Home >> Maharashtra >> Marathwada

Marathwada News

 • राज्यातील 114 ग्रामपंचायतीसाठी 23 सप्टेंबरला मतदान; आचारसंहिता लागू
  औरंगाबाद/मुंबई- राज्यात विविध जिल्ह्यातील ऑक्टोबर 2017 मध्ये मुदत संपणाऱ्या आणि नव्याने अस्तित्वात आलेल्या 114 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 23 सप्टेंबर 2017 रोजी मतदान होणार आहे. जालना जिल्ह्यातील सर्वाधिक 40 ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे. त्या खालोखाल नाशिक जिल्ह्यातील 22 ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी याबाबत घोषणा केली. निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेल्या ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे. या...
  55 mins ago
 • जायकवाडी धरणाची पाणी पातळी 60.16 टक्क्यांवर; 48 तासात 10 टक्के पाण्याची भर
  औरंगाबाद- जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही जोरदार पाऊस झाल्याने धरणात पाण्याची आवक वाढली आहे. धरणाची पाणी पातळी 60.16 टक्क्यांवर पोहोचली आहे. यासोबतच धरणाच्या वरील प्रदेशातून 26,666 क्युसेक या क्षमतेने पाण्याची आवक सुरु आहे. मागील 48 तासात 10 टक्के पाण्याची भर पडल्याने धरण साठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. आवक अशीच राहिली तर धरण पूर्ण क्षमतेने भरेल, असे सांगण्यात येत आहे. दोन ते अडीच महिन्याच्या खंडानंतर मराठवाड्यात पावसाचे जोरदार आगमन झाले आहे. तसेच धरणाच्या वरील भागातूनही...
  04:54 PM
 • #NoFakeNews: औरंगाबादेत पैश्यांचा पाऊस, जाणून घ्या बातमीपलिकडचे सत्य!
  औरंगाबाद - शहरातील चिकलठाणा परिसरात कथित 2000 आणि 500 च्या नवीन नोटांचा ढीग सापडला अशा प्रकारचे मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यापैकी काहींनी ह्या नोटा खऱ्या असल्याचा दावा केला. तर, काहींनी त्या बनावट असून कुणीतरी छापून फेकून दिल्या असा दावा केला. मात्र, या मागचे सत्य DivyaMarathi.com आपल्यासमोर आणत आहे. व्हायरल होणाऱ्या बातम्यांमध्ये काय? - फेसबूक आणि ट्वीटरसह अनेक माध्यमांमध्ये सुद्धा औरंगाबादच्या नोटांच्या पावसाची बातमी पसरली. त्यानुसार, चिकलठाण परिसरात नोटांचा ढीग सापडला. हे...
  12:19 PM
 • आता औरंगाबादमध्येही 3 नवजात बालकांचा मृत्यू; 9 तासांनी सांगितले हे कारण
  औरंगाबाद- घाटीतील प्रसूती विभागात रविवारी रात्री प्रसूत झालेल्या तीन बाळांचा जन्मताच मृत्यू झाला. या तिन्ही तान्हुल्यांंवर बेगमपुरा स्मशानभूमीत सोमवारी सकाळी सहा वाजता एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. ही विदारक घटना पाहून रोज सरणाची व्यवस्था करणाऱ्या स्मशानजोगीच्याही डोळ्यात पाणी आले. यातील दोन मातांची प्रकृती आता सुधारली असून एक अजूनही गंभीर आहे. रविवारी मृत्युमुखी पडलेल्या तीन बालकांत दोन मुली आणि एका मुलाचा समावेश आहे. माया मुकेश मगरे (३०, रा. ब्रिजवाडी), पूजा पांडुरंग बखले...
  11:40 AM
 • एक दिवसाच्या पावसाची कहाणी: दुष्काळ गेला वाहून, 878 कोटींच्या नुकसानीचे काय‌?
  उस्मानाबाद- एक दिवसांच्या पावसामुळे दुष्काळाचे रूपांतर वरवर सुकाळामध्ये झाले असले तरी या पावसाला मोठा विलंब झाला आहे. अगोदरच सरासरी ७० टक्के म्हणजेच तीन लाख ५१ हजार २६६ हेक्टरवरील पिकांचा पाचोळा झाला. यामध्ये जिल्ह्यातील शेतकरी ८७८ कोटी १६ लाख ५० हजार रुपये गमावून बसला आहे. गेल्या ६० दिवसांत पाऊस पडला नसल्यामुळे दिव्य मराठीने शेतकऱ्यांच्या व्यथा, प्रशासनाचा कुचकामीपणा चव्हाट्यावर आणला. तेव्हा जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी गेल्या आठवड्यात पथके तयार करून पिकांची पाहणी...
  11:20 AM
 • औरंगाबाद - रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे कन्नड घाटातील रस्ता खचल्याने तसेच दरड काेसळल्याने दुरुस्तीसाठी दीड ते दोन महिन्यांचा कालावधी लागेल. ताेपर्यंत घाटातून वाहतूक बंद असेल. अाैरंगाबादहून येणारी व जाणारी वाहने राेहिणी, न्यायडाेंगरी, शिऊर बंगलामार्गे वळवण्यात अाल्याने या रस्त्यावर पहिल्याच दिवशी वाहतूक ठप्प झाली. घाट दुरुस्तीच्या कामाचे तीन प्रस्ताव तातडीने केंद्रीय दळणवळण मंत्रालयाकडे पाठवण्यात अाले. दरम्यान, वन विभागाची मंजुरी व इतर प्रलंबित प्रक्रिया पाहता...
  11:05 AM
 • अनेक नगरसेवकांनी केला राडा, तक्रार मात्र दोघांच्याच विरोधात; इतरांचे काय...?
  औरंगाबाद- शनिवारी झालेल्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत एमआयएम नगरसेवकांसह शिवसेना भाजपच्या नगरसेवकांनीही मोडतोड केली होती. मात्र सोमवारी तक्रार फक्त एमआयएम नगरसेवक सय्यद मतीन शेख जफर या दोघांच्याच विरोधात देण्यात आली. महापौरांनी दिलेल्या पत्रात फक्त दोघांचीच नावे असल्याने दोघांच्याच विरोधात तक्रार देण्यात आल्याचे आयुक्त दीपक मुगळीकर यांनी सांगितले. महापौरांनी सूचना केली तर इतर नगरसेवकांच्या विरोधातही तक्रार दिली जाऊ शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले. सर्वसाधारण सभेत वंदे...
  08:41 AM
 • 17 नोव्हेंबरपर्यंत हटवणार ब वर्गातील धार्मिक स्थळे
  औरंगाबाद- अनधिकृत धार्मिक स्थळांच्या नियमितीकरणाबाबत नव्याने एक हजारावर आक्षेप आलेले आहेत. सुनावणीला जास्त कालावधी लागणार असल्याने ऑक्टोबरपर्यंत आक्षेपांवर सुनावणी घेणे, त्यानंतर २४ ऑक्टोबरला अ, वर्ग धार्मिक स्थळांची अंतिम यादी प्रसिद्ध करणे आणि त्यानंतर ब वर्गातील अतिक्रमित धार्मिक स्थळे १७ नोव्हेंबरपर्यंत हटवणे, असा नवा आराखडा (कॅलेंडर ऑफ ऑपरेशन) धार्मिक स्थळ नियमितीकरण समितीने सोमवारी तयार केला. या समितीची बैठक समिती अध्यक्ष तथा मनपा आयुक्त दीपक मुगळीकर यांच्या उपस्थितीत...
  08:39 AM
 • ढिनचॅक पूजा सारखे लोक अशी करतात लाखोंची कमाई, असे होतात फेमस...
  नवी दिल्ली - ढिनचॅक पूजाने युट्यूबवर आपल्या अजब गाण्यांचे व्हिडिओज टाकून अगदी कमी वेळातच देशभर प्रसिद्धी मिळवली आहे. गाणे कसेही असो... इंटरनेट वापरणारे अगदी कमीच लोक असतील ज्यांना ढिनचॅक पूजा हे नाव माहिती नाही. तिने केवळ नावच नाही, तर पैसाही खूप कमवला आहे. युट्यूबवर ढिनचॅक पूजाचे 2.5 लाख सबस्क्राइबर्स आहेत. विशेष म्हणजे, बेसुरेल आवाज असल्याची टीका करणारे सुद्धा तिचे गाणे पाहतातच... त्यामुळेच, तिच्या प्रत्येक गाण्याला 10 लाखांहून अधिक व्यूज आहेत. देशभर तूफान गाजलेल्या सेल्फी मैने लेली आज...
  08:27 AM
 • आधीच निर्जळी, त्यात नवे संकट: विजेची तार तुटताच दाबाच्या झटक्याने फुटली जलवाहिनी
  औरंगाबाद- शनिवारपासून जायकवाडी पंपहाऊसमध्ये विजेचा लपंडाव सुरू असल्याने शहरातील अनेक भागांत पाणी आले नाही. रविवारी सायंकाळी चारनंतर पाणीपुरवठा सुरळीत होताच रात्री दहा वाजता फारोळ्यात विद्युत खांबावरील तार तुटल्याने झटक्याने पुरवठा खंडित झाला. पाण्याचा दाबही वाढला. त्यामुळे पैठण रोडवरील अजित सीड्ससमोर १२०० व्यासाची जलवाहिनी एक मीटर लांबपर्यंत फुटल्याने मंगळवारी शहरात पाणी येणार नाही. जायकवाडीपासून शहरापर्यंत पाणीपुरवठा करण्यासाठी टाकलेली जलवाहिनी ४० आणि २६ वर्षांपेक्षा...
  08:17 AM
 • मराठवाडा: 14 तालुक्यांत ‘छप्पर फाडके’ पाऊस, अवघ्या 2 दिवसांत वार्षिक सरासरीशी बरोबरी
  औरंगाबाद - एक महिन्याच्या दीर्घ विश्रांतीनंतर प्रसन्न झालेल्या वरुणराजाने मराठवाड्यातील १४ तालुक्यांत धो-धो बरसात करून आजपर्यंतच्या वार्षिक सरासरीची बरोबरी अवघ्या दोन दिवसांत केली. दोन दिवसांपासून मराठवाड्यात मुक्कामाला असलेला पाऊस पोळ्याला भोळा झाला. दरम्यान, या पावसाने पिण्याच्या पाण्याची टंचाई काही प्रमाणात दूर झाली आहे. ६३ मंडळांत झाली अतिवृष्टी : मराठवाड्यात ६३ मंडळात अतिवृष्टी झाली आहे. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या ६५ पैकी१४, जालना ४९ पैकी २४, परभणी ३९ पैकी ०७, हिंगोली...
  07:20 AM
 • 4 बहिणींचा एकुलता भाऊ हॉस्टेलवरून घरी आला होता, भिंत कोसळून असा झाला मृत्यू...
  वाळूज- घराच्या वरच्या मजल्यावरील खोलीत बांधलेल्या साडीच्या झोळीत बसून झोके खेळणाऱ्या बहीण-भावाच्या अंगावर भिंत कोसळली. त्याखाली दबून मुंजाजी सुरेश गाडगीळ (१२) रमा गाडगीळ (६) या बहिण भावाचा जागीच मृत्यू झाला. याच घटनेत सरगम गाडगीळ (१०) ही किरकोळ जखमी झाली. चौघा बहिणींमध्ये एकुलता एक असणारा मुंजाजी शनिवारी होस्टेलहून घरी परतला होता आणि दुसऱ्याच दिवशी हा प्रकार घडला. दत्तनगरात शब्बीर पठाण यांच्या मालकीची जुनी दोनमजली इमारत आहे. खालच्या मजल्यावरील खोलीत सुरेश गाडगीळ (३९) हे मागील चार...
  06:38 AM
 • घरी कुणी नसल्यामुळे केली ओली पार्टी; त्यानंतर पैशाच्या वादातून केला मित्राचा खून
  हिंगोली- नशेच्या आहारी गेलेल्या दोन मित्रांमध्ये पैसे देण्या-घेण्याच्या कारणावरून वाद झाल्यानंतर एकाने मित्राचा खून केल्याची घटना घडली आहे. घरी कुणी नसल्यामुळे या दोघांनी ओली पार्टी केली होती. यावेळी एकाने आपल्या मित्राच्या पायावर लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. यात अतिरक्तस्त्राव झाल्याने मित्राचा जागीच मृत्यू झाला. ही घटना औंढा नागनाथ तालुक्यातील सिद्धेश्वर येथे घडली. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. औंढा नागनाथ तालुक्यातील सिद्धेश्वर श्रीराम भगवान पोले (60) हे त्यांच्या...
  06:20 AM
 • EXCLUSIVE: खरिपाचे पीक कर्ज रब्बीला तरी मिळेल का? अवघ्या 916 जणांना 10 हजारांचे वाटप
  उस्मानाबाद - सभासद शेतकऱ्यांना पीककर्जापोटी खरिपाच्या पेरणीसाठी प्रत्येकी १० हजार रुपयांची रक्कम आगाऊ देण्याचे आदेश राज्य शासनाने सर्व बँकांना दिले हाेते. जिल्ह्यातील परिस्थिती पाहता खरिपासाठीचे हे १० हजार रुपयांचे पीककर्ज तोंडावर आलेल्या रब्बी हंगामासाठी तरी पदरात पडणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण आतापर्यंत राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांनी केवळ ९११ शेतकऱ्यांना प्रत्येकी १० हजारांचे कर्ज दिले आहे. शेतकरी आंदोलनाच्या उठावानंतर अगोदर नाही-नाही म्हणणाऱ्या राज्य शासनाने...
  05:41 AM
 • बीड: शनीसह बुध, शुक्र ग्रहांची मंदिरे चौदा तास पुराच्या पाण्यात
  गेवराई- दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या संततधारेमुळे गाेदावरी नदीला पूर आल्याने रविवारी सायंकाळी सहा ते सोमवारी सकाळी आठ अशी चौदा तास शनीसह बुध व शुक्र ग्रहांची मंदिरे पुराच्या पाण्यात होती. सोमवारी पूर ओसरल्यानंतर मंदिरे भाविकांसाठी खुली करण्यात आली. तब्बल दहा वर्षांनंतर या मंदिरांना गोदावरीच्या पाण्याने वेढले. गेवराई तालुक्यात शनिवार, रविवार या दोन दिवशी झालेल्या दमदार पावसाने तालुक्यातील नदीनाले ओसंडून वाहू लागले. तालुक्यातील हिरडपुरी येथील बंधारा वाहू लागल्याने गोदावरी...
  05:37 AM
 • EXCLUSIVE: पोळा सणात बनोटीत वादाच्या खेळाला खो, आता मोकाट सांड गोऱ्ह्याला दिला मान
  बनोटी - सोयगाव तालुक्यातील बनोटी येथे दरवर्षी पोळा सणात मानपानावरून वाद होऊन दोन ते तीन तास पोळा उशिराने फुटण्याच्या परंपरेला यंदा ग्रामस्थांनी वरिष्ठांच्या मदतीने तोडगा शोधत ना तुझा ना माझा करत थेट गावातून एका मोकाट सांड पकडून त्याला सजवून त्याला पहिला मान देण्याचे ठरवल्याने यंदा बनोटीत प्रथमच वादाविना पोळा सण साजरा झाल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. दुपारी ठरलेल्या वेळेत साडेचार वाजता पोळा फुटला. बनोटी येथे दरवर्षी गावातील जावई असलेल्या व्यक्तीच्या बैलास मान देऊन...
  03:33 AM
 • सुनेच्या खात्यावरील रक्कम सासुने उचलली; वडवणीच्या स्टेट बँकेतील प्रकार
  औरंगाबाद/बीड- सुनेच्या नावावर असलेली 4 लाख 36 हजाराची रक्कम सासुने बनावट कागदपत्र तयार करून उचलल्याची घटना वडवणीच्या स्टेट बँकेत घडली आहे. याप्रकरणी सुनेने सासुविरूद्ध वडवणी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. वडवणीच्या भारतीय स्टेट बँकेत 8 ऑगस्ट रोजी विजयमाला दिगंबर गदळे (रा. वडमाऊली दहीफळ ता. केज) या महिलेने सुन कावेरी श्रीकांत गदळे (रा. कुर्ला, मुंबई) हिच्या भारतीय स्टेट बँक वडवणी शाखेतील खात्यातील 1 लाख 12 हजार 663 रूपये व विम्याचे असलेले 1 लाख 23 हजार 482 रूपये असे एकुण 4 लाख 36 हजार 145...
  August 21, 08:58 PM
 • औरंगाबाद/पुणे - मराठवाड्यात 2 दिवसात पावसाने 11 बळी घेतले आहेत. परभणी जिल्ह्यात 4 तर नांदेड जिल्ह्यात 3 तर औरंगाबादमध्ये 2 व बीडमध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. सुमारे दीड महिन्याहून अधिक काळ दडी मारलेला पाऊस महाराष्ट्रात परतला असून दोन दिवसांत राज्यातील बहुतांश भागांत चांगला पाऊस झाला. विशेषत: मराठवाड्यात रविवारी चालू हंगामातील सर्वात मोठा पाऊस झाल्याने अनेक भागांत पिकांना आधार झाला आहे. रविवारी मराठवाड्यात 32 तालुक्यांत अतिवृष्टी झाली. यात नांदेड आणि लातूर जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस झाला....
  August 21, 08:29 PM
 • मालेगाव Chronology: ईदच्या 2 दिवसांपूर्वी झाला होता हल्ला, त्याचवेळी गुजरामध्ये स्फोट
  औरंगाबाद - 29 सप्टेंबर 2008 रोजी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव दुहेरी बॉम्बस्फोटाने हादरले. हा बॉम्बस्फोट रमजान ईदच्या 2 दिवसांपूर्वी घडवण्यात आला होता. बॉम्बस्फोटात 8 जणांचा मृत्यू आणि जवळपास 100 जण जखमी झाल्याची नोंद आहे. ज्या दिवशी मालेगावात बॉम्बस्फोट घडला, त्याच दिवशी आणि त्याच वेळी गुजरातच्या मोडासा येथे सुद्धा बॉम्बस्फोट झाला. त्यामध्ये एका 15 वर्षीय मुलाच्या मृत्यूची नोंद आहे. घटनास्थळी धडकला होता हजारोंचा जमाव - रमजान ईदला अवघे 2 दिवस बाकी असताना मालेगावात दुहेरी स्फोट घडला होता....
  August 21, 03:46 PM
 • बीड- मागील दोन दिवसांपासून बीड जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. जिल्ह्यातील कपीलधार व पाटोदा तालुक्यातील सौताडा येथील रामेश्वर धबधबा ओसंडून वाहु लागले आहेत. पावसाळी पर्यटणांना हे धबधबे खुणावू लागले आहेत. या ठिकाणी पर्यटक गर्दी करू लागले आहेत. दरम्यान, तब्बल दीड महिन्यांच्या दडी मारलेला पाऊस महाराष्ट्रात परतला आहे. राज्याच्या बहुतांश भागात दमदार पाऊस होत आहे. या पावसाने शेतकर्यांना दिलासा तर खरीपाला जीवदान मिळाले आहे. बीड तालुक्यातील कपीलधार हे क्षेत्र विरशैव समाजाचे...
  August 21, 03:45 PM
 
जाहिरात
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
जाहिरात
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 

हास्ययात्रा