डॉ. शहाणे कार चालवित होते. तोच त्यांचे लक्ष समोर गेले. एका तरुणामागे तीन कुत्री लागली होती. कुत्रे चावल्यामुळे नंतर जी इंजक्शने घ्यावी लागतात ते त्यांनी त्यांच्याकडे येणा-या पेंशटकडून चांगलेच अनुभवले होते. त्यामुळे त्यांनी त्या तरुणाजवळ गाडी थांबविली व म्हणाले- 'चल, बस आत पटकन्!’‘थँक यू’ तो तरुण आत बसत म्हणाला- ‘अहो, या कुत्र्यांमुळे मला कोणी लिफ्टच देत नव्हतं. ए, टॉमी,...
गंपू- असं म्हणतात की, डोळे मिटवून घेतले तर तुमचं ज्या व्यक्तीवर प्रेम आहे तिचा चेहरा डोळ्यांसमोर येतो. झंपू- तू ट्राय केला आहेस का कधी? गंपू- हो.. पण स्लाइड शो सुरू झाला.
नवरा-बायकोचे भांडण अगदी भरात आले होते- बायको : देव अक्कल वाटत होता तेव्हा तुम्ही कुठे तडफडायला गेला होतात कोण जाणे. नवरा : (अत्यंत त्वेषाने) इकडे तिकडे नाही तुझ्याच शोधात तडफडत होतो !
बंडू : बाबा, तुम्हाला चष्मा न घालता सही करता येते?बाबा : का रे, त्यात काय अवघड आहे?बंडू : मग माझ्या प्रगती पुस्तकावर सही करून दाखवा ना!-वरुण राजेंद्र मोटे, वर्ग ७ वा, गुरुदेव समंतभद्र विद्यामंदिर, वेरूळ.
पहिला : माझ्या वडिलांनी नदीत उडी मारली व तीन तासांनी बाहेर आले.दुसरा : माझ्या वडिलांनी नदीत उडी मारली व पाच तासांनी बाहेर आले.तिसरा : माझ्या वडिलांनी नदीत उडी मारली पाच वर्षे झाली आणखी बाहेरच आले नाहीत.
नवरा-बायकोचे भांडण अगदी भरात आले होते-बायको : देव अक्कल वाटत होता तेव्हा तुम्ही कुठे तडफडायला गेला होतात कोण जाणे.नवरा : (अत्यंत त्वेषाने) इकडे तिकडे नाही तुझ्याच शोधात तडफडत होतो !- अभय जोशी, शारदा मंदिर
वेटर : साहेब, तुम्ही खिशात टाकलेले दोन चमचे मी पाहिले आहेत.गि-हाईक : डॉक्टरांची तशी सूचना होती.वेटर : म्हणजे?गि-हाईक : हे बघ, माझ्या औषधाच्या चिठ्ठीवर त्यांनी काय लिहलंय?वेटर : काय?गि-हाईक : जेवणानतंर दोन चमचे घेणे!!!-वरुण राजेंद्र मोटे, वर्ग ७ वा, गुरुदेव समंतभद्र विद्यामंदिर, वेरूळ.
1 ला कैदी : किती वर्षांची शिक्षा?2 रा कैदी : पाच वर्षांची.1 ला कैदी : कुठला गुन्हा?2 रा कैदी : जनता बँक लुटली म्हणून. आणि तुला?1 ला कैदी : दहा वर्षे.2 रा कैदी : कुठला गुन्हा?1 ला कैदी : मी जनता बँकेचा मॅनेजर होतो.- वरुण राजेंद्र मोटे, वर्ग ७ वा, गुरुदेव संमतभद्र विद्यामंदिर, वेरूळ
संता - बंता, आठवडाभर माझी बायको खूप बिझी असते रे! बंता - कशात बिझी असते? संता - सोमवार ते शुक्रवार एकता कपूरच्या सिरियल बघण्यात आणि
शनिवार-रविवार माझ्या चुका काढण्यात!
शंकर(पार्वतीला) : माझा त्रिशूळ कोठे आहे?पार्वती : गणेशाने घेतला आहे.शंकर : कशासाठी घेतला?पार्वती : मॅगी खायला.-कु. गायत्री अरुण कुलकर्णी, वर्ग ८ वा, मुकुल मंदिर, सिडको, औरंगाबाद
बिरबलास तंबाखू खायची सवय होती.मात्र बादशहा अकबरास ती सवय अजिबात नव्हती.एकदा बादशहा अकबर आणि बिरबल तंबाखूच्या शेताजवळून जात होते. शेतात एक गाढव गवत खाताना बघून अकबर बिरबलास म्हणाले-‘ बघ बिरबल, तंबाखू किती वाईट असते, हे गाढवदेखील तंबाखूला स्पर्श करीत नाही.’ तसा हजारजबाबी बिरबल लगेच उत्तरला-‘ होय महाराज, गाढव तंबाखू कधीच खात नाही.’उत्तर ऐकून बादशहा मात्र ओशाळले.