Home >> International >> Pakistan

Pakistan News

 • सियाचीनमध्ये पाकिस्तानी लढाऊ विमानाच्या घिरट्या, पाकच्या हवाई दल प्रमुखांनीही केले उड्डाण
  इस्लामाबाद - पाकिस्तानच्या लढाऊ विमानाने बुधवारी सियाचीन ग्लेशियरमध्ये घिरट्या घातल्या. पाकिस्तानी हवाई दलाचे प्रमुख एअर चिफ मार्शल सोहेल अमन हे सीमेलगतच्या स्कर्दू येथील हवाई दल तळावर पोहोचले. तेथून त्यांनी मिराज विमानाने उड्डाण घेतले. पाक हवाई दल प्रमुखांनी तेथे पायलट व तांत्रिक कर्मचाऱ्यांशीही चर्चा केली, असे वृत्त एका पाकिस्तानी वृत्तवाहिनीने दिले आहे. पाकने सीमेलगतचे सर्व आघाडीचे हवाई दल तळ ऑपरेशनल केल्याचेही या वृत्तात म्हटले आहे. सियाचीनमध्ये उड्डाण घेतलेले मिराज विमान...
  07:02 AM
 • भारतीय महिला उज्माला वाघा सीमेपर्यंत सुरक्षित पोहोचवा, पाकिस्तानी न्यायालयाचा आदेश
  इस्लामाबाद - इस्लामाबाद उच्च न्यायालयाने उज्मा नावाच्या या भारतीय महिलेला मायदेशी परतण्याची परवानगी दिली आहे. पाकिस्तानी व्यक्तीने बंदुकीचा धाक दाखवून आपल्याशी विवाह केला, असा आरोप उज्माने केला होता. आरोप केल्यानंतर उज्मा पाकिस्तानमधील भारतीय दूतावासात राहत होती. उज्माला वाघा सीमेपर्यंत सुरक्षितपणे सोडा, असा आदेश न्यायालयाने पोलिसांना दिला आहे. ती केव्हा भारतात परतणार हे अद्याप स्पष्ट नाही. उज्मा नवी दिल्लीची रहिवासी असून ती याच महिन्यात पाकिस्तानला गेली होती. मलेशियात ताहीर...
  04:42 AM
 • ट्रम्प यांच्यापुढे भाषणासाठी सराव करत राहिले नवाज शरीफ... बोलण्याची संधीच दिली नाही!
  रियाध / इस्लामाबाद / नवी दिल्ली - सौदी अरेबिया येथील समिट रविवारी संपल्यानंतरही पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या अपमानामुळे पुन्हा चर्चेत आले आहे. या समिटसाठी नवाज शरीफ शुक्रवारी इस्लामाबाद ते रियाधला रवाना झाले होते. समिटमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सुद्धा उपस्थिती लावणार अशी माहिती असल्याने त्यांनी ट्रम्प यांच्या पुढे बोलण्यासाठी विमानातच भाषणाची भरपूर प्रक्टिस केली. कार्यक्रमात एक-एक करून छोट्या-छोट्या देशांच्या नेत्यांना भाषणासाठी व्यासपीठावर...
  May 23, 04:15 PM
 • श्रीमंताचा देश ओळख असलेल्या सौदीतही आहेत गरीब लोक, जगताहेत अशी LIFE
  इंटरनेशनल डेस्क- सौदी अरेबियाचे नाव जगात श्रीमंत देश म्हणून घेतले जाते. हे सुपर रिच लोकांचे सर्वात मोठा अड्डा मानला जातो. येथे सुपर रिच लोकांची संख्या भले ही जास्त असेल, पण सौदी देशात आजही 20 टक्के जनता खूपच गरिबीचे जीवन जगत आहेत. मात्र, येथील गरिबी जगासमोर कधीच येत नाही. लंडनचा फोटोग्राफर लिन्से एडेरियोने येथील स्लममधील फोटो टिपले आहेत. गरिबी लपवते या देशातील सरकार... - रियादमधील लग्झरी शॉपिंग मॉल्ससोबतच राजधानीतील स्लम्सची लांबच लांब रांग साफ दिसून येते. -गरिबी आणि विकास यावर लिहणारे...
  May 23, 09:27 AM
 • नवाझ शरीफ 7 दिवसांत राजीनामा द्या, अन्यथा देशभरात आंदोलन; पाकमधील वकीलांची धमकी
  लाहोर- पाकिस्तान सुप्रीम कोर्ट बार असोसिएशन (SCBA) आणि लाहोर हायकोर्ट बार असोशिएशनने (LHCBA) पंतप्रधान नवाज शरीफ यांना अल्टीमेटम दिला आहे. शरीफ यांनी पुढील 7 दिवसांत अर्थात 27 मेपर्यंत राजीनामा द्यावा, अन्यथा देशभरात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा खणखणीत इशाराही वकिलांनी दिला आहे. दोन्ही बार असोसिएशनने शनिवारी एक संयुक्त निवेदन जारी केले आहे. पनामा पेपर लीक प्रकरणी शरीफ यांना वकिलांनी हा इशारा दिला आहे. असोसिएशन मेंबर्स आणि नवाझ समर्थक वकीलांमध्ये झटापट... - न्यूज एजन्सी एएनआयनुसार, पनामा...
  May 21, 11:58 AM
 • कुलभूषण जाधवप्रकरणी आता पाकची बाजू मांडणार अॅटर्नी जनरल अश्तार
  इस्लामाबाद: भारतीय नागरिक कुलभूषण जाधवप्रकरणी पाकिस्तानचे अॅटर्नी जनरल अश्तार असफ अली आता आंतरराष्ट्रीय न्यायालयात पाकिस्तानची बाजू मांडणार आहेत. आंतरराष्ट्रीय न्यायालयात पाकिस्तानची नाचक्की होऊन न्यायालयाने १८ मे रोजी जाधव यांच्या फाशीवर अंतरिम स्थगिती दिल्यामुळे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयावर टीकेची झोड उठली आहे. पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाने हे प्रकरण नीट हाताळले नाही आणि ब्रिटनस्थित खवर कुरेशी यांची आंतरराष्ट्रीय न्यायालयात वकील म्हणून नियुक्ती केल्यामुळे टीका...
  May 21, 02:32 AM
 • पाकिस्तानचे नाव येताच पहिल्यांदा समोर येतो तो काश्मिर मुद्दा. तेथून पसरवण्यात येणाऱ्या दहशदवादावर लक्ष केद्रीत होते. परतु, भारत-पाकिस्तानची संस्कृति अनेक बाबतीत मिळती-जुळती आहे. तेथील अनेक लोक भारताविरोधात द्वेशाच्या दृष्टिकोणातून बघत नाहीत. भारतातही अनेक लोकांना दोन्ही देशात शांताता आणि बंधूभाव असावा असे वाटते. पाकिस्तानातील नवतरुणांना भारताबद्दल काय वाटते असे प्रश्न विचारल्यानंतर, त्यांचे उत्तरं देखील असेच होते. काय म्हणाले पाकिस्तानी तरूण, पाहण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक...
  May 20, 03:00 PM
 • पाकची ICJ मध्ये पुनर्विचार याचिका; अंतिम निकालापर्यंत जाधवांना फाशी देऊ नये- ICJ चा आदेश
  इस्लामाबाद - पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांच्यावरील खटल्याची पुन्हा सुनावणी घेण्यात यावी यासाठी आंतरराष्ट्रीय न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सहा आठवड्यांच्या आत आंतरराष्ट्रीय न्यायालयाने यावर पुन्हा सुनावणी घ्यावी, अशी मागणी पाकिस्तानने केली आहे. तसेच जाधव यांच्या संदर्भातला खटला लढण्यासाठी आंतरराष्ट्रीय न्यायालयात नव्या वकिलांचे पथक पाठवण्यात येणार आहे. पाकिस्तानी पंतप्रधानांचे सल्लागार सरताज अजीज यांनी ही माहिती दिली. विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आणि तज्ज्ञांनी...
  May 20, 10:16 AM
 • गिलानींसह 4 फुटीरवादी नेत्यांची चौकशी सुरू; दहशतवादी गटांकडून निधी घेण्याचे प्रकरण
  नवी दिल्ली :राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) सय्यद अली शाह गिलानी यांच्यासह काश्मीरमधील तीन फुटीरवादी नेत्यांच्या विरोधात प्राथमिक चौकशी सुरू केली आहे. या फुटीरवादी नेत्यांवर घातपाती कारवाया केल्याचा आणि लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिझ सईद याच्याकडून रक्कम घेतल्याचा आरोप आहे. ज्या नेत्यांवर या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे त्यात नईम खान, फारूक अहमद डार ऊर्फ बिट्टा कराटे आणि गाझी जावेद बाबा यांचा समावेश आहे, अशी माहिती एनआयएच्या प्रवक्त्याने दिली. नईम खान अलीकडेच एका न्यूज चॅनेलच्या...
  May 20, 04:22 AM
 • पाकने फेटाळल्या माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्या अटी
  इस्लामाबाद: पाकिस्तान सरकारने माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांना लष्करी सुरक्षा आणि परदेशात परतण्याची हमी देण्यास नकार दिला आहे. मुशर्रफ यांनी तशी मागणी केली होती. मुशर्रफ हे पळून गेले आहेत आणि अशी व्यक्ती न्यायालयात हजर राहण्यासाठी कुठलीही अट घालू शकत नाही, असे सरकारने म्हटले आहे. मुशर्रफांविरोधात तीन न्यायमूर्तींचे खंडपीठ देशद्रोहाच्या प्रकरणाची सुनावणी करत असून सरकारने तेथे आपले म्हणणे मांडले. मुशर्रफ यांच्या वकिलाने ५ मे रोजी म्हटले होते की, मुशर्रफ न्यायालयात हजर...
  May 19, 02:01 AM
 • 20 PHOTOS मधून पाहा, नष्‍ट होण्‍याच्या मार्गावर असलेल्या आदिवासींचे LIFE
  इंटरनॅशनल डेस्क- आजच्या हायटेक लाईफमध्ये सुख सुविधांपासून लांब असलेले आदिवासी कसे आयुष्य जगतात हे दाखवले आहे छायाचित्रकार जिमी नेल्सन यांनी. त्यांनी जगभरातील दुर्गम भागात जाऊन आदिवासींचे छायाचित्रे काढली आहेत. नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत हे आदिवासी... - बिफोर दे पास अवे या प्रकल्पासाठी जिमीने प्रत्येक वर्षी दुर्गम भागात 5 ते 10 दौरे केले. - दुर्गम भागात नष्ट होण्याच्या टप्प्यावर असलेले 30 आदिवासी जमातींना जाणून घेण्याचा प्रयत्न केला. - आर्थिक विकासासाठी हिसकावून घेतले जाणारे जमीन...
  May 17, 10:45 AM
 • पाकिस्तानी विमानाची झडती; 14 कर्मचारी पाच तास ताब्यात
  इस्लामाबाद: पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सच्या (पीआयए) एका विमानात अमली पदार्थ असल्याची माहिती मिळाल्यानंतर लंडनच्या हिथ्रो विमानतळावर सोमवारी या विमानाची कसून झडती घेण्यात आली. ब्रिटिश प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी विमानाच्या १४ कर्मचाऱ्यांना तब्बल पाच तास ताब्यात घेतले होते. या झडतीत काहीही आढळले नसले तरी पुढील चौकशी होण्याची शक्यता असल्याने या १४ ही जणांचे पासपोर्ट ताब्यात घेण्यात आले. पीआयएचे प्रवक्ता मसहूद ताजवार यांनी या प्रकाराची माहिती देताना सांगितले की, पीके ७८५ हे...
  May 17, 04:48 AM
 • पाकची अखेर कबुली, हाफिज जिहादच्या नावावर पसरवतोय दहशतवाद; म्हणूनच नजरकैदेत
  लाहोर- मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यांचा मास्टरमाइंड हाफिज सईद हा जिहादच्या नावावर दहशतवाद पसरवत असल्याची कबुली खुद्द पाकिस्ताननेच दिली आहे. पाकिस्तानच्या गृह मंत्रालयाने न्यायिक आढावा मंडळासमोर हा युक्तिवाद केला आहे. जमात-उद-दावाचा संस्थापक हाफिज सईद आणि त्याच्या चार सहकाऱ्यांच्या नजरकैदेचा अवधी का वाढवला, अशी विचारणा मंडळाने केली होती. पोलिसांनी सईदसह चौघांना मंडळासमोर हजर केले. काश्मिरींचा आवाज बुलंद होण्यापासून रोखण्यासाठी सरकारने आपल्याला ताब्यात घेतल्याचा आरोप हाफिजने...
  May 15, 03:50 AM
 • अतिरेकी मोकाट फिरतात आणि रमजानमध्ये पाणी पिले म्हणून कैदेत टाकले जाते: बख्तावर
  इस्लामाबाद- पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांची मुलगी बख्तावर भुट्टो झरदारी हिने एहतराम-एरमजान कायद्याला विरोध केला आहे. पाकिस्तानात एकिकडे रमजानमध्ये पाणी पिले म्हणून तुरुंगवास आणि दुसरीकडे अतिरेकी मोकाट फिरतात असे ढोंग सुरू असल्याचे तिने म्हटले आहे. शुक्रवारी एकामागे एक ट्विट करून बख्तावरने पाकिस्तानी सरकारची कट्टरवादी विचारसरणी हास्यास्पद असल्याचे सांगून हा इस्लाम नाही असे नमूद केले...ती म्हणते... माझ्या पाकिस्तानात ढोंग सुरू आहे. येथे अतिरेकी मोकाट फिरू शकतात....
  May 14, 05:50 AM
 • जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय कोर्टाचा निकाल पाकला अमान्य; पाकिस्तानी माध्यमांचा दावा
  इस्लामाबाद - कुलभूषण जाधव यांच्याबाबत इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस (आयसीजे) ने दिलेला आदेश पाकिस्तान मान्य करण्यास नकार देऊ शकतो. पाकिस्तानी माध्यमांनी शनिवारी यासंदर्भातील वृत्त जाहीर करून हा दावा केला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, पाकिस्तानच्या लष्करी कोर्टाने भारतीय नागरिक जाधव यांना सुनावलेली फाशी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने स्थगित केली आहे. आयसीजे 15 मे रोजी यावर अंतिम निकाल देणार आहे. पाकिस्तानचे महान्यायवादी म्हणाले... पाकिस्तानी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना पाकिस्तानचे अटॉर्नी...
  May 13, 01:12 PM
 • नमाजनंतर पाकिस्तानात बॉम्बस्फोट, सिनेटचे उपसभापती जखमी; 25 ठार
  क्वेट्टा- पाकिस्तानातील बलुचिस्तानमध्ये शुक्रवारच्या नमाजनंतर झालेल्या बॉम्बस्फोटात किमान २५ जणांचा मृत्यू झाला. पाकिस्तान सिनेटचे उपसभापती मौलाना अब्दुल गफूर हैदरीसह ४५ जण जखमी झाले आहेत. दहशतवादी हल्ल्याचे लक्ष्यही हैदरीच होते. बलुचिस्तानची राजधानी क्वेट्टापासून ७० किलोमीटर असलेल्या मस्तंगमध्ये हा स्फोट झाला. . हैदरी नमाजनंतर लोकांशी आपल्या गाडीवर बसून संवाद साधत होते त्याच वेळी हा हल्ला झाला. त्यात ते जखमी झाले, तर चालकाचा मृत्यू झाला. स्फोट एवढा भयंकर होता की अनेक...
  May 13, 03:41 AM
 • सीमेवरील तणाव दूर करण्यासाठी इराण-पाकिस्तानमध्ये संयुक्त आयोगाची स्थापना
  इस्लामाबाद- सीमेवरील तणाव दूर करण्यासाठी इराण-पाकिस्तान यांच्यात एका संयुक्त आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. दोन्ही देशांत गेल्या काही दिवसांपासून तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर उभय देशांकडून हा निर्णय घेण्यात आला. पाकिस्तानने वेळीच योग्य कारवाई केली नाही, तर पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचा खात्मा केला जाईल, असा इशारा इराणने दोन दिवसांपूर्वी दिला होता. पाकिस्तान हा दहशतवाद्यांसाठी नंदनवन बनले आहे. पाकिस्तानला तत्काळ कारवाई जमत नसल्यास आम्ही धडक कारवाई...
  May 12, 04:00 AM
 • प्रत्येक मुलीला लष्‍करी प्रशिक्षण सक्तीचे, वाचा रहस्यमय उत्तर कोरियाचे 10 Facts
  इंटरनॅशनल डेस्क- जगातील सर्वात रहस्यमय देश असलेला उत्तर कोरिया गेल्या दिवसांपासून कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत आहे. उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन हा अमेरिकेचा द्वेष करत नसल्याचे किमच्या अमेरिकन मित्राने खुलासा केला आहे. यानिमित्त आम्ही तुम्हाला सांगणार आहोत रहस्यमय देशातील लष्कराशी संबंधित काही भयावह फॅक्ट्स. बंदी असलेले लेझर केमिकल शस्त्रही देशाजवळ... महिलांसाठी लष्करी सेवा अनिवार्य- द गार्डियनच्या 2015च्या एका वृत्तानुसार येथील सरकारने 17 ते 20 वर्षांच्या...
  May 10, 04:39 PM
 • सौदीत पुरूषांशिवाय अशी आहे महिलांची LIFE, फोटोग्राफरने टिपले विश्व
  इंटरनॅशनल डेस्क- सौदी अरेबियात आता महिलांना मेल गार्जियनशिप (पुरुषी पालकत्व)पासून स्वातंत्र्य मिळणार आहे. स्थानिक मीडियानुसार, किंग सलमान यांनी एक ऑर्डर पास केली आहे महिला आता पुरुष गार्जियनशिवाय एज्यूकेशन आणि हेल्थकेयरशी संबंधित सर्व सरकारी फायदे घेऊ शकतात. सौदीत घरातून बाहेर पडण्यापासून ते घरातील छोट्या-मोठ्या कामासाठी मेल गार्जियनसोबत असणे गरजेचे असते. यामुळे घटस्फोटित व ज्यांच्या पतींचे निधन झाले आहेत अशा सिंगल वुमनचे जीवन खूपच कठिण होते. सौदीत वेडिंग फोटोग्राफर तस्नीम...
  May 10, 03:10 PM
 • शरीफ लष्करविरोधी असल्याची तक्रार रद्द; आयएसआयच्या अखत्यारीतील विषय असल्याची सबब
  इस्लामाबाद- पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यावर लष्कराविषयी मानहानी करणारी वक्तव्ये केल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. पाकिस्तानच्या पोलिसांनी या सर्व तक्रारी रद्द ठरवल्या आहेत. नवाझ जनतेला लष्कराविरुद्ध चिथावत असल्याचा आरोप होता. पोलिसांनी ३ मे रोजी ही तक्रार नोंदवली होती. रावळपिंडीतील वकील इश्ताक अहमद मिर्झा यांनी ही तक्रार केली होती. तपासानंतर ही बनावट तक्रार असल्याचे उघडकीस आल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. व्हॉट्सअॅपद्वारे आपल्याला एक व्हिडिओ क्लिप आली होती असे...
  May 10, 05:46 AM
 
जाहिरात
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
जाहिरात
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 

हास्ययात्रा