Home >> International >> Bhaskar Gyan
 • भावनिक व्यवस्थापनाने चिडचिडेपणावर मात
  वॉशिंग्टन - संकटे किंवा अडचणी येतात तेव्हा तुम्ही पळून जाता का ? की समस्यांना टाळता ? प्रत्येकाची पद्धत वेगळी असली तरी भावनिक व्यवस्थापन केले तर चिडचिडेपणावर मात करता येऊ शकते, हे अभ्यासातून सिद्ध झाले आहे. विधायक मार्गाने प्रश्न सोडवण्याची तयारी असलेल्या व्यक्तींना चिडचिडेपणातून होणारा त्रास कमी असतो, असा दावा इलीनॉइस विद्यापीठाकडून करण्यात आला आहे.
  May 14, 04:04 PM
 • आज जागतिक हास्य दिन : खळखळून हसा, निरोगी राहा!
  हास्य ही मानवाला लाभलेली अप्रतिम देणगी आहे. ज्याला मनमोकळे, खळखळून हसता येते तो माणूस सुदैवी आहे. हसणार्या चेहर्याभोवती मित्रमैत्रिणींची गर्दी होते. एक वेगळाच प्रभाव समोरील व्यक्तीवर पडत असतो. शिवाय हसतमुख चेहर्याच्या व्यक्ती अनेक कठीण प्रसंगांवरही सहज मात करतात. हास्य हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. हा घटक आपण जेवढा विकसित केला तेवढे आपले जीवन सुखी आणि आनंदी होत असते. नेहमी दु:खात बुडालेल्या, खिन्नतेच्या शेवाळात अडकलेल्या व्यक्तीला हास्याचे भाग्य लाभत नाही. मात्र,दु:खाचे...
  May 5, 03:50 PM
 • सुपरहॅकर कॉमेक्स गुगलमध्‍ये काम करणार
  निकोलस एलिग्रा ऊर्फ कॉमेक्सने 19 व्या वर्षीच आयफोन आणि आयपॅडसाठी जेलब्रेकमी नावाचे हॅकिंग टूल तयार करून नाव कमावले होते. त्यानंतर अॅपलने त्याला कंपनीत बोलावून घेतले होते. मात्र, आता कॉमेक्स गुगल कंपनीत जाणार आहे. ही माहिती त्याने ट्विटद्वारे दिली आहे. मात्र, तो गुगलमध्ये काय काम करणार, हे अद्याप स्पष्ट नाही. कॉमेक्स हा सामान्य विद्यार्थी नाही. त्याने 2011 मध्ये जेलब्रेकमी-3 नावाचे टूल तयार केले होते. या टूलच्या मदतीने महिन्याच्या आत 20 लाखांहून जास्त लोकांना आयफोन आणि आयपॅडवरील डाऊनलोडच्या...
  April 27, 12:00 AM
 • सीडी-3 करणार मलेरियाच्या नकली औषधांचा पर्दाफाश
  आशिया आणि अफ्रिका खंडात विकल्या जाणा-या मलेरियाच्या नकली औषधांचा पर्दाफाश करणारे मशीन लवकरच बाजारात येणार आहे. एका अंदाजानुसार डासांमुळे होणा-या मलेरियामुळे दरवर्षी 6.50 लाख लोकांचा मृत्यू होतो. यातील 90 टक्के मृत्यू आफ्रिकेत होतात. तेथील मलेरियाची एकतृतीयांश औषधे एक तर नकली आहेत किंवा त्या औषधांमध्ये आजार नीट करणारे सक्रिय घटकच नाहीत. मलेरियाची लक्षणे दिसू लागल्यानंतर काही दिवसांतच तो आजार प्राणघातक ठरू शकतो. अशा परिस्थितीत नकली औषधांमुळे आजार आणखी गंभीर रूप घेऊ शकतो, कारण मलेरियाचे...
  April 27, 12:00 AM
 • महिला बाथरूममध्ये शिरताच समोर वाघ
  वॉशिंग्टन - हॉलीवूडच्या गाजलेला विनोदी चित्रपट द हँगओव्हर मध्ये स्नानगृहात वाघाचे दृश्य दाखवण्यात आले आहे. हा प्रसंग हसवणूक करणारा होता. परंतु वास्तवात महिलेच्या समोर असा वाघ आला तर ? परंतु असा थरार एका महिलेने नुकताच प्रत्यक्षात अनुभवला. सॅलिनाची रहिवाशी असलेल्या जेन्ना क्रेहबेल सर्कस पाहण्यासाठी बिसेंटेनीयल सेंटरमध्ये गेल्या होत्या. त्या बाथरूममध्ये दाखल होताच तिच्यासमोर वाघ उभा होता. अगदी दोन फुटांवर. बाथरूममध्ये हा वाघ काही क्षण भटकला आणि लगेचच तेथून बाहेर पडला. बाथरूम केवळ 25...
  April 24, 12:26 AM
 • PHOTOS: 100 वर्षांपेक्षाही जुन्या कार उत्पादक कंपन्यांची कहाणी
  कार्ल बेंझने मर्सिडीझ बेंझ 1883 मध्ये तयार केली. हेर्नी फोर्डने फोर्ड या ऑटो कंपनीची 1903 मध्ये स्थापना केली. रोल्स रॉइसने 1906 मध्ये लाँग हुडेड लक्झरी कार आणली. जगातील सर्वात जुन्या कार कंपन्यांपैकी वयाची शंभरी पार केलेल्या या कंपन्या..
  April 23, 02:07 PM
 • अंतराळात पिळताच येत नाहीत कपडे...
  अंतराळात पाणी वाहत नाही किंवा धबधब्याप्रमाणे कोसळतही नाही. तुम्हाला ग्लासमध्ये पाणी भरताही येत नाही. मग तुम्ही अंतराळात असाल आणि एखादा ओला कपडा पिळण्याचा प्रयत्न केलात तर काय होईल? तुमचे प्रयत्न अपयशी ठरतील. कारण तेथे पाणी थेंबांच्या रूपात जागेवरच थांबते. ते खाली पडत नाही. खगोलशास्त्रज्ञ क्रिस हेडफील्ड यांनी जारी केलेल्या एका व्हिडिओतून ही बाब पुढे आली आहे. अंतराळात एखादा कपडा आपण पिळल्यास पाण्याचे थेंब खाली पडण्याऐवजी कपड्यावरच चहूबाजूंनी थेंबांच्या रूपात असे काही चिकटून बसतात की,...
  April 23, 11:24 AM
 • रंग बदलत्या दुनियेत यापुढे कपडेही रंग बदलणार
  टोरांटो- सरड्याप्रमाणे रंग बदलणा-या दुनियेत आता कापडाचाही रंग बदलणे शक्य होणार आहे. माणसाच्या हालचालींनुसार रंग बदलणारे कापड तयार करण्याचा अवघड प्रयोग कॅनडातील एका विद्यापीठाने यशस्वीपणे केला आहे. हे कापड व्यक्तीच्या शरीरातील ऊर्जा साठवून ठेवते आणि तीच ऊर्जा रंग तसेच आकार बदलण्यासाठी वापरते. टेक्स्टाइल इंडस्ट्रीमध्ये या शोधामुळे आगामी काळात क्रांतिकारी बदल घडून येऊ शकतो. कॅनडातील कॉनकोर्डिया विद्यापीठाच्या प्राध्यापिका जोआना बर्झोवस्का यांच्या चमूने अशा प्रकारचे...
  April 20, 03:18 AM
 • 1836 मध्ये अशी होती चंद्रावरील जीवनाची कल्पना
  सोबत दिलेल्या चित्रात तुम्हाला लोक उडताना दिसत आहेत. हा लिथोग्राफ 1836 मध्ये बनवला होता. चंद्रावर जीवनाची कल्पना यातून केली आहे. न्यूयॉर्क सन वृत्तपत्रासाठी लिहिणारे रिचर्ड इ लॉक यांनी तेव्हा लिहिले की, ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ सर जॉन हर्शेल यांनी चंद्रावर जीवन असल्याचा शोध लावला आहे. तेथे त्यांना वनस्पती, बॅटमॅन आणि पंख असलेली माणसे दिसली होती. त्यानंतर त्यांनी हायड्रोजन बलूनच्या मदतीने चंद्रावर जाण्याची योजना बनवली होती. स्मिथसोनियन लायब्ररीने आपल्या संग्रहालयातून हे फोटो प्रकाशित...
  April 15, 06:18 PM
 • 15 वर्षांच्या संशोधनानंतर सिद्ध झाले, ब्रा घातल्याने खराब होतात ब्रेस्‍ट
  पॅरिस- महिलांसाठी अंडरगारमेंट्स हानिकारक असल्याचे एका संशोधनात आढळून आले आहे. फ्रॉन्समधील एका संशोधकाने याबाबत निष्कर्ष काढले आहेत. या संशोधकाने सुमारे 330 महिलांवर व त्या वापरत असलेल्या अंडरगारमेंटसवर सलग 15 वर्ष अभ्यास केला. त्यात त्याला आढळून आले की, अंडरगारमेंट्स घातल्यामुळे महिलांची छाती व उरोज व्यवस्थित व नैसर्गिकरित्या विकसित होत नाहीत. तसेच त्यामुळे महिलांच्या फिगरवरही परिणाम होतो. अशामुळेच महिलांना आपली फिगर व्यवस्थित करण्यासाठी ब्रेस्ट इंप्लांट आणि इतर अनेक सर्जरी...
  April 13, 12:10 PM
 • भुकेवर नियंत्रण मिळवणे शक्य!
  लंडन - विज्ञानाच्या साह्याने भुकेवर नियंत्रण मिळवता येऊ शकते का? कदाचित या प्रश्नाचे उत्तर हो असेच मिळू शकते. शास्त्रज्ञांनी भूक नियंत्रणात आणण्याची क्षमता असलेल्या मेंदूतील अशा पेशींच्या एका समूहाचा शोध लावला आहे. या पेशींमुळेच खानपानाच्या सवयीत गडबड होते आणि स्थूलपणा येऊ शकतो. उंदीर, खार आणि अन्य कुरतडणार्या प्राण्यांवर करण्यात आलेल्या प्रयोगात मेंदूतील टेनिसायटिस नावाच्या पेशी न्यूरॉनची निर्मिती करतात, असे शास्त्रज्ञांना आढळून आले आहे. न्यूरॉन हे मुख्यत्वे करून भूक...
  April 12, 10:45 PM
 • PHOTOS : पाचशे वर्षानंतर सगळीकडे असेल पाणीच पाणी
  शीर्षक वाचून दुष्काळी भागातील नागरिक सुखावले असतील, कारण महाराष्ट्राच्या काही भागात हंडाभर पाण्यासाठी मैलोनमैल पायपीट करावी लागत आहे. मात्र, हे वृत्त दुष्काळग्रस्तांना दिलासा देणारे नसून जगाची चिंता वाढवणारे आहे. तुम्ही कधी विचार केला आहे का की, पाचशे वर्षानंतर हे विश्व कसे दिसेल. शास्त्रज्ञांचा दावा आहे की, पुढील पाचशे वर्षानंतर समुद्राच्या पाण्याची पातळी एवढी वाढलेली असेल की, अनेक जगप्रसिध्द इमारती या पाण्यात बुडालेल्या दिसतील. दिव्य मराठी डॉट कॉमने अशी छायाचित्रे तुमच्यासाठी...
  April 11, 05:38 PM
 • माशाच्या शरीरातून काढलेल्या चिकट पदार्थापासून बनवले जाऊ शकतात कपडे...
  हेगफिश नावाच्या माशापासून निघणारा हा चिकट पदार्थ लक्षपूर्वक पाहून घ्या. कारण भविष्यात तुम्ही त्यापासून तयार केलेले कपडे घालण्याची शक्यता आहे. हेगफिशपासून काढलेला पदार्थ धाग्यासारख्या फायबरपासून बनलेला असतो. या माशाच्या शरीरातील 100 पेक्षा जास्त ग्रंथींतून हा पदार्थ स्रवतो. कॅनडाच्या ग्यूफ विद्यापीठात या संशोधन प्रकल्पाचे नेतृत्व करणारे डग्लस फज सांगतात की, तुम्ही हे फायबर पाण्यात ताणून धरले आणि नंतर बाहेर काढून ते कोरडे केल्यास त्यात धाग्यासारखी लक्षणे दिसतात. हेगफिश फायबर खूप...
  April 6, 12:42 AM
 • 1973 मध्ये बनला जगातील पहिला सेलफोन; छाया‍चित्रातून पाहा 40 वर्षांचा प्रवास
  चार दशकांपूर्वी 3 एप्रिल 1973 रोजी मार्टिन कूपर याने जगातील पहिला सेलफोन बनवला. कूपरने पत्रकारांसमोर सेलफोनने कॉल केला. या फोनची लांबी 10 इंच आणि वजन एक किलो एवढे होते. कूपर आता 84 वर्षांचे झाले आहेत आणि अजूनही सिलिकॉन व्हॅलीत काम करत आहेत. माजी नौसैनिक आणि अभियंते असलेल्या कूपर हे 1952 मध्ये मोटोरोला कंपनीत रुजू झाले होते. पुढील स्लाइडवर क्लिक करून सेलफोनच्या 40 वर्षांच्या इतिहासावर एक नजर टाकूया...
  April 5, 02:38 PM
 • जगभरातील पुरुष होत आहेत 'कमजोर'; पृथ्वीवरुन नष्ट होणार पुरुष जमात!
  लंडन- जगभरातील पुरुषांचे दिवस आता भरत आल्याचे एका संशोधनात पुढे आले आहे. ऑस्ट्रेलियातील एका महिला वैज्ञानिकाने दावा केला आहे की, पुरुषांची प्रजात जास्त दिवस या जगात टिकणार नाही. येत्या 50 लाख वर्षांत पुरुष प्रजात पृथ्वीवरुन नष्ट होईल. या महिला वैज्ञानिकाने हा ही दावा हकेला आहे की, पुरुष प्रजात नष्ट होण्याला सुरुवात झाली आहे. क्रोमोझोम्सच्या आधारावर संबंधित महिलेने संशोधन केल्यानंतर हा दावा केला आहे. तिचे म्हणणे आहे की, महिलांतील क्रोमोझोम्स पुरुषांच्या तुलनेत अधिक व मजबूत आहेत....
  April 4, 02:25 PM
 • जॉर्जिया डेव्हिस : 19 वर्षांच्या वयात एका खुर्चीपुरतेच मर्यादित होते विश्व
  292 किलो वजन असलेली जॉर्जिया डेव्हिस तीन दिवसांपासून रुग्णालयात आहे. 19 वर्षांच्या जॉर्जियाला या खुर्चीवरून उठताही येत नव्हते. पायांमध्ये प्रचंड वेदना. चार वर्षांपूर्वी डॉक्टरांनी सक्तीने तिच्या खान-पानावर नियंत्रण आणून वजन 95 किलो घटवले होते. तिला केवळ 1500 कॅलरी घेण्यास सांगण्यात आले. मात्र, जॉर्जियाचे नियंत्रण राहिले नाही. तिने घ्यायला सुरुवात केली 13000 कॅलरीज. मागील वर्षीच्या मे महिन्यात तिचे वजन 330 किलो झाले होते. रुग्णालयात घेऊन जाण्याची वेळ आली तेव्हा घराचा एक भाग तोडून तिला बाहेर...
  March 31, 04:14 AM
 • ‘युरोपा’वर मिळाले जीवसृष्टीचे संकेत
  सर्वात आधी हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की, आपल्याला माहीत नाही, गुरू ग्रहाच्या सर्वात मोठ्या चंद्रापैकी एक युरोपा उपग्रहावर मासे आहेत. परंतु आपल्याला हेही माहिती नाही की, येथे मासे नाहीतच. आपल्याकडे फक्त इतकीच माहिती आहे की, येथे भरपूर पाणी आहे. इतके की, संपूर्ण ब्रह्मांडाला चारही बाजूने व्यापू शकेल. हे शंभर मैल खोल समुद्रासारखे आहे. जो जवळपास दहा मैल जाड बर्फाच्या तुकड्याने झाकलेला आहे. पृथ्वीच्या अथांग सागरांप्रमाणे युरोपावरील हे पाणी जीवसृष्टीसाठी अनुकूल नाही. कारण यात मीठ आणि...
  March 31, 12:00 AM
 • हंगेरीत प्रबळ होतोय यहुदींचा विरोध
  दोन महिन्यांपूर्वी बुडापेस्टमध्ये सुरू झालेल्या माशेज हस्जर रेस्टॉरंटमध्ये जमलेला जनसमुदाय हंगेरीत यहुदी संस्कृती परतण्याचे संकेत देते. आधी नाझी आणि नंतर साम्यवादी शासनाने या संस्कृतीला उद्ध्वस्त केले होते. रेस्टॉरंटमध्ये यहुदी पक्वान्नांचा आनंद घेणा-या लोकांना चिंता सतावतेय की, देश पुन्हा एकदा यहुदींचा शत्रू तर बनत नाही ना? हा प्रश्न आश्चर्यजनक आहे. कारण बुडापेस्टमध्ये जवळपास एक लाखावर यहुदी राहतात. मध्य युरोपातील यहुदींची ही सर्वात मोठी संख्या आहे. अर्थव्यवस्थेची झालेली...
  March 31, 12:00 AM
 • कोंबडीपेक्षा 100 पट मोठे अंडे
  कोंबडीच्या अंड्यापेक्षा 100 पट मोठय़ा अंड्याचा लिलाव लंडनच्या सूदबे कंपनीच्या वतीने करण्यात येणार आहे. हे अंडे 17 व्या शतकातील एलिफंट बर्ड या पक्षाचे आहे.सन 1640 ते 50 च्या दरम्यान मादागास्कार भागात सापडणारे हे पक्षी सुमारे दहाफूट उंच आणि 400 किलो वजनाचे होते.येत्या 24 एप्रिल रोजी त्याचा लिलाव होणार असून या अंड्याला सुमारे साडेसोळा लाख ते 24 लाख 70 हजार रुपयांपर्यंत बोली लागू शकते, असा अंदाज आहे. गुरुवारी कोंबडीच्या अंड्यासमोर एलीफंट बर्डचे अंडे दाखवताना सूदबेचे कर्मचारी.
  March 29, 02:56 PM
 • PHOTOS : पाहा, कशी गायब झाली जमिन आणि बेपत्ता झाली घरे...
  वॉशिंग्टन- वॉशिंग्टनजवळील एका छोट्या आईसलॅंडमधील लोकांची आजची सकाळ धक्कादायक व त्रासदायक ठरली. कारण येथील आईसलॅंडमधील जमीन फाटल्यामुळे अनेक लोकांची घरे पडली. काहींची तर घरे जमिनदोस्त झाली. तर काही घरांचे किरकोळ नुकसान झाले. ज्या ठिकाणी ही जमिन अचानकपणे फाटली तेथील रहिवाशी ब्रेट होल्मने सांगितले की, मी जोराचा आवाज ऐकला. मी जेव्हा खिडकीतून घराच्या बाहेर पाहिले तेव्हा मला एकही झाड दिसले नाही. तसेच माझी जमिनच गायब झाली होती. ही जमिन सुमारे 500 फूट लांब फाटत गेल्यामुळे स्थानिक नागरिकांत...
  March 28, 02:46 PM
 
जाहिरात
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
जाहिरात
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 

हास्ययात्रा