Home >> Magazine >> Rasik

Rasik

 • ही आणीबाणी थांबवता योणार नाही...
  पहिल्या आणीबाणीला ४२ वर्षे झाली. तिच्या आठवणी आता पुसट होत चालल्या आहेत. तरीही भाजप त्या जागवू पाहात आहे. पण त्याच वेळी दुसरीकडे खुद्द भाजप राजवटीत अघोषित आणीबाणी लागू झाल्याचे अनेकांना वाटू लागले आहे. नरेंद्र मोदी यांची वाटचाल थेट इंदिरा गांधी यांच्या पद्धतीने चालू आहे, असेही अनेकांचे ठाम म्हणणे आहे... स्वतंत्र भारताच्या इतिहासातील आणीबाणी हे एक काळे पान आहे. या काळात संसद स्थगित करण्यात आली. विरोधकांना तुरुंगात डांबण्यात आले. इंदिरा गांधी यांना विरोध करणारे ते ते सरकारचे व देशाचे...
  12:03 AM
 • मातृसत्तेचा उदय
  स्त्री गर्भ धारण करते,पुरुष नाही, या एकाच गोष्टीचा पुरुषांनी आजवर प्रचंड गैरफायदा घेतलेला आहे. त्याच्याच बळावर पुरुषांनी एकेकाळची मातृसत्ता उलथवून पितृसत्ताक पद्धती आणली. पण ती कायम टिकेल, याची आता शाश्वती नाही. पुरुषांना आपल्या पौरुषत्वाचा नको तितका अभिमान असतो. बोलीभाषेत त्याला शब्द आहे मर्दानगी. मर्द को दर्द नहीं होता असली भंकस पुरुष अनेकदा करतात. त्यात आपण स्त्रियांपेक्षा वरचढ आहोत, असा भाव असतोच; शिवाय इतर पुरुषांपेक्षाही आपल्यातच जास्त पुरुषत्व आहे, असा माजही त्यात मिसळलेला...
  12:03 AM
 • थ्री चिअर्स फॉर मिस्टर काश्मीर...
  काश्मीर म्हणजे दहशतवादी हल्ले, फुटीरवाद्यांच्या हिंसक कारवाया. काश्मीर म्हणजे स्थानिकांचा लष्कराशी होत असलेला संघर्ष, आणि काश्मीर म्हणजे नंदनवनात वाहणारे रक्ताचे पाट... या बदनाम ओळखीला मागे टाकत आता काश्मिरी युवकांमध्ये बॉडीबिल्डिंगचे वेड पसरू लागले आहे... दहशतवादाच्या आगीत होरपळलेला काश्मिरी समाज यातून आशावादी पहाटेचे स्वप्न पाहू लागला आहे... सतत अस्थिर आणि अशांत असलेल्या काश्मीरमध्ये दगड हातात घेऊन रस्त्यांवर उतरलेले युवक, त्यांचा लष्करासोबतचा हिंसक संघर्ष हे नेहमीचेच...
  12:03 AM
 • सहवेदनेची व्हायरल पोच
  बाळाला जन्म दिल्यानंतर काही दिवसांतच आई वारली.बाळाच्या पित्याने नैराश्यातून आत्महत्या केली. बाळ लौकिकार्थाने अनाथ झाले. त्या छोट्या जिवाचं असं आपल्या डोळ्यांसमोर निराधार होणं,बाळावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना निखशिखांत हादरवून गेलं. एक दिवस बाळाचे आजोबा डॉक्टरांना भेटायला आले. डॉक्टरांनी त्यांना धीर दिला. म्हणाले, यापुढे बाळाच्या तब्येतीची जबाबदारी माझी. डॉक्टरांचे हे बोल ऐकून दुष्काळग्रस्त आजोबांच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या. म्हणाले, पैशांची अडचण नाही. ते मी कसेही...
  12:02 AM
 • डॉक्टर, शेतकरी, फेसबुक आणि आपण सारे...
  फेसबुकवर साडे तेरा लाखांची पोच. हा एका पोस्टचा अवघ्या सात दिवसांतला प्रवास. तोही बिनपैशात. हा अनुभव थक्क करणारा. डॉ. अमोल अन्नदातेंच्या फेसबुक पेजवरून ही पोस्ट व्हायरल झाली. व्हायरल हा शब्द का वापरला जातो, ते या पोस्टमुळे कळलं. असं काय होतं या पोस्टमध्ये? अमोल अन्नदाते सेलेब्रिटी नाहीत, सिनेस्टार नाहीत, क्रिकेटपटू नाहीत, राजकीय नेते नाहीत. तरीही एका डॉक्टरच्या पोस्टला इतकी पोच मिळावी? या पोस्टमधून लोकांना दिसला, एक संवेदनशील डॉक्टर. या पोस्टमधून लोकांना दिसले, एक व्यथित तरीही...
  12:01 AM
 • फ्रेम
  भावनेचं रूपघेऊन शब्द कागदावर अवतरतात. भावनांच्या लडीतून कथाविश्व आकारास येत जातं. या विश्वाची काही वैशिष्ट्यं असतात. ती कधी दीर्घकथेतून उलगडतात, कधी लघुकथेतून. परंतु अत्यल्प शब्दांत अवघे विश्व सामावलेली कथा आपल्याला निराळ्या रूपात भेटते. एकदा भेटली की, कायमस्वरूपी आपली होऊन जाते. अशाच वाचकमनांवर प्रभाव टाकणाऱ्या लघुत्तम कथांना व्यासपीठ देणारे हे पाक्षिक सदर... एक मोठा वाडा. दरवाजाशी एक खोलीवजा दुकान. फोटो फ्रेमचं. गजबजलेलं, चकाकणारं, अस्ताव्यस्त, तरीही सुखावणारं. हनुमान,...
  12:01 AM
 • माझी रेषा मीच मोठी केली!
  महाराष्ट्र विधानपरिषदेतील राज्यपालनियुक्त बारा जागांवर साहित्य, कला, विज्ञान, सहकार, संस्कृती या पाच क्षेत्रांतील तज्ज्ञांची नियुक्ती होणे, हे घटनेतील तरतुदींनुसार आवश्यक होते. परंतु राज्याच्या निर्मितीनंतर याबाबत इतकी चालढकल झालेली आहे की, या बारा जागा म्हणजे आपल्या मर्जीतील नेत्यांची खोगीरभरती करण्याची ठिकाणे, असा समज राजकीय पक्षांनी करून घेतला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने राज्यपाल सी. विद्यासागर राव व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या विषयाकडे त्यांचे...
  12:00 AM
 • हादरवून टाकणारा वाचनानुभव
  जसे शरीर आपल्याला येऊ घातलेल्या आजार-विकाराचे संकेत देत असते, तसेच वर्तमान आपल्याला भविष्यातल्या धोक्यांचे इशारे देत असते. असेच जागतिक आणि देशपातळीवरचे भविष्यातले संभाव्य धोके राजहंस प्रकाशनाचे प्रस्तुत पुस्तक आपल्याला समजावून सांगते... वाचनाचा किडा ज्याला डसलेला असतो, त्याला रोज नवे काहीतरी वाचायला हवेच असते. या शोधात अनेक पुस्तके घेतली जातात. कष्ट करून पैदा केली जातात. आजकाल नेटवर शोधाशोध चालू असते. पेपरमधून येणाऱ्या पुस्तकांची नोंद घेतली जात असतेच. हे शोधताना भाषिक आग्रह...
  12:00 AM
 • करून सवरून नामानिराळे राहण्याच्या कलेतून राजकारण बहरत जाते. आजचे सरकार आणि या सरकारची पितृसंघटना या कलेत विलक्षण पारंगत आहे. त्यातूनच हिंदू जनजागृती समितीसारख्या कट्टरपंथी संघटनांना राज्यघटना पायदळी तुडवण्यास मूक संमती दिली जात आहे. आणीबाणीसदृश परिस्थिती लादणारेच आणीबाणीविरोधी दिन पाळण्यासाठी पुढाकार घेताना दिसत आहेत... बरेच लोक जिच्याकडे त्यात काय एवढे म्हणून दुर्लक्ष करतील, अशी एक घटना नुकतीच घडून गेली. खरे तर एक प्रकारचा जाहीर गुन्हाच घडवला गेला आणि त्याकडे दुर्लक्षच केले...
  12:00 AM
 • 'बिकिनी किलर' चार्ल्स शोभराज, 32 खून केल्याचा देशोदेशीच्या पोलिसांचा दावा
  विस्मृतीत गेलेला बिकिनी किलर चार्ल्स शोभराज गेल्या आठवड्यात अचानक बातम्यांमध्ये चमकला. पाठोपाठ त्याच्याशी निगडित कथा-दंतकथांना नव्याने उजाळा दिला गेला. त्याचे तुरुंगातून सफाईने पळून जाण्याचे किस्से चघळले गेले, त्याला अत्यंत चतुराईने जेरबंद करणाऱ्या इन्स्पेक्टर मधुकर झेंडेंची कर्तबगारी नव्याने सांगितली गेली. अर्थात, सत्तर-ऐंशीच्या दशकात पोलिसांना गुंगारा देत पसार होण्याचं कसब राखून असलेला शोभराज आता वृद्धत्वाकडे झुकलाय. काठमांडूमधल्या सुंधारा सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपेची...
  June 18, 10:51 AM
 • गोली मार भेजे में...
  हर कुत्ते के दिन होते है... या वाक्याचा खरोखरीच प्रत्यय यावा, अशी अवस्था सध्या मुंबईच्या गुन्हेगारी विश्वाची झालीय. या विश्वाचा प्रभाव झपाट्याने ओसरत चाललाय. पण खोड गेलेली नाही, त्यामुळे कुणा वेटरला, केटररला किंवा स्ट्रगलर मॉडेलला हाताशी धरून शूटआऊटचे प्रयत्न होताहेत आणि त्यात ते फसताहेत... एक केटरर, एक वेटर आणि एक मॉडेल. तीन दिशांना तोंड असलेल्या या तीन जणांमध्ये काय साम्य असू शकतं? किंवा असायला हवं? तसं काही ना काही निमित्ताने हे तिघे कुठे तरी एकत्र येऊ शकतात. म्हणजे, जिथे कुठे मॉडेल शूट...
  June 18, 06:51 AM
 • तुमचं आमचं सेम असतं...
  राजकीय-लष्करी तणाव भारत, पाकिस्तान आणि चीन या तीन देशांना एकमेकांच्या विरोधात उभे करतात. पण आपली संस्कृती, आपल्यावर झालेले संस्कार आणि त्या संस्कारातून उद्भवलेले प्रश्न एकच आहेत, याची जाणीव चीनमध्ये हजार कोटीची कमाई करणारा दंगलसारखा सिनेमा करून देतो. नुकत्याच पार पडलेल्या कझाकिस्तान येथील शिखर संमेलनामध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष शी चीनपिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आमीर खानच्या दंगल सिनेमाची दिलखुलासपणे प्रशंसा केली. फक्त चीनमध्ये तब्बल १००० कोटीपेक्षा जास्त...
  June 18, 06:47 AM
 • अभिजन हिताय बहुजन सुखाय
  बहुजनांच्या आयुष्यात निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी अभिजन पुढेच सरसावले नाहीत. ते याच भ्रमात राहिले की बहुजन त्यांच्या पाठीमागून येत आहेत. प्रत्यक्षात बहुजनांनी आपला मार्ग कधीच बदलला आहे. जमिनीवरचे प्रश्न आकाशात राहून सोडवता येत नाही, याचं त्यांचं भान पुरतं हरवलं आहे... गोध्रा दंगलीचा कलंक अंगावर असलेले नरेंद्र मोदी नावाचे गुजरातचे मुख्यमंत्री एकट्याच्या बळावर भाजपला बहुमताची सत्ता मिळवून देत देशाचे पंतप्रधान होतील, असं कोणालाही वाटलं नव्हतं. पण तसं झालं. स्त्रिया,...
  June 18, 06:39 AM
 • अखेरचा प्रकाश
  काळ कुणासाठी थांबत नसतो, हे खरं; पण हा न थांबणारा काळ पारंपरिक कलागुणांशी निगडित व्यवसायदेखील धुऊन नेतो. असं जेव्हा घडतं, तेव्हा घोंगड्याची पिढ्यानपिढ्या सोबत असलेली ऊबही गेलेली असते... माणदेशातील दुपार... उन्हाळी झळा जाणवत होत्या. पाहावं तिकडं भकास मोकळं रान. दूरवर एखादा गुराखी झाडाच्या सावलीला बसलेला. सातारा-पंढरपूर रस्त्यावर असलेल्या महिमानगडकडे आम्ही निघालो होतो. मुख्य रस्त्याच्या आत एक किलोमीटर गेल्यावर गाव. याच गावात घोंगडंं विणणारे कारागीर आहेत, याची माहिती मिळाली होती....
  June 18, 06:31 AM
 • एका बनियाचा गहिवर
  गांधीजी स्वतःला सनातनी हिंदू म्हणत, पण ते कधीचेच धर्माच्या पलीकडे गेले होते. ते कर्मकांडी धार्मिक नसले, तरी धर्माची पोकळी व्यापण्याचं मोल त्यांना माहीत होतं. राम गांधीजींच्या हातातून निसटला, तो थेट अडवाणींच्या हातात गेला. गांधीजींच्या अनुयायांना ही चतुराई ना कधी कळली, ना जमली. ते आदरणीय अमितभाईंच्या पथ्यावरच पडलं आणि पडतंय. गांधींनी गळ्यातला गहिवर आवरला आणि ते म्हणाले, तरी तुम्ही भाग्यवान एकेक जातजमात तरी तुमच्या पाठीशी आहे माझ्या पाठीशी मात्र फक्त सरकारी कचेऱ्यातील भिंती!...
  June 18, 06:26 AM
 • मी का बाळगावी लाज?
  तसं पाहायला गेलं तर मासिक पाळी प्रत्येक स्त्रीच्या आयुष्याचा अविभाज्य भाग. तरी हे असं चित्र? एकीकडे शासन सामाजिक आरोग्याच्या गप्पा मारतं, तर दुसरीकडे सामाजिक आरोग्य प्रश्नांत सॅनिटरी नॅपकिनचा हा प्रश्न महत्त्वाचा असूनही, कमालीची दुर्लक्षित गोष्ट म्हणून दूर ठेवला जातोय. महिलांचं आरोग्य हेच प्राथमिकतः देशाचं आरोग्य नाही का? मी बाजार मागत होते. ताई, बाई, आक्का म्हणत मस्त चाललं होतं. दे गं, आक्का!, असं म्हणत मी तिच्या समोर हात केला, आणि ती म्हणाली मला द्यायचं नाहीये. मी म्हणाले, का गं? उत्तर...
  June 18, 06:18 AM
 • साहब हेल्पर हूँ, पर भिखारी नही
  शेटकडं टिप जमा केल्याने त्यांच्या दृष्टीने खूप मोठा गुन्हा केला होता. हे सगळे मिळून मला मारतील. सतत हाच विचार मनात यायचा. भणाणणाऱ्या आग्यामोहळाच्या माशा कडकडून झोंबायच्या. मी विचार करायचो, कस्टमर्स जेवणाचं बिल देतात, तरीही वेटरला पैसे कसे काय देतात? शिक्षण हे माणसाला अपमान पचवू देत नाही. नांगराला जुंपलेला बैल जसा फुसफुस करतो, अगदी त्याप्रमाणेच अपमानाची धग उरात धगधगते. खरंच का होतं असं? मला तर वाटतं, आपल्याला अपमान झाला, हे कळलंच नाही पाहिजे. ही अनुभूती माणसाच्या वाट्यालाच आलीच नाही...
  June 18, 06:12 AM
 • फरक पडतो, साहेब!
  दारं खिडक्या सताड उघड्या टाकून आपल्याच मस्तीत लोळत राहिल्यानंतर पाहुण्यांसोबत दोन-चार भुरटे घरात घुसले तर कांगावा करण्यात काय हशील? मात्र, तरीही महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशात लागलेल्या शेतकरी आंदोलनाच्या आगीत विरोधक तेल ओतताहेत, असा आरोप करून सत्ताधारी स्वत:चं हसं करून घेत आहेत. एरवी, संप हे आपलं अस्त्र नाही, याची सर्वसामान्य शेतकऱ्याला पूर्ण जाणीव आहे. तरीही त्याने उगारले. इतरांआधी स्वत:चे खूप मोठे नुकसान सोसले. यातून नेमके काय साधले, समाज आणि सरकारला काय शिकवले, याचा ऊहापोह करणारा हा...
  June 11, 08:32 AM
 • पंगेवाली बाई
  गेल्या दोन दशकांतली राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक खळबळ शब्दबद्ध करणारी दी मिनिस्ट्री ऑफ अटमोस्ट हॅपिनेस कादंबरी प्रकाशित होणं, ही साहित्यविश्वातली अलीकडच्या काळातली सगळ्यांत मोठी घटना. मात्र या घटनेत नायिका असलेली अरुंधती रॉय नावाची लेखिका कौतुक आणि कुतूहलापेक्षा प्रस्थापित वर्गाच्या तिरस्काराचीच धनी ठरत आली आहे... एखाद्या माणसाचा द्वेष करणं खूप सोपं आहे. त्यातही जर ते माणूस अरुंधती रॉय नावाचं असेल तर त्यांच्या विरोधात गरळ ओकण्यासाठी या घटकेला कितीतरी कारणं आहेत, निमित्त आहेत. द...
  June 11, 08:28 AM
 • असत्यमेव जयते
  संशय पेरणीतून सत्तेची मशागत हे तत्त्व तिकडे डोनाल्ड ट्रम्प आणि इकडे मोदी सरकार खूपच गांभीर्याने राबवू पाहतंय. म्हणजे, गांधीजींवर चौथी गोळी कुणी झाडली, अशी हळूच फुसकुली सोडून द्यायची, शेतकरी आंदोलनात गुंड घुसले म्हणायचं, बेडर होऊन प्रश्न विचारणारे एनडीटीव्ही चॅनेल स्वत:च नीतिभ्रष्ट आहे अशी हवा तयार करायची... हे प्रकार सध्या जोरात आहेत. अमेरिकी प्रेस मात्र या खोटारडेपणाला पुरून उरला आहे. भारतातही ती वेळ आलीय... राज्यसत्तेसमोर शेपूट घोळणाऱ्या माध्यमांचा शाप ज्या समाजांना असतो, त्या...
  June 11, 08:21 AM
 
जाहिरात
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
जाहिरात
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 

हास्ययात्रा