Home >> International >> Bhaskar Gyan
 • बेडरूम टॅक्स घेणे किती योग्य ?
  घरांसाठी जागेच्या कमतरतेमुळे हैराण झालेल्या ब्रिटिश सरकारने नवा टॅक्स लावण्याचा विचार केला आहे. तो म्हणजे बेडरूम टॅक्स. यासाठी तीन कारणे देण्यात येत आहेत. पहिले- गरजेपेक्षा जास्त मोठ्या घरांमध्ये राहणा-या लोकांना तेथून बाहेर काढणे, जेणेकरून खचाखच भरलेल्या वस्त्यांमध्ये राहणा-या लोकांना जास्तीत जास्त जागा मिळू शकेल. दुसरे- वेल्फेअर कॉस्ट कमी करणे. तिसरे- मागणी आणि पुरवठ्यादरम्यान योग्य संतुलन प्रस्थापित करणे; पण मूलभूत समस्या त्या घरांची आहे, जेथे लोक राहू शकतील. हेलन गॉडमॅन यांच्या...
  February 25, 02:08 AM
 • तुमच्या झोपेच्या समस्येवर अचूक तोडगा सापडला
  मी थकलो आहे, असे अनेक जण नेहमीच म्हणत असतात. झोप पूर्ण न झाल्यामुळे तसेच अधिक काम करण्यामुळे ही समस्या उद्भवते. अमेरिकन रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राने दिलेल्या माहितीनुसार सुमारे एकतृतीयांश अमेरिकी नागरिकांची झोप पूर्ण होत नाही; पण फक्त जांभया येणे हे अपु-या विश्रांतीचे लक्षण नाही. याची इतरही अनेक कारणे आहेत. तुमची नेमकी समस्या जाणून घ्या. पेंगुळलेपणा काय जाणवते : डोळे जड होतात, पापण्या लवून नजर हळूहळू अस्पष्ट होते कारण : नॅशनल स्लीप फाउंडेशनने दिलेल्या माहितीनुसार नेहमी...
  February 25, 01:44 AM
 • प्रेम आणि विश्‍वास जिंकण्‍यासाठी सखोल विचार करणे आवश्‍यक
  जीवशास्त्रज्ञ रिचर्ड डॉकिन्स यांनी त्यांच्या 10 वर्षांच्या मुलीला पत्र लिहिले. पित्याने आपल्या मुलीला लिहिलेल्या प्रसिद्ध पत्रांपैकी हे एक पत्र. आपल्याला माहीत असलेल्या गोष्टी आपल्याला का आणि कशा माहीत आहेत याविषयी त्यांनी आपल्या मुलीला समजावून सांगितले आहे. माझ्या प्रिय मुलीस, आता तू दहा वर्षांची होणार आहेस. त्यामुळे काही आवश्यक गोष्टी मी तुला सांगणार आहे. ज्या गोष्टी आपण जाणतो त्या आपल्यापर्यंत कशा पोहोचल्या हे तुला माहीत आहे का? आकाशात एखाद्या छोट्या बिंदूप्रमाणे दिसणारे तारे...
  February 21, 12:00 AM
 • पुस्‍तकाप्रमाणे उघडणारा टेबल लँप
  पाहताक्षणी हे तुम्हाला एखादे पुस्तक वाटेल, पण प्रत्यक्षात हा एक पोर्टेबल लाइट आहे. लुमिओ नावाचा हा पोर्टेबल लाइट उघडल्यास त्यात पुस्तकातील पानांप्रमाणे दिसणारा दिवा लागेल.लँपला लावलेल्या चुंबकाच्या मदतीने तो लोखंडी खिळ्यावर टांगताही येतो. एकदा चार्ज केल्यानंतर तो लँप आठ तास चालू शकतो. हँडी डिझाइन असल्यामुळे हा लँप कुठेही नेता येऊ शकतो. मेक्स गुनावन या वास्तुशास्त्रज्ञाने हा बुकलँप तयार केला आहे. thisiscolossal.com
  February 21, 12:00 AM
 • 68 वर्षांनंतर तिला कळले वडिलांचे धीरोदात्त शौर्य
  लॉस एंजलिस येथील हायला मेरीनला कल्पनाही नव्हती की, तिच्या वडिलांना शौर्यासाठीचे पर्पल हार्ट आणि सिल्व्हर स्टार या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी निमंत्रण मिळेपर्यंत तिला हे माहीत नव्हते. मेरीनचे वडील हायमन मार्केल हे दुस-या महायुद्धादरम्यान 3 मे 1945 रोजी शहीद झाले होते. मेरीनने तिच्या वडिलांना फक्त लग्नाच्या फोटोंमध्ये पाहिले होते. 60 च्या दशकात मेरीन तिच्या आईसोबत ज्या अपार्टमेंटमध्ये राहत होती तेथील मॅनेजरला लाँड्री...
  February 21, 12:00 AM
 • मेंदूच्या संशोधनासाठी तब्बल 7054 कोटी रूपयांचा निधी
  युरोपियन संशोधक हेन्री मारक्राम हे मानवी मेंदू सक्रिय करण्याच्या प्रकल्पावर काम करत आहेत. त्यासाठी त्यांना युरोपियन आयोगाने 1.3 अब्ज डॉलर एवढा निधी दिला आहे. हेन्री हे स्वित्झर्लंडमध्ये सुरू असलेल्या मानवी मेंदूवरील प्रकल्पाचे प्रमुख आहेत. मानवी मेंदू सक्रिय करण्यासाठी मज्जातंतूंद्वारे दोन न्यूरॉन्सदरम्यान होणा-या संदेशवहनाचा ते अभ्यास करणार असल्याचे हेन्री यांनी सांगितले. कोणत्या न्यूरॉनपासून कोणत्या प्रकारच्या जीनवर परिणाम होतो यावरही रिसर्च केला जाणार आहे. प्रत्येक...
  February 21, 12:00 AM
 • 'चाचा चौधरी' वर बंदी घालण्‍यासाठी पोहोचले
  ही बातमी विडंबनात्मक शैलीत लिहिण्यात आली आहे. याचा उद्देश मस्करी नसून गंभीर विषयावर रंजक पद्धतीने भाष्य करणे असा आहे. यूजीसीची वेबसाइट आणि इतर यूआरएलवर मानहानीचा दावा करत बंदी घालणारे आयआयपीएमचे संस्थापक अरिंदम चौधरी यांनी या यादीत आणखी एक नाव समाविष्ट केले आहे. अरिंदम यांनी चाचा चौधरी या बच्चे कंपनीच्या आवडत्या कॉमिक्सविरूद्ध मानहानीचा दावा केला आहे.या कॉमिक्सने व्यवसायाला नुकसान पोहोचवल्याचा त्यांचा आरोप आहे. ही संपूर्ण कॉमिक सिरीज बेकार आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. स्वयंघोषित...
  February 21, 12:00 AM
 • उल्कापात : नेहमी पडणा-या प्रश्‍नांची उत्तरे खास तुमच्यासाठी
  *पृथ्वीवर दररोज 4 अब्ज उल्कांचा वर्षाव होतो. पण आकाराने लहान असल्यामुळे त्यापासून फार नुकसान होत नाही. *उल्कापाताच्या अनेक बातम्या येत असतात. पण रशियात यापूर्वी फक्त एकाच घटनेचा शास्त्रशुद्ध पुरावा मिळाला आहे. 1954 मध्ये सायलाकोगा येथे राहणारे अॅनी होजेस त्यांच्या घरी झोपले होते. सुमारे 4 किलो वजनाची एक उल्का घराचे छत भेदून त्यांच्यावर कोसळली. *पुढील 20 वर्षांत होणा-या सुमारे 1 लाख उल्कांपासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचा बचाव करण्यासाठी केव्हलेटचे आवरण घालण्यात आले आहे. बुलेटप्रूफ...
  February 19, 09:50 AM
 • ताटातील घासन् घास खा नाही तर दंड भरा !
  जपानमधील सपोरो येथील हाचियाको रेस्टॉरंटमध्ये एक नवा नियम लागू केला आहे. या रेस्टॉरंटमध्ये आल्यानंतर तुमच्या ताटातील अन्न तुम्ही पूर्ण संपवले नाही तर त्यासाठी दंड भरावा लागणार. हा नवा नियम जपानच्या खास सूको मेसी या डिशसाठी लागू करण्यात आला आहे. एक वाटीभर भात, त्यावर सॉमन रॉ फिश असलेली ही डिश जपानमध्ये खूप लोकप्रिय ठरली. ऑर्डर केल्यानंतर ही डिश तुम्ही पूर्ण संपवली नाही तर तुम्हाला त्याची नुकसानभरपाई द्यावी लागणार आहे. रेस्टॉरंटने या मेन्यूसाठी असा नियम लागू करण्यामागील कारण सांगितले...
  February 19, 09:33 AM
 • मोठे कष्‍णविवर सापडण्‍याची शक्यता
  नासाच्या एक्स-रे ऑब्झर्व्हेटरी या चंद्रापासून मिळालेल्या माहितीचा उपयोग करून शास्त्रज्ञ एका सुपरनोव्हाचे अवशेष शोधत आहेत. त्यात आपल्या आकाशगंगेतील सर्वात मोठे कृष्णविवर असण्याची शक्यता आहे. सुपरनोव्हाच्या अवशेषांना सध्या डब्ल्यू 49 बी नाव देण्यात आले आहे. हा पृथ्वीपासून सुमारे 26 हजार प्रकाश वर्ष अंतरावर आहे. 27 हजार वर्षांपूर्वी त्यात स्फोट झाल्याचे मानले जात आहे. सापेक्षतेच्या सिद्धांतानुसार, 1000 वर्षांपूर्वी ती पृथ्वीवरून पाहता आली असती. एनरिको रॅमिर्ज या संशोधकाच्या मते,...
  February 18, 01:00 AM
 • ब्रिटनमध्‍ये सापडले मॅकियाव्हेलीचे 500 वर्षे जुने अटक वॉरंट
  मँचेस्टर विद्यापीठातील प्राध्यापक स्टीफन मिलनर यांना योगायोगाने एक ऐतिहासिक दस्तऐवज सापडला आहे. 500 वर्षांपूर्वीचे ते एक अटक वॉरंट आहे. तत्कालीन कुख्यात राजकीय विचारवंत निकोलो मॅकियाव्हेलीविरोधात ते जारी करण्यात आले होते. मॅकियाव्हेलीला अटक करण्याची घोषणा 1513 मध्ये झाली होती. त्याचे अध:पतन अणि मृत्यूसाठी तीच कारणीभूत ठरली. प्राध्यापक स्टीफन हे फ्लोरेन्समधील संग्रहालयात दवंडी पिटणारे आणि घोषणा करणा-यांवर संशोधन करत होते. 1470 पासून 1530 पर्यंत जारी करण्यात आलेले शेकडो घोषणापत्र त्यांनी...
  February 18, 01:00 AM
 • स्वत:च्या अत्यंयात्रेची रिहर्सल
  कोलोरॅडो येथे राहणा-या जिम गॅनहार्ट यांनी 1951 मध्ये स्वत:च्या अंत्ययात्रेचा सराव केला होता. ते शेती करत होते. आपल्या माघारी कुटुंबातील सदस्य कसे जगतील, हे त्यांना पाहायचे होते. त्यामुळे त्यांनी आपल्या अंत्ययात्रेचा सराव करून पाहिला. गेनहार्ट यांनी हेडस्टोन आणि पुरण्यासाठी 25 हजार रुपयांत जमिनीही खरेदी केली होती. स्थानिक वर्तमानपत्रांत त्यांचा शोकसंदेशही प्रकाशित करवून घेतला. त्यांच्या अंत्यसंस्कारांवेळी वाचल्या जाणा-या शोकसंदेशात म्हटले गेले की, गेनहार्ट यांनी लोकांना काहीही न कळू...
  February 18, 12:00 AM
 • अमेरिकेतील फ्लोरेन्समध्ये राहणा-या सर्गियो पोर्टिलिओ या चित्रकाराने मृत व्यक्तीच्या आठवणी चिरकाळ स्मृतीत ठेवण्याकरिता तिच्या नातेवाइकांसाठी एक अनोखी सेवा द्यायला सुरुवात केली आहे. मृत व्यक्तीच्या राखेपासून तो कॅन्व्हासवर अशी काही कलाकृती चितारतो की ती नेहमीसाठी आपल्या नजरेसमोर राहते. मृत पाळीव प्राण्यांच्या हाडांच्या राखेपासून मेमोरियल पेंटिंग तयार करण्यापासून सर्गियोने या कलेची सुरुवात केली. मृत प्राणी पेंटिंगच्या स्वरूपात नेहमीसाठी त्यांच्या मालकांसोबत राहावेत, असे...
  February 16, 08:58 AM
 • अमेरिकेत प्रगती झाली;पण 99 टक्के लोक गरीब
  यूसी बर्कले युनिव्हर्सिटीतील इमॅन्युअल सॅझ या अर्थशास्त्रज्ञांच्या मते,अमेरिकेतील धिमी अर्थव्यवस्था वेगाने विकसित झाल्यामुळे श्रीमंतांना जास्त फायदा झाला. यामुळे अमेरिकेतील एक टक्का श्रीमंत लोक आणखी श्रीमंत झाले आणि उर्वरित 99 टक्के गरीब लोक आणखी गरीब झाले. स्ट्रायकिंग इट रिचर नावाच्या अध्ययनात त्यांनी हे मत मांडले आहे. सॅझ यांना आढळून आले की, 2009 मध्ये झालेल्या आर्थिक लाभाचा 121 टक्के भाग श्रीमंतांच्या खात्यात जमा झाला. दुस-या शब्दात सांगायचे झाल्यास वेगाने आर्थिक विकास झाला तरी...
  February 16, 08:56 AM
 • सहा महिन्यांच्‍या बाळास चांगल्या-वाईटाचा अंदाज
  तुम्हाला वाटते त्यापेक्षाही तुमचे बाळ जास्त हुशार असते. नव्या तंत्रज्ञानानुसार लहान बाळासोबत बोलताना त्याच्या डोक्यात काय सुरू आहे, याची माहिती शास्त्रज्ञांना मिळू शकते. सहा महिन्यांपर्यंतची मुले शक्यतांच्या आधारावर अंदाज लावण्यात सक्षम असतात. संशोधकांनी या मुलांना अनेक प्रकारचे हावभाव असलेले चेहरे दाखवले तेव्हा भीतीदायक चेह-यांकडे मुलांनी टक लावून पाहिले.एखाद्या मोठ्या माणसाप्रमाणेच त्यांची वर्तणूक होती. भावनिक विश्लेषणाचे हे पहिले संकेत असल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे....
  February 15, 07:53 AM
 • झाडाच्‍या आकाराचे इंटरॅक्टिव्ह लाइट स्कल्पचर
  चार्ल्स गेडलेकन या कलाकाराने औरोरा पालो ऑल्टो नावाचे इंटरॅक्टिव्ह लाइट स्कल्पचर तयार केले आहे. झाडासारखी दिसणारी ही कलाकृती कॅलिफोर्नियातील पालो ऑल्टोमधील सिटी हॉलसमोर उभारण्यात आली आहे. मोबाइल अॅप्लिकेशनच्या मदतीने प्रेक्षक या झाडावरील लाइटचे रंग आणि पॅटर्न बदलू शकतात. या झाडावर 40 हजार एलईडी लाइट्स लावण्यात आले आहेत. त्यामुळे रात्री झाड लखलखते. विशेष म्हणजे पातळ तांब्याच्या पत्र्यापासून या झाडाची पाने हाताने तयार केली आहेत. वा-याची झुळुक येताच झाडांच्या पानांची किणकिण ऐकू येते....
  February 15, 07:48 AM
 • एकच चित्रपट 40 वर्षे पुन्‍हा पुन्हा बनवला
  अमेरिकन चित्रपट निर्माते मेल्टन बारकर यांनी 1930 ते 1970 दरम्यान द किडनॅपर्स फॉइल नावाचा लघुपट अनेक वेळा बनवला. या चार दशकांच्या काळात ते अनेक छोट्या गावांमध्ये फिरले. गावात जाऊन घोषणा करत असत की, ते एक चित्रपट करत आहे. चित्रपटात अनेक लहान मुलांसाठी काम आहे. ज्या आई-वडिलांना आपल्या मुलांना चित्रपटात पाहण्याची इच्छा असते, त्या पालकांना ते आवाहन करत असत. चित्रपटनिर्मितीसाठी ते स्थानिक लोकांकडून पैसा गोळा करत असत. चित्रपट झाल्यानंतर ते गाव सोडून दुस-या गावाला निघून जात. अमेरिकन लोकांचे आयुष्य...
  February 15, 07:46 AM
 • प्लूटोच्या नव्या चंद्राचे नाव ठेवण्‍यासाठी मतदान सुरू
  खगोलशास्त्रज्ञांना प्लूटोवर दोन छोटे चंद्र आढळून आले आहेत. या चंद्रांना नाव देण्यासाठी शास्त्रज्ञ आता सामान्य लोकांची मदत घेत आहेत. यासाठी लोकांना प्लूटोरॉक्स डॉट एसईटीआय डॉट ओआरजी या संकेतस्थळावर जाऊन मतदान करावे लागेल. परंपरेनुसार प्लूटोच्या चंद्रांची नावे हेड्स आणि अंडरवर्ल्डशी निगडित आहेत. कॅलिफोर्नियातील माउंटन व्ह्यूमधील एसईटीआय इन्स्टिट्यूटच्या कार्ल सागान सेंटरमध्ये काम करणारे ज्येष्ठ संशोधक मार्क शोवाल्टर आणि त्यांच्या टीमने या चंद्रांचा शोध लावला आहे. मतदानाच्या...
  February 15, 07:28 AM
 • घराची आठवण काढणारा आधिकारी
  कोटडा (उदयपूर) - आयएएस अधिका-याने अधिकाराचा गैरवापर करण्याची आणि त्याबद्दल त्याची कानउघाडणी होण्याची एक वेगळीच घटना राजस्थानमध्ये घडली. भारतीय प्रशासकीय सेवेतील प्रशिक्षणार्थी अधिकारी होलियान गुइटे यांना उदयपूर जिल्ह्यातील कोटडा येथे उपविभागीय अधिकारी म्हणून पाठवण्यात आले. मणिपूर राज्यातील लमका गावचे रहिवासी असलेल्या गुइटे यांना आपल्या गावाची खूपच आठवण येत असे. वसतिगृहावर राहणारे किंवा बोर्डिंग स्कूलमध्ये शिकणारे विद्यार्थी कुटुंबीयांची आठवण म्हणून त्यांचा एखादा फोटो...
  February 11, 02:41 AM
 • चरबीच्या पेशीची कहाणी ऐका तिच्याच शब्दात
  जवळपास 10 वाजले आहेत. मी यकृताजवळ आहे. नुकतेच एनर्जी ड्रिंक मिळाले आहे. मस्त, गोड आहे. खरंच मला खूप आवडते. पचनक्रियेतून जाताना चोरून यकृतापर्यंत येते. यकृत त्याचे चरबीत रूपांतर करून माझ्यापर्यंत आणते. व्हॉट अ बोनांझा? मला मोठी मेजवानी मिळाली. फक्त मलाच नाही तर माझ्या इतर मैत्रिणींनाही (म्हणजेच चरबीच्या पेशींना). वर्षानुवर्षे मांसपेशींचे राज्य होते. आता आमची वेळ आहे. त्यासाठी तुम्हाला माझ्यावर विश्वास ठेवण्याची गरज नाही. तुमच्या आजूबाजूच्या रस्त्यावर पाहा. 35 टक्के प्रौढ लोक स्थूलपणाने...
  February 11, 02:37 AM
 
जाहिरात
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
जाहिरात
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 

हास्ययात्रा