Home >> Maharashtra >> Marathwada
 • मुलगी म्हणजे घराचे वैभव, 'सेल्फी विथ डॉटर'च्या रंगात रंगले सामान्य लोक
  सेल्फी विथ डॉटर या डीबी स्टारच्या अभियानाला उदंड प्रतिसाद मिळत आहे. अनेक आई-वडील आपल्या मुलींसोबत फोटो काढून आम्हाला व्हाट्सअॅप करत आहेत. यामध्ये वडिलांनी आधाडी घेतली आहे, तर आई मंडळी अजूनही वेटींगवरच असल्याचे दिसते. पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा वडिलांचे मुलींसोबतचे सेल्फी...
  11:52 AM
 • पंकजा मुंडे यांना घडवली तनवाणींनी गुलमंडीची सैर
  औरंगाबाद- खरेदी करायची नसली तरी गुलमंडीवर फिरण्याचा मोह अनेकांना सुटत नाही. महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनीही शनिवारी गुलमंडीवर फेरफटका मारला. निमित्त होते माजी आमदार किशनचंद तनवाणी मित्रमंडळाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या मोफत वापराच्या पाण्याचा शुभारंभ योजनेचे. यासाठी पंकजा यांनी तनवाणी यांच्या कार्यालयापासून म्हणजेच जेथलिया टॉवर ते गुजराती शाळेपर्यंत त्या पायी चालल्या. तनवाणी यांनी आग्रह केल्याने पंकजा यांची गुलमंडीची सैर होऊ शकली. त्यामुळे पोलिस तसेच अन्य...
  09:04 AM
 • सोलापूर-जळगाव रेल्वे मार्गावरून राजकारण सुरू
  औरंगाबाद- सोलापूर ते जळगाव नवीन मार्गावरून शिवसेना - भाजप असे राजकारण चांगलेच पेटले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार रावसाहेब दानवे पैठणमार्गे जळगाव हा रूट बदलून जालना, अजिंठा जळगाव नवीन रूट सुरू करण्यासाठी जोरदार प्रयत्नशील आहेत. यामुळे पैठण, औरंगाबाद, वेरूळचे लोक, लोकप्रतिनिधी कमालीचे संताप व्यक्त करत आहेत. याच मुद्यावरून सुभेदारी सभागृहात जालना आणि औरंगाबादेतील नागरिकांची बाचाबाची झाली होती. पैठणमध्ये बंद पुकारला होता. शुक्रवारी जुलै रोजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या...
  08:55 AM
 • ‘मसाप’चे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, 'माझ्यावरील टीका निराधार
  औरंगाबाद- ज्यांच्याकडे सांगण्यासाठी काही नाही, अशीच मंडळी निवडणुकीत गरळ ओकत आहे. आम्हाला नावे ठेवताना ते खोटेपणाचा आधार घेत आहेत. त्यांच्या विरोधालाही काहीच तथ्य नसून राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा मिळवत विरोधकांनी केलेली आमच्यावरील टीका बिनबुडाची आणि तर्कहीन आहे. ज्यांच्याकडे स्वत:चे काही नाही अशी मंडळी काहीही बरळत सुटली आहे, असा आरोप मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला. मराठवाडा साहित्य परिषदेची निवडणूक राजकीय हस्तक्षेपामुळे चांगलीच...
  08:46 AM
 • मंत्रिमंडळ बैठकीसाठी 'सुभेदारी'चे नूतनीकरण
  औरंगाबाद- मंत्रिमंडळ बैठकीसाठी सुभेदारी विश्रामगृहाचे काम हाती घेण्यात आले आहे. नव्याने रुजू झालेल्या कार्यकारी अभियंत्यांनी विश्रामगृहांच्या कक्षासाठी ६० लाख रुपयांच्या खर्चास मंजुरी दिली असून १५ तारखेपासून २५ कक्षांच्या नूतनीकरणाचे काम सुरू होणार आहे. २००७-०८ नंतर पहिल्यांदाच बैठक होत असल्याने सर्वच विभागांचे अधिकारी कामाला लागले आहेत. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस औरंगाबादेत आले असता त्या वेळी त्यांनी मंत्रिमंडळ बैठक घेण्याचे जाहीर...
  08:43 AM
 • मार्ग सुकर: मंदिर जतनासाठी पुरातत्त्व खाते सरसावले
  औरंगाबाद- लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले साताऱ्यातील खंडोबा मंदिराच्या जतन दुरुस्तीसाठी पुरातत्त्व विभागातर्फे नुकताच एक कोटी १३ लाख रुपयांचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. महापौर त्र्यंबक तुपे यांनीही मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याचे काँक्रिटीकरण मंदिर गावाला जोडणारा पूल लवकरच बांधण्यासाठी आराखडा तयार करण्याचे आदेश दिले. अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या मंदिराची मोठ्या प्रमाणात पडझड सुरू झाली आहे. यासंदर्भात अनेकदा पुरातत्त्व खात्याला तसेच लोकप्रतिनिधींना...
  08:26 AM
 • प्रत्यक्ष कृतीवर भर, 'मराठवाडा ऑटो क्लस्टर'ला केंद्रीय मंत्री अनंत गितेंची भेट
  वाळूज- केवळ आश्वासने देऊन उद्योजकांच्या आशा पल्लवित करण्याऐवजी वाळूज औद्योगिक क्षेत्रात प्रत्यक्ष कृतीचा ठसा उमटवणार असल्याचे केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गिते यांनी सांगितले. वाळूज येथील मराठवाडा ऑटो क्लस्टरमध्ये सुरू असलेल्या औद्योगिक प्रदर्शनाचा शनिवारी गिते यांच्या उपस्थितीत समारोप झाला. या वेळी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार प्रशांत बंब, महापौर त्र्यंबक तुपे, मराठवाडा ऑटो क्लस्टरचे चेअरमन राम भोगले, मासिआचे अध्यक्ष बालाजी शिंदे, मुनीश शर्मा आदींची उपस्थिती होती....
  08:21 AM
 • विहिरी दुरुस्त केल्यास शहर होईल टंचाईमुक्त!
  औरंगाबाद- एका जुन्या विहिरीच्या मदतीने माजी आमदार किशनचंद तनवाणी यांनी २५० घरांना मोफत वापराचे पाणी देण्याची योजना शनिवारी कार्यन्वित केली. अशाच प्रकारच्या शहरभर अडीचशेपेक्षा जास्त विहिरी आहेत. त्यातील १९७ विहिरींची नोंद तर पालिकेच्या दप्तरातही आहे. या विहिरी कार्यान्वित झाल्या तर वापरासाठी मुबलक पाणी उपलब्ध होऊ शकते. एका अर्थाने शहर पाणीटंचाईमुक्त होऊ शकते. त्यामुळे पालिकेच्या पाणीपुरवठ्याची ओरडही आपोआपच कमी होईल. यासाठी प्रयत्न करणार असल्याचे महापौर त्र्यंबक तुपे यांनी...
  08:06 AM
 • कार्यशाळेत बालरुग्णांच्या सेवांचे दाखवले प्रात्यक्षिक
  औरंगाबाद- बालकांमध्ये हृदयरोग आणि श्वसनविषयक आजारांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे बालमृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. यासाठी तातडीच्या प्रसंगात बालकांना उपचार कसे द्यावेत, याविषयी सप्रात्यक्षिक अनुभव देणारी कार्यशाळा शनिवारी जुलै रोजी शहरात झाली. इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिशियन आणि एमजीएम बालरोग विभाग यांच्या विद्यमाने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शहरासह विदर्भ, जालना येथील बालरोगतज्ज्ञ सहभागी झाले होते. डॉ. ऋषीकेश ठाकरे, डॉ. मंदार देशपांडे, मुंबई येथील ज्युपिटर...
  07:54 AM
 • 'राका लाइफस्टाइल'चे 'हुक्कापाणी' केले बंद!
  औरंगाबाद- पोलिस आयुक्तांच्या आदेशावरून पोलिसांनी ज्योतीनगरातील राका लाइफस्टाइल क्लबमधील हुक्का पार्लरवर धाड टाकल्यानंतर तेथे सुरू असलेले एक-एक गैरप्रकार उघडकीस येऊ लागले. शनिवारी आयुक्त प्रकाश महाजन, महापौर त्र्यंबक तुपे आणि उपमहापौर प्रमोद राठोड यांनी पाहणी केली. या ठिकाणी ब्यूटी पार्लरच्या नावाखाली मसाज पार्लर सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे आयुक्त महाजन यांनी क्लबच्या कागदपत्रांची छाननी होईपर्यंत हा क्लब सील करण्याचे आदेश दिले. त्यानंतर तासाभरातच या क्लबचे...
  07:49 AM
 • सिस्टीम बदलेन अथवा बाहेर पडेन, घाणेरडे राजकारण करणार नाही : पंकजा
  औरंगाबाद - महिला व बालकल्याण खात्याशी संबंधित ठेकेदारांची मोठी लाॅबी आहे. ती तोडण्याचा प्रयत्न केला म्हणून मला बदनाम करण्याचे प्रयत्न झाले. पण त्यामुळे मी खचून गेलेली नाही. आता हा विषय मी धसास लावणार आहे. मी सिस्टिम बदलण्यासाठी राजकारणात आले आहे आणि ती मी बदलणार आहे. जर सिस्टिम बदलता आली नाही तर मी येथून बाहेर पडेन; पण असे घाणेरडे राजकारण करणार नाही, अशा शब्दांत मंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पंकजा या शनिवारी औरंगाबादेत होत्या. दुपारी त्यांनी दिव्य मराठी...
  04:20 AM
 • आम्ही जगायचं कसं? कारखान्यांच्या कर्मचा-यांना दिले नारळ
  उस्मानाबाद - जिल्ह्यातील सहकार क्षेत्राला वेगाने अवकळा येत आहे. मराठवाड्यातील सर्वात जुन्या तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्यातील कर्मचाऱ्यांनी पगार होत नसल्याने शुक्रवारपासून (३ जुलै) काम सोडून दिले असून दुसऱ्या सहकारी संस्थेतील म्हणजे तुळजाभवानी दूध संघातील सर्व कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करून त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. एकाच दिवशी दोन मोठ्या सहकारी संस्थांना अवकळा आली आहे. यापुढे या दोन्ही संस्था कामगारांव्यतिरिक्त बकाल दिसू लागतील. दुर्दैवाची बाब म्हणजे कामगारांवर बिकट...
  04:00 AM
 • नापिकीमुळे कर्जबाजारी झालेल्या तीन शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपवली
  बदनापूर/फुलंब्री - नापिकीमुळे कर्जबाजारी विठ्ठल अंबादास मोरे (३०) या शेतकऱ्याने वीजपुरवठ्याच्या रोहित्रावर चढून जीवनयात्रा संपवली. बदनापूर तालुक्यातील धामणगाव येथे शनिवारी हा प्रकार घडला. तसेच रावसाहेब काशीनाथ करडे (४०, गणोरी, ता. फुलंब्री, जि. औरंगाबाद) व शंकर महादू दौड (नाटवी, ता. सिल्लोड, जि. औरंगाबाद) या दोन्ही शेतकऱ्यांनीदेखील आत्महत्या केली. विठ्ठल मोरे यांची धामणगाव येथे तीन एकर शेती आहे. मात्र, तीन वर्षांपासून सतत दुष्काळी परिस्थिती असल्याने शेतीतून काहीच उत्पन्न हाती लागले...
  04:00 AM
 • तीन वादळांनी पळवला भारताचा पाऊस, पश्चिम प्रशांत महासागरात वादळे
  औरंगाबाद - जूनमध्ये देशभरात चांगली सलामी देणारा मान्सून जुलैमध्ये बेपत्ता झाला आहे. पश्चिम प्रशांत महासागरात निर्माण झालेल्या उष्णकटिबंधीय वादळांमुळे नैऋत्य मान्सून क्षीण झाला आहे. त्यामुळे देशभरात १४ जुलैनंतर मान्सून सक्रिय होण्याची शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे. तर येत्या ७ जुलैपासून महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने व्यक्त केली आहे. स्कायमेटच्या मते, पश्चिम प्रशांत महासागरात सध्या तीन उष्णकटिबंधीय वादळे सक्रिय आहेत. लिन्फा, चान-होम आणि नांगका अशी या...
  04:00 AM
 • औरंगाबादेत सेलचा स्टील डेपो, गिते मराठवाड्यासाठी वापरणार अधिकार
  औरंगाबाद - औरंगाबादमध्ये सेल (स्टील अॅथॉरिटी ऑफ इंडिया) च्या माध्यमातून स्टील डेपो उभारला जाईल. उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या कंपन्यांमार्फत खरेदीसाठीही औरंगाबादला प्राधान्य देण्यात येईल, असे आश्वासन केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गिते यांनी दिले. वाळूजमध्ये आयोजित मराठवाडा ऑटो क्लस्टरच्या सेंटर ऑफ एक्सलन्सच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. या वेळी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार प्रशांत बंब, महापौर त्रंबक तुपे, ऑटो क्लस्टरचे अध्यक्ष राम भोगले, सीएमआयएचे माजी अध्यक्ष...
  04:00 AM
 • सॅनिटरी नॅपकिन्स योजना लवकरच प्रत्यक्षात आणणार, पंकजांचे आश्वासन
  औरंगाबाद - राज्यातील माध्यमिक शाळा, महाविद्यालये व प्राथमिक आरोग्य केंद्रात सॅनिटरी नॅपकिन्स मोफत देण्याच्या योजनेला प्राधान्य देऊ, असे महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी शनिवारी सांगितले. दिव्य मराठी कार्यालयात सदिच्छा भेट दिली, त्या वेळी त्या बोलत होत्या. मुलींसाठी व्हेंडिंग मशीनद्वारे सॅनिटरी नॅपकिन्स द्याव्यात, यासाठी दिव्य मराठीने गेल्या काही महिन्यांपासून बातम्यांद्वारे पाठपुरावा केला. नुकताच मधुरिमाचा अंकही या विषयावरच काढण्यात आला. तो पंकजा यांना या वेळी...
  04:00 AM
 • ऑटो क्लस्टरला रु.५‌ कोटी
  छायाचित्र: औद्योगिक प्रदर्शनाची पाहणी करताना मुनगंटीवार, संरक्षणमंत्री पर्रीकर. छाया : दिव्य मराठी औरंगाबाद - मराठवाडा ऑटो क्लस्टरला पाच कोटी रुपये देण्याची घोषणा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी केली. वाळूज येथे उद्योजकांतर्फे आयोजित सेंटर फॉर एक्सलन्सच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची प्रमुख उपस्थिती होती. मुनगंटीवार म्हणाले की, अॉटो क्लस्टरसाठी ताजमहाल उभारणीपेक्षा चौपट वेळ लागतो. मात्र, औरंगाबादच्या उद्योजकांनी एकत्रित...
  July 4, 08:12 AM
 • औरंगाबाद - पोलिस महासंचालकांच्या अधिकारात आणि आयुक्तालयातील निवड समितीद्वारे सहायक पोलिस उपनिरीक्षकाचे उपनिरीक्षक झालेले शहरातील ३५ अधिकारी पुन्हा कर्मचारी झाले आहेत. मुदतवाढ न मिळाल्याने या ३५ जणांना १५ जूनपासून पुन्हा एएसआय व्हावे लागले असून नियुक्ती पीएसआय म्हणून अन् काम करताना एएसआय अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. पीएसआयच्या खांद्यावर दोन स्टार असतात, तर एएसआयच्या खांद्यावर एकच स्टार असतो. या ३५ जणांचे स्टार चांगले नसल्यामुळे त्यांना खांद्यावरील एक स्टार बदलावा...
  July 4, 08:09 AM
 • औरंगाबाद - पाण्याच्या प्रश्नावरून औरंगाबाद सिटी वाॅटर युटिलिटीने दिलेला शब्द न पाळल्याने सिडको-हडकोतील सर्वपक्षीय नगरसेवकांनी शुक्रवारी पुन्हा एकवार समांतरच्या मुख्यालयावर धडक मारली. शहराला तीन दिवसांआड पाणी देता, मग आम्हाला पाच दिवसांआड कशासाठी, असा सवाल करत हा प्रश्न सुटला नाही तर वेळप्रसंगी कायदाही हातात घेऊ, असा इशारा या संतप्त नगरसेवकांनी दिल्यानंतर कंपनीने १५ जुलैपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत करू, असे लेखी आश्वासन दिले. सिडको-हडकोतील पाण्याचे वेळापत्रक कोलमडले आहे. शहरात तीन...
  July 4, 08:06 AM
 • औरंगाबाद - निवासी डॉक्टरांनी पुकारलेल्या राज्यव्यापी संपातील डाॅक्टरांच्या मागण्या मान्य केल्यामुळे गुरुवारी सुरू झालेला संप शुक्रवारी सायंकाळी मागे घेण्यात आला, अशी माहिती औरंगाबाद मार्डचे अध्यक्ष डॉ. ऋषिकेश चेवले यांनी दिली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेणाऱ्या निवासी डॉक्टरांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यव्यापी संप केला होता. १९० निवासी डॉक्टर संपावर गेल्याने रुग्णसेवेला फारसा धक्का बसला नसला तरीही बेमुदत संपामुळे आगामी काही दिवसांत...
  July 4, 08:05 AM
 
जाहिरात
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
जाहिरात
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 

हास्ययात्रा