जाहिरात
 
हास्ययात्रा
 
 
 
 

  • January 14, 06:56
     
    नवरा बायकोला  -  ना कजरे की धार, ना मोतियो के हार, ना कोई किया सिंगार, फिर भी कितनी सुंदर हो...बायको- सरळ सरळ सांगा ना मेकअपसाठी पैसे नाहीत म्हणून.
     

  • January 13, 08:38
     
    एक बाई दुसर्‍या बाईला विचारतेपहिली बाई- तुम्ही गहू कसा आणला?दुसरी बाई- पिशवीतून आणला.पहिली बाई- तसे नाही हो, कोणत्या भावाने आणला?दुसरी बाई- चुलतभावाने आणला..
     

  • January 12, 07:19
     
    फोनची बेल वाजते (तो चुकीचा क्रमांक लागलेला असतो.) पहिला- (फोन करणारा पुणेरी)- हॅलो..., दुसरा- बोलापहिला- देशपांडे आहेत का?दुसरा (चिडून)- नाही, ते पावन खिंडीत लढतायेत. पहिला- मग त्यांना सांगा राजे गडावर पोचले. आता मेलात तरी चालेल.
     

  • January 11, 11:17
     
    एक सुंदर सेक्रेटरी तिच्या बॉसच्या दालनातून तणतण करतच बाहेर येते. तिचे मित्र-मैत्रिण तिला विचारतात, काय झाले,  एवढी रागात का दिसतेस ?सेक्रेटरी -बॉसने विचारले की, आज रात्री तुझ्याकडे मोकळा वेळ आहे का ? मी लगेच म्हटले : येस सर !  तेव्हा तो गाढव म्हणतो कसा... मग ही ५० पाने टाईप करुन घेऊन ये .
     

  • January 10, 08:44
     
    संताने एक स्वप्न पाहिले, कुणीतरी त्याचा खून करत आहे. पुढच्याच दिवशी संताने आपले बँक खाते बंद केले. कारण ‘आम्ही तुमचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवतो.’ असे बँकेचे घोषवाक्य होते. 
     

  • January 9, 09:31
     
    संता : ही मुलगी बधिर आहे. बंता : तुला कसे काय कळले? संता : मी तुझ्यावर प्रेम करतो असे जेव्हा तिला म्हणालो तेव्हा ‘माझी सँडल नवीन आहे’ असे तिने सांगितले.  
     

  • January 8, 08:43
     
    एकदा एक सुंदर मुलगी वर्गात येते.सगळी मुले तिच्या मागे वेडी होतात आणि तिच्या वाटेत जाऊन थांबतात...पण तिचे ऐकून बेशुद्ध होतात.ती म्हणते- ओ भाऊ बाजूला व्हा ना झाडू मारायचा आहे.
     

  • January 7, 08:13
     
    एका गरिबाने ताजमहालाची प्रत्येक भिंत पाहिली, मिनार पाहिले, सर्व खिडक्या पाहिल्या आणि बोलला..आई शप्पथ, प्रेमात खर्च खूप आहे.. आपले ते काम नाही बुवा..!
     

  • January 6, 03:23
     
    एकदा संता मोबाईल खरेदी करण्यासाठी जातो. संता- 'या मोबाइलवर सर्व स्टेशन्स मिळतील काय?'दुकानदार- 'हो, मिळतील ना. फक्त दोन स्टेशन्स मिळणार नाहीत.'संता- 'कोणती?'दुकानदार- 'रेल्वे स्टेशन आणि पोलीस स्टेशन.'
     

  • January 6, 09:16
     
    संता- शर्ट शिवण्‍यासाठी कापड दाखवा.. सेल्‍समन- सर..प्‍लेनमध्‍ये दाखवू का? संता- नको, हेलीकॉप्‍टरमध्‍ये दाखव... सरदार दिसल्‍यावर लगेच थट्टा करायला सुरू का करतात?
     

  • January 5, 06:55
     
    अनुपसिंगने भंगारमध्ये पडलेली बाबा आजमच्या जमान्यातील सायकल बाहेर काढली. ती दुरुस्तीसाठी गॅरेजमध्ये नेली. तेव्हा त्यांच्या सायकलची अवस्थापाहूनगॅरेजवाला - साहेब, या सायकलची दुरुस्ती करणे अशक्य आहे.अनूपसिंग- पण नेपोलियन बोनापार्ट तर म्हणत होता, जगात काहीही अशक्य नाही...
     

  • January 4, 08:44
     
    मिनी : (चिंटूला) कसली भिक्कार टी.व्ही. सिरियल आहे बघ.चिंटू : अगं, मग बघते कशाला असली भिक्कार सिरियल? मिनी : अरे, बघितल्याशिवाय कशी कळणार भिक्कार आहे म्हणून?
     

  • January 3, 08:04
     
    एक भुरटा चोर आपल्या खिसेकापू मित्राला म्हणाला, आज एक बाई दार उघडं टाकून शेजारणीकडे गेली होती.मी घरात शिरलो आणि बाहेर पडत असताना ती बाई दारात हजर.मग काय मार खावा लागला?छे, छे, दूध जळाल्याचा वास आला म्हणून गॅस बंद करायला आत शिरलो असे सांगताच ती बाई आत आणि मी बाहेर पळालो.
     

  • January 2, 11:11
     
    शिक्षक- 64 चे वर्गमूळ सांग.मुलगी- मला नाही माहिती..शिक्षक- तुला एवढे साधे उत्तर येत नाही.मुलगी- सर तुम्ही माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या, मी तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर देईल.मुलगी- कोलावरी कोलावरी डीचा अर्थ सांगा?शिक्षक- बाळ तू खाली बस आणि हे बघ, 64 चे वर्गमूळ 8 आहे.
     

  • December 31, 07:18
     
    एक दारुडा रस्त्यावरून जात असताना तिकडून एक व्यक्ती येत असते. तेव्हा तो  दारुडा- अरे, माझ्यासाठी टॅक्सी घेऊन ये? ती व्यक्ती- मी काही तुझा नोकर नाही. दारुडा- मग कोण आहेस?  ती व्यक्ती- एअर कमांडर दारुडा- मग विमान घेऊन ये.
     
 
 
 
 
जाहिरात
 
 
 
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
 
 
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 
 
 
 

बिझनेस