Home >> Maharashtra >> Marathwada

Marathwada News

 • तुळजाईनगरीत मातेचा आजपासून उदो-उदो, घटस्थापनेने होणार नवरात्रोत्सवास प्रारंभ
  तुळजापूर -कुलस्वामिनी तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महाेत्सवास शनिवारपासून (दि.१) घटस्थापनेने प्रारंभ होत आहे. तत्पूर्वी शनिवारी पहाटे १ वाजता मंचकी निद्रा संपवून तुळजाभवानी माता सिंहासनावर विराजमान होईल. दरम्यान, तुळजाभवानी देवीच्या सिंहासनावरील प्रतिष्ठापनेसाठी महंत तुकोजीबुवांनी शुक्रवारी परंपरेप्रमाणे मेण तयार करून गाभाऱ्याची स्वच्छता केली. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजाई नगरी गजबजली आहे. तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवास मंदिरात दुपारी घटस्थापनेने...
  12:47 AM
 • औरंगाबादेत दोन ठिकाणी दरोडा; पोलिसांनी तासाभरातच 6 दरोडेखोरांच्या आवळल्या मुसक्या
  खुलताबाद - तालुक्यातील गल्लेबोरगाव येथे दोन ठिकाणी दरोडा टाकून पळून जाणाऱ्या प्रयत्नात असलेल्या सहा दरोडेखोरांच्या खुलताबाद पोलिसांनी नाकेबंदी करून तासाभरातच मुसक्या आवळल्या. ही घटना गुरुवारी रात्री एक ते दोन वाजेदरम्यान घडली असून उपविभागीय पाेलिस अधिकारी नीरज राजगुरू व पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली. दरोड्यानंतर तासाभरातच दरोडेखोर जेरबंद करण्याची जिल्ह्यातील ही पहिलीच घटना असल्याने पोलिस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांनी पोलिस...
  12:31 AM
 • बीड जिल्ह्यात सातवीत शिकणाऱ्या मुलीने छेडछाडीला कंटाळून पेटवून घेतले
  बीड - गावातील तरुणाकडून सतत होणाऱ्या छेडछाडीला कंटाळून सातवीत शिक्षण घेणाऱ्या मुलीने पेटवून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना माजलगाव तालुक्यातील देवखेडा येथे गुरुवारी घडली. सध्या मुलीवर उपचार सुरू असून पोलिसांनी जबाब नोंदवून घेतला अाहे. माजलगाव तालुक्यातील देवखेडा येथे आजीकडे राहणाऱ्या तेरा वर्षांच्या मुलीला गावातीलच विकास साधू शेरकर (३५) हा तरुण मागील काही दिवसांपासून छेड काढून त्रास देत होता. सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून मुलीने गुरुवारी दुपारी पेटवून घेत आत्महत्या...
  12:31 AM
 • PHOTOS : किल्लारी भूकंप, २३ वर्षांनंतरही जखमा अजून ओल्‍या
  लातूर -लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात १९९३ मध्ये झालेल्या प्रलयंकारी भूकंपाला आज २३ वर्षे पूर्ण झाली. आप्तजनांच्या मृत्यूच्या वेदना चिरकाल टिकणाऱ्या असल्या तरी नव्या पिढीने दु:ख बाजूला सारून जगण्याच्या लढाईला नव्याने सुरुवात केली आहे. लातूर जिल्ह्यातल्या किल्लारीत १९९३ मध्ये सप्टेंबर महिन्यात ३० तारखेला प्रलयंकारी भूकंप झाला होता. सरकारी आकड्यांनुसार ७ हजार ९२८ जणांचा त्यात मृत्यू झाला. प्रत्यक्षात अनेकांचे मृतदेह मिळाले नाहीत. त्या घटनेला आता २२ वर्षे झाली. भूकंपाच्या वेळी...
  September 30, 11:46 AM
 • सेना करणार अॅट्राॅसिटीग्रस्तांना मदत; शरद पवार, अशोक चव्हाण यांच्या वक्तव्याचा निषेध
  औरंगाबाद - अॅट्रॉसिटीकायदा रद्द करण्याची गरज नाही, या शरद पवार अशोक चव्हाण या दोन माजी मुख्यमंत्र्यांचा जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी निषेध केला. त्याचबरोबर जिल्ह्यातील अॅट्राॅसिटीचे गुन्हा दाखल असलेल्या प्रत्येकाला न्यायालयीन तसेच अन्य मदत केली जाईल, असेही त्यांनी जाहीर केले. हे काम आपण शिवसेना म्हणून तसेच मराठा म्हणूनही करणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. येत्या काही दिवसांत जिल्हाभर फिरून अॅट्राॅसिटीच्या गुन्ह्यांची नोंद असलेल्या नागरिकांची भेट घेऊन...
  September 30, 08:06 AM
 • औरंगाबाद - युतीतील करारानुसार महापौरपद पुढील एक वर्षासाठी भारतीय जनता पक्षाकडे जाणार आहे. त्यामुळे ३१ ऑक्टोबरला दीड वर्ष पूर्ण होणार असल्याने विद्यमान महापौर त्र्यंबक तुपे व उपमहापौर प्रमोद राठोड यांना राजीनामा द्यावा लागेल. सार्वत्रिक निवडणुकीनंतर सेना भाजपमध्ये पद वाटपात पहिल्या अडीच वर्षांपैकी दीड वर्ष महापौरपद शिवसेनेकडे, तर उपमहापौरपद भाजपकडे राहील, असे ठरले होते. नंतरचे एक वर्ष महापौरपद भाजपकडे जाताना उपमहापौरपद आपोआपच शिवसेनेकडे जाईल. त्यानंतरची अडीच वर्षे हे पद...
  September 30, 08:02 AM
 • बहिणीचा वाढदिवसासाठी कचोरीची ऑर्डर देण्यासाठी घराबाहेर पडलेल्या एकुलत्या एक भावाचा अंत
  औरंगाबाद - मोठ्या बहिणीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तो सकाळी कचोरीची ऑर्डर देण्याकरिता घराबाहेर पडला. खिशातील मोबाइलला हेडफोन कनेक्ट करून तो गाणी ऐकत निघाला. विवेकानंद चौक (सहकार बँक कॉलनी) येथे त्याच्या दुचाकीने मॉर्निंग वॉकला निघालेल्या एका वृद्धाला धडक दिली. वृद्ध खाली पडल्याने त्याने घाबरून दुचाकीला आणखी वेग दिला. वृद्धाला धडक दिल्याने कोणी आपला पाठलाग तर करत नाही, हे पाहण्यासाठी तो मागे वळून पाहू लागला. तेवढ्यात त्याचे हँडलवरील नियंत्रण सुटले आणि मागून येणाऱ्या सागर...
  September 30, 07:52 AM
 • घाटीत ब्रदरला मारहाण; चार तास काम बंद, नंतर संप मागे
  औरंगाबाद - बेड बदलल्याने रुग्ण अत्यवस्थ झाल्याच्या कारणावरून रुग्णाच्या नातेवाइकांनी घाटीतील ब्रदर आशिष मोरे यांना गुरुवारी सकाळी ९.४५ वाजता मारहाण केली. या घटनेचा निषेध नोंदवत शासकीय परिचारिका संघटनेचे ७५० कर्मचारी अवघ्या १५ मिनिटांत संपावर गेले. अधीक्षक आणि सुरक्षा व्यवस्था तत्काळ बदलण्याची मागणी संघटनेने केली आहे. मात्र, रुग्णहित लक्षात घेऊन दुपारी दोन वाजता सर्व कर्मचारी कामावर परतले. घाटीतील ट्रॉमा केअर विभागात साजेदा बेगम इलिया सय्यद (५०) ही महिला रुग्ण २३ सप्टेंबरपासून...
  September 30, 07:40 AM
 • औरंगाबाद विमानतळासाठी २०० कोटी देऊ
  औरंगाबाद - औरंगाबादला आंतराष्ट्रीय विमानतळ करून तेथे जगभराची कनेक्टिव्हिटी जोडण्यात येणार आहे, त्यासाठी राज्य सरकारने दोनशे कोटी मंजूर केले असल्याची माहिती उद्याेगमंत्री सुभाष देसाई यांनी औरंगाबादच्या उद्योजकांना मुंबईत दिली. सीएमआयएचे शिष्टमंडळ मुंबईत देसाई यांना भेटले. शिष्टमंडळात खासदार चंद्राकांत खैरे, सीएमआयएचे अध्यक्ष गुरुप्रीतसिंग बग्गा, उमेश दाशरथी, दुष्यंत पाटील, रितेश शर्मा, अजित मुळे, विनोद नांदापूरकर होते. उद्योगमंत्र्यांनी सांगितले की, एमआयडीसीच्या धोरणांत...
  September 30, 07:33 AM
 • शहर खड्डेमुक्त करण्यासाठी १५० कोटींचा प्रस्ताव मांडणार
  औरंगाबाद - पालकमंत्री रामदास कदम यांनी बुधवारी दुपारी महापौर बंगल्यावर महानगरपालिका तसेच जिल्ह्याच्या विविध मुद्द्यांवर मॅरेथॉन बैठक घेतली. रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी शहरात होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीसमोर १५० कोटींचा प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याची शहरवासीयांसाठी सुखद माहिती त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. बुजवलेले खड्डे बघण्यासाठी आदित्य येणार : खड्डे बुजवण्यासाठी न्यायालयाला आदेश द्यावा लागतो ही लाजिरवाणी बाब असल्याचे कदम यांनी या वेळी सांगितले. औरंगाबाद हे...
  September 30, 07:29 AM
 • आयुक्तालयात रंगरंगोटी; जुने कार्पेट, पडदे बदलले
  औरंगाबाद - मंत्रिमंडळ बैठकीसाठी विभागीय आयुक्तालयात लगबग सुरू आहे. 4 ऑक्टोबरला होणाऱ्या बैठकीसाठी मुख्य प्रशासकीय इमारतीसह सर्वच इमारतींची रंगरंगोटी सुरू आहे. विभागीय आयुक्तांच्या दालनासह महत्त्वाच्या दालनांची साफसफाई सुरू आहे. त्यामुळे आयुक्तांचे दालन आज बंद होते. या दालनात मुख्यमंत्री आणि राज्यपालांची तसबीर लावली जाणार आहे. आयुक्त उमाकांत दांगट हे महसूल उपायुक्तांच्या दालनात बसून कामकाज पाहत होते. संपूर्ण परिसरात मोठा पेंडॉल टाकण्यात येत असून झाडून सर्वच अधिकारी...
  September 30, 07:24 AM
 • ओबीसी आरक्षणात वाटलेली खैरात हा घटनात्मक भ्रष्टाचार
  औरंगाबाद - मराठा समाजाने १९९३ मध्ये आरक्षण मागताच पद्धतशीरपणे ओबीसी आरक्षणात थेट १६ टक्क्यांची वाढ करून आरक्षणाची खैरात वाटली गेली. ओबीसी आरक्षण देताना कोणत्याही जातीचा शास्त्रशुद्ध अभ्यास, सर्वेक्षण करण्यात आले नाही. हा एक प्रकारे राजकीय पक्षपात आणि घटनात्मक भ्रष्टाचार आहे. आरक्षणाचे दर दहा वर्षांनी पुनर्विलोकन केलेच पाहिजे या कायद्याचेही पालन झालेले नाही, असे आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटे यांनी म्हटले. मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण देताना आधीच्या काळात ओबीसी आरक्षण...
  September 30, 06:44 AM
 • delete
  September 30, 12:05 AM
 • लाखो मराठा मुली उतरल्‍या रस्‍त्यावर, पाहा असे केले मूक मोर्चाचे नेतृत्‍त्‍व
  औरंगाबाद- कोपर्डी प्रकरणाचा निषेध, अॅट्रॉसिटी कायद्यात सुधारणा आणि मराठा समाजाच्या अन्य मागण्यांसाठी राज्यातील विविध शहरांमध्ये लाखो मराठा बांधवांचे मोर्चे निघत आहेत. प्रत्येक शहरातील मोर्चा हा ऐतिहासीक ठरत असल्याचे दिसून येत आहे. विशेष बाब ही की, एवढ्या मोठ्या संख्येने मराठा समाज आपल्या मागण्यांसाठी एकत्र येतो. मात्र अद्यापतरी कोणताही अनुचित प्रकार कुठेही घडला नाही. मोर्चामध्ये जमणा-या लाखो लोकांमध्ये महिला आणि युवतींचे प्रमाणही विशेष उल्लेखनिय आहे. प्रत्येक मोर्चात विविध फलक...
  September 29, 01:37 PM
 • हद्द ग्रामपंचायतीची, वसुली मनपा-समांतरची...वर खोटारडेपणामुळे जनता झाली ‘पाणी पाणी’
  औरंगाबाद - मनपा पैसे घेते, पण गुंठेवारी म्हणून पाइपलाइन न टाकता समांतरकडे बोट दाखवते. समांतरही पैशांची वसुली करते अन् पाइप टाकल्याचे खोटेच सांगते. अखेर लोक निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा देतात. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वजण मनपाला लेखी सूचना देतात; पण काही केल्या ना जलवाहिनी आली, ना पाणी मिळाले. आणखी खोलात गेले असता पैसे भरणाऱ्या कॉलनीने ज्या वेळी गुंठेवारीचे पैसे भरले तेव्हा ती ग्रामपंचायतीच्या हद्दीत असल्याचे स्पष्ट झाले. कामच होणार नव्हते तर मग...
  September 29, 08:07 AM
 • एमआयटी-सातारा गाव रस्ता कामासाठी ९६ लाखांचे टेंडर
  औरंगाबाद - सातारा वॉर्डाचा समावेश महानगरपालिकेत झाल्यापासून सहा महिन्यांत एकही काम मनपाने केले नाही. पहिल्याच कामाला आता मुहूर्त सापडला असून एमआयटी ते सातारा गाव व्हाइट टाॅपिंगचा रस्ता लवकरच होणार आहे. त्यासाठी ९६.८० लाख रुपयांचे टेंडर काढण्यात आले असून ठेकेदाराला दोन टक्के रक्कम भरण्यासाठी आठ दिवसांपूर्वीच पत्र देण्यात आले आहे. ही रक्कम भरताच कामाला प्रारंभ करण्यात येणार आहे. सातारा गावाचे कुलदैवत असलेल्या खंडोबाची यात्रा अवघ्या तीन महिन्यांवर आली असून त्यासाठी गावकऱ्यांकडून...
  September 29, 07:59 AM
 • संवेदनशील कटकट गेटवर एमआयएम-सेना नेते एकत्र
  औरंगाबाद - १९८०च्या दशकात दंगलीचे केंद्र आणि अगदी दोन-तीन वर्षांपूर्वी संवेदनशील भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कटकट गेटला बुधवारी अनोखा सोहळा झाला. विकासकामाच्या निमित्ताने एमआयएम आणि शिवसेनेचे पदाधिकारी एकत्र आले होते. पालकमंत्री रामदास कदम यांच्यासाठी फटाक्यांची आतषबाजीही झाली. कोणत्याही पक्षाचा राजकारणी चांगले काम करणार असेल तर जात-पात-धर्म विसरून स्वागत केले जाते, असा संदेश यातून देण्यात आला. राजकारणात कट्टर विरोधक असलेल्या एमआयएम, शिवसेनेचे नेते कधी एका मंचावर येतील, असा...
  September 29, 07:56 AM
 • ऐतिहासिक दरवाजेही घेतील मोकळा श्वास, पालकमंत्री रामदास कदम यांनी दिली ग्वाही
  औरंगाबाद - पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते बुधवारी कटकट दरवाजाला लागून होणाऱ्या पुलाचे भूमिपूजन करण्यात आले. यासाठी दोन कोटी रुपये खर्च येणार आहे. येथील पुलाचे काम सुरू होतानाच येत्या दोन महिन्यांत शहरातील अन्य तीन ऐतिहासिक दरवाजांसाठी निधी देण्यात येईल अन् त्याचेही काम सुरू होईल, अशी ग्वाही कदम यांनी दिली. मकई दरवाजा, बारापुल्ला दरवाजा आणि महेमूद दरवाजा या तीन दरवाजांचा विकास करण्यासाठी सहा वर्षांपूर्वी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारा कोटी रुपये देण्याची घोषणा...
  September 29, 07:53 AM
 • एमआयएम नगरसेवकाला कपडे फाटेपर्यंत मारहाण
  औरंगाबाद - महापालिकेचे अधिकारी गेंड्याच्या कातडीचे असा शब्दप्रयोग करणारे एमआयएमचे नगरसेवक शेख जफर (बिल्डर) यांना विरोधी पक्षनेत्याच्या दालनात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली. जफर तसेच त्यांना मारहाण करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचेही कपडे फाटले. दुपारी चार वाजता हा प्रकार घडला. विशेष म्हणजे जफर बिल्डर यांना मारहाण करणारे राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही व्यवसायाने बिल्डर्स असल्याचे समजते. ही हाणामारी होत असताना एमआयएम नगरसेवक अज्जू नाईकवाडी घटनास्थळी...
  September 29, 07:51 AM
 • अन् पुन्हा माझ्या आयुष्याचा प्रवास सुरू झाला !
  औरंगाबाद - २८ जुलै २००२ ची रात्र. टाटा कंपनीने एका परदेशी कंपनीला टेकओव्हर केल्याप्रीत्यर्थ पुण्यात पार्टी दिली. या कामात माझा महत्त्वाचा वाटा असल्याने मलाही निमंत्रण होते. आनंदाच्या भरात नाचत असताना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन मी कोसळलो. त्या घटनेने माझे जीवन गोठवून टाकले होते. २० जुलै २०१६ रोजी एका अज्ञात दात्याचे हृदय माझ्या शरीरात धडधडू लागले अन्् पुन्हा आयुष्याच्या नव्या प्रवासाला निघालो, पण २००२ ते २०१६ पर्यंतचे माझे जगणे एकाकी होते. मात्र, नव्या हृदयाने मला आयुष्यातील...
  September 29, 07:47 AM
 
जाहिरात
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
जाहिरात
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 

हास्ययात्रा