• Funny: जवा नवरा इचारते बायको ले 'जेवाले काय बनवतं?' वाचा खळखळून हसवणारा वऱ्हाडी जोक

  Funny: जवा नवरा इचारते बायको ले 'जेवाले काय बनवतं?' वाचा खळखळून हसवणारा वऱ्हाडी जोक
  Husband Wife
  नवरा बायकोले फोन करते, नवरा:-जेवाले काय बनवतं?  बायको:-तुम्ही सांगसान ते! नवरा:- कर वरण भात रोटी . बायको:-ते तं कालच केलती. नवरा:-बेसण कर तव्यावर.... Expand
  नवरा बायकोले फोन करते, नवरा:-जेवाले काय बनवतं?  बायको:-तुम्ही सांगसान ते! नवरा:- कर वरण भात रोटी . बायको:-ते तं कालच केलती. नवरा:-बेसण कर तव्यावर. बायको:-पोट्टे खात नाई, नवरा:-वटाण्याची चटणी कर.  बायको:-ते पचाले जड जाते. नवरा:-आंडे कर . बायको:- काही वाटते का,सोम्मार हायै आज. नवरा:- आरे हो .धिलडे कर . बायको:-त्याचा लय कुटाणा हाये. आंधिच बनवुन ठेवा लागते ते. नवरा:-तुरीचे सोले वाट. बायको:-शेंगा नाही तोडून आणल्या. नवरा:-मंग मॅगी बनव. बायको:-हाट ते का जेवण हाये? नवरा:- मंग काय बनवतं. बायको:- तुम्ही सांगसान ते ,... Collapse
  Share on facebook
 • Funny: कॅमेरातून कबूतर निघतो असे म्हणताच फोटोग्राफरला फुटला घाम, वाचा भन्नाट जोक

  Funny: कॅमेरातून कबूतर निघतो असे म्हणताच फोटोग्राफरला फुटला घाम, वाचा भन्नाट जोक
  Office
  एक काकू, आपल्या 6 वर्षाच्या मुलाला घेऊन फोटो काढायला फोटो स्टूडिओत गेली. फोटोग्राफर ( प्रेमाने) - “बेटा, इकडे बघ ...या कॅमेऱ्यातुन आत्ता कबूतर निघेल!... Expand
  एक काकू, आपल्या 6 वर्षाच्या मुलाला घेऊन फोटो काढायला फोटो स्टूडिओत गेली. फोटोग्राफर ( प्रेमाने) - “बेटा, इकडे बघ ...या कॅमेऱ्यातुन आत्ता कबूतर निघेल! मुलगा :- “फोकस एडजस्ट कर पहिले, बापाला नको शिकवूस पोर्ट्रेट मोड यूज कर, मॅक्रो , ISO 200च्या आतमधी ठेव ! फोटो High resolution pic यायला पाहिजे… Facebook वर अपलोड करायचा आहे.   कबुतर निगते म्हणे तुझ्या बापान ठेवल व्हता का कॅमरामधे कबुतर चिंधीचोर..  फोटोग्राफर: कोणत्या शाळेत शिकतो रे बाबा ?? मुलगा:- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा..  तूला काय वाटले IIN ?? Collapse
  Share on facebook
 • Funny: मरताना रावणाने दिला लक्ष्मणाला गुरूमंत्र, वाचा खळखळून हसवणारा जोक

  Funny: मरताना रावणाने दिला लक्ष्मणाला गुरूमंत्र, वाचा खळखळून हसवणारा जोक
  Other Jokes
  रावण ज्या वेळी मरणासन्न अवस्थेत होता... त्या वेळी भगवान श्रीरामाने लक्ष्मणाला सांगितले की, या विश्वाला नीति, राजनीति आणि शक्ति चा महान पंडित सोडून... Expand
  रावण ज्या वेळी मरणासन्न अवस्थेत होता... त्या वेळी भगवान श्रीरामाने लक्ष्मणाला सांगितले की, या विश्वाला नीति, राजनीति आणि शक्ति चा महान पंडित सोडून चालला आहे. तु त्यांच्याकडे जा आणि त्यांच्याकडून जीवनाबद्दलचे शिक्षण घे, जे तुला या जगात त्यांच्या शिवाय दुसरा कोणी देऊ शकणार नाही. श्रीरामाची आज्ञा मानून लक्ष्मण मरणासन्न अवस्थेत असलेल्या रावणाच्या डोक्याजवळ जावून ऊभा राहिला... रावण एक शब्द ही बोलला नाही. लक्ष्मण परत भगवान रामा जवळ आला. तेव्हा भगवान राम म्हणाले कोणाकडुन ज्ञान प्राप्त करायचे असेल तर त्याच्या डोक्याजवळ नाही तर त्याच्या पायाजवळ ऊभे रहावे. तेव्हा भगवान रामाचे म्हणने ऐकून लक्ष्मण यावेळी रावणाच्या पायाजवळ जाऊन ऊभा रहिला. त्यावेळी महापंडित रावणाने लक्ष्मणाला तीन महत्वाच्या गोष्टी सांगितल्या. ज्या आयुष्याची गुरुकिल्ली आहेत... १. Whatsapp पासुन दुर रहा... २. Facebook चा उपयोग करु नको...  ३. गाडी चालवताना मुलींकडे बघू नको   नाही तर, माझ्या पेक्षा वाईट हाल होतील लक्षपुर्वक वाचल्याबद्दल धन्यवाद!   Collapse
  Share on facebook
 • Funny: सासूने (वैतागुन) केलेला Whatsapp मेसेज, नक्की वाचा डोळ्यात पाणी येईपर्यंत हसाल

  Funny: सासूने (वैतागुन) केलेला Whatsapp मेसेज, नक्की वाचा डोळ्यात पाणी येईपर्यंत हसाल
  Husband Wife
  सासूने  (वैतागुन) केलेला Whatsapp मेसेज पाया पडते सुनबाई  बंद कर तुझी चाल पहीलं तुझं Whatsapp  चुली मंधी जाळ रोज नविन ड्रेस नवं काढतीस फोटू  रडून... Expand
  सासूने  (वैतागुन) केलेला Whatsapp मेसेज पाया पडते सुनबाई  बंद कर तुझी चाल पहीलं तुझं Whatsapp  चुली मंधी जाळ रोज नविन ड्रेस नवं काढतीस फोटू  रडून रडून उपाशिच झोपून घेतो छोटू डिपी का फीपी बदलण्याच्या नादात, करपून जाते डाळ पहीलं तुझ Whatsapp चुली मंधी जाळ लगिन झालय आपलं शहाण्या सारख वागावं चार दिसाचं सासू सासरं तोंड भरून बोलावं आम्ही मरून गेल्यावर बस वाजवीत टाळ पहीलं तुझ Whatsapp चुली मंधी जाळ रोज एक मेनू बनवतेस वाजवतेस झोपाय बारा पुलाव असतो चांगला पण त्यात दगड अन् गारा टून्ग टून्ग वाजतो फोन पोरी लक्ष थोडं टाळ पहीलं तुझ Whatsapp चुली मंधी जाळ डोळ्याला लागल चष्मा अंगठा होईल बाद खरच सांगते सुनबाई ह्यो चांगला नाय नाद  मान्य हाय दुनिया चंद्रावर गेली पण मान मर्यादा पाळ नाय तर पोटातूनच  नेटपॅक माराय सांगल बाळ पाया पडते सुनबाई Whatsapp चुली मंधी जाळ  चुली मंधी जाळ Collapse
  Share on facebook
 • Funny Facts: बायको सारखी प्रेयसी नाही, वाचा पुरूषांचे डोळे खाडकन उघडणारी कविता

  Funny Facts: बायको सारखी प्रेयसी नाही, वाचा पुरूषांचे डोळे खाडकन उघडणारी कविता
  Husband Wife
  Whatsapp वर Chat करणारी प्रेमिका भेटेल  पण.......... प्रत्येक मिनीटाला तुमची काळजी करणारी बायकोसारखी प्रेयसी नाही. 🍁 🍁 🍁 🍁 🍁 हॉटेलात तुमच्या बरोबर जेवण करणारी... Expand
  Whatsapp वर Chat करणारी प्रेमिका भेटेल  पण.......... प्रत्येक मिनीटाला तुमची काळजी करणारी बायकोसारखी प्रेयसी नाही. 🍁 🍁 🍁 🍁 🍁 हॉटेलात तुमच्या बरोबर जेवण करणारी प्रेमिका तुम्हाला भेटेल  पण............ तुम्ही घरी येईपर्यंत जेवणासाठी वाट बघणारी बायको सारखी प्रेयसी नाही. 🍁 🍁 🍁 🍁 🍁 तुमच्याकडून गिफ्ट स्वीकारणारी प्रेमिका तुम्हाला भेटेल  पण........ तुमच्या वाढदिवसाला गुलाबाचे फुल देणारी बायको सारखी प्रेयसी नाही. 🍁 🍁 🍁 🍁 🍁 तुमच्या बाईक वर मागे बसुन तुम्हाला घट्ट आवळून फिरणारी प्रेमिका तुम्हाला भेटेल पण...... तुम्ही प्रवासात असताना जेवले का म्हणून विचारणारी बायको सारखी प्रेयसी नाही. 🍁 🍁 🍁 🍁 🍁 तुमचे हातपाय दुखेल एवढी बेधूंद होऊन तुमच्या सोबत नाचणारी प्रेमिका तुम्हाला भेटेल  पण .............. कामावरुन थकून आल्यावर तुमचे हातपाय दाबून देणारी बायको सारखी प्रेयसी नाही. 🍁 🍁 🍁 🍁 🍁 तुमच्या बरोबर ज्युस पिणारी प्रेमिका तुम्हाला भेटेल पण..... तुम्ही ऊन्हातून आल्यावर माठातील थंड ग्लासभर पाणी देणारी बायको सारखी प्रेयसी नाही. 🍁 🍁 🍁 🍁 🍁 तुमच्या पैशाने खरेदी करणारी प्रेमिका तुम्हाला भेटेल पण...... पैशाला पैसा जोडून काटकसरीचा संसार करणारी बायको सारखी प्रेयसी नाही. 🍁 🍁 🍁 🍁 🍁 बरा होशीलना लवकर ? असं म्हणणारी प्रेमिका तुम्हाला भेटेल  पण ............. तुम्हाला ठेच लागली म्हणून डोळे भरुन येणारी बायको सारखी प्रेयसी नाही. 🍁 🍁 🍁 🍁 🍁 भेटायला यायला तुला किती वेळ लागेल ? असं विचारणारी प्रेमिका तुम्हाला भेटेल  पण...... तुम्हाला घरी यायला उशीर झाला म्हणून उंबर्‍यात उभी राहून वाट पाहणारी बायकोसारखी प्रेयसी नाही. म्हणून म्हणतोय भल्या माणसा Whatsapp च्या बानू पेक्षा आपली घरातील म्हाळसाच बरी. 🍁 🍁 🍁 🍁 🍁 Collapse
  Share on facebook

FUNNY PICTURES

ONE LINER

खट्याळ विनोद

Advertisement

BEST OF JOKES

Funny Videos

हसा खळखळून