
ऐन सुटीच्या हंगामात ‘एअर इंडिया’च्या वैमानिकांनी एकसाथ आजारपणाची रजा घेऊन प्रवासी व पर्यटकांचे हाल केले...
भारत-पाकिस्तान क्रिकेट संबंध जिव्हाळ्याचे आणि तिरस्काराचेही आहेत. तुझे माझे जमेना आणि तुझ्याविना करमेना अशीच...
आधार वाटण्याऐवजी ‘समाज’ नावाच्या समूहाची दहशतच मोठी. समाज काय म्हणेल, या भीतीपोटी सावध पावले उचलणा-यांची (खरे...
उशिरा का होईना, सोनिया गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांना काही खडे बोल सुनावले आहेत. काँग्रेस अध्यक्ष सोनिया...
अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांची नुकतीच झालेली भारतभेट ही इराणची चोहोबाजूंनी कोंडी करण्याचा अमेरिकेचा एक मोठा ‘डिप्लोमॅटिक’ प्रयत्न होता. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे एफडीआयच्या बाजूने मन वळवण्यासाठी हिलरी क्लिंटन या भारतात आल्या होत्या, असे चित्र आपल्याकडील मीडियाने तयार केले होते. पण या भेटीचा मूळ उद्देश भारताने इराणकडून...
केंद्रीय अर्थसंकल्पात सरकारने सोन्याच्या दागिन्यांवर लादलेले एक टक्का उत्पादन शुल्क अखेर मागे घेण्याची घोषणा अर्थमंत्री प्रणब मुखर्जी यांना करावी लागली आहे. सोन्यावरील हा कर लादल्यापासून देशातील सराफांनी याला विरोध केला होता आणि या निषेधार्थ 21 दिवस संप पुकारून आपल्या भावना सरकारपर्यंत पोहोचवल्या होत्या. अखेरीस सोन्या-चांदी व्यापार्यांच्या एकजुटीचा विजय झाला आणि...
फ्रान्समधील सत्तापालट तसा अपेक्षितच होता. निकोलस सर्कोझी हे प्रस्थापित अध्यक्ष धोरण व मुत्सद्देगिरीपेक्षा त्यांच्या खुशालचेंडू उडाणटप्पूपणासाठी प्रसिद्ध होते. त्यात भर पडली होती त्यांच्या अरेरावी आणि वर्णद्वेष्ट्या वृत्तीची. अध्यक्ष म्हणून 2007 मध्ये निवडून आल्यानंतर सर्कोझींनी ‘रिफॉर्म’च्या नावाखाली बेभान ‘मार्केटशाही’ सुरू केली. त्या नवसुधारणावादी आर्थिक...
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) नुकत्याच लागलेल्या निकालामध्ये महाराष्ट्रातील 80 उमेदवारांनी पटकावलेले यश मराठी प्रसारमाध्यमांमध्ये नकारात्मक पद्धतीने मांडले गेलेले आहे. वास्तविक अखिल भारतीय स्तरावरच्या परीक्षांमध्ये कोणत्याही राज्याचा ठसा असणे किंवा त्या राज्यांतील बहुतेक उमेदवारांचे नाव अंतिम यादीत असणे हा या परीक्षांकडे बघण्याचा निखळ दृष्टिकोन असू शकत...
आणखी दोन वर्षांनी होणारी लोकसभा निवडणूक सर्वार्थांनी ऐतिहासिक होणार, असे मानले जात आहे. राजकीय भूकंप होईल, कुणीतरी धूमकेतूसारखे आकस्मिकपणे अवतरेल वा एखाद्या महा-अराजकाला सुरुवात होईल, अशी भाकिते केली जात आहेत. बहुतेक लोक, पत्रकार, राजकारणी आणि पंडित मंडळी मात्र काँग्रेस वा भाजप किंवा त्यांच्या पुढाकाराने उभ्या होणा-या आघाड्या, डाव्यांची तिसरी वा शरद पवारांची चौथी आघाडी,...
एकेका सामन्यासाठी कोट्यवधी रुपये कमावणारा सचिन तेंडुलकर, एकेका चित्रपटासाठी कोट्यवधी रुपयांचे मानधन घेणारी माधुरी दीक्षित, एकेका मराठी चित्रपटातून लाखो रुपयांचा नफा मिळवणारा महेश मांजरेकर आणि शासनाच्या प्रत्येक सांस्कृतिक योजनेवर व्यवस्थित ‘हात’ मारणारा नितीन चंद्रकांत देसाई यांना आपण ‘देशसेवा’ करणारे मान्यवर म्हणून अजून किती काळ डोक्यावर घेऊन नाचणार? या...
कल्पना करा, के. एल. सैगलचा दर्दभरा आवाज आपल्यापर्यंत पोहोचलाच नसता, लता मंगेशकर-नूरजहाँ-महंमद रफी यांच्या नादमय स्वराने आणि खेमचंद प्रकाशपासून सी. रामचंद्र-आर.डी. बर्मन ते आजच्या ए. आर. रहमान यांच्यापर्यंतच्या संगीत जादूगारांनी रचलेल्या रचनांनी आपल्याला वेडावून टाकले नसते, दिलीपकुमार-बलराज साहनी यांच्या बावनकशी अभिनयाचे आपल्याला दर्शनच घडले नसते, बिमल रॉय, के. आसिफ, महबूब...
पांढरपेशा शहरी मंडळींच्या दृष्टीने मे महिना म्हटला की सुटी, पर्यटन, आंबे, आइस्क्रीम अन् एकुणातच धमाल, मौजमस्ती.. असा माहोल असतो. परंतु बाकीच्या बहुसंख्य वर्गासाठी मे महिना पाण्यासाठी भटकंती, रखरखाट आणि उकाडाच घेऊन येत असतो. यंदाचे वर्षसुद्धा त्याला अपवाद नाही. राज्याच्या अनेक भागांवर सध्या दुष्काळाचा फेरा आला असताना उत्तर महाराष्ट्रात तर त्याच्या झळा तापत्या उन्हाएवढ्याच...
आजकाल 1 मे हा कामगार दिन आहे, याचा जवळजवळ सर्वांनाच विसर पडला आहे. नाही म्हणायला काही कामगार संघटना आणि विविध कम्युनिस्ट पक्षांना या कामगार दिनाचे स्मरण होते. पण पूर्वी जसा हा दिवस लाल बावट्यांनी आणि क्रांतिकारक घोषणांनी लाखोंच्या साक्षीने साजरा केला जात असे, तसा आता तो साजरा होत नाही. खरे म्हणजे भारतातील कामगार चळवळीची मुहूर्तमेढ महाराष्ट्रात रोवली गेली. मुंबईचा गिरणी...