Home >> Maharashtra >> North Maharashtra >> Jalgaon

Jalgaon News

 • वामनरावांसारखे अायुष्य जगले तर ‘एटीं’ना मंत्रिपद मिळू शकते; खडसेंनी घेतली फिरकी
  जळगाव- मनपाचे विराेधीपक्ष नेते वामनराव खडके शब्दाचे पक्के अाहे. निस्वार्थ वृत्तीमुळेच त्यांचे राजकीय अाणि सामाजिक जीवन यशस्वी झाले अाहे. वामनरावांसारखे राजकीय अायुष्य जगले तर खासदार ए. टी. पाटील यांना दिल्लीत मंत्रीपद मिळू शकते, अशा शब्दात माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी खासदार ए. टी. पाटलांची फिरकी घेतली. तसेच वामनरावांना भलेही राज्यपाल करू नका, प्रमाेशन देऊ नका; परंतु, त्यांचा अडवाणी तरी करू नका, अशी विनंती डाॅ. उल्हास पाटील यांना अापल्याकडे केल्याचे खडसे यांनी जाहीरपणे सांगितले....
  August 21, 10:07 AM
 • भुसावळच्या मुलांनी चीनला पाजले तापीचे पाणी, आंतरराष्ट्रीय रोबो वॉर स्पर्धेत भारताचा डंका
  भुसावळ- भुसावळातील संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टीम ब्लँका बोट्सने चीनमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय रोबो वॉर स्पर्धेत भारताचा डंका वाजवला. चीनमधील ग्वॉँझाऊ येथे १९ आणि २० ऑगस्टला झालेल्या पाचपैकी चार सामन्यांमध्ये टीम ब्लँका बोट्सने विजय मिळवला. चारपैकी तीन सामन्यात त्यांनी चीन, तर अंतिम सामन्यात न्यूझीलंडला तापीचे पाणी पाजले. डाेकलाम प्रश्नावरून भारत-चीनमध्ये वाद सुरू असताना राेबाे वाॅरमध्ये भारताने विजय मिळवल्याने विद्यार्थ्यांचा अानंद द्विगुणीत झाला....
  August 21, 09:53 AM
 • ‘वंदे मातरम’चा अपमान; 20 पैकी 15 संचालक शिक्षक, तरीही राष्ट्रगान म्हटले चुकीचे
  जळगाव- एकीकडे देशभरात वंदे मातरमच्या मुद्द्यावरून राष्ट्रभिमान जागवण्याचा प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे रविवारी ग.स.च्या वार्षिक सभेत वंदे मातरमचा अपमान केल्याचा गंभीर प्रकार घडला. विरोधकांना बाेलू देण्याच्या प्रयत्नात सत्ताधारी सहकार गटाकडून हे कृत्य करण्यात अाल्याचा अाराेप सभासदांनी केला. संस्थेच्या संचालक मंडळात २० पैकी १५ संचालक शिक्षक असतानाही वंदे मातरम अपूर्ण चुकीचे म्हणण्यात अाले. सभेत राष्ट्रभक्ती जागवत चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची शपथ घेणाऱ्या संचालकांकडून...
  August 21, 09:50 AM
 • खान्देशात पावसाची दमदार हजेरी; खरिपाला जीवदान, रब्बीस फायदा
  जळगाव, धुळे, पुणे- सुमारे दीड महिन्याहून अधिक काळ दडी मारलेला पाऊस महाराष्ट्रात परतला असून दोन दिवसांत राज्यातील बहुतांश भागांत चांगला पाऊस झाला. विशेषत: खान्देश, विदर्भ अाणि मराठवाड्यात रविवारी चालू हंगामातील चांगला पाऊस झाल्याने अनेक भागांत पिकांना आधार झाला आहे. जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यांतील बहुतांश तालुक्यांत रविवारी चांगला पाऊस झाला. जळगाव जिल्ह्यातही रविवारी सर्वत्र पाऊस पाऊस झाला. जळगाव शहरात दुपारी चार वाजेच्या सुमारास तासभर मुसळधार पाऊस झाला. यामुळे सखल भागात पाणी...
  August 21, 09:38 AM
 • दुष्काळ जाहीर करण्यासाठी प्रशासनाकडे लावला रेटा, काँग्रेसचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
  धुळे- पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांना दुबार आणि तिबार पेरण्यांना सामोरे जावे लागले. त्यामुळे शेतकरी संकटात सापडल्याने शासनाने तातडीने धुळे तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिवाजी दहिते, आमदार कुणाल पाटील, समाजकल्याण सभापती मधुकर गर्दे, तालुकाध्यक्ष भगवान पाटील, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन लहू पाटील, डॉ. दरबारसिंग गिरासे, दूध संघाचे चेअरमन वसंत पाटील,...
  August 20, 11:19 AM
 • पैसे लुटणाऱ्या दोघांना अवघ्या तीन तासांतच अटक
  जळगाव- रेल्वेस्थानक परिसरात पादचाऱ्याला मारहाण करूण सात हजार रूपये लुटल्याची घटना शुक्रवारी रात्री १० वाजता घडली. शहर पोलिसांनी लुटमार करणाऱ्या दोन्ही भामट्यांनी तीन तासात अटक केली. सुभाष सुकदेव पाटील (रा.निवृत्तीनगर) हे शुक्रवारी रात्री १० वाजता रेल्वेस्थानक परिसरात कामानिमित्त आले होते. या वेळी दुचाकीने अालेल्या दोघांनी पाटील यांच्याजवळ येत त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांच्या खिशातील सात हजार रूपये काढून घेत दुचाकीवरून पोबारा केला होता. या घटनेमुळे...
  August 20, 11:12 AM
 • भरदिवसा गाय चोरी करून कसायाला विकली, सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरी उघड
  जळगाव- जिल्हापेठ परिसरातील लेवा भवनाच्या आवारातील दावणीला बांधलेली गाय चोरून नेत काट्याफाइल भागात एका कासायाकडे विक्री केल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला. नगरसेवक विष्णू भंगाळे यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून चोरट्याची ओळख पटवली. शनिवारी चोरटा त्याच्या साथीदारांना जिल्हापेठ पोलिसांनी ताब्यात घेतले होते. हा चाेरटा कोंडवाड्यात काम करणारा कर्मचारी आहे. रस्त्यांवर मोकाट फिरणाऱ्या जनावरांना कोंडवाड्यात ठेऊन नंतर संबधित मालकाकडून दंड वसूल करण्यात येताे. मात्र, दावणीला...
  August 20, 11:07 AM
 • दोन कारचे दरवाजे उघडून बॅगा लंपास, नवीपेठेत पंधरा मिनिटांत 27 हजार पळवले
  जळगाव- शहर पोलिस ठाण्यापासून अवघ्या ५० मीटर अंतरावर उभ्या असलेल्या दोन चारचाकींचे दरवाजे उघडून चोरट्यांनी दोन बॅगा लंपास केल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी १.१५ वाजता घडली. या दोन्ही बॅगांमध्ये २७ हजार रुपयांचा मुद्देमाल होता. नवीपेठेतील प्रभात सोडा या दुकानाच्या समोर या चारचाकी उभ्या होत्या. यातील एक बॅग रात्री वाजता मुक्ताईनगर तालुक्यात सापडली. उज्ज्वलकुमार नामदेव बोरसे (वय ३२, रा. शांतीनगर भागातील पुखराज पार्क, भुसावळ) हे व्यवसायाने ठेकेदार आहेत. जळगावातील विजया बँकेत काम...
  August 20, 10:59 AM
 • धुळे: पत्नीचा छळाला कंटाळून पतीची आत्महत्या, मृत्यूपूर्वी लिहिली चिठ्ठी
  कापडणे- पत्नीच्या छळाला कंटाळून पतीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी घडली. ज्ञानेश्वर उर्फ मयूर अशोक बडगुजर (वय २८) असे आत्महत्या करणाऱ्याचे नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी ज्ञानेश्वरने चिठ्ठी लिहून ठेवली आहे. त्यात त्याने पत्नीसह सासरे अाजल सासऱ्यांच्या धमकीला कंटाळून अात्महत्या करत असल्याचे म्हटले अाहे. याप्रकरणी सोनगीर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली. येथील कॉलनी परिसरात ज्ञानेश्वर उर्फ मयूर बडगुजर हा अाई-वडील लहान...
  August 19, 12:10 PM
 • गरम दुधाच्या पातेल्यात पडल्याने अडीच वर्षीय चिमुकलीचा मृत्यू, धुळे येथील घटना
  धुळे- खेळतानागरम दुधाच्या पातेल्यात पडल्याने अडीच वर्षीय बालिकेचा मृत्यू झाला. ही घटना वाघाडी प्र.डांगरी येथे घडली. अडीच वर्षे वयाची भूमिका जगदीश पाटील खेळत असताना ती घरातील गरम दुधाच्या पातेल्यात पडली. ही घटना गेल्या शनिवारी (दि. १२) राेजी सायंकाळी साडेपाच वाजता घडली. त्यात ती ४० टक्के भाजली. तिला उपचारासाठी हिरे मेडिकल काॅलेजमध्ये दाखल करण्यात अाले. तेथे उपचार सुरू असताना तिचे निधन झाले. डाॅ. याेगेश वाणी यांनी तपासणी करून तिला मृत घाेषित केले. याबाबत जगदीश सीताराम पाटील यांनी...
  August 19, 11:47 AM
 • रिक्षातून अपहरण करून आयटीआय विद्यार्थ्याला तिघांची बेदम मारहाण
  जळगाव- जळगाव तालुक्यातील सावखेडा येथील आयटीआयच्या विद्यार्थ्याचे आकाशवाणी चौकातील पतंजली स्टोअर्सजवळून तोंडाला रुमाल बांधलेल्या तीन युवकांनी रिक्षात अपहरण केले. त्याच्या डोळ्यावर काळी पट्टी बांधून त्यांनी विद्यार्थ्याला रिक्षात फिरवले. त्यानंतर शेवटी त्याच्या खिशातील मोबाईल १८० रूपये काढून पांडे डेअरी चौकात रिक्षातून ढकलून दिल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी दुपारी १.३० वाजता घडला. सावखेडा येथील विवेक राजेंद्र पाटील या विद्यार्थ्याने जळगाव येथील आयटीआयमध्ये प्रवेश घेतला...
  August 19, 11:40 AM
 • 350 रुपयांमध्ये कार, 600 मध्ये फ्लॅट; गुजरातच्या मार्केटिंगचा फंडा, जळगावकरांना कोटींचा गंडा
  जळगाव- फ्लॅट, महागड्या चारचाकी गाड्या, दुचाकींसह सुमारे २८० वस्तू हमखास देणारी योजना राबवणाऱ्या गुजरातमधील गायत्री मार्केटिंग कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांचा गंडा घालून शहरातून गाशा गुंडाळला आहे. गायत्री मार्केटिंगच्या एका एजंटानेच दिलेल्या तक्रारीमुळे हा नवा घोटाळा शुक्रवारी चव्हाट्यावर आला. गायत्री मार्केटिंगच्या मायाजालमध्ये शहरातील सुमारे शंभरावर ग्राहक अडकले आहेत आणि एकट्या जळगाव जिल्ह्यात त्यांच्या ग्राहकांची संख्या शेकडोवर आहे. कंपनीच्या ब्रोशरवर १०...
  August 19, 11:35 AM
 • जळगावात खेडीजवळ भरधाव वाळूच्या डंपरची ट्रकला धडक, दोन गंभीर जखमी
  जळगाव- भरधाव वाळूच्या डंपरने भुसावळकडून जळगावकडे येत असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिल्याने अपघात झाला.खेडीजवळ हा भीषण अपघात झाला. या अपघातात ट्रकचालकासह डम्परमधील एक जण गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर महामार्गावर सव्वा तास वाहतुकीचा खोळंबा झाला होता. भुसावळकडून सी.जे.१४ डी. ०५३५ या क्रमांकाचा ट्रक जळगावकडे येत असताना सकाळी ७ वाजेच्या सुमारास भुसावळकडे जात असलेल्या सी.जे.०५ ए.व्ही.५५२३ या क्रमांकाच्या भरधाव डंपरने समोरून धडक दिली. या अपघातात ट्रकच्या समोरील काचा फुटून कॅबीनचे मोठ्या...
  August 18, 05:33 PM
 • मुंबई/चोपडा- जळगाव जिल्ह्यातील निमगव्हाण या गावात तापी नदीकिनाऱ्यावर राहणाऱ्या एका माकडाचा एका अपघातात मृत्यू झाला. पूर्ण गावाने एकत्र येत माकडावर अंत्यसंस्कार केले. इतकेच नाही दशक्रिया विधीसाठी संपूर्ण गावाने एकत्र येत भोजन दिले. 200 गावकऱ्यांनी मुंडण केले. पूर्ण गाव झाले सामिल - दोन महिन्यापूर्वी एक माकड तापी नदीच्या किनाऱ्यावर येऊन राहू लागले होते. - लहान मुले आणि गावकरी या माकडाला रोज काहीतरी खाण्यास देत होते. हे माकडही चांगलेच माणसाळले होते. - 2 ऑगस्ट रोजी एका अपघातात या माकडाचा...
  August 18, 04:09 PM
 • शहरात स्वाइन फ्लूसदृश अाजाराची लक्षणे असलेल्या रुग्णसंख्येत वाढ
  जळगाव- वातावरणातीलबदल संसर्गजन्य अाजारांच्या संख्येत वाढ हाेत असताना गेल्या महिनाभरात स्वाइन फ्लू सदृश अाजाराची लक्षणे असलेल्या रुग्णांचे प्रमाणदेखील वाढत अाहे. दाेन- तीन दिवसांच्या तापानंतर अचानक श्वसनाचा त्रास वाढलेल्या रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू अाहेत. खबरदारी म्हणून अाैरंगाबाद येथील घाटी तर मुंबईला उपचारासाठी पाठवले जात अाहे. तर जिल्हा रुग्णालयात अालबेल असून एकही संशयित रुग्ण दाखल नसल्याचे शासकीय उत्तर मिळत अाहे. वातावरणातील बदल, पावसाची उघडीपमुळे सर्दी, ताप,...
  August 18, 11:08 AM
 • महिलांनी युवकास डांबून मागितली दीड लाखांची मागणी, तिन महिला पोलिसांच्या अटकेत
  जळगाव- जळगावात ट्रॅक्टरचे साहित्य घेण्यासाठी आलेल्या नावरे (ता.यावल) येथील युवकास एका महिलेसह दोन मुलींनी घरात डांबून ठेवले. त्यानंतर चार ते पाच युवकांनी मारहाण करीत त्याचे फोटो काढले. त्याच्याकडे दीड लाख रुपयांची मागणी केली. त्याच्या खिशातील दोन हजार रुपये काढून घेतले. अखेर युवकाने त्यांच्या तावडीतून सुटका करून घेत पळ काढला. याप्रकरणी तीन महिलांसह सहा जणांना अटक करण्यात आली आहे. नावरे येथील नीलेश बापू पाटील (वय २७) हा युवक बुधवारी ट्रॅक्टरचे साहित्य घेण्यासाठी जळगाव येथे आला होता....
  August 18, 10:52 AM
 • अारटीअाे पाठलाग करीत असताना अपघात, भरधाव ट्रकने दाेघांना चिरडले
  पाचोरा- जळगाव येथील आरटीओ पथक ट्रकचा पाठलाग करत असल्याने शहराकडे येणाऱ्या भरधाव ट्रकने दोन दुचाकींवरील दोघांना चिरडले. त्यानंतर हा ट्रक नजीकच्या हॉटेलात शिरल्याने वडापाव विक्रेते वृद्ध दाम्पत्य जखमी झाले.ही घटना गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास पाचाेरा शहराबाहेरून जाणाऱ्या मुंबई-नागपूर महामार्गावरील जारगाव चौफुलीवर घडली. पाचोऱ्याकडे तुरीची डाळ घेऊन एक ट्रक (एमएच ०४ बीके २०४७) येत हाेता. या ट्रकने दाेन दुचाकींना (एमएच १९ बीके ५७८८ एमएच १९ बीएन ३६७) धडक दिली. यात दुचाकीवरील...
  August 18, 10:43 AM
 • झोक्याच्या दोरीचा गळफास लागून दोन वर्षीय बालकाचा मृत्यू
  पाचोरा- येथील कृष्णापुरी भागातील दाेन वर्षीय बालकाचा झोक्याच्या दोरीचा गळफास लागून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. सोमानंद मराठे हा बालक झोक्यात झोपला होता. त्याची आई समोरच्या नळावर पाणी भरण्यासाठी गेली होती. अाई बाहेर गेल्यावर ताे झोपेतून जागा झाला आणि त्याने झोळीबाहेर येण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यास झोक्याच्या दोरीचा गळफास लागून मृत्यू झाला. त्याची आई पाणी घेऊन आली असता बाळ झोक्याच्या दोरीला लटकलेले दिसले. त्यानंतर तिने हंबरडा फाेडला.
  August 18, 10:39 AM
 • जिंतूरच्या युवतीची देहव्यापारातून सुटका, कारवाईने खळबळ
  भुसावळ- परभणी जिल्ह्यातील १८ वर्षीय युवतीला शहरातील वैतागवाडी भागात बळजबरीने अनैतिक देहव्यापारास भाग पाडणाऱ्या घर मालकीणीविरुद्ध सोमवारी रात्री बाजारपेठ पाेलिस ठाण्यात स्त्रिया मुलींचा अनैतिक देहव्यापार प्रतिबंधक अधिनियम (पीटा अॅक्ट)नुसार गुन्हा दाखल झाला. पीडित मुलीस जळगाव अाशादीप महिला सुधारगृहात रवाना केले. वैतागवाडीत तीन महिन्यांपूर्वी कारवाई झाली होती. या भागात पुन्हा देहव्यापार बोकाळला आहे. येथे एका १८ वर्षीय मुलीस बळजबरीने वेश्या व्यवसायात ढकलल्याची माहिती जळगाव...
  August 17, 09:46 AM
 • चाकूचा धाक दाखवून युवकाचे 10 हजार लुटले; एकास अटक
  जळगाव- एमआयडीसीतील एन सेक्टरमधील भारत पेट्रोलियम कंपनीजवळील दोन भामट्यांनी चाकूचा धाक दाखवून युवकाजवळील १० हजार ५०० रुपयांचा ऐवज लुटून नेल्याची घटना १४ ऑगस्ट रोजी रात्री १२.३० वाजता घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी १५ ऑगस्ट रोजी एका भामट्याला अटक केली. म्हाडा कॉलनीतील रहिवासी विलास गिरधर पाटील हे एमआयडीसीतील भारत पेट्रोलियम कंपनीकडून जात असताना मोटारसायकलवर आलेल्या दोन भामट्यांनी त्यांना आडवले. त्यानंतर मारहाण केली. तसेच चाकूचा धाक...
  August 17, 09:43 AM
 
जाहिरात
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
जाहिरात
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 

हास्ययात्रा