मला उद्ध्वस्त व्हायचंय, असं बिनधास्तपणे म्हणणार्या मल्लिका अमर शेख या कवियत्रीबद्दल आणि तिच्या जगण्याबद्दल मला कमालीचं कुतूहल होतं. प्रवाहाच्या विरोधात खळबळ माजवणार्या सर्वांबद्दलच असतं ना, तसंच. आपल्या साहित्यातून त्यांनी समाजव्यवस्थेतल्या भ्रामक संकल्पना, पक्षपाती रूढी-परंपरा आणि ढोंगी पुरुषी मानसिकतेवर कोरडे ओढले आहेत. येडा होऊन पेढा खाणार्या...
गेल्या काही दिवसांपासून सतत कानावर येणार्या स्त्रियांवरील अत्याचारांच्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर ‘काय तुझ्या मनात?’ हे मंगला गोडबोले यांचं पुस्तक वाचनात आलं. लेखिका मराठीतील महिला मासिकांशी संबंधित आहेत. त्यांच्यात मिसळत आहेत. त्या काय सोसतायत, त्यांच्या मनातल्या भावना, भडका मांडायचा प्रयत्न करत आहेत. काही वेळेस अगदी आपल्या जवळची स्त्री मनोरुग्ण आत्महत्येचा...
सर्वत्र आनंदीआनंद होता, सगळा आसमंत जणू आनंदाने बहरला होता, प्रत्येक लहानसहान गोष्टींत चांगलेपणा दिसत होता. प्रत्येक कामात उत्साह वाटत होता. नवीन जीवनाला सुरुवात झाली होती. आयुष्यभराचा सोबती मिळाला होता. कुठेही लक्ष न देता फक्त आपल्यापुरतेच जगायची जणू या 15 दिवसांत सवय झाली होती.
पाहता पाहता एक महिना उलटला व आमचे ‘साहेब’ ड्यूटीवर जॉइन झाले. काही दिवस तर नुसती वाट पाहण्यातच...
आपल्या आईवडिलांचं नाव आपण बदलू शकत नाही. आई किंवा वडील खूप मोठे कुणी असतील, सेलिब्रिटी असतील तरीही किंवा ते भ्रष्ट, गुन्हेगार असले तरीही. मुलांचं त्यात काही श्रेय नसते की त्यांचा दोषही नसतो. सुनील गावसकरचा मुलगा क्रिकेटच्या पिचवर सहज पाय ठेवू शकला असेल, पण रोवून उभा नाही राहू शकला. राजेंद्रकुमारसारख्या स्टार बापाचा मुलगा कुमार गौरवला पहिला सिनेमा सहज मिळाला, पण तो त्यात...
नुकताच नागपूरमध्ये अल्पवयीन मुलामुलींवरील वाढत्या अत्याचाराला अनुषंगून एक परिसंवाद झाला, त्यात सरसकट सर्वच वक्त्यांनी वाढता चंगळवाद आणि सहज उपलब्ध होणार्या सवंग माहिती व तंत्रज्ञानाला या मनोवृत्तीसाठी जबाबदार धरले. मात्र, ज्येष्ठ समाजसेविका लीलाताई चितळे यांनी नेमक्या शब्दांत खुलासा केला. त्यांच्या मते 70 वर्षांपूर्वी आपण एक राजकीय क्रांती केली व स्वातंत्र्य मिळवले;...
काही कळायच्या आतच शिरपानं जीव गमावला होता. भागीच्या संसाराची राखरांगोळी झाली होती. शिरपा गेला. तीन महिन्याच्या फरकानं सासराही गेला. आणि सासूचं तोंड सुटलं. भागीमुळंच समदं झालं म्हणून तिला शिव्याशाप देऊ लागली. ‘बापाच्या इच्छेखातर माझ्या पोरानं ही काळी म्हस घरात आणली.’ सासूचा एकेक शब्द बाण घुसल्यागत भागीच्या डोक्यात घुसत होता.
मी काळी, कुरूप होते म्हणून नवर्यानं जवळ केलं...
‘बेटियोंवालोंका स्वागत है,’ असं कवी गुलजार एखाद्या कार्यक्रमात म्हणतात तेव्हा ते केवळ टाळ्यांसाठी फेकलेलं वाक्य नसतं. गुलजार आणि राखी या दांपत्याला एकच मुलगी आहे आणि तिच्यामुळे आपण पूर्ण समाधानी आहोत, असं त्यांना म्हणायचं असतं. ‘मैं बाप कम, माँ ज्यादा हूँ,’ असं ते म्हणतात, तेही टाळ्यांसाठी नसतं. मुलगी तेरा वर्षांची होईपर्यंत तिच्या प्रत्येक वाढदिवसाला त्यांनी...
उमा त्रासून गेली होती. तिच्या बाळाचे सतत आजारी पडणे काळजीचे ठरले होते. गेले सहा महिने ती या डॉक्टरकडून त्या डॉक्टरकडे जात होती. अनेक चाचण्याही झाल्या होत्या, पण बाळाची तब्येत काही ठीक होत नव्हती. त्याचे वजन दोन किलोने कमी झाले आणि तो गुंगीतच असायचा. उमा त्याच्या खाण्यापिण्याकडे खूप लक्ष द्यायची. दिवसभर कंपनीचे दूध पावडर आणि कंपनीचे पाणी, असे दर दोन-तीन तासांनी. बाळासाठी खास...