• Funny: मरताना रावणाने दिला लक्ष्मणाला गुरूमंत्र, वाचा खळखळून हसवणारा जोक

  Funny: मरताना रावणाने दिला लक्ष्मणाला गुरूमंत्र, वाचा खळखळून हसवणारा जोक
  Other Jokes
  रावण ज्या वेळी मरणासन्न अवस्थेत होता... त्या वेळी भगवान श्रीरामाने लक्ष्मणाला सांगितले की, या विश्वाला नीति, राजनीति आणि शक्ति चा महान पंडित सोडून... Expand
  रावण ज्या वेळी मरणासन्न अवस्थेत होता... त्या वेळी भगवान श्रीरामाने लक्ष्मणाला सांगितले की, या विश्वाला नीति, राजनीति आणि शक्ति चा महान पंडित सोडून चालला आहे. तु त्यांच्याकडे जा आणि त्यांच्याकडून जीवनाबद्दलचे शिक्षण घे, जे तुला या जगात त्यांच्या शिवाय दुसरा कोणी देऊ शकणार नाही. श्रीरामाची आज्ञा मानून लक्ष्मण मरणासन्न अवस्थेत असलेल्या रावणाच्या डोक्याजवळ जावून ऊभा राहिला... रावण एक शब्द ही बोलला नाही. लक्ष्मण परत भगवान रामा जवळ आला. तेव्हा भगवान राम म्हणाले कोणाकडुन ज्ञान प्राप्त करायचे असेल तर त्याच्या डोक्याजवळ नाही तर त्याच्या पायाजवळ ऊभे रहावे. तेव्हा भगवान रामाचे म्हणने ऐकून लक्ष्मण यावेळी रावणाच्या पायाजवळ जाऊन ऊभा रहिला. त्यावेळी महापंडित रावणाने लक्ष्मणाला तीन महत्वाच्या गोष्टी सांगितल्या. ज्या आयुष्याची गुरुकिल्ली आहेत... १. Whatsapp पासुन दुर रहा... २. Facebook चा उपयोग करु नको...  ३. गाडी चालवताना मुलींकडे बघू नको   नाही तर, माझ्या पेक्षा वाईट हाल होतील लक्षपुर्वक वाचल्याबद्दल धन्यवाद!   Collapse
  Share on facebook
 • Funny: सासूने (वैतागुन) केलेला Whatsapp मेसेज, नक्की वाचा डोळ्यात पाणी येईपर्यंत हसाल

  Funny: सासूने (वैतागुन) केलेला Whatsapp मेसेज, नक्की वाचा डोळ्यात पाणी येईपर्यंत हसाल
  Husband Wife
  सासूने  (वैतागुन) केलेला Whatsapp मेसेज पाया पडते सुनबाई  बंद कर तुझी चाल पहीलं तुझं Whatsapp  चुली मंधी जाळ रोज नविन ड्रेस नवं काढतीस फोटू  रडून... Expand
  सासूने  (वैतागुन) केलेला Whatsapp मेसेज पाया पडते सुनबाई  बंद कर तुझी चाल पहीलं तुझं Whatsapp  चुली मंधी जाळ रोज नविन ड्रेस नवं काढतीस फोटू  रडून रडून उपाशिच झोपून घेतो छोटू डिपी का फीपी बदलण्याच्या नादात, करपून जाते डाळ पहीलं तुझ Whatsapp चुली मंधी जाळ लगिन झालय आपलं शहाण्या सारख वागावं चार दिसाचं सासू सासरं तोंड भरून बोलावं आम्ही मरून गेल्यावर बस वाजवीत टाळ पहीलं तुझ Whatsapp चुली मंधी जाळ रोज एक मेनू बनवतेस वाजवतेस झोपाय बारा पुलाव असतो चांगला पण त्यात दगड अन् गारा टून्ग टून्ग वाजतो फोन पोरी लक्ष थोडं टाळ पहीलं तुझ Whatsapp चुली मंधी जाळ डोळ्याला लागल चष्मा अंगठा होईल बाद खरच सांगते सुनबाई ह्यो चांगला नाय नाद  मान्य हाय दुनिया चंद्रावर गेली पण मान मर्यादा पाळ नाय तर पोटातूनच  नेटपॅक माराय सांगल बाळ पाया पडते सुनबाई Whatsapp चुली मंधी जाळ  चुली मंधी जाळ Collapse
  Share on facebook
 • Funny Puneri: अरे देवा! परत पुण्यातच जन्माला आलो, वाचा भन्नाट पुणेरी JOKES

  Funny Puneri: अरे देवा! परत पुण्यातच जन्माला आलो, वाचा भन्नाट पुणेरी JOKES
  Husband Wife
  🔘 पुणेरी विनोद 🔘 🌸एक बाळ जन्माला आल्या-आल्या बोलायला लागतो. तो नर्सला विचारतो, खायला काय आहे? नर्स : पोहे आणि उपीट तयार आहे... मुलगा: अरे देवा! परत... Expand
  🔘 पुणेरी विनोद 🔘 🌸एक बाळ जन्माला आल्या-आल्या बोलायला लागतो. तो नर्सला विचारतो, खायला काय आहे? नर्स : पोहे आणि उपीट तयार आहे... मुलगा: अरे देवा! परत पुण्यातच जन्माला आलो....!! 🔷🔷🔷🔷🔷🔷 🌸एक पुणेरी मुलगा आपल्या मित्रांना घरी घेऊन आला आणि म्हणाला, " थांबा मी चहा घेऊन आलो..." १० मिनीटांनी, " चला माझा चहा घेऊन झाला आपण आता जाऊया! 🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸 🌸स्थळ : सदाशिव पेठ, पुणे. जोशीकाका : काय तात्या, आज अगदी आनंदात दिसता आहात ! काय झालं ? तात्या : अहो, आमच्या शेजारच्या कुलकर्ण्यांना १ लाख रुपयाची लॉटरी लागलीये! जोशीकाका : मग तुम्हाला का इतका आनंद झालाये ? तात्या : त्याला आता तिकिट सापडत नाहीये ! 🔷🔷🔷🔷🔷🔷🔷 🌸स्थळ: (पुण्याशिवाय दुसरे असू शकत नाही.) पेशंट:- डॉक्टर,प्लास्टिक सर्जरी करायची आहे, साधारण किती खर्च येईल? डॉक्टर:- ३ लाख रुपये. पेशंट (थोडा विचार करून):- आणि प्लास्टिक आम्ही आणून दिले तर? 🔷🔷🔷🔷🔷🔷🔷 स्थळ : पुणे  एक मुलगा सायकलवरुन जाताना, एका मुलीला धडकला....!!  मुलगी: बावळट.. ब्रेक नाही का मारता येत...?  मुलाचे पुणेरी उत्तर: अख्की सायकल मारली, आता काय ब्रेक वेगळा काढून मारु..!!!. पुणेरी एकदम तिखट.... 🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷 🌸पाहुणा : अहो Camp ला जायला कुठली बस पकडू ? पुणेरी : २० Number ची पकडा. पाहुणा : आणि ती नाही मिळाली तर? पुणेरी : १० - १० च्या २ पकडा. 🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷 🌸पुण्याला डेक्कनच्या चौकात CCTV कॅमेरे बसवले. दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिस  कंट्रोल-रूमला आलेला पहिला फोन: "अहो, जरा कॅमेरात बघून सांगा ना, चितळे उघडले आहेत का.?" 🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸 पुणेरी स्पेशल  चिंटूः बाबा मला  ब्लॅकबेरी नाही तर अॅप्पल पाहिजे.  बाबाः घरात फणस आणलाय तो संपव आधी...  🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷 🌸**पुणेरी स्पेशल  बायको: अहो काल डॉक्टर मला सांगत होते की, माझा 'बीपी' वाढलाय! पण बीपी म्हणजे काय हो सांगा ना? नवराः अगं 'बीपी' म्हणजे 'बावळट पणा' 🔹🔹🔹🔹🔹🔹🔹 🌸** भन्नाट पुणेरी  बाळूः काकू, चिंटू आहे का घरी? जोशी काकूः  आहे ना, गरमा-गरम पोहे खातोय. तुलापण भूक लागली असेल ना? बाळूः हो  जोशी काकूः मग घरी जा आणि काहीतरी खाऊन ये... 🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹 नवरा थकलेला, ऑफिसमधुन घरी आलेला असतो.. नवरा: प्यायला पाणी आण ग? बायको: तहान लागली आहे का ? नवरा (संतापून): नाही माझा गळा कुठुन लिक होतोय ते चेक करायचा आहे. 🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸 🌸पुणेरी राँग नंबर  अः देशपांडे आहेत का?  बः (चिडून) पावनखिंड लढवायला गेलेत. काही निरोप?  अः त्यांना म्हणाव, महाराज गडावर पोचले. मेलात तरी चालेल! Collapse
  Share on facebook
 • Funny: जेव्हा कॉलेजच्या तरूणांना भेटतो देव, वाचा भन्नाट जोक

  Funny: जेव्हा कॉलेजच्या तरूणांना भेटतो देव, वाचा भन्नाट जोक
  Other Jokes
  एकदा ४ महाविद्यालयीन तरुणांना देव भेटला आणि म्हणाला -"मी तुम्हाला १ कोटी रुपये दिले तर तुम्ही काय करणार ?" पहिला - मी ते पैसे बँकेत'फिक्स... Expand
  एकदा ४ महाविद्यालयीन तरुणांना देव भेटला आणि म्हणाला -"मी तुम्हाला १ कोटी रुपये दिले तर तुम्ही काय करणार ?" पहिला - मी ते पैसे बँकेत'फिक्स डीपोझिट'मध्ये ठेवेल आणि त्याच्या व्याजावर माझा चरितार्थ चालवेल. दूसरा - मी ते पैसे शेअर बाजारात गुंतवेल आणि'ते वाढतील'याची तरतूद करेल. तिसरा - मी ते पैसे वापरून स्वतची कंपनी टाकेल आणि ती कंपनी हळूहळू मोठी करेल. चौथा - मी ते पैसे लोकांमध्ये वाटून टाकील. देव'चौथ्यावर'जाम खुश झाला आणि देवाने त्याला खरोखरच १ कोटी रुपये दिले. *************** -*************** -*************** -* काही वर्षांनी - पहिला -'सामान्य माणूस' म्हणून जगला आणि शेवटी महागाईला कंटाळून त्याने आत्महत्या केली. दुसरा - स्वकष्टाने काही पैसे कमवून ते शेअर बाजारात लावू लागला आणि नंतर शेअर दलाल झाला. तिसरा - स्वकष्टाने काही पैसे कमवून त्याने स्वत:ची कंपनी काढली आणि आता तो एक छोटासा उद्योजक आहे. चौथा - आज एका राज्याचा मुख्यमंत्री आहे. तो आजही पैसे वाटतो आणि त्याच्या पैसे वाटण्याच्या सोहळ्याला...... -. 'निवडणुका'असे गोंडस नाव मिळाले आहे Collapse
  Share on facebook
 • Funny: फुकट्या मागे वळून काय पाहातोयेस, वाचा भन्नाट जोक आणि हसा भरपूर

  Funny: फुकट्या मागे वळून काय पाहातोयेस, वाचा भन्नाट जोक आणि हसा भरपूर
  Other Jokes
  पुणेरी पाट्यांचा कहर  एका गृहस्थाला सपाटून भूक लागली. म्हणून तो हॉटेल शोधत होता. तेवढ्यात त्याला पाटी दिसली. त्यावर लिहिलं होतं,'जेवणाची उत्तम... Expand
  पुणेरी पाट्यांचा कहर  एका गृहस्थाला सपाटून भूक लागली. म्हणून तो हॉटेल शोधत होता. तेवढ्यात त्याला पाटी दिसली. त्यावर लिहिलं होतं,'जेवणाची उत्तम सोय'. जवळ गेल्यावर त्याला दोन हॉल दिसले. एकावर लिहिलं होतं 'शाकाहारी' तर दुसरयावर 'मांसाहारी' 🍤 तो मांसाहारी हॉलमध्ये शिरला.  आतमध्ये आणखी दोन हॉल होते.  डावीकडे पाटी होती 'भारतीय बैठक' तर उजवीकडे 'डायनिंग टेबल' तो टेबलच्या हॉलमध्ये शिरला.   आतमध्ये पुन्हा दोन हॉल होते. एकावर पाटी होती 'रोख' तर दुसरी 'उधार', तो फुकट्या असल्याने अर्थातच उधारीच्या हॉलमध्ये शिरला.   पुढे गेल्यावर वाहनांची वर्दळ त्याला समोर दिसली. तो अचंबीत झाला. त्याने मागे वळून पाहिले तर तिथे एक पाटी होती.   'फुकट्या, मागे वळून काय बघतोस? हा बाहेरचाच रस्ता आहे.' Collapse
  Share on facebook

FUNNY PICTURES

ONE LINER

खट्याळ विनोद

Advertisement

BEST OF JOKES

Funny Videos

हसा खळखळून