जाहिरात
Home >> Maharashtra >> Marathwada >> Aurangabad
औरंगाबाद
 
 
 
 

 • July 15, 01:37
   
  अधिकार्‍याची शरीरसुखाची मागणी; महिलेने केला आत्महत्येचा प्रयत्न
  औरंगाबाद  - पुरवठा केलेल्या मालाचा धनादेश देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंत्याने शरीरसुखाची मागणी केल्यामुळे संतप्त महिलेने त्याच कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. उपस्थितांनी तिला रोखल्यानंतर ती थेट पोलिस आयुक्तांना जाऊन भेटली आणि   पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दिली. 3 दिवसानंतरही गुन्हा नोंदवला नाही. स्वच्छतागृहासाठी...
   

 • July 15, 01:34
   
  गळतीमुळे दररोज लाख लोकांचे पाणी जाते वाया
  औरंगाबाद - फारोळा ते औरंगाबाद मार्गावरील जलवाहिन्यांच्या गळत्यांमुळे दररोज एक लाख नागरिकांच्या वाट्याचे पाणी वाया जात आहे. या गळत्या बंद करण्याबाबत भाजपने हल्लाबोल करताच प्रशासनाने लवकरच 48 तासांचा शटडाऊन घेत दुरुस्तीचे काम करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या काही दिवसांतच हे काम होणार असून त्यावेळी औरंगाबादकरांना किमान 5 दिवसांची निर्जळी सहन करावी लागणार आहे.  ...
   

 • July 15, 01:31
   
  वेरूळ प्राधिकरण घोषित होताच सव्वाशे एकर गायरान जमीन विक्रीला
  औरंगाबाद  - औरंगाबाद पर्यटन प्राधिकरणाचा तुकडा करून गंगापूर-खुलताबादचे आमदार प्रशांत बंब यांनी वेरूळ-खुलताबाद-म्हैसमाळ-शूलिभंजन व परिसरासाठी स्वतंत्र पर्यटन प्राधिकरणाची निर्मिती केली. प्राधिकरण होणार असल्याचे समजताच येथील जमिनीला सोन्याचे भाव येणार हे स्पष्ट झाले. त्यामुळे जमिनीच्या विक्रीसाठीही तयारी सुरू झाली आहे.    शासनाकडून मिळालेली गायरान जमीन विकता...
   

 • July 15, 01:22
   
  पॉलिटेक्निक कॉलेजात उभारले ‘अन्न आश्रम’
  औरंगाबाद - शासकीय तंत्रनिकेतनमध्ये दिवसभर सुरू असणारी यंत्रांची धडधड, कर्णकर्कश आवाज आणि लोखंडाला आकार देणारे विद्यार्थी व शिक्षकवृंद...अशा  वातावरणातही येथील कर्मचार्‍यांनी पक्षी व प्राणिमात्रांवर भूतदया दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. उन्हात त्यांच्या दाणा-पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून एक तरुण  पुढे आला. कार्यशाळेतील ज्ञानाचा वापर करून त्याने सहकार्‍यांच्या...
   

 • July 15, 01:18
   
  शासनाची प्रॉपर्टी नोंदणी वेबसाइट अपडेट नाही; स्वत:च्या मालमत्तेची माहिती मिळवण्यासाठी पडतोय भुर्दंड
  औरंगाबाद - जिल्हा प्रशासनाच्या विविध कामांची माहिती मिळावी यासाठी aurangabd.nic.in ही वेबसाइट सुरू करण्यात आली. सोबतच जिल्हाभरात सदनिका, प्लॉट, दुकानांची खरेदी-विक्रीचे व्यवहार याबाबतची सगळी माहिती नागरिकांना समजावी या हेतूने लिंक देण्यात आली. मात्र, चार वर्षांत  या साइटवरील सिटी सर्व्हे कार्यालयाच्या लिंकवर खरेदी-विक्री, नामांतर आणि अन्य माहिती अद्ययावत केलीच जात नाही. त्यामुळे...
   

 • July 15, 12:44
   
  हद्दीच्या वादामुळे तरुणाची दोन बोटे तुटली
  औरंगाबाद - दोन वॉर्डांतील मुख्य रस्ता, कडेला मोठी नाली. ती काही ठिकाणी उघडी, तर काही ठिकाणी  ढापे टाकलेले...हे ढापेही जुनाट. दोन्ही वॉर्डांतील लोक त्रस्त. किमान एखादा अपघात ठरलेलाच...नागरिकांनी दुरुस्तीची मागणी केली. पण दोन्ही नगरसेवकांनी हद्दीचा वाद काढत हात झटकले...शुक्रवारी रात्री आणखी एक तरुण ढापा उलटा होऊन पडला व दोन बोटे गमावून बसला. संगणकावर काम करून अर्थार्जन करत...
   

 • July 15, 12:29
   
  पावसाने पुन्हा डोळे वटारले; बळीराजाच्या नजरा आकाशाकडे
  गंगापूर - गंगापूर तालुक्यात गेल्या आठवड्यात सलग दोन दिवस पावसाने हजेरी लावल्यानंतर शेतक-यांनी लगबगीने पेरण्या पूर्ण केल्या. मात्र, त्यानंतर पावसाने पाठ फिरवल्याने शेतक-यांपुढे दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे.   या वर्षी जून महिना संपूनही पाऊस न आल्याने तालुक्यातील शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत होता. नऊ व दहा जुलै रोजी काही ठिकाणी अल्प पाऊस झाला व पुढेदेखील पाऊस येईल...
   

 • July 14, 04:32
   
  उपमुख्यमंत्री पवार घेणार आज टंचाईसंदर्भात बैठक
  औरंगाबाद - राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सोमवारी औरंगाबाद व जालना शहरात येत असून, त्यांच्या उपस्थितीत टंचाईसदृश स्थिती व त्यावरील उपाययोजनांबाबत आढावा घेण्यात येणार आहे. औरंगाबादेत सकाळी 11 वाजता सिडकोतील संत तुकोबाराय नाट्यमंदिरात राष्ट्रवादीचा निर्धार मेळावा ठेवण्यात आला आहे.   पवारांच्या  उपस्थितीत होणा-या जिल्हास्तरीय आढावा बैठकीनंतर निर्धार मेळावा होईल....
   

 • July 14, 03:55
   
  लहरी मोसम! लहरी पाऊस !! कुठे अतिवृष्टी, तर कुठे कोरडाठाक
  औरंगाबाद -  वाल्मी, गारखेड्याच्या काही भागांत रविवारी अर्धा तास जोरदार पाऊस पडला. मात्र पावसाचा धावा करणारे अख्खे कोरडे शहर उकाड्याने त्रस्त असताना पावसाचा थेंबही पडला नाही. मागील आठवड्यात मंगळवारीही सिडकोच्या चिकलठाणा भागात 36 मिमी पाऊस पडला, तर बुधवारी फुलंब्री शहरात अतिवृष्टी झाली. उर्वरित जिल्हा ढगांनी केवळ झाकोळला होता. काही भागांत अत्यल्प पाऊस झाला. अशी स्थिती अल...
   

 • July 14, 03:50
   
  सीटीए रायझर्स डीपीएल चॅम्पियन !
  औरंगाबाद - तनवाणी (नि:शुल्क पेयजल उपक्रम) प्रस्तुत दिव्य प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रशांत धुमाळ यांच्या सीटीए रायझर्स संघाने शानदार कामगिरी करताना नितीन जाधव यांच्या गजानन आॅइल इंडियन्स संघाला अवघ्या 3 धावांनी पराभूत करत विजेतेपद पटकावले. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या रोमांचक सामन्यात सीटीएने बाजी मारली. विजयाच्या उंबरठ्यावर असलेल्या गजानन...
   

 • July 14, 03:46
   
  मनात आणले तर विधानसभेची यादी केव्हाही;राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे सूतोवाच
  औरंगाबाद  - विधानसभा मतदारसंघाची खडान्खडा माहिती राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे आहे. राष्ट्रवादीने मनात आणले तर तत्काळ विधानसभा उमेदवारांची यादी जाहीर करता येईल, असे सूतोवाच राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केले.    तटकरे आणि उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी रविवारी ‘दिव्य मराठी’ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. या वेळी...
   

 • July 14, 03:42
   
  मोदींच्या कार्यक्रमातील व्हीआयपींची माहिती मागवली
  औरंगाबाद  - पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 6 आॅगस्ट रोजी औरंगाबादच्या दौर्‍यावर येत असून त्या वेळी विविध कार्यक्रमांत त्यांच्यासोबत राहू शकणार्‍या शहरातील व्हीआयपींची माहिती गोळा करण्याचे काम इंटेलिजन्स ब्युरोने सुरू केले आहे. मोदींच्या दौर्‍याचे अंतिम नियोजन झाल्यावर यापैकी कोणती मंडळी त्यांच्यासोबत राहातील यावर शिक्कामोर्तब होणार आहे.    पंतप्रधान...
   

 • July 14, 03:39
   
  आणखी सहा बालकांना डेंग्यू
  औरंगाबाद  - डेंग्यू झाल्यामुळे  पुंडलिकनगरातील सहा बालकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे तर आणखी एकाला अतीव दक्षता विभागात दाखल केले.  डेंग्यू झालेल्यांना माउली हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. धनुर्वीर पाटील (14 महिने), मनीष अहिरवाड (4), तेजस काथार (14), अनिरुद्ध पाटील (6), सागर बागडे (13), विशाल भोंबे (8), भगवान तपाइतकर (9) अशी या बालकांची नावे आहेत....
   

 • July 14, 03:35
   
  मनपात भाजपची कुरघोडी; खैरेंनाच पकडले कोंडीत
  औरंगाबाद - लोकसभा निवडणुकीतील एकहाती विजयानंतर भाजपमध्ये आत्मविश्वास बळावला असून तो आता झिरपत औरंगाबादपर्यंत पोहोचला आहे. महापालिकेत सत्ताधारी असलेल्या भाजपने रविवारी शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांनी बोलावलेल्या बैठकीत आक्रमक रूप धारण करीत खासदारांनाच कोंडीत पकडले. फक्त भाजपच्याच नगरसेवकांची कामे केली जात नाहीत, विकास कामे नाहीत, पाण्याचा प्रश्न सोडवता आलेला नाही,...
   

 • July 14, 03:31
   
  निकृष्ट कामाची चौकशी करून अहवाल पाठवा
  औरंगाबाद - श्रेयनगर येथे सिमेंट रस्त्याच्या निकृष्ट कामाचा दर्जा दक्षता व गुणनियंत्रण मंडळाकडून तपासा. आठ दिवसांत या तपासणीचा चौकशी अहवाल पाठवा, असे आदेश मुख्य अभियंता सी. पी. जोशी यांनी दिले आहेत. तसे पत्रच त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता यू. के. आहेर यांना दिले आहेत. त्यामुळे याप्रकरणी लगेच चौकशीही सुरू झाली आहे.   निकृष्ट सामग्रीचा वापर, तांत्रिक...
   
 
 
 
 
जाहिरात
 
 
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
जाहिरात
 
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 

हास्ययात्रा

 
 
 
 
 
 

फोटो गॅलरी

B'Day Girl सेलेना
सुटीचा आनंद फेव्‍हरेट डेस्टिनेशनवर
अनुष्‍का विराटचे 'लव्‍ह' कनेक्‍शन
माझा झुला तुला घे... तुझा झुला मला.....!