Home >> Editorial >> Columns

Columns

 • बेजबाबदार उद्गार!
  सुमारे सहा ते सात महिन्यांपासून महाराष्ट्रभर शेतकरी डोळ्यांसमोर ठेवून संघर्षाचा वणवा पेटला आहे. अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या बाबतीत बोलण्यात कोणीच मागे नाही. विद्यमान सरकारच्या विशेषत: भाजपच्या विरोधात सत्तेत सहभागी असलेल्यांसह सर्वच पक्षांनी दंड थोपटले. वेगवेगळ्या नावांनी शेतकऱ्यांसाठी यात्रा काढल्या. काँग्रेस-राष्ट्रवादीची संघर्ष यात्रा चर्चेत आली, बच्चू कडूंची आसूड यात्रा वादग्रस्त विधाने करत माध्यमांत चर्चेत राहिली, तर राजू शेट्टींच्या आत्मक्लेश यात्रेने आम्हीही...
  June 24, 03:06 AM
 • ‘गोब्राह्मण’ : जुन्या वादाला नवी फोडणी
  गोब्राह्मणचे विरोधक जेव्हा व्हायरल झालेल्या पुरंदरेंच्या व्हिडिओचा आधार घेतात तेव्हा त्यांनी याआधी पुरंदरेंच्या अनेक विधानांना नाकारल्याचा विसर पडल्याचे, तर हिंदुत्ववादी आणि गोब्राह्मणवादी समर्थक, जे नेहमी पुरंदरेंना प्रमाण मानतात ते या मुद्द्यावर त्यांना जमेस धरताना दिसत नाहीत. असे विरोधाभासी चित्रही यानिमित्ताने समोर आले. आजवर शिवरायांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने शिकवला गेला. ज्ञान देण्याची मक्तेदारी विशिष्ट वर्गाकडे असल्याने त्यांना अभिप्रेत असलेला इतिहास...
  June 24, 03:00 AM
 • चीनमध्ये ‘मोहंमद’ शब्दावर बंदी
  इस्लाम धर्माचे प्रणेते पैगंबर हजरत मोहंमद साहेब यांच्या नावावर एखादा देश बंदी घालू शकेल यावर कोणी विश्वास तरी ठेवेलकाय? परंतु ही वस्तुस्थिती आहे. चीनने मोहंमद पैगंबर साहेब यांच्या नावावर बंदी घालण्याची घोषणा केली आहे. आता चीनमधील कोणत्याही मुस्लिम कुटुंबाला आपल्या बाळाचे नाव मोहंमद ठेवता येणार नाही. याचा सरळ सरळ अर्थ असा झाला की, जो कोणी आपल्या बाळाचे नाव मोहंमद ठेवेल त्याला दंडित करण्यात येईल. नवीन कायद्यानुसार, कोणी आपल्या मुलाचे नाव मोहंमद ठेवले असेल तर त्यांना ते नाव बदलावे...
  June 23, 03:03 AM
 • देशद्रोह्यांना धर्म, जात वा पक्ष असतो?
  चित्रपटगृहात राष्ट्रगीत चालू असताना एखादी म्हातारी व्यक्ती उभी राहू न शकल्यास तिला देशद्रोही म्हणून मारहाण करणे कितपत देशभक्तीपूर्ण आहे? भारत माता की जय अथवा घसा कोरडा करून वंदे मातरम् म्हणणे हीच फक्त देशभक्तीची कसोटी आहे काय? मध्य प्रदेशातील दहशतवादविरोधी दलाने राज्यातील ११ जणांना भारतीय सैन्याची गुप्त माहिती पाकिस्तानला पुरवण्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. अटक केलेल्यांमध्ये तेथील भाजपच्या मुख्यमंत्र्यांपासून प्रदेश सचिवांपर्यंत संबंध असलेल्यांचा समावेश आहे. ध्रुव...
  June 22, 03:06 AM
 • ...आता खरी कसोटी
  चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानकडून मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागलेल्या भारतीय संघाला मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्या राजीनाम्याने आणखी एका धक्का बसला आहे. कुंबळे यांच्या राजीनाम्याचे कारण अद्याप अधिकृतपणे समोर आले नसले तरी कर्णधार विराट कोहलीशी झालेल्या बेबनावामुळेच त्यांनी पदत्याग केल्याचे सांगण्यात येत आहे. परिणामी, मुख्य प्रशिक्षकाविनाच वेस्ट इंडीजच्या दौऱ्यावर रवाना होणे टीम इंडियाला भाग पडले असून आता विराटच्या...
  June 22, 03:05 AM
 • ‘मेक इन इंडिया’ला वेग
  उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेक इन इंडिया हा उपक्रम सुरू केला आहे. या संंकल्पनेची घोषणा करताना त्यांनी म्हटले होते की, उत्पादन क्षेत्रात भारत महासत्ता होण्याच्या मार्गावर आहे. उत्पादनासोबतच उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी मेक इन इंडिया ही संकल्पना चार स्तंभांवर आधारित असेल. हे चार स्तंभ म्हणजे देशात उद्योगांसाठी अनुकूल वातावरण निर्माण करणारी नवीन कार्यपद्धती तयार केली जाईल, उद्योगांचा विकास होईल यासाठी अत्याधुनिक पायाभूत सुविधा निर्माण...
  June 21, 03:03 AM
 • अमेरिकेशी व्यावहारिकता हवी
  भारताने ट्रम्प यांच्यामुळे निर्माण झालेल्या जागतिक स्थितीत विचलित न होता मिळू शकणाऱ्या फायद्याकडे लक्ष द्यावे. आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताने अधिक लवचिक, व्यावहारिक आणि हिताधारित भूमिका स्वीकारणे गरजेचे आहे. येत्या २५ जूनपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर आल्यानंतर पहिल्यांदाच मोदी त्यांची भेट घेणार आहेत. गेल्या २० वर्षांत अटलबिहारी वाजपेयी, डॉ. मनमोहन सिंग आणि मोदी या सर्वांनीच अमेरिकेशी संबंध दृढ करण्यासाठी आपली राजकीय...
  June 21, 03:02 AM
 • नजर मलाक्का सामुद्रधुनीवर...
  मलाक्काच्या सामुद्रधुनीचे भारताप्रमाणे अन्य देशांच्या दृष्टीनेही सामरिक महत्त्व आहे. या सामुद्रधुनीतून दरवर्षी सुमारे ९५ हजार मालवाहू जहाजांची ये-जा होते. हिंदी व प्रशांत महासागरांना जोडणारा सर्वांत जवळचा जलमार्ग ही सामुद्रधुनी उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे मलाक्काच्या सामुद्रधुनीची आणखी प्रभावीपणे टेहळणी व्हावी, या उद्देशाने भारतीय नौदलाने आता तेथे आपली युद्धनौका कायमस्वरूपी तैनात केली आहे. तिच्या मदतीने या सामुद्रधुनीतून येणाऱ्या-जाणाऱ्या जहाजांवर दिवसरात्र लक्ष ठेवले...
  June 20, 03:04 AM
 • ‘बेटी’ संकटात
  शालेय वा महाविद्यालयीन मुलींच्या असहायतेचा फायदा उचलून त्यांना उभरत्या आयुष्यातून कायमचेच उठवायचे वा उद्ध्वस्त करावयाचे षडयंत्र तीर्थक्षेत्र नाशिकच्या भूमीत सुरू असल्याचे धक्कादायक प्रकरण नुकतेच बाहेर आले. प्रेमसंबंध प्रस्थापित करून तेच संबंध हळूहळू शरीरसंबंधापर्यंत न्यायचे अन् त्याच्या चित्रफिती करायच्या वा छायाचित्रे काढून घ्यायची. एवढेच नाही, तर संबंधित मुलींनी पुन्हा प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिलाच तर तिला ब्लॅकमेल करण्यासाठी चित्रफिती वा छायाचित्रे जगभरातील...
  June 20, 03:04 AM
 • आयएसआयची नवी रणनीती
  पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआयच्या दोन एजंटांना मागच्या वर्षी जम्मू- काश्मीर सेनेने जम्मूच्या आरएसपुरा सेक्टरमध्ये पकडले. त्यानंतर ७ महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटून गेला आहे. आता मराठवाड्यातल्या लातूरमध्ये दोन अवैध टेलिफोन एक्स्चेंज सापडले आहेत. या एक्स्चेंजच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय काॅलचे स्थानिक काॅलमध्ये रूपांतर केले जात होते. या दोन घटनांचा एकमेकांशी अर्थाअर्थी काय संबंध, असा प्रश्न हे वाचणाऱ्याला पडू शकतो. त्याचे उत्तर आहे, या दोन्ही घटनांचा एकमेकांशी थेट संबंध...
  June 19, 03:06 AM
 • फसव्या दाव्यांना ‘इंधनाचा’ फोल डोस!
  भारतीय अर्थव्यवस्थेची सध्या झालेली नाजूक अवस्था पाहता सरकार तेलावरील कर कमी करेल हा आशावाद झाला.कोणत्याही करामुळे उत्पन्नाची चटक लागलेले सरकार त्यावर पाणी सोडेल, ही आशा करता येत नाही. जीएसटीमधून सध्या तेलाला वगळले आहे ते यामुळेच. थोडक्यात आंतरराष्ट्रीय तेलदरांशी जुळवून घेण्याचा सरकारी दावा कुचकामी आहे. तेलाचे आंतरराष्ट्रीय भाव सातत्याने बदलत असतात. गेल्या काही वर्षांत अमेरिकेने तेलाचे विक्रमी उत्पादन सुरू केल्याने आंतरराष्ट्रीय किमती जुलै १४ ते जानेवारी १६ या पंधरा...
  June 19, 03:01 AM
 • सत्तेवर कोणीही येवो, वर्तन तेच
  नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर नेहमीच एक चुकीचा आरोप होतो. तो आरोप म्हणजे भारत हा मूलत: मुक्त (लिबरल) विचार व्यक्त करण्याचा देश असून हे सरकार विचारस्वातंत्र्याचा (इललिबरल) संकोच करण्याचा प्रयत्न करत आहे. हा आरोप कसा चुकीचा आहे ते पाहू. लिबरलचा अर्थ होतो सहनशील, इललिबरलचा अर्थ होतो असहनशील आणि भाषण स्वातंत्र्याच्या संकोच करणारे किंवा कृतीचा संकोच करणारे. मी या सरकारवर चुकीचा आरोप होतोय, असे म्हणतोय, कारण तथ्य असे सांगतात की, भारताचे सरकार, मग ते अगदी कुठलेही असो, काँग्रेसच्या राज्यातही कधीच...
  June 17, 03:00 AM
 • जनहित याचिकेचा जनक गेला
  भारताचे माजी सरन्यायाधीश पद्मविभूषण प्रफुल्लचंद्र नटवरलाल म्हणजेच पी. एन. भगवती यांचे दिल्लीत वयाच्या ९५ व्या वर्षी निधन झाले. ते भारताचे १७ वे सरन्यायाधीश होते. जुलै १९८५ ते डिसेंबर १९८६ या काळात म्हणजे निवृत्तीपर्यंत त्यांनी देशातील सर्वोच्च न्यायिक पद भूषवले. देशातील न्यायिक सक्रीयवादाचे प्रणेते तसेच पीआयएल म्हणजेच जनहित याचिकेचे जनक म्हणून त्यांची विशेष ओळख आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती असलेल्या नटवरलाल यांच्या घरात गुजरातेत १९२१ मधे प्रफुल्लचंद्र यांचा जन्म...
  June 17, 03:00 AM
 • कर्जमाफीची मलमपट्टी अल्पायुषी!
  महाराष्ट्रात शेतकरी संपाची हाक देण्यात आली. तिचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्रभर जाणवणारा जरी झाला नाही तरी मुंबईतील भाजीपाल्याची आवक दोन-तीन दिवस थंडावली. दुधाचा पुरवठादेखील थोडा कमी झाला. शेतकऱ्यांचा संप ही तशी प्रत्यक्षात न येणारी गोष्ट आहे. कारखान्यातील कामगार आणि शेती करणारा शेतकरी दोघेही श्रमिक असले तरी दोघांच्या स्थितीत जमीन-आसमानाचे अंतर आहे. कारखान्यात काम करणाऱ्या श्रमिकाला ठराविक तास काम करावे लागते आणि कामाचा मोबदला म्हणून त्याला वेतन मिळते. कारखान्यातील त्याची नोकरी तशी...
  June 16, 03:00 AM
 • शिक्षणाधिकार क्रांतिकारी; मात्र गुणवत्ता दर्जाहीन
  राजस्थानची राजधानी जयपूर येथील प्राथमिक शाळेतील तळमजल्यावर बसलेली पन्नास, साठ मुले शाळा सुटण्यासाठी व्याकुळ झालेली आहेत. शाळेतील तीन शिक्षकांपैकी दोन गैरहजर तर एक आजारी. काही कामानिमित्त मुख्याध्यापिकाही शाळेतून गायब आहेत. मुलांसमोर मोठी पुस्तके पडली आहेत, पण त्यातील चार ओळीही सलग वाचता येणार नाही, अशी स्थिती. याच शाळेतील दुसऱ्या मजल्यावरचे चित्र पूर्णपणे उलट. प्रथम नामक सामाजिक संस्थेच्या रेखा गुर्जर यांच्या वर्गातील मुले स्वत: फलकाजवळ येऊन इतर मुलांना शिकवत आहेत. त्यांनी प्रश्न...
  June 16, 03:00 AM
 • नदाल : क्ले कोर्टचा शहेनशहा
  क्ले कोर्टवर खेळल्या जाणाऱ्या खुल्या फ्रेंच ग्रँडस्लॅम स्पर्धेतील सर्वोच्च शिखरावर झेंडा फडकावलाय राफेल नदालने. तो झेपावलाय फ्रेंच स्पर्धेतील चक्क दहाव्या विजेतेपदावर. चार ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या कोणत्याही एका स्पर्धेतील हे यश अतुलनीय. ही भरारी कदाचित चिरंतन राहणार नाही. कारण सारे विक्रम हे केव्हा ना केव्हा मोडले गेले आहेत. नदाल विराजमान झालाय त्या शिखराला एव्हरेस्ट संबोधण्याची घाई मी अजिबात करणार नाही. कारण कुणी सांगावं येत्या दोन-तीन वर्षांत तो अकरावं-बारावं फ्रेंच जेतेपद...
  June 15, 03:00 AM
 • माफीचे मानकरी कोण?
  काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारने २००८ मध्ये देशपातळीवर कर्जमाफी जाहीर केली. २००९ मध्ये लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माफी केली गेली. त्यानंतर नऊ वर्षांनी महाराष्ट्र सरकारने सरसकट पीक कर्जमाफीचा निर्णय जाहीर केला. अर्थात याचा संबंध निवडणुकांशी आहे किंवा नाही, हे आज सांगता येणार नाही. पण काँग्रेस आघाडी सरकारच्या कर्जमाफीतील गैरप्रकारांचे पोस्टमॉर्टेम कॅगने केले. त्यात उघडकीस आलेले कर्जमाफीचे गैरप्रकार धक्कादायक होते. आता सरसकट कर्जमाफीचे निकष ठरवताना कॅगने...
  June 15, 03:00 AM
 • कतारचे पंख कापण्याचा डाव
  अवघ्या तीन आठवड्यांपूर्वी अरब इस्लामिक अमेरिकन परिषदेमध्ये दहशतवादाला मूठमाती देण्याची ग्वाही देत विकासाचा संकल्प आखाती सहकार्य परिषदेतील देशांनी (जीसीसी) केला होता. त्यानंतर दहा दिवसातच जीसीसी देशांमधील थोरला भाऊ असलेल्या तेलसंपन्न सौदी अरेबियासह संयुक्त अरब अमिराती (यूएई), बहारिन व इजिप्त यांनी जीसीसी सदस्य देश असलेल्या कतारची इस्लामिक मूलतत्त्ववाद्यांना व दहशतवादाला खतपाणी घालत असल्याचा आरोप करत अनिश्चित काळासाठी त्याच्याशी असलेले राजनैतिक संबंध तोडले. पुढे सौदी, बहारिन व...
  June 14, 03:00 AM
 • टक्केवारीचा फुगवटा
  राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी परीक्षेचा निकाल अखेर सोमवारी जाहीर झाला आणि सोशल मीडियावरील अफवांना पूर्णविराम मिळाला. राज्याचा एकूण निकाल ८८.७४ टक्के लागला. गतवर्षाप्रमाणे यावर्षीही निकालाची वैशिष्ट्ये तीच आहेत. मुलांपेक्षा मुलींनीच बाजी मारली असून एकूण निकालात उत्तीर्ण होणाऱ्या मुलींची टक्केवारी ही ९१.४१ टक्के आहे. गतवर्षापेक्षा त्यात आणखी ४ टक्क्यांनी भर पडली हे विशेष. दहावी, बारावीची परीक्षा ही आयुष्यातील टर्निंग पॉइंट मानली जाते....
  June 14, 03:00 AM
 • ‘केंब्रिज’चा तिढा !
  नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली आहे. सरकारी असो खासगी तसेच अनुदानित असो विनाअनुदानित दोन्ही स्तरांवर शाळांच्या व्यवस्थापनासह शालेय प्रवेशासाठी इच्छुक पाल्य अन् त्यांचे पालक यांचीही लगबग सुरू आहे. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर कुटुंबाचा गाडा हाकताना पाल्याची शाळेची फी आवाक्यात कशी राहील यावर सर्वांचाच भर असतो. किंबहुना तसे ते करत असल्यामुळेच सरकारीपेक्षा खासगी शाळांमध्ये मुलांना प्रवेश मिळावा म्हणून त्यांचा आग्रह अन् हट्टदेखील असतो, असा सार्वत्रिक अनुभव आहे. नाशिकच्या...
  June 13, 03:00 AM
 
जाहिरात
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
जाहिरात
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 

हास्ययात्रा