Home >> Magazine >> Madhurima

Madhurima

 • श्वास सुरू राहावेत म्हणून...
  जिजा राठोड. रा. गाळण खुर्द, ता. पाचोरा. जिल्हा जळगाव- गाळण खुर्दच्या बंजारा लोकवस्तीत जिजा यांचं नाव आज आदरानं घेतलं जातं. आपल्या समाजातली एमए, बीएड झालेली गावामधली एकमेव मुलगी म्हणून सर्वांना त्यांचं कौतुक आहे. सणसमारंभ, कौटुंबिक सोहळ्यांमध्ये जिजा आणि त्यांच्या कुटुंबीयांना आग्रहानं बोलावलं जातं. लोकवस्तीवरच्या विविध समस्यांवरच्या उपायांमधे जिजा यांचं मत विचारात घेतलं जातं. केवळ त्यांच्या शब्दाखातर गावातल्या अनेक पालकांनी आपल्या मुलींना शाळेकडे जाणाऱ्या पाऊलवाटेवर चालतं केलंय....
  03:00 AM
 • हवीशी मदत नकोशी होताना
  मित्रांनो व मैत्रिणींनो! काय, लेखाचं शीर्षक वाचून मनात प्रश्न डोकावला ना? कसली हवीशी मदत आणि नंतर ती नकोशी का होते? सध्याचा काळ नवराबायको दोघांनी नोकरी करण्याचा. सकाळी लवकर घरातून बाहेर पडणे आणि घरी उशिरा परतणे, हे नित्याचेच झाले आहे. कधी एकदा शनिवार येतो आणि रविवारची सुट्टी मिळते, असं आठवडाभरात कैक वेळा चाकरमान्यांच्या मनात येऊन गेलेलं असतं. चला, आपल्या घरातूनच सुरुवात करू या. सुट्टीच्या दिवशी अचानक बायको नवऱ्याला म्हणते, स्वयंपाकात मदत करा. घराची साफसफाई करा. मुलांचा अभ्यास घ्या, वगैरे...
  03:00 AM
 • माल आणि मालमत्ता
  स्त्रियांच्या आर्थिक लालसेविषयी अनेक म्हणी प्रचलित आहेत. उदाहरणार्थ, बाईल पैशाची, कधी नव्हे बा पुरुषाची; बाई मी भोळी, लुगड्यावर मागते चोळी; बाये जोड फुलां काबार (बाईची मिळकत फुलं खरेदी करण्यातच खर्च व्हायची); बायको केली म्हणजे आणा पाठीस लागतो! अशाच म्हणी तिला घराची ओढ किती जास्त असते, याविषयीही आहेत. आवा चालली पंढरपुरा, वेशीपासून आली घरा... असं म्हणताना तिला परमार्थ नको, स्वार्थच हवा, अशी टवाळी केली जाते. कशाचाही अतिरेक झाला की टिंगल होणारच; पण हा अतिरेक नेमका का झाला, याचा मात्र आपण कधी विचार...
  03:00 AM
 • घर माझंही आहे
  अनेकदा महिलांचं नाव रेशन कार्डवर नसतं, घरावर/जमिनीवर तर सोडाच. घटस्फोटाच्या प्रकरणांमध्ये पोटगी अनेकदा धनादेशाच्या स्वरूपात मिळते. रेशन कार्डवर नाव नसलं तर अस्तित्वाचा, पत्त्याचा दाखला देणं कठीण होतं व बँकेत खातंही उघडणं शक्य होत नाही. परिणामी पोटगी मिळूनही त्या महिलेच्या हातात येतच नाही. या संदर्भात मुंबईतल्या एका कौटुंबिक न्यायालयाने दिलेला निकाल नुकताच वाचनात आला. कागदोपत्री नाव नसलेल्या एका महिलेने तिच्या माहेरच्या नावाने कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल केली. साहजिक नवरा...
  03:00 AM
 • दिल-ए-नादाँ तुझे हुआ क्या है
  सोशल मीडियावर आल्यापासून एक गोष्ट निश्चितच झाली आहे. थोडा वेळसुद्धा तुम्ही एकटे नसता. डोक्यात केलेल्या पोस्टचे विचार, त्यावर केलेल्या, वाचलेल्या कॉमेंट्स पिंगा घालत असतात आणि विचारांचे प्रतिबिंब चेहऱ्यावर उमटते नकळत. परवाच बसने प्रवास करत होते. मी आपली माझ्या विचारात दंग. समोर बसलेली एक मुलगी म्हणाली, आई, ती हसते बघ एकटीच. मला पटकन हसू आले, वाटले सांगावे तिला, कुछ दिल ने कहा, कुछ भी नहीं. घाबरलीच असती बिचारी. माझ्या मनाशी माझा संवाद जुळवून देणारा हा एकांत मला फार आवडतो. बाह्य जगात असंख्य...
  03:00 AM
 • अतिथी देवो भव
  जर्मनीमधील Lohr am Main (माईन नदीवर स्थित लोर) या शहरात एका प्रोजेक्टनिमित्त २०१२मध्ये गेले होते. तिथे फक्त एक महिन्याचं काम असल्यामुळे अपार्टमेंट मिळणं कठीण होतं. त्यामुळे मी कार्यरत असलेल्या कंपनीने माझी एका हॉटेलमध्ये राहण्याची सोय केली होती. तीसेक किलोची एक सूटकेस, एक लॅपटॉप असलेली बॅग, एक पर्स ह्यासकट मी चेक इन केलं. मला चौथ्या मजल्यावरची रूम मिळाली होती. सही करत असताना हॉटेलमधली लिफ्ट तिसऱ्या मजल्यापर्यंतच आहे, अशी माहिती मला रिसेप्शनिस्टने दिली आणि तिच्या हावभावावरून तिचं कर्तव्य...
  03:00 AM
 • साखर, वेफर्स, बिस्कीटं टाळा
  अति प्रमाणात व गरजेपेक्षा जास्त व सातत्याने आहार सेवन करणे, स्थूलता यांमुळे कर्करोगाची शक्यता वाढते. त्यामुळे प्रमाणात आहार सेवन करणे, षड्रसांनी युक्त आहार सेवन करणे महत्त्वाचे ठरते. यासोबत ताजा आहारही आवश्यक असतो. भारतामध्ये विशेषत्वाने स्त्रियांमध्ये शिळे अन्न खाण्याची परंपरा आहे. यामुळेसुद्धा कर्करोगास आमंत्रण मिळू शकते. सातत्याने थंड, किंवा मायक्रोवेवमध्ये गरम केलेल्या, किंवा फ्रिजमध्ये थंड करून पुन्हा गरम केलेल्या पदार्थांमध्ये खूप प्रमाणात ऑक्सिडेशन होते. असे पदार्थ नेहमी...
  03:00 AM
 • भयचकीत करणाऱया वास्तवाची कविता
  समकालीन साहित्य वर्तुळात पारंपरिक कवितेच्या परिघाबाहेर जाणारी, उद्ध्वस्त आणि अस्वस्थ जगण्याला भिडू पाहणारी आणि उरल्यासुरल्या माणूसपणाला हलवणारी कवितादेखील लिहिली जाते, याचा प्रत्यय ग्रंथाली प्रकाशनाने अलीकडेच प्रकाशित केलेल्या कवी सुशीलकुमार शिंदे यांच्या शहर आत्महत्या करायचं म्हणतंय या कवितासंग्रहातील कविता वाचून येतो. महानगरातील वेगवान आणि स्वत्वाच्या शोधात असणारे जगणे, आपले आयुष्य पणाला लावून आयुष्य शोधणारी माणसे आणि संवेदना बोथट झालेली गर्दी याचा मागोवा घेतानाच...
  03:00 AM
 • आपण रेसिस्‍ट नाही? की आहोत?
  काळ्यासावळ्या कृष्णावर आपण प्रेम करतो, पण नवरा वा बायकाे शोधताना हट्टाने गोऱ्या रंगालाच प्राधान्य देतो. काय विचार असतो यामागे? किती आयुष्यांचं या हट्टापायी नुकसान झालंय, याची जाणीव तरी आहे का आपल्याला? या संदर्भात फेसबुकवर अभिनेता अभय देओलने गाजवलेल्या अभियानाविषयी ही कव्हर स्टोरी, त्याच्याच शब्दांवर आधारित. भारतात, विशेषकरून मुंबई, पुणे व दिल्ली या शहरांमध्ये शिक्षणासाठी हजारो परदेशी विद्यार्थी राहतात. हे गोरे, काळे, पिवळे, सावळे आणि इतर रंगांचे वा वर्णांचे आहेत. खुद्द भारतात...
  April 18, 07:06 AM
 • शब्‍दवैभव
  प्रमाण भाषा, बोली भाषा यांमधला वाद सध्या सोशल मीडियावर उफाळलेला आहे. मराठी भाषा कशी बिघडतेय, अनेक शब्द आपण न वापरल्याने अडगळीत गेले आहेत, हिंदी व इंग्रजीचा प्रभाव फार वाढलाय, अशी खंत फार वर्षांपासून व्यक्त केली जात आहेच, त्यात काही नवीन नाही. परंतु या नवीन वादाने मराठीच्याच बोली व प्रमाण भाषांमध्ये, किंबहुना या भाषा बोलणाऱ्यांमध्ये, फूट पाडलीय. प्रमाण भाषाच वापरली पाहिजे, तरच मराठी वाचेल असा मुद्दा एक बाजू मांडते. तर इतक्या शेकडो बोलीभाषांचं काय, त्यांना काय मराठी म्हणायचं नाही का, असं...
  April 18, 03:00 AM
 • मृत पतीस स्‍मृतिपत्र
  कैलासवासी अहो यांस, आजच जंपानगिरे यांच्या ट्रॅव्हल कंपनीबरोबर कुलू मनाली अशी सहल संपवून घरी आले. तुम्हाला जाऊन एक महिना झाला हे तुम्हालाच काय सांगायचे. हे म्हणजे हत्तीला तू जाड आहेस आणि शेजारच्या वामनरावांना तुम्ही द्वाड आहात, असे सांगण्यासारखेच की हो. माणूस आपली जन्मतारीख आणि मरणतारीख कधीच विसरत नाही. तुमच्या तेराव्यानंतर मुलांनी माझे दुःख हलके व्हावे, म्हणून ही सहल घडवून आणली. बरोबर माझी शाळा मैत्रीण मालतीदेखील होती. आम्ही दोघींनी खूप धमाल केली. तुम्हाला आठवतच असेल, बरोबर चाळीस...
  April 18, 03:00 AM
 • मेघनेच्‍या किनारी
  माझ्या नियमाप्रमाणे मी साइटवर होते त्या वेषात जेवायला न जाता सलवार कुर्ता घालून गेले. त्या त्या देशाचे, त्या त्या ठिकाणचे काही अलिखित नियम असतात आणि मुद्दाम असे कोणतेही नियम मोडणं मी नेहमीच कटाक्षाने टाळलं आहे. याची कारणे अनेक आहेत जी सगळीकडे सारखी नसतात, पण माझ्यापुरतं मी हे सांभाळते, हे नक्की. मार्केटिंग हे माझं डिपार्टमेंट नाही; परंतु, रीट्रोफिटिंगचा नेहमीपेक्षा वेगळा प्रोजेक्ट घेताना इंजीनिअरिंगच्या माणसाची साइट व्हिजिट आवश्यक असते. अशीच एक बांगलादेशमधली एनक्वायरी होती....
  April 18, 03:00 AM
 • दिल पे मत ले यार
  जीवनातल्या ताणतणावांचा खूप विपरीत परिणाम शरीरातल्या हार्मोन्सवर होत असतो. विशेषत: स्त्रियांच्या. त्यामुळे शरीरासोबत मनाची काळजी घ्यायलाही प्रत्येकीने शिकले पाहिजे. डिप्रेशन जवळ करण्यापेक्षा आनंदाने जगले पाहिजे. आपण करतो ती सगळी कामे आनंद देणारी असतातच असे नाही; पण आवडीचे, आनंद देणारे एखादे काम आपण नक्की करू शकतो. डिप्रेशन म्हणजे नैराश्य हा विषय घेऊन नुकताच जागतिक आरोग्य दिन साजरा झाला. या निमित्ताने पुढे आलेल्या आकडेवारीत तीनपैकी एक व्यक्ती नैराश्यग्रस्त असल्याचे स्पष्ट होते....
  April 18, 03:00 AM
 • किलबिलत्‍या पाखरांच्‍या किलबिल गोष्‍टी
  या किलबिल गोष्टीसंग्रहाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, यातील मुलांच्या स्वत:च्या भाषेत आलेल्या तीन कथा. उत्तर भारतातून आलेल्या कोमल वर्माची हम यही राहबय ही कथा तिच्या कुर्मी भाषेत येते, तर मी अभय बोलतो ही अभय पवार या पारधी समाजातील मुलाने लिहिलेली कथा वाचताना पारधी समाजाचा एकंदरीत जीवनपट आपल्यासमोर उलगडत जातो. नामदेव माळी. साहित्यिक म्हणून ओळख असणारे अन् आता नव्या पिढीने जोमाने लिहिले पाहिजे, असा ध्यास घेतलेले व्यक्तिमत्त्व. एक अधिकारी म्हणून त्यांची कारकिर्दही खूप धडपडीची...
  April 18, 03:00 AM
 • दिव्‍यांगांच्‍या भावंडांचे प्रश्‍न
  दिव्यांग मूल व सोबत त्याची सर्वसाधारण भावंडं ह्यांना एकत्र सांभाळणं म्हणजे आईबाबांची तारेवरची कसरत असते. दिव्यांग मुलाच्या गरजा जास्त म्हणून नेहमी त्याच्याकडे जास्त कल असतो. तर दुसरी भावंडं मात्र नेहमी तक्रार करत असतात की, आईबाबा आमच्यावर प्रेमच करत नाहीत. सगळीकडे फुग्यांचं डेकोरेशन केलेलं. वेगवेगळ्या कार्टून्सचे कटआउट लावलेले. डेकवर धमाल मुलांची गाणी चालू. एकीकडे पाणीपुरी, बर्फाचा गोळा, व्हेज मंच्युरियन, पनीर चिली, मनचॉऊ सूप असे एक ना अनेक मुलांच्या आवडीचे प्रकार. बाजूलाच...
  April 18, 03:00 AM
 • सिंबा, द लायन
  युग, वय - ९ महिने माझा पिटुकला आता घरभर पळतो. सिंबा - द लायन किंगसारखा राजेशाही पावलं उचलत अख्ख्या घराची टेहळणी करतो. हॉलची हद्द संपली की, तिथून पुढे (आत) येण्याआधी तो थोडा वेळ विचार करत थांबतो. डाव्या बाजूच्या बाथरूममध्ये जाऊन टबातल्या पाण्याशी युद्ध करावे? की, उजव्या बाजूला देवघरावर चढाई करावी? अतिशय गहन विचारानंतर बाथरूमात गनिमी काव्याने शिरकाव केला जातो आणि अचानक लक्षात येते, पाणी आणि फरशी दोन्हीही फार थंड आहेत, आणि आपण चिलखत घालायला विसरलो आहोत. एकूणच पाण्याची पूर्वतयारी दांडगी...
  April 18, 03:00 AM
 • पालकांची भूमिका महत्‍त्‍वाची
  नुकताच अनेक ठिकाणी जागतिक ऑटिझम डे साजरा करण्यात आला. औरंगाबादमध्ये अनेक तज्ज्ञ डॉक्टर, थेरपिस्ट आणि समाजसेवक या विषयावर मोठ्या प्रमाणावर मेहनतीने काम करत आहेत. पण आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचे आपण काही देणे लागतो, त्यामुळे समाजानेही अशा मुलांना मदत होईल असे कार्य केले पाहिजे. सर्वप्रथम तर पालकांमध्ये असलेला आत्मविश्वासाचा अभाव. आपण पाहतो की, कित्येक पालक आपला/ली पाल्य ऑटिस्टिक आहे, हे स्वीकारतच नाहीत. आणि या त्यांच्या वर्तणुकीमुळे अनेक वर्षे निघून जातात आणि तो पाल्य उपचार व...
  April 18, 03:00 AM
 • आकांक्षापुढती जिथे गगन ठेंगणे
  आजच्यासारखी संपर्काची आधुनिक साधने नव्हती, साहसांसाठी वापरण्यात येणारी साधनेही अत्याधुनिक नव्हती, अशा काळात महिलांनी केलेल्या साहसी प्रवासांच्या या कथा. विशिष्ट ध्यासाने पछाडलेल्या या महिलांना डोंगरदऱ्या, नद्या, आकाश, महासागर, बर्फाळ ध्रुवप्रदेश, रखरखीत वाळवंट काहीच वर्ज्य नाही. ज्या काळात आजच्यासारखी संपर्काची आधुनिक साधने नव्हती, साहसांसाठी वापरण्यात येणारी साधनेही अत्याधुनिक नव्हती, अशा काळात म्हणजे शंभर-दीडशे वर्षांपूर्वीही महिला साऱ्या आव्हानांना तोंड देत साहसी प्रवास...
  April 18, 03:00 AM
 • मुलांच्‍या आत्‍महत्‍या
  शेतकऱ्यांच्या आत्महत्या आपल्याला नव्या नाहीत. पण त्याच वाटेने लहान मुले जाऊ लागली तर! शेतकऱ्यांनी जीवनाचे भयानक वास्तव पाहिलेले असते. त्यातून प्रत्येक वेळी निराशाच पदरी पडली तर त्यांना आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलावे लागते. हे एक वेळ समजून घेता येण्यासारखे आहे. पण लहान मुलांनी, ज्यांच्या जीवनाची नुकतीच कुठे सुरुवात होते आहे अशांनी, आत्महत्येचा मार्ग पत्करावा, हे अनाकलनीय आणि मन सुन्न करणारे आहे. फक्त आपल्या महाराष्ट्रात गेल्या तीन महिन्यांत एकदोन नव्हे तर चक्क बावीस...
  April 18, 03:00 AM
 • प्रवाशांच्या सोयीसाठी
  एसटी महामंडळाकडून प्रवाशांच्या सोयीसाठी आधुनिक काळानुसार तंत्रज्ञानाच्या वापरावर भर दिला जात आहे. त्याचेच उत्तम उदाहरण म्हणजे एमएसआरटीसी मोबाइल रिझर्व्हेशन अॅप. सध्याच्या युगात मोबाइल अॅप्स आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक बनले आहेत. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या अॅप्सपैकी अनेक अॅप्स लोकप्रिय असतातच, परंतु ती आपल्यासाठी अतिशय उपयुक्तही असतात. रेल्वे आणि राज्य परिवहन म्हणजेच एसटी या दोन उपयोगी अॅप्सविषयी माहिती घेऊ. रेल्वेच्या मोबाइल अॅपमुळे रेल्वे प्रवाशांना आता त्यांच्या...
  April 11, 07:08 AM
 
जाहिरात
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
जाहिरात
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 

हास्ययात्रा