Home >> Maharashtra >> Vidarva >> Akola

Akola News

 • आनंद पर्वणी : गणरायाच्या आगमनाची बुलडाण्यात जोरदार तयारी
  बुलडाणा - मागील काही दिवसापासून आबाल वृध्दासह सर्वांनाच गणरायाच्या आगमनाची चाहुल लागली आहे. काही दिवसांवर गणेशोत्सव येवून ठेपल्याने गणेशाच्या आगमनाची जोरदार तयारी सगळीकडे सुरु झाली आहे. शहरापासून जवळ असलेल्या सव येथील फुलचंद पेंढारकर यांच्या मुर्ती कार्यशाळेत गणेशाच्या मूर्तीवर शेवटच्या टप्प्यातील रंगकाम करुन मुर्ती आकर्षक बनविण्यासाठी कलाकार अंतीम हात फिरवत आहेत. या कामात त्यांच्या कुटुंबातील महिलाही आता कामाला लागल्या आहेत. दरवर्षी येणारा गणेश उत्सव म्हणजे आबाल...
  12:09 PM
 • अाता गणवेशात न येणाऱ्या शिक्षकांचे वेतन राेखणार
  अकाेला -शाळेत गणवेशात न येणाऱ्या शिक्षकांचे वेतन राेखण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीच्या सभेत घेण्यात अाला. तसेच भिली येथे जि.प. शाळेतील एका प्रकरणात शाळा बंद ठेवणाऱ्या दाेन शिक्षकांची एक वेतन वाढ थांबवण्याचा निर्णयही सभेत घेण्यात अाला. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये वितरीत करण्यात येणाऱ्या पाेषण अाहाराची मािहती अनेकदा सादर करण्याच्या सूचना शिक्षण समिती सभापती पुंडलीकराव अरबट यांनी दिल्या. त्यानंतर त्यांनी स्वत:ही अनेकदा शाळांमध्ये प्रत्यक्ष...
  12:03 PM
 • शौचालयामध्ये सरपंचापासून बीडीओपर्यंत 6 जणांनी केली घाण
  अकोला - पंतप्रधान ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत हगणदारीमुक्त गाव योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या स्वच्छतागृहाचे देयके काढण्यासाठी सरपंच पुत्रापासून ते गटविकास अधिकारी (बीडीओ) अशा सहा जणांनी मिळून लाभार्थ्यांकडे १४ हजार ९०० रुपये कमिशनची मागणी केली. कमिशन देण्याची ऐपत नसल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) लाभार्थ्यांने तक्रार केली. त्यात मंगळवारी विस्तार अधिकाऱ्याला दोन हजार रुपयांची लाच घेताना एसीबीच्या युनिटने पंचायत समितीमध्ये सापळा रचून रंगेहात अटक केली. अकोला...
  11:52 AM
 • तीन दिवस सलग तरीही गतवर्षीपेक्षा निम्माच पाऊस, सरासरी अजून दूरच
  अकोला- गेले तीन दिवस विदर्भासह अकोला जिल्ह्यात सलग पाऊस पडला असला तरी जिल्ह्यात अजूनही गतवर्षीच्या तुलनेत निम्मेच पर्जन्यमान नोंदले गेले. यामुळे पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य काही प्रमाणात कमी झाले तरी शेतीपिकाची समस्या मात्र कायमच राहणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. महसूल विभागातील नोंदीनुसार जिल्ह्यात गतवर्षी २१ ऑगस्टपर्यंत ६५६.३ मिलीमीटर पाऊस पडला होता. यावर्षी मात्र तो ३४७.३ मिलीमीटरवरच थांबला आहे. पावसाची ही आकडेवारी सरासरीपेक्षाही खूप कमी आहे. गेल्या दहा वर्षांतील...
  August 22, 11:29 AM
 • पश्चिम विदर्भातील ऐतिहासिक वास्तूंच्या सीमा गेल्या चोरीला!
  अकोला- भारतीय पुरातत्व विभागाने (एएसआय) राष्ट्रीय वारसा म्हणून घोषित केलेल्या बहुतेक ऐतिहासिक वास्तुंच्या सीमा अतिक्रमणाच्या विळख्यात सापडल्याने चोरीला गेल्या आहेत. सदर वास्तूंना त्यातून मुक्त करण्यासाठी एएसआयने मोजणीचा विडा उचलला असून, पश्चिम विदर्भातील सर्व वास्तूंचे सीमांकन लवकरच केले जाणार आहे. पश्चिम विदर्भातील अमरावती अकोला जिल्ह्यात आठ राष्ट्रीय वारसास्थळे आहेत. अमरावती जिल्ह्यात तीन आणि अकोल्यात पाच अशी त्यांची विभागणी आहे. या सर्व वास्तूंचे सीमांकन करण्यासाठी...
  August 22, 11:26 AM
 • पाच दरोडेखोर विशेष पथकाच्या सापळ्यात, वाशीम नगराध्यक्ष खून प्रकरणातील आरोपीचा सामावेश
  अकोला- वाशीम जिल्ह्यातील पाच कुख्यात दरोडेखोरांना पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने रविवारी संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास बार्शीटाकळी रोडवर पकडले. सोने तस्करीच्या बहाण्याने पोलिसांनी रचलेल्या सापळ्यात ते अडकले. पोलिसांनी त्यांच्याकडून नेपाळच्या चलनी नोटा जप्त केल्या आहेत. पोलिस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांना गोपनीय माहिती मिळाली की, वाशीम येथील कुख्यात आरोपी अकोल्यात दरोड्याच्या प्रयत्नात आहेत. अळसपुरे यांच्या चमुने...
  August 21, 11:53 AM
 • 700 गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांची भेट, ‘रोटरी अॅग्रोसिटी’चे स्कूल जोडो अभियान
  अकोला- आपल्या आजूबाजूला असणाऱ्या गरजू व्यक्तींना सहकार्याची वृत्ती विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी, त्यांना देण्यातील आनंद लुटता यावा या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ अकोला अॅग्रोसिटीने स्कूल जोडो अभियान राबवले. या अभियान अंतर्गत शहरातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी त्यांच्या कडील सुस्थितीतील शालेय साहित्य जमा करुन हे सर्व साहित्य ग्रामीण भागातील जवळपास ७०० गरजू विद्यार्थ्यांना भेट म्हणून देण्यात आले. रोटरी क्लब ऑफ अकोला अॅग्रोसिटी या अभियानासाठी कार्य करत आहे. शालेय...
  August 21, 11:49 AM
 • चोरट्यांनी चक्क पोलिसांच्याच वाहनावरील ब्रॅन्डेड कंपनीचे ‘लोगो’ पळवले
  अकोला- दुचाकी चारचाकी वाहने चोरीला जाण्याच्या घटना नवीन नाहीत; मात्र आता चारचाकी वाहनांचे ब्रॅन्डेड कंपनीचे लोगो चोरून त्यातून पैसे कमवण्याची शक्कल चोरट्यांनी लढवली आहे. शासकीय, निमशासकीय खासगी वाहनांचे इम्पोर्टेड लोगो चोरीला जाण्याचे प्रकार वाढले आहेत. विशेष म्हणजे पोलिसांच्या नव्या करकरीत पेट्रोलिंग कारचेही लोगो गायब झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. शहरातील बहुतांश वाहनांचे लोगो चोरीला जाण्याच्या घटना उजेडात आल्या आहेत. मात्र, या प्रकरणी कुणी तक्रार करण्याच्या भानगडीत पडत...
  August 21, 11:42 AM
 • सामाजिक सलोख्यासाठी धावले पोलिस, नागरिक
  अकोला- क्रीडा स्पर्धेनिमित्त शनिवारी सकाळी ६.३० वाजता पोलिस प्रशासनातर्फे आयोजित सामाजिक एकता दौडला चांगला प्रतिसाद मिळाला. पोलिस विभागातर्फे गुरुवारपासून जिल्ह्यातील पोलिसांसाठी क्रीडा स्पर्धा घेतल्या. या स्पर्धेच्या समारोपीय कार्यक्रमापूर्वी पोलिस विभागातर्फे सर्व समाज, धर्मांच्या नागरिकांचा सहभाग असावा, यादृष्टीने सामाजिक एकता दौडचे आयोजन केले होते. जिल्ह्यातील शांतता सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस प्रयत्न करीत आहेत. सामाजिक सलोख्याचा आधार घेऊन पोलिसांकडून...
  August 20, 12:13 PM
 • संपूर्ण करात सुमारे 20 टक्के कपात, सत्ताधारी बॅकफूटवर
  अकोला- मालमत्ता करात भरमसाठ वाढ झाल्याचे लक्षात घेत, सत्ताधारी भाजपने कराच्या वाढ केलेल्या रकमेत ५५ टक्के कपात केली. संपूर्ण करात ही कपात २० टक्के ठरली. सत्ताधाऱ्यांनी ९० रुपये प्रति चौरस मीटरने करात वाढ केली होती, ती आता ४० रुपये केली आहे. सत्ताधारी गटाने मतदान घेऊन घेतलेल्या या निर्णयाला कॉग्रेस, भारिप-बमसं, शिवसेनेने विरोध केला तर राष्ट्रवादी कॉग्रेस आणि एमआयएमच्या नगरसेवकांनी मतदानावर बहिष्कार घातला. महासभेने घेतलेल्या या निर्णयामुळे सर्व सामान्य नागरिकांना काही प्रमाणात का...
  August 20, 12:06 PM
 • सत्ताधाऱ्यांना सद्बुद्धी मिळावी म्हणून शिवसेनेचा देवी जागर
  अकोला- वाढवलेला भरमसाठ कर कमी करण्यासाठी शिवसेनेच्या नगरसेवक तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी महापालिका कार्यालयासमोर १९ ऑगस्टला देवीचा जागर घालून सत्ताधाऱ्यांना सद््बुद्धी मिळण्यासाठी प्रार्थना केली. जागराला प्रारंभ होतानाच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांसोबत वादही झाला. सुदैवाने हा वाद मिटला. सत्ताधाऱ्यांनी उत्पन्न वाढवण्यासाठी मालमत्ता करात भरमसाठ वाढ केली. वाढीस झालेला विरोध लक्षात घेऊन सत्ताधारी गटाने मालमत्ता करात कपात करण्याचा निर्णय घेतला होता. या...
  August 20, 12:00 PM
 • पाण्याअभावी सुकलेली पीके पाहून खचलेल्या शेतकऱ्याची आत्महत्या
  बोरगावमंजू- कौलखेड जहॉगीर येथील अल्पभुधारक युवा शेतकऱ्याने गावाबाहेरील सोपीनाथ महाराज मंदिरात गळफास लावून आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली. ही घटना १८ ऑगस्ट रोजी दुपारी वाजताच्या सुमारास घडली. प्रमोद पुंडलीक तायडे, वय ३० वर्षे रा. कौलखेड जहॉगीर असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे. सततची नापिकी यंदा पाण्याअभावी सुकत असलेली पीके पाहून ते चिंतेत होते. तसेच महाराष्ट्र बँक शाखा पळसोचे पीक कर्ज, महेंद्र फायनान्सच्या कर्जाचा डोंगर त्यांच्यासमोर होता. यामुळे चिंतेत असल्याने त्यांनी...
  August 19, 02:18 PM
 • अाता पक्षाचे नव्हे, जनतेचे प्रतिनिधीत्व करा; काँग्रेसचे थाली बजाव अांदाेलन
  अकोला- भरमसाठ करवाढीमुळे सर्व सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. महापालिकेत बहुमत असले तरी मिळालेले पद हे पक्षासाठी नाही तर सर्व सामान्य जनतेसाठी आहे. याची जाण ठेवून सभागृहात पक्षाचे नव्हे तर जनतेचे प्रतिनिधीत्व करुन वाढीव कर रद्द करा, असे आवाहन भारिप-बमसंच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी १८ ऑगस्टला मनपा पदाधिकाऱ्यांना केलेल्या घेराव आंदोलनात केले. यावेळी पदाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले. यावेळी तगडा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दर चार वर्षानी करवाढ करता येते. परंतु १७...
  August 19, 02:06 PM
 • मालवाहू ट्रक 150 फुट नदीपात्रात कोसळला, दोघे जागीच ठार
  बोरगावमंजू/कुरणखेड- बोरगावमंजू पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील कुरणखेड येथील काटेपुर्णा नदीच्या पुलावरून मालवाहू ट्रक नदीपात्रात १५० फुटांवर कोसळला. यामध्ये ट्रकमधील दोघेजण जागीच ठार झाले. ट्रक क्रमांक एनएल ०२ एल ५९६७ हा मालवाहू ट्रक कलकत्ता येथे कांदा घेऊन जात होता. दरम्यान, काटेपुर्णा नदीच्या पुलावरून पहाटे वाजताच्या सुमारास १५० फुट खाली नदी पात्रात पडला. त्यामुळे ट्रकचा चुराडा झाला. यामध्ये ट्रक चालक दारसिंग राणा रा. दिल्ली त्याचा सहकारी क्लीनर...
  August 18, 12:28 PM
 • जल संकट: एकाही लघु प्रकल्पात अर्धा दलघमी जलसाठा नाही
  अकोला- पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील ३२ लघु प्रकल्पापैकी १९ लघु प्रकल्प कोरडे पडले असून उर्वरित लघू प्रकल्पात अर्धा दशलक्ष घनमिटर पेक्षाही कमी जलसाठा राहिला आहे. तर काटेपूर्णा प्रकल्पाच्या जलसाठ्यात दररोज घट होत आहे. पुढे पाऊस झाल्यास शहरासह जिल्ह्याला पाणी टंचाईचा भिषण सामना करावा लागणार आहे. गेल्या काही वर्षापासून पावसाच्या हलगर्जीपणामुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. एक वर्ष पाऊस दोन वर्ष हुलकावणी असा पावसाचा खेळ सुरु आहे. यावर्षीही पावसाने दडी मारल्याने...
  August 18, 12:25 PM
 • रात्री पती अन् पत्नीला लुटले, दुपारी युवतीची चेन हिसकली
  अकोला- पती-पत्नी बुधवारी रात्री स्कुटीवरून मुलाला रुग्णालयात घेऊन जात होते. दुचाकीवरून तिघे आले. त्यांना अडवले, मारहाण केली. चेन हिसकली स्कुटीही घेऊन पळून गेले. त्यानंतर गुरुवारी दुपारी दीड वाजता कौलखेड रोडवरील अपार्टमेंटमधील तीन फ्लॅट चोरट्यांनी फोडले एकातून ७० ग्रॅम सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला तर अर्धातासांनी गोरक्षण रोडकडे पायी जात असलेल्या युवतीजवळ दुचाकीवरून तिघे आले त्यांनी तिचे तोंड दाबले गळ्यातील सोन्याची चेन कानातील टॉप्स काढून पळून गेले. हा थरार घडला १८ तासात खदान...
  August 18, 12:21 PM
 • भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी संजय धोत्रेंचे नाव चर्चेत, देसाईंच्या 'उद्योग'वर उद्धव ठाकरे नाराज
  मुंबई/अकोला- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार, राज्य मंत्रिमंडळातल्या खांदेपालटाची जोरदार चर्चा पुन्हा सुरु झाली आहे. अनेकांच्या मंत्रिपद गमवावे लागण्याची तर नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची जोरदार चर्चा आहे. सोबतच भाजपचे प्रदेशाध्यक्षपदावरून रावसाहेब दानवे यांना दूर करण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी खासदार संजय धोत्रेंचे नाव चर्चेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह काही...
  August 17, 03:30 PM
 • बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 1 हजार कोटींची कर्जमाफी
  बुलडाणा- शासनाने शेतकऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज कृषि सन्मान योजना अंमलात आणली असून या योजनेनुसार दीड लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज सरसकट माफ करण्यात आले आहे. या योजनेचा सर्वात जास्त लाभ बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना झाला आहे. जिल्ह्यात दीड लाखापर्यंत पीक कर्ज असलेल्या लाख ७० हजार ८५० शेतकऱ्यांच्या ९१३.२७ कोटी रुपयांच्या कर्जाला माफी मिळाली आहे. तसेच दीड लाखाच्यावर कर्ज असलेल्या हजार ९८० शेतकऱ्यांना ११८.६१ कोटी रुपयांची कर्जमाफी एकरकमी भरणा केल्यानंतर मिळणार आहे. एकूण १०३५.८८...
  August 17, 11:17 AM
 • साडेआठ लाखांची अवैध दारू पकडली; दोघांना अटक, 1 फरार
  बुलडाणा- परराज्यातून देशी विदेशी दारू आणून तीची जिल्ह्यात अवैधरित्या विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन आरोपींना राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने अटक केली. तर अंधाराचा फायदा घेवून तिसरा आरोपी फरार होण्यात यशस्वी झाला आहे. यावेळी आरोपीच्या ताब्यातून दारुचे २३ बॉक्स एक क्रुझर गाडी असा एकुण साडे आठ लाख रुपयाचा माल जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई १२ ऑगष्ट रोजी मध्यरात्रीचे सुमारास मोताळा येथे करण्यात आली आहे. या कारवाईमुळे अवैधरित्या दारूची वाहतुक विक्री करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ...
  August 17, 11:13 AM
 • एकाचा पाय मोडून आला कमरेजवळ तर दुसरा फेकला गेला 10 फूटावर, रिक्षाला ट्रकची धडक, 4 जण ठार
  खामगाव (जि. बुलडाणा) - भरधाव ट्रक व ऑटोची समोरासमोर धडक हाेऊन झालेल्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार झाले, तर सहा जण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी सकाळी ११ वाजता खामगाव-अकोला महामार्गावर घडली. मृत बुलडाणा, साखरखेर्डा व भुसावळ येथील रहिवासी आहेत. अपघातातील जखमींना येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात ऑटोमधील प्रवासी मजूर शेख आसिफ शेख रशीद (२६, रा. इकबालनगर, बुलडाणा) समाधान झिने (रा. साखरखेर्डा), भागाजी कांबळे (रा. साखरखेर्डा) आणि सागरसिंग फुलसिंग चितोडिया (२५, रा....
  August 17, 09:10 AM
 
जाहिरात
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
जाहिरात
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 

हास्ययात्रा