मोझार्टची सर्वात लोकप्रिय रचना कोणती? आश्चर्य वाटेल, पण लहानथोरांच्या सहजी ओठी रुळणारी ‘ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार’ ही मोझार्टची सर्वात लोकप्रिय रचना आहे. जोआन्स वॉल्फाँग मोझार्ट याचा जन्म 27 जानेवारी 1756 रोजी झाला. सात मुलांमध्ये तो सर्वात धाकटा होता. मोझार्टचे वडील साल्झबर्गचा राजपुत्र आर्च बिशपच्या ऑर्केस्ट्रात व्हायोलिन वाजवत आणि असिस्टंट कंडक्टर म्हणून काम करत....
पैशाने भलेही प्रेम विकत घेता येत नसेल, परंतु ही हृदयद्रावक कहाणी वाचून कदाचित न्यायही विकत मिळू शकतो, हे लक्षात येईल! पुढील कहाणी ही असामान्य दर्जाची आहे, असे अजिबात नाही. यापूर्वी शेकडो लोकांना अशा प्रकारच्या अग्निदिव्यातून जावे लागले आहे...
उत्तर प्रदेशमधील अलिगढ जिल्ह्यातल्या मेहरौनी गावात आपल्या पतीसोबत राहणा-या विजयकुमारी या महिलेला शेजा-याच्या मुलाचा खून...
भोपाळपासून साधारणपणे 80 किमी अंतरावर भीमबेटका गुहा आहेत. आदिमानवाने दगडी अवजारांनी चितारलेल्या चित्रकृतींसाठी त्या प्रसिद्ध आहेत. सुमारे पाच हजार वर्षांपूर्वी मानवाने या ठिकाणी वस्ती केली आणि आपल्या पाऊलखुणा उमटवल्या असाव्यात, असे मानले जाते. पोहोचताक्षणी तेथील सरकारी गाइड नम्रपणे माहिती देतो, माफक शुल्क घेतो आणि पर्यटक आपल्या पूर्वजांचे कलाकौशल्य मनात कायमचे साठवून...
सात जून रोजी शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्या मंत्र्यांचे राजीनामे घेतले होते. लागलीच महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण येणे स्वाभाविक होते. या चर्चेचा प्रमुख रोख मात्र एकच होता, की शरद पवार यांनी पक्षात थेट एकच संदेश दिला तो म्हणजे, आजही या पक्षावर एकहाती हुकमत माझीच चालते. याचाच दुसरा अर्थ असा निघत होता की, पक्षात अजित पवार यांचे चालत नाही....
महाराष्ट्राला शिखांनी दिलेली मुख्य देणगी म्हणजे ‘ढाबा संस्कृती’. शीख समाजातील तरुणांचा सहभाग हा लष्कर, शेती आणि ट्रान्सपोर्टच्या व्यवसायात अधिक आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे किंवा दक्षिणेकडून उत्तरेकडे ट्रक वाहतूक करताना सुरक्षित अशा मुक्कामाच्या जागा व त्यांच्या पद्धतीचे जेवण या ढाब्यांमुळे त्यांना मिळू लागले. ढाबावाला स्थानिक असल्यामुळे प्रवाशाला स्थानिक...
‘चौथा भिडू... चौथा भिडू... जो तो उठतोय आणि चौथा भिडू घ्या, असं म्हणतोय. डोकं उठवलंय या चौथ्या भिडूनं’, उद्धवराव एकदम मोठ्यांदा ओरडतात. उद्धवरावांचे ओरडणे ऐकून स्वयंपाकघरात दुपारच्या जेवणाची तयारी करत असलेल्या त्यांच्या पत्नीला, म्हणजे रश्मी वहिनींना आपले ‘हे’ असे का ओरडताहेत, हे लक्षात येत नाही. त्या पटकन टॉवेलला हात पुसत आपल्या ह्यांना काय झालंय, हे पाहण्यासाठी...
2014च्या लोकसभा निवडणुकांसाठी भाजपच्या प्रचार प्रमुखपदी नरेंद्र मोदी यांची निवड झाल्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी ब्लॉगवर आपली नाराजी प्रकट केली आणि हा ब्लॉग प्रसिद्ध होताच एकाएकी सोशल मीडियात, न्यूज चॅनेलवर ब्रेकिंग न्यूज, चर्चांचे फड जमले. सोशल मीडिया हा आता केवळ राजकीय चर्चांचा, मतमतांतराचा नव्हे तर राजकीय नेत्यांचाही चव्हाटा झाला आहे. एरवी फेसबुक,...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जो सांस्कृतिक बुरखा घेऊन राजकारण करीत असतो, तो बुरखा आजवर अनेक वेळा टराटरा फाडला गेला आहे. चेहरा झाकण्यासाठी कधी कधी काही जण मुखवटा वापरतात, तर काही जण बुरखा घेतात. नरेंद्र मोदींनी आपले सर्वव्यापी अस्तित्व दाखवण्यासाठी आपल्या चेह-याचे हजारो मुखवटे तयार केले होते. रा. स्व. संघ मात्र आपला राजकीय चेहरा ‘सांस्कृतिक’ बुरख्याखाली लपवण्याचा प्रयत्न करीत...
व्रती चॅटर्जीची आई, ‘हजार चौरासी की माँ’ (1998) या चित्रपटाची नायिका (जया बच्चन) आहे. वीस वर्षांचा व्रती चॅटर्जी (जॉय सेनगुप्ता) हे तिचं सर्वात धाकटं अपत्य.
मध्यरात्री केव्हा तरी फोन वाजू लागतो. ती फोन उचलते. ‘‘दिव्यनाथ चॅटर्जींचं घर? घरात कोणी पुरुष माणूस नाही का?’’ पलीकडून विचारणा होते. ती म्हणते, ‘‘सगळे झोपले आहेत. मी मिसेस चॅटर्जी.’’ ‘‘व्रती चॅटर्जी तुमचा कोण...