रकाशसिंग बादल...
  November 19, 12:53 AM
 • शहिदांचा विसर न पडावा!
  घरात बसून दूरचित्रवाणीवरच्या पडद्यावरून पाहायला मिळणाऱ्या किंवा वृत्तपत्रांतून वाचायला मिळणाऱ्या युद्धकथा कमालीच्या रोमांचक, थरारक असतात. जवानांना मात्र जिवाची बाजी लावावी लागते. एक क्षण आयुष्य संपवायला पुरेसा असतो. चोवीस तास मारा किंवा मरा हे आव्हान डोळ्यात तेल घालून पेलावे लागते. असे आव्हान झेलण्याची पहाडी छाती असणारे कर्नल संतोष महाडिक यांना काश्मीरच्या कुपवाड्याजवळ वीरमरण प्राप्त झाले. सातारा जिल्ह्यातल्या छोट्या खेड्यातून १९९८ मध्ये सैन्यात भरती झालेल्या या तरुणाने...
  November 19, 12:39 AM
 • जनधन योजना : बदलासाठीचे ‘बँकमनी’ इंजिन!
  जनधन या राष्ट्रीय योजनेला सुरुवात होऊन नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले. प्रत्येक भारतीय नागरिकाला आर्थिक स्वातंत्र्य देण्याची क्षमता असलेल्या या योजनेमुळे देशात एक क्रांतिकारी बदल होतो आहे. समृद्ध आणि आधुनिक समाजाच्या वाटचालीतील या अपरिहार्य बदलाविषयी... ब हुचर्चित प्रधानमंत्री जनधन योजनेची सुरुवात होऊन गेल्या २८ ऑगस्टला एक वर्ष पूर्ण झाले. बँकिंगच्या माध्यमातून ज्या ३० ते ४० टक्के नागरिकांनी गेली ६८ वर्षे आर्थिक फायदे करून घेतले, ते फायदे एक भारतीय नागरिक या नात्याने सर्व नागरिकांना...
  November 18, 02:00 AM
 • अशांत पंजाब
  खलिस्तान चळवळीने ८० च्या दशकात पेटलेला पंजाब पुन्हा पेटेल, अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. त्या वेळी सत्तेत असलेले व विरोधक असलेले लोकनेते आजही त्याच प्रकारचे राजकारण करत आहेत. बदलला आहे फक्त काळ. गेल्या महिन्यात १० ऑक्टोबर रोजी शीख समाजाच्या पवित्र ग्रंथाचा अवमान करण्यात आला व त्यामुळे बब्बर खालसापासून, खलिस्तान मुक्ती मोर्चापर्यंत सर्व कडवे शीख गट राज्यातील भाजप-अकाली दल सरकारच्या विरोधात एकवटले. १० नोव्हेंबर रोजी सरबत खालसा बोलावण्यात आली होती. या सभेला झालेली अभूतपूर्व...
  November 18, 02:00 AM
 • नेहरू व बांडुंग परिषद : परराष्ट्र धोरणातला सुवर्णाध्याय
  साठ वर्षांपूर्वी एप्रिल १९५५ मध्ये इंडोनेशियातील बांडुंग शहरात परिषद भरली होती. तिच्या आयोजनात तत्कालीन भारतीय पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंचा मोलाचा वाटा होता. नुकतीच १४ नोव्हेंबरला माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंची १२५ वी जयंती साजरी करण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर हा लेख. मा गील महिन्यात भारताने ५४ आफ्रिकी देशांच्या शिखर परिषदेचे अतिशय यशस्वी आयोजन केले होते. अशीच एक परिषद बरोबर साठ वर्षांपूर्वी एप्रिल १९५५मध्ये दक्षिण-पूर्व आशियातील इंडोनेशियामध्ये बांडुंग शहरात भरली होती....
  November 17, 02:03 AM
 • नथु‘रामायण’
  भारताची फाळणीनंतर उसळलेली हिंदू-मुस्लिम दंगल, हिंदू निर्वासितांचा झालेला छळ आणि नवजात पाकिस्तानला भारताने दिलेले ५५ कोटी रुपये या सर्व घटनांना केवळ मोहनदास करमचंद गांधीच जबाबदार आहेत, असा नथुराम गोडसेचा ठाम गैरसमज होता. गोडसेच्या दृष्टीने गांधी देशाचे शत्रू होते. त्याची शिक्षा देण्यासाठी त्याने गांधींना संपवले. हा कुविचार करणारा गोडसे तेव्हाही एकटा नव्हता. आजही त्याचा विचार जिवंत ठेवणाऱ्यांची संख्या कमी नाही. खेदाची गोष्ट म्हणजे खुनी नथुरामला संत ठरवण्याचेच पद्धतशीर प्रयत्न सुरू...
  November 17, 12:11 AM
 • पगाराबद्दलची माहिती सर्वांना दिल्यास कर्मचाऱ्यांना फायदा
  36 वर्षीय किकुचीने मॅनहटनमधील न्यू याॅर्क शहरातील समअाल या एका मार्केटिंग अॅनालिटिक्स कंपनीत नाेकरी पत्करली हाेती. ती दीड वर्षांपूर्वीच कंपनीत दाखल झाली हाेती. काही अन्य कर्मचारी, विशेषत्वे अन्य महिला कर्मचाऱ्यांप्रमाणेच किकुचीला पगाराबाबत चर्चा करण्यास धजावत नव्हती. तिचे म्हणणे असे हाेते की, तुम्ही स्वतची किंमत कशी ठरवू शकता. मग त्याबाबत मागणी करण्याची तर गाेष्टच साेडा. मात्र, यावेळी किकुचीला एक अाधार गवसला हाेता. कंपनीने प्रत्येक कर्मचाऱ्याला एक दस्तावेज दिला हाेता. त्यात...
  November 15, 08:29 AM
 • जपान- अमेरिकेप्रमाणेच ब्रिटनचाही दौरा; कूटनीतीपेक्षा गुंतवणुकीवर भर
  मोदींचा ब्रिटन दौराही जपान आणि अमेरिकेच्या ट्रॅकवरच पुढे जात असल्याचे आहे. तेथेही कूटनीती-लष्करी मुद्द्यांना वगळून डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया, ग्रीन एनर्जी आणि गुंतवणुकीवरच त्यांचा जास्त फोकस आहे. इतर देशांप्रमाणेच येथेही दहशतवादविरोधी लढाईवर सहमती झाली आहे. भारत-ब्रिटनदरम्यान १४ अब्ज डॉलरचे करार झाले. ते ऊर्जा, एंटरटेनमेंट, मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया आणि सौर ऊर्जा स्टोअर चेन यांना नवी दिशा देऊ शकतात. पण त्यातून किती रोजगार उपलब्ध होतील हे सध्यातरी निश्चित नाही. गुंतवणूक आणणे हा...
  November 14, 01:49 AM
 
जाहिरात
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
जाहिरात
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 

हास्ययात्रा