Home >> Editorial >> Agralekh

Agralekh

 • अस्थैर्याच्या काठावर (अग्रलेख)
  उद्या नरेंद्र मोदी यांच्या सरकारला तीन वर्षे पूर्ण होत आहेत. साहजिकच मोदी सरकारच्या कामकाजाचे प्रसारमाध्यमांकडून सर्वेक्षण जाहीर केले जाईल. बहुतांश प्रसारमाध्यमे आर्थिक आघाड्यांवर सरकार किती यशस्वी झाले याचा धांडोळा घेताना आढळतात. पण विद्यमान सरकार वा व्यवस्था देशाची अंतर्गत सुरक्षा योग्य प्रमाणात हाताळण्यात यशस्वी झाली का, या प्रश्नाच्या शोधात किंवा खोलात त्यांना जायचे नसते. विशेषत: काश्मीरसारख्या वादग्रस्त विषयावर देशात जे दोन तट पडले आहेत त्यावर राष्ट्रवादाचा जो उन्माद...
  03:01 AM
 • विखारी वृत्तीचे आव्हान (अग्रलेख)
  गेल्या मार्च महिन्यात ब्रिटनमध्ये संसद परिसरामध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. त्या हल्ल्यानंतर संपूर्ण ब्रिटनमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. पोलिसांनी सावधानतेच्या सूचना दिल्या होत्या तरीही कॉस्मोपॉलिटन संस्कृती असलेल्या मँचेस्टर शहरात काल एका पॉप शोमध्ये एका माथेफिरूने स्वत:ला बॉम्बने उडवून दिले व निष्पाप २२ तरुण मुलामुलींचा बळी गेला. ब्रिटनमध्ये ८ जूनला सार्वत्रिक निवडणुका होत असून त्या पार्श्वभूमीवर हा दहशतवादी हल्ला झाल्याने परिस्थिती तणावपूर्ण झाली...
  May 24, 03:00 AM
 • बेजबाबदार ट्रम्प (अग्रलेख)
  हाती अमर्याद सत्ता एकवटलेली असल्याने अमेरिकेचा अध्यक्ष हा सर्वशक्तिमान समजला जातो. पण हाती अमर्याद सत्ता असली तरी अध्यक्षाच्या अधिकार क्षेत्रावर अंतर्गत सुरक्षा पाहणारी एफबीआय यंत्रणा, गुप्तहेर संघटना सीआयए, संसद व मीडिया यांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष दबाव असतो. तरीही अध्यक्ष एखाद्या यंत्रणेला बेदखल करणारे, त्या यंत्रणेला अंधारात ठेवणारे, अमेरिकेच्या हिताला बाधा येऊ शकणारे आततायी निर्णय घेऊ शकतो. अमेरिकेच्या इतिहासात या यंत्रणा एकमेकांविरोधात काम करतानाही दिसून आल्या आहेत. जॉन...
  May 23, 03:00 AM
 • जीएसटीचे वारे (अग्रलेख)
  केंद्र सरकारकडून जीएसटीसंदर्भात श्रीनगरमध्ये आयोजित केलेल्या परिषदेनंतर कोणत्या वस्तू महाग किंवा स्वस्त होणार याचे चित्र हळूहळू स्पष्ट होऊ लागले आहे. मार्चमध्ये संसदेच्या उन्हाळी अधिवेशनात जीएसटी कायदा संमत झाला; पण माध्यमांमध्ये या कायद्यातल्या तांत्रिक बाजूंवर व राजकीय पक्षांच्या राजकारणावर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. त्यातून लोकांमध्ये संभ्रमच निर्माण झाला. दुसरीकडे कायदा संमत झाला; पण तो अस्तित्वात आल्यानंतर पाहून घेऊ, अशीच मानसिकता व्यापारी व उद्योजकांमध्ये तयार...
  May 22, 03:49 AM
 • आले रजनीदेवाच्या मना...(अग्रलेख)
  देव हा सर्वश्रेष्ठ. देवाची इच्छा अंतिम. त्यापुढे प्रश्न नाही. आर्जव नाही. वाद नाही. वितंडवाद तर अजिबातच नाही. भक्ताने दिव्य संदेश मानावा आणि फळाची अपेक्षा न करता कर्म करीत राहावे. हा शिरस्ता पाळत युगे नि शतके उलटली, पण त्यात बदल नाही. यापुढच्या काळातही संभवत नाही. तो व्हावा तरी का? देव-धर्म आणि त्यातून निर्माण होत गेलेल्या रूढी-परंपरा हा आमच्या संस्कृतीचा बहुमोल ठेवा आहे. याचं भान जितकं तुम्हा-आम्हाला आहे, त्याहून अधिक थलाइवा द ग्रेट रजनीकांतला आहे. त्याचा पडद्याबाहेरचा सगळा व्यवहार देवाला...
  May 20, 02:44 AM
 • पाकिस्तानला चपराक (अग्रलेख)
  संयुक्त राष्ट्रांच्या हेगस्थित आंतरराष्ट्रीय न्यायालयाने भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या फाशीला दिलेली स्थगिती हा भारतीय परराष्ट्रनीतीचा, मुत्सद्देगिरीचा विजय समजला पाहिजे. मुद्देसूद युक्तिवाद, कोणताही आक्रस्ताळेपणा नाही, व्हिएन्ना कन्व्हेन्शनच्या चौकटीत मांडलेला काटेकोर दावा आणि भारत हा देश सुसंस्कृत लोकशाही देश असून हा देश मानवाधिकाराबाबत अत्यंत संवेदनशील असल्याची प्रतिमा भारताच्या वकिलांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयात उभी केल्याने पाकिस्तानचे जवळपास सर्व दावे...
  May 19, 03:00 AM
 • पुणतांब्याची सोशीक माघार ( अग्रलेख)
  भीक नको घामाचे दाम हवे, शेतकऱ्याची कर्जमुक्ती, उत्पादन खर्चावर आधारित भाव, शेतकऱ्यांच्या लुटीचे षड्यंत्र हे मुद्दे शरद जोशींनी ऐंशीच्या दशकात ऐरणीवर आणले. सरकारी धोरणांमुळे शेती तोट्यात आणि शेतकरी गरीब असल्याची शास्त्रशुद्ध मांडणी जोशींनी देशात पहिल्यांदा केली. आता परिस्थिती अशी की, सत्तेतला किंवा विरोधातला कोणताही राजकारणी या मांडणीबाहेरचे काहीच बोलत नाही. राज्यकर्त्यांच्या विरोधात जोशींनी सुरू केलेल्या शेतकरी दिंड्यांचे अनुकरण शरद पवारांसारख्या नेत्यानेही केले. संघर्ष...
  May 18, 03:00 AM
 • धाडींमागच्या शंका (अग्रलेख)
  सीबीआयने मंगळवारी धाडींचा धडाका लावला. माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांच्या मुलापाठोपाठ लालू प्रसाद यादव यांच्याही मालमत्तांची चौकशी सुरू झाली. या दोन्ही प्रकरणांतील आर्थिक व्यवहारांवर संशय व्यक्त होत होता. सीबीआयचे आरोप खरे किती याचा निकाल शेवटी न्यायालयात लागेल. त्यातही चिदंबरमसारखा कसलेल्या वकिलाशी संबंधित प्रकरणात खरोखर सत्य बाहेर येईल याची खात्री नाही. विरोधी पक्षांचे तोंड बंद करण्यासाठी मोदी सरकारने ही चाल केली आहे, असे विरोधी पक्षांचे मत आहे. अनेक प्रमुख नेते...
  May 17, 03:07 AM
 • ड्रॅगनचा मायावी फास (अग्रलेख)
  निद्रिस्त चिनी ड्रॅगन जागा झाल्यास आक्रमक होऊन तो विनाश करू शकतो, अशी चीनविषयी वैचारिक मांडणी (भीती?) शीतयुद्धाच्या काळात पाश्चात्त्य जगताकडून सातत्याने केली जात असे. ८० च्या दशकानंतर हे चित्र खरे होऊ लागले. डेंग यांच्या कारकीर्दीत चीनने विचारपूर्वक कम्युनिझमच्या पोलादी वैचारिक बेडीतून स्वत:ची सुटका केली आणि भांडवलशाहीचा मार्ग बेधडकपणे अनुसरला. जग आज चीनची घोडदौड पाहत आहे त्याचे बीज डेंग यांच्या दूरदर्शीपणाच्या धोरणात आहे आणि हेच धोरण आज आक्रमकपणे राबवण्यासाठी चीनचे अध्यक्ष शी...
  May 16, 08:11 AM
 • सायबर हल्ल्याचे बळी! (अग्रलेख)
  अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा संस्थेतून (एनएसए) चोरलेल्या सायबर शस्त्राच्या आधारे करण्यात आलेल्या सायबर हल्ल्याचा भारतासह जवळपास शंभर देशांना जो फटका बसला आहे. त्यातून माहिती तंत्रज्ञान तसेच संगणकप्रणाली तज्ज्ञांबरोबरच संगणकाचा वापर करणाऱ्या सामान्य माणसांनीही बरेच काही शिकण्यासारखे आहे. जगात कोणतेही नवे तंत्रज्ञान किंवा प्रणाली वापरात आली की त्याचा गैरवापर करणाऱ्या प्रवृत्तीही पाठोपाठ जन्माला येत असतात. या गैरप्रवृत्ती करत असलेल्या अपकृत्यांवर तंत्रज्ञानाच्या...
  May 15, 03:01 AM
 • ‘जीएम’ मोहरीचे मोल (अग्रलेख)
  खाद्यतेलाचा यथेच्छ वापर करणाऱ्या भारतीयांना तेलाची हौस भागवण्यासाठी आयातीवर अवलंबून राहावे लागते. तेलबिया पुरेशा पिकत नाहीत. उपलब्धता आणि आवडीनुसार प्रांतागणिक खाद्यतेलाची मागणी बदलते ती वेगळीच. देशाची वार्षिक गरज २२० लाख टन खाद्यतेलाची आहे. यातल्या सुमारे ७० टक्के खाद्यतेलाच्या आयातीसाठी दरवर्षी तब्बल ७० ते ८० हजार कोटी रुपये भारताला ओतावे लागतात. केवळ या खाद्यतेलाची आयात जरी रोखली तरी कृषी क्षेत्राचा जीडीपी थेट पाच टक्क्यांनी वाढेल. प्रचंड रोजगारनिर्मिती करण्याचीही क्षमता...
  May 13, 03:00 AM
 • दानवेंचा दांडपट्टा (अग्रलेख)
  रावसाहेब दानवे हे त्यांच्या अघळपघळ वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. मराठवाडी बोलीभाषेतल्या बेफिकीर वक्तृत्वाने आपण हास्याची कारंजी उडवतो याचेच बहुधा त्यांना फार कौतुक. अलीकडेच त्यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवरून बेताल वक्तव्य केले व आता तुरीवरून त्यांच्याच नकळत पुन्हा कैचीत सापडले. पक्षाध्यक्ष असल्यामुळे दानवे स्वत:बरोबर पक्षालाही पेचात टाकतात. असल्या वक्तव्यांमुळे राज्य आणि देशाची सत्ता असलेल्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष असूनही दानवेंना राजकीयदृष्ट्या कोणी गांभीर्याने घेत...
  May 12, 03:00 AM
 • न्यायव्यवस्थेतील बेदिली (अग्रलेख)
  राज्यघटनेने प्रत्येक व्यक्तीला, व्यवस्थेला त्याच्या मूलभूत अधिकाराची, सार्वभौमत्वाची, स्वातंत्र्याची लक्ष्मणरेषा आखून दिली आहे. या लक्ष्मणरेषेचा प्रत्येकाने आदर करावा अशी अपेक्षा आहे. तरीही दुसऱ्याच्या अधिकारांवर आक्रमण करण्याची एक खुमखुमी मानवी स्वभावात असते. यातून स्वत:च्या अधिकाराचे महत्त्व अधोरेखित करायचे असते. शिवाय समोरच्या व्यक्तीला धडा शिकवला याचे मानसिक समाधान मिळवायचे असते. कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सी. एस. कर्णन यांना अवमानप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने...
  May 11, 03:00 AM
 • भाजपला कुरघोडीची संधी (अग्रलेख)
  २०१९च्या लोकसभा निवडणुकांअगोदर भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्णअडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांच्यावरील बाबरी मशीद पाडल्याप्रकरणाचा खटला पूर्ण करावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी दिले होते. त्यापाठोपाठ सोमवारी राजद नेते व माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्यावरील चारा घोटाळा केल्याप्रकरणातील सुनावणी पूर्ण होऊन निकाल लागावेत, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. दोन्ही प्रकरणांतील दाहकता कालानुरूप कमी झाली आहे. देशाचे राजकारण त्यापुढे गेले आहे....
  May 10, 03:00 AM
 • सुज्ञ लोकशाहीचा कौल (अग्रलेख)
  ब्रेक्झिटचा निर्णय, दहशतवादी हल्ले, राष्ट्रवादाच्या नावाने सुरू असलेला उजव्यांचा धिंगाणा, स्थलांतरितांचा वाढता वेग व बेरोजगारीचा प्रश्न अशा अनेक प्रश्नांमुळे युरोप सर्वच पातळ्यांवर अस्वस्थ आहे. ब्रिटनने निर्वासितांचे पुनर्वसन व ढासळत्या अर्थव्यवस्थेचे कारण पुढे करत युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता खरा; पण अनेक राजकीय व आर्थिक प्रश्नांपायी ब्रिटनच्या संसदेला देशातील राजकीय वातावरण अनुकूल हवे आहे म्हणून त्यांनी मध्यावधी निवडणुकांची घोषणा केली. या...
  May 9, 03:00 AM
 • केजरीवाल गोत्यात( अग्रलेख)
  दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दोन कोटी रुपयांची लाच घेतल्याचा सनसनाटी आरोप त्यांच्या मंत्रिमंडळातील निलंबित जलसंधारणमंत्री कपिल मिश्रा यांनी केला आहे. या पद्धतीचे आरोप भारताच्या राजकारणात नवे नाहीत व त्यांची न्यायालयात शहानिशा होण्याचीही शक्यता धूसर असते. पण असे आरोप करून राजकीय प्रतिमा मलिन करता येते. जनतेमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम, संशय निर्माण करता येतो. पक्षात बेदिली माजते, बंडखोरांचा आवाज वाढतो आणि तेवढे डॅमेज साधले तरी खूप काही साध्य होते. केजरीवाल...
  May 8, 03:00 AM
 • आमच्या स्वप्नातील ‘ग्रंथगाव’ (अग्रलेख)
  पुस्तक जसे माणसाचे आयुष्य घडवते तसे माणसाच्या कर्तृत्वामुळेही पुस्तके लिहिली जातात. या साऱ्यातून समाज घडत जातो. हे मर्म लक्षात घेऊन सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील भिलार गावी महाराष्ट्राच्या मराठी भाषा विभागाचे मंत्री विनोद तावडे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या देशातील पहिल्या पुस्तक गावाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गुरुवारी लोकार्पण झाले. ब्रिटनमधील वेल्स प्रांतात असलेल्या हे ऑन वे या पुस्तकांच्या ठिकाणाच्या धर्तीवर भिलारमध्ये तसाच प्रकल्प साकारण्यात आला....
  May 6, 03:06 AM
 • कोरियन कंपनी किया मोटर्सने औरंगाबादची डीएमआयसी अव्हेरून आंध्र प्रदेशात मोटार निर्मिती प्रकल्प सुरू करण्याचा घेतलेला निर्णय महाराष्ट्राच्या प्रगतीचे खरे स्वरूप दाखवून गेला आहे. सात हजार कोटी रुपयांची गुंतवणूक ही कंपनी औरंगाबादच्या नव्या पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत करेल, अशा घोषणा राज्याच्या उद्योग मंत्रालयाकडून उच्चारवाने करण्यात आल्या होत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यात आपला सूर मिसळला होता; पण कंपनीने थेट आंध्र प्रदेश गाठून तिथे आपली गुंतवणूक करण्यासाठी...
  May 5, 03:05 AM
 • कोंडी फुटणे आवश्यक (अग्रलेख)
  चिघळलेला काश्मीर प्रश्न, पाकिस्तानच्या लष्कराकडून दोन भारतीय जवानांची निर्घृण हत्या व पाकिस्तानविरोधात कडक कारवाई करण्याबाबत निर्माण झालेले जनमत यांचा मोदी सरकारवर मोठा दबाव आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान नरेंद्र मोदी यांनी केंद्रात सबळ सरकार असल्यास, या सरकारचा प्रमुख कणखर नेता (म्हणजे ते स्वत:) असल्यास देशापुढे असलेला कोणताही प्रश्न मिटू शकतो, अशी सोपी-सुलभ राजकीय मांडणी मतदारांच्या गळी उतरवली होती. ही मांडणी ज्या मतदारांमध्ये ७० वर्षांत काहीच झाले नाही अशी प्रबळ...
  May 4, 03:08 AM
 • बांधकाम व्यवसायाला वेसण (अग्रलेख)
  नोटाबंदीचा फटका बांधकाम व्यवसायाला जोरदार बसेल, त्यानेघराच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्यात येतील बँकांकडून गृहकर्ज दर कमी केले जातील, असे सांगितले जात होते. प्रत्यक्षात तशी परिस्थिती नाही. सध्या घराच्या किमती पूर्वीच्या होत्या तेवढ्याच आहेत. त्या आवाक्याबाहेरच्याच आहेत, पण त्यामध्ये होणारी वाढ मात्र मंदावली आहे. गृहकर्ज दर उतरलेले नाहीत. मोठे गृहप्रकल्प रिकामे पडून आहेत. ग्राहकांना भूलवण्यासाठी विविध आमिषे दाखवली जात आहेत. ग्राहकाची त्याकडे पाठ आहे. अर्थव्यवस्थेत मागणी तसा...
  May 3, 03:07 AM
 
जाहिरात
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
जाहिरात
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 

हास्ययात्रा