Home >> Maharashtra >> Vidarva >> Akola

Akola News

 • अकोला: 2 दिवसांनंतर अाली रुग्णसेवा पूर्वपदावर, खासगी रुग्णालये सुरु
  अकोला - डाॅक्टरांवर हाेत असलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांच्या समर्थनार्थ अकोल्यातील आयएमएचे सदस्य असलेल्या डॉक्टरांनी पुकारलेला बंद अखेर शुक्रवारी मागे घेतला. दाेन दिवस रुग्णांचे हाल झाल्यानंतर शुक्रवारी संध्याकाळपासून खासगी वैद्यकीय सेवा सुरु झाली. धुळे येथील एका डाॅक्टरला रुग्णाच्या नातेवाईकांनी जबर मारहाण केल्यानंतर डाॅक्टरांच्या सुरक्षेचा मुद्या एेरणीवर अाला हाेता. अशातच मुंबई येथेही डाॅक्टरांना मारहाणीच्या घटना घडल्या. या हल्ल्यांमुळे डाॅक्टरांमध्ये...
  March 25, 09:25 AM
 • ट्रकची दुचाकीला धडक, महिला पोलिस जागीच ठार
  बाळापूर - अकोल्यावरून बाळापूरकडे येत असताना महामार्गावरील शेळद फाट्याजवळ भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली असता दुचाकीवरील एक महिला पोलिस कर्मचारी जागीच ठार तर दुसरी गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी ११.३० वाजताच्या सुमारास घडली. बाळापूर उपविभागीय पोलिस कार्यालयातील दोन महिला कर्मचारी ह्या अॅक्टिव्हा क्रमांक एमएच ३० , एडी ३०१९ ने अकोलावरून बाळापूरकडे येत असताना राष्ट्रीय महामार्गावरील शेळद फाट्याजवळ ट्रक क्रमांक जीजे १९ एक्स १८९० च्या चालकाने आपले वाहन बेजबाबदारीने चालवून...
  March 25, 09:04 AM
 • मनपा अाता प्रत्येक प्रभागामध्ये 60 ते 100 सफाई कर्मचारी देणार, पहिल्‍या महासभेत निर्णय
  अकोला - शहराची झालेली हद्दवाढ, प्रभागाची लोकसंख्या लक्षात घेता सफाईचे काम योग्य रित्या व्हावे, या हेतुने एका प्रभागात ६० ते १०० सफाई कर्मचारी नियुक्त करण्याचा त्याच बरोबर प्रभागाची लोकसंख्या लक्षात घेऊन महापौर आणि गटनेते यांच्या बैठकीत सफाई कामगारांच्या नियुक्तीचा निर्णय २४ मार्च रोजी झालेल्या महापालिकेच्या नविन कार्यकारीणीच्या पहिल्या महासभेत घेण्यात आला. महापालिकेच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात दुपारी दोन वाजता झालेल्या या सभेत ३५० किंवा आवश्यकते प्रमाणे सफाई...
  March 25, 09:04 AM
 • घरकुलासाठी विधवा महिलेचे पालिकेसमोर ठिय्या आंदोलन
  तेल्हार - घरकुलाच्या लाभासाठी वारंवार चकरा मारून हतबल झालेल्या एका विधवा महिलेने २४ मार्चला तेल्हारा नगर पालिकेेमध्ये नगराध्यक्षांच्या कक्षासमोर ठिय्या आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले. जुने शहरातील चंदाबाई गोकुळ वाघमारे यांचे पालिकेमध्ये सुरू असलेल्या आयएचएसडीपी या घरकुल योजनेच्या यादीत नाव आहे. नगर परिषदेच्या सुचनेनुसार महिलेने कागदपत्रांची पुर्तता केली आहे. नोटरी करण्यासाठी नोटीस मिळाल्याने नोटरी होऊ शकली नाही. नोटरी करण्याकरिता तयार असून, न. प. नोटीस देण्यास तयार नाही....
  March 25, 08:49 AM
 • मनसंधारण,जलसंधारण ते दारुबंदी; जितापूर गावाचा आमिर खानच्‍या वाॅटर कप-2 आवाहनाला प्रतिसाद
  अकोट - मनसंधारण ते जलसंधारण असा प्रयोग सातपुड्याच्या पायथ्याशी असणाऱ्या ग्राम जितापूर रूपागड येथे यशस्वी होत आहे. गावाने पाणी फाउंडेशन अंतर्गत सत्यमेव जयते वाॅटर कप २ मध्ये सहभाग घेतला आहे. अभिनेता अमिर खान यांच्या आवाहनाला नागरिकांचा प्रतिसाद लाभत आहे. गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन गावात दारूबंदी केली आहे. सत्यमेव जयते वाॅटर कप २ चे प्रशिक्षण ५ गावातील लोकांनी पूर्ण केले. त्यात राजेंद्र भारसाकळे, नागोराव सोलकर, देवानंद मोरे, शशिकला सुरत्ने यांचा समावेश होता. प्रशिक्षणावरून...
  March 25, 08:39 AM
 • बांधकाम साहित्य चाेरीप्रकरणी अाराेपीला कारावासाची शिक्षा
  अकोला - बांधकाम साहित्य चाेरी केल्याप्रकरणी अाराेपीला शुक्रवारी न्यायालयाने कारावासाची दंडाची शिक्षा सुनावली. गाेकुळ काॅलनीमध्ये राहणारे शिक्षक राम मखराम राठाेड यांनी सिव्हील लाईन्स पाेलिस ठाण्यात मे २०१६ राेजी चाेरीची तक्रार दिली हाेती. लाेखंड, प्लायवुड, सिमेंट चाैकट असे एकूण हजार २०० रूपयांचे साहित्य चाेरी गेले. याप्रकरणी पाेलिसांनी विद्यावान बळीराम प्रधान (वय ५०, रा. कृषि नगर) याच्या विरुद्ध भादंविचे कलम ३७९ अन्यवे गुन्हा दाखल केला. पाेलिसांनी तपास करुन दाेषाराेपपत्र...
  March 25, 08:28 AM
 • गोरेगावची जिल्‍हा परिषद शाळा डिजीटलच्या दिशेने
  प्रतिनिधी - शासनाकडून पायाभूत शैक्षणिक गुणवत्तेकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष, उदासिन धोरण अवलंब करण्यात येऊन शिक्षणाचे बाजारीकरण करण्यात आले. शिक्षण क्षेत्रात शिक्षण माफियांची मनोपल्ली सर्वसामान्य गोरगरिबांच्या पाल्यांना उच्च दर्जेदार शिक्षणापासून वंचित ठेवणारी ठरली. इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे पालकांची वाढलेली ओढ जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील शाळांवर संक्रांत ओढवणारी ठरली. यातूनच आता विद्यािर्थ्यांची रोडावणारी पटसंख्या वाढवणे, शिकवण्याच्या पद्धतीत आधुनिकता आणणे,...
  March 25, 08:27 AM
 • अकोल्याचे तापमान @41 अंश सेल्सिअस
  अकोला - अकोला शहराच्या तापमानाने आज, गुरुवारी अचानक उचल घेत ४१ अंश सेल्सिअस ही मोठी संख्या गाठली. परिणामी वातावरणातील उकाडा तीव्र वाढला असून, अकोलेकरांना आज खऱ्या अर्थाने उन्हाच्या झळा सोसाव्या लागल्या. गेल्या आठवड्यात जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी पाऊस पडला होता. त्यामुळे वातावरणात बऱ्यापैकी गारवा पसरला होता. दैनंदिन तापमानही ३२ अंश सेल्सिअसपर्यंत खाली उतरले होते. दरम्यान, गेल्या दोन दिवसांत तापमानाने अचानक उचल घेतल्यामुळे आजचे तापमान ४१ अंश सेल्सिअस नोंदले गेले. हवामान...
  March 24, 10:11 AM
 • विवाहितेला माहेरी पाठवल्याने त्याने फेकले घरामध्ये पेट्रोल
  अकाेला- विवाहितेचे परपुरुषासोबत संबंध जुळल्याने बदनामी होऊ नये म्हणून तिच्या पतीने तिला माहेरी पाठवले. त्यामुळे चिडून जाऊन आरोपीने विवाहितेच्या घरात पेट्रोल राॅकेल टाकले आणि पेटवून दिले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला गुरुवारी अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. रेल्वेमध्ये नोकरीला असलेल्या एका नोकरदाराच्या पत्नीसोबत बिर्ला रेल्वे कॉलनी येथील संदीप भगवान पट्टेबहाद्दूर वय २८ याचे संबंध जुळले. त्यांच्या संबंधाची...
  March 24, 10:09 AM
 • पातुरात चोरट्यांचा धुमाकूळ, 8 लाखांचा ऐवज केला लंपास
  पातूर - येथील बालाजी वेटाळातील कालंका मंदिराजवळ राहत असलेेले विनायकराव मुळे हे आपल्या कुटुंबासह देवदर्शनाला १७ मार्चपासून २२ मार्चपर्यंत पाच दिवस तिर्थयात्रेला गेले असताना रात्रीदरम्यान त्यांच्या घराचे कुलूप कोंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून लाखांचा ऐवज लंपास केला. या चोरीच्या घटनेत ५० ग्रॅम सोन्याची लक्ष्मीची मूर्ती, लक्ष्मी पूजनाचे दोन नाणे प्रत्येकी ७० ग्रॅम, सोन्याच्या दोन अंगठ्या प्रत्येकी ग्रॅम, कानातील सोन्याचे टॉप्स, महालक्ष्मीचे मंगळसूत्र दोन प्रत्येकी...
  March 24, 09:41 AM
 • मैत्रेयच्या गुंतवणुकदारांचे धरणे अांदाेलन
  अकोला - आर्थिकदृष्ट्या फसवणूक झालेल्या मैत्रेयच्या गुंतवणुकदारांनी बुधवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरु केले. दरम्यान ४८ तास उलटल्यावरही या आंदोलनाची दखल घेतली गेली नसल्याने दररोज सकाळी ११ ते या वेळात धरणे देण्याचा निर्णय कृती समितीने घेतला आहे. मुंबईच्या मैत्रेय प्लॉटर्स अँड स्ट्रक्चर्स या कंपनीने दाखविलेल्या आमीषापोटी जिल्ह्यातील बहुतेक नागरिकांनी सदर कंपनीत गुंतवणूक केली. गुंतवणुकीची ही रक्कम लाखो रुपये आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरळीत...
  March 24, 09:36 AM
 • अकोला: खासगी डाॅक्टरांच्या बंदमुळे रुग्णांचे हाल, माेठ्या हाॅस्पिटलमधील चाचण्या खाेळंबल्या
  अकोला - डाॅक्टरांवर हाेत असलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांच्या समर्थनार्थ अकोल्यातील आयएमएचे सदस्य असलेल्या डॉक्टरांनी गुरुवारी अांदाेलनाचे हत्यार उपसले. खाजगी रुग्णालये, दवाखान्यामधील बाह्य रुग्ण (ओपीडी )सेवा बंद ठेवून डाॅक्टरांनी सुरक्षितेच्या मुद्यावर अाक्रमक पवित्रा घेतला. परिणामी रुग्णांचे हाल झाले. अनेकांनी उपचारासाठी शासकीय रुग्णालयांमध्ये धाव घेतली. काहींनी अायुर्वेदिक, हाेमिअाेपॅथी डाॅक्टरांकडे धाव घेतली. गत काही दिवसांपासून राज्यात निवासी...
  March 24, 09:13 AM
 • ‘काँग्रेस- राष्ट्रवादी’ आमदारांच्या निलंबनाचा चिखलीमध्ये निषेध
  चिखली - शेतकऱ्यांच्या कर्जमाफी साठी आक्रमक असलेल्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या आमदारांनी कर्ज माफीचा उल्लेख आणि तरतूद अर्थसंकल्पात नसल्याबद्दल विधीमंडळाच्या दोन्ही भवनात आज वेलमध्ये उतरून कर्जमाफीसाठी घोषणा दिल्या. त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीच्या १९ आमदारांना निलंबित करण्यात आले. या घटनेचा चिखली तालुका शहर काँग्रेस, शेतकरी संघटना मित्र पक्षाच्या वतीने आज २२ मार्च रोजी तिव्र निषेध नोंदविण्यात आला. तसेच दोनशे ते अडीचशे कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवीत या घटनेचा जयस्तंभ चौकात...
  March 23, 10:56 AM
 • अकोला : खासगी दवाखान्यात होणार नाही अाज रुग्णांवर उपचार
  अकोला - निवासी डॉक्टरांच्या समर्थनार्थ अकोल्यातील आयएमएचे सदस्य असलेले डॉक्टर सरसावले असून, गुरुवारपासून महानगरातील खाजगी इस्पितळे दवाखान्यातील बाह्य रुग्ण ( ओपीडी ) सेवा पुढील आदेशापर्यंत बंद करण्याचा निर्णय आयएमएच्या बैठकीत घेण्यात आला. ही बैठक बुधवारी रात्री झाली. डॉक्टरांच्या आंदोलनामुळे रुग्ण सेवा कोलमडणार आहे. राज्यात निवासी डॉक्टरावर होत असलेल्या हल्ल्यांच्या संदर्भात राज्यभरातील निवासी डॉक्टरांचा संप सुरु आहे. राज्यभरातील रेसिडेंट डॉक्टरांवर चौफेर हल्ले होत असून...
  March 23, 10:52 AM
 • अकाेला: अशाेक वाटिका चाैकातील अवैध बांधकामावर पडला महापािलकेचा हाताेडा
  अकाेला - अशाेक वाटिका चाैकातील गणपती प्लाझाचे अनधिकृत बांधकाम महािलकेने बुधवारी पाडले. याप्रकरणी महापािलकेने किशाेर विश्वनाथ बाछुका पंकज वसंतकुमार बाछुका यांना मार्च २०१४मध्ये नाेटीस बजावली हाेती. मात्र ठाेस कारवाईसाठी २०१७ साल उजाडले. काही महिन्यांपूर्वी अकाेल्यातील एकूण १८६ इमारतींना अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी नोटीस बजावण्यात आल्या होत्या. त्यानंतर महापािलकेने अनेक अवैध इमारतींवर कारवाई केली होती. त्यानंतर इमारतींचे बांधकाम थांबले होते. दरम्यान, काही दिवसांपासून...
  March 23, 10:43 AM
 • बुलडाणा: घड्याळाच्या काट्यावर कमळाचा कारभार, दोन्हीही पदे घाटाखाली
  बुलडाणा- जिल्हापरिषदेच्या एकविसाव्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी भाजपचे सुत जुळले असून, काँग्रेसमधून आलेल्या उमाताई तायडे यांना जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी भाजपाने दिली आहे. तर राष्ट्रवादीच्या मंगला रायपुरे या उपाध्यक्षपदी निवडून आल्या आहेत. त्यामुळे आता जिल्हा परिषदेत घडयाळाच्या काटयावर कमळाचा कारभार चालणार अाहे. विशेष म्हणजे ही दोन्ही पदे म्हणजे घाटाखाली आणि एका मलकापूर तालुक्याला मिळाली आहेत. जिल्हा परिषदेच्या शिवाजी सभागृहात अध्यक्ष उपाध्यक्षपदाची...
  March 22, 11:39 AM
 • देऊळगावराजा: टॅक्सीवर ट्रेलर आदळून 1 ठार, 4 जण जखमी
  देऊळगावराजा- दुचाकीस धक्का लागल्याने एका व्यक्तीने ट्रेलरचालकास बाहेर ओढल्याने मालवाहू ट्रक काळी पिवळी टॅक्सीवर आदळल्याने अपघात घडला. २० मार्च रोजी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास देऊळगावराजा बसस्थानकासमोरील अजिंठा गेस्ट हाऊससमोर घडली. या अपघातात 1 जण ठार झाला असून 4 जण जखमी झाले आहेत. शहरातून जड वाहनाची वाहतूक होत असल्याने बसस्थानकासमोर वाहतूक ठप्प झाली. दरम्यान, एमएच २६ एडी ६५८२ या मालवाहू ट्रेलरचा एका दुचाकीस धक्का लागला. यामुळे नागरिकांनी गर्दी होताच परमेश्वर नावाच्या...
  March 21, 10:28 AM
 • वाणिज्य संकुलला भीषण अाग, लाखाे रुपयांची हानी; अनर्थ टळला
  अकाेला- गांधीराेडवरील श्री उत्सव संकुल या वाणिज्य इमारतीला अाग लागल्याची घटना साेमवारी सकाळी घडली. अागीत संसारपयाेगी साहित्यासह तयार कपडे भस्मसात झाले. सुमारे सात तासानंतर अाग विझवण्यात महापालिकेच्या अग्निशमन विभागाला यश अाले. अागीत झी महासेल संपूर्ण खाक झाला. ही अाग संकुलमधील एका हाॅटेलपर्यंतही पाेहाेचली हाेती. मात्र सुदैवाने अागीत जीवित हानी झाली नाही. या अागीत लाखाे रुपयांचे सािहत्य खाक झाले. गांधी राेडवर चार मजली उत्सव संकुल असून, यामध्ये माेबाईल फाेन, ज्वेलर्स, कपड्यांसह...
  March 21, 09:38 AM
 • बुलडाणा: रेल्वेत कटलरी विकणारा दृष्टिहीन अनिस झाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू
  बुलडाणा- गरीब परिस्थितीशी दोन हात करत केवळ जिद्द, चिकाटी परिश्रमाच्या जोरावर रेल्वेमध्ये कटलरीचे साहित्य विकणारा देऊळघाट येथील फलंदाज अनिस बेग हा आंतरराष्ट्रीय दृष्टिहीन क्रिकेटपटू बनला आहे. एवढेच नव्हे तर फेब्रुवारी महिन्यात पार पडलेल्या दृष्टिहीनांच्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानला हरवून विश्वविजेत्या संघात अनिसचा सहभाग होता. अनिस फखरुल्लाह बेग मूळ देऊळघाट येथील आहे. एका गरीब कुटुंबात जन्मलेला अनिस जन्मजात दृष्टिहीन आहे. लहानपणापासूनच त्याला क्रिकेट खेळण्याचा छंद होता....
  March 20, 11:19 AM
 • पाय घसरून पडल्याने आलेले अपंगत्व आयुर्विम्यासाठी पात्र
  अकोला -पाय घसरून पडल्याने आलेले अपंगत्वदेखील आयुर्विम्याचे कवच प्राप्त करून घेण्यास पात्र असल्याचा ऐतिहासिक निकाल येथील ग्राहक मंचाने दिला. यामुळ पातूर येथील सुनील खोडे यांना पॉलिसीच्या ७५ टक्के रक्कम मिळणार अाहे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंचाच्या अध्यक्ष एस. एम. उंटवाले व सदस्य भारती केतकर यांच्या द्विसदस्यीय पीठाने अलीकडेच हा निवाडा घोषित केला. अपघातानंतर सुमारे सव्वापाच वर्षांनी दाखल केल्या गेलेल्या या दाव्याचा निकाल अवघ्या सहा महिन्यांत देण्यात आला हे विशेष. नगर...
  March 20, 03:26 AM
 
जाहिरात
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
जाहिरात
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 

हास्ययात्रा