Home >> Maharashtra >> North Maharashtra

North Maharashtra News

 • मनमाड रेल्‍वे स्‍थानकावर प्रवाशांची झुंबड, सुट्टया आणि लग्‍नसराईमुळे गर्दीत प्रचंड वाढ
  मनमाड - लग्न सराईचा हंगाम आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे मनमाड रेल्वे स्थानकावर प्रवाशांची तुंबळ गर्दी दिसून येत आहे. रेल्वे फलाटावर येताच जागा मिळविण्यासाठी प्रवाशांची चढाओढ सुरू होते. रेल्वेच्या पार्सल बोगीमध्येदेखील प्रवासी शिरण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्यभरात एप्रिल महिन्याच्या दुसर्या आठवड्यापासून शाळा महाविद्यालयांना सुट्टया लागल्या आहेत. त्यामुळे अनेक कुटुंब पर्याटनाला निघाले आहेत. तसेच अनेक पर्यटक परप्रातांतून रेल्वेने मनमाड येथे येतात आणि तेथून शिर्डी,...
  01:17 PM
 • चाळीसगावात हाताची नस कापून शेतकऱ्याची आत्महत्या
  चाळीसगाव - थकीत सोसायटी वीजबिलामुळे वैफल्यग्रस्त शेतकऱ्याने हाताच्या नसा कापून घेत आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील बिलाखेड येथे घडली. वसंत हिरामण पाटील (वय ४०) यांनी २५ रोजी सायंकाळी घरी कुणी नसताना उजव्या हाताच्या मनगटावरील नस कापून घेतल्याने मोठा रक्तस्त्राव झाला होता. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना उपचारार्थ रूग्णालयात दाखल केले. परंतु त्यांचा मृत्यू झाला. वसंत पाटील यांच्या मुलीचे मागील वर्षीच लग्न झाले असून त्यांच्याकडे केवळ अडीच एकर जमीन अाहे. त्यांच्यावर विकास...
  10:36 AM
 • पाच नगरसेवक भाजपमध्ये; मनपात सत्ताधारी राष्ट्रवादीला झटका
  धुळे - राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक तथा महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती सोनल शिंदे, उपमहापौर फारुक शहा यांच्यासह शिवसेनेची एक नगरसेविका दोन अपक्ष नगरसेवकांनी बुधवारी पिंपरी-चिंचवडमध्ये झालेल्या बैठकीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान, घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. महापालिकेत अपक्ष नगरसेवकांना सोबत घेत राष्ट्रवादी कॉंग्रेसने सत्ता स्थापन केली आहे. स्थायी...
  10:22 AM
 • धोका: सुमारे 200 बालकांच्या जीवाशी खेळ; केऱ्हाळेत विनापरवानगी होणारे लसीकरण रोखले
  केऱ्हाळे - आरोग्य विभाग किंवा ग्रामपंचातीची कोणीतीही परवानगी घेताच केऱ्हाळेत जळगावातील एका खासगी संस्थेकडून लसीकरण सुरू होते. प्रत्येकी ७० रुपये घेवून त्यांनी सुमारे २०० बालकांचे लसीकरणदेखील केले. मात्र, सूज्ञ ग्रामस्थांच्या लक्षात हा प्रकार येताच लसीकरण करणाऱ्यांना गाशा गुंडाळणे भाग पडले. कारण अशा लसीकरणादरम्यान धोका झाल्यास बालकांच्या जीवावर बेतू शकते. जळगाव येथील एका खासगी संस्थेचे दोन प्रतिनिधी मंगळवारी केऱ्हाळेत घरोघरी फिरले. या भेटीदरम्यान त्यांनी महिल आणि लहान...
  10:14 AM
 • हवामानाच्या नोंदीस 104 वर्षांचे जुने यंत्र, ममुराबाद केंद्रावर कुलाबा वेधशाळेची भिस्त
  जळगाव - जिल्ह्यातील हवामानाच्या अधिकृत नाेंदी गृहीत धरण्यात येणाऱ्या ममुराबादच्या फार्मवरील हवामानाच्या नाेंदी ठेवणारी उपकरणे, पद्धती अाणि यंत्रणा तब्बल १०४ वर्ष जुनी अाहे. काळानुरूप थाेडे बहुत बदल स्वीकारले असले तरी तापमान माेजणीची प्रमुख यंत्रणा जुनीच असल्याने खासगी शासकीय केंद्रावरील हवामानाच्या नाेंदींमध्ये तफावत अाढळून येत अाहे. खासगी नाेंदणीमध्ये डिजिटल अाकड्यांचा तर ममुराबाद केंद्रावर मॅन्युअली माेजणी केली जात असल्याने तापमानामध्ये ते अंशाची तफावत राहत अाहे....
  09:57 AM
 • जळगाव: जिनिंगला आग; 3 हजार क्विंटल कापूस जळून खाक
  तीन तासांत आग आटोक्यात... २० मिनिटांनी दोन बंब घटनास्थळी पोहचले. त्या बंबांनी जिनिंगमध्ये असलेल्या बोअरिंगच्या पाण्याने अाग विझवण्यात अाली. आग लागली तेंव्हा जिनिंगमध्ये ५० पेक्षा जास्त कर्मचारी काम करीत होते. महिला कर्मचारी भीतीपोटी कंपनीच्या बाहेर जाऊन उभ्या होत्या. दुपारी वाजता लागलेली ही आग वाजता पूर्णपणे आटोक्यात आली. दरम्यान, २००८ मध्ये देखील या जिनिंगला आग लागली होती. कर्मचाऱ्याची तत्परता... आव्हानेजवळील लक्ष्मण पाटील यांच्या लक्ष्मी जिनिंग अॅण्ड प्रेसिंगला बुधवारी दुपारी...
  09:49 AM
 • मृत बिबट्याचे पिलू अाढळले, वाघूर धरण परिसरात कुत्र्यांनी मारल्याचा अंदाज
  जळगाव - वाघूर धरण परिसरात ते महिने वय असलेल्या बिबट्याच्या पिलाचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत बुधवारी आढळून आला. कुत्र्यांनी या पिलाला जखमी केल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज डाॅक्टरांनी व्यक्त केला आहे. वाघूर धरणाच्या डाव्या बाजूला बुधवारी सकाळी काही मजुरांना ते महिन्यांचे बिबट्याचे पिलू मृतावस्थेत आढळून आले. या विषयी मजुरांनी वन विभागाशी संपर्क साधून माहिती दिली. त्यानंतर वनपाल एस. टी. भिलावे, बी. एन. पवार, वनरक्षक डी. ए. जाधव हे घटनास्थळी दाखल झाले. हे पिलू कुत्र्यांच्या...
  09:46 AM
 • जळगावच्या मैत्रेयाज हॉटेलवर पाेलिसांची टाच, मुंबई पोलिसांनी डकवली नाेटीस
  जळगाव - फसवणूक अपहारप्रकरणी मैत्रेयाज ग्रुप ऑफ कंपनी विरुद्ध मुंबईत गुन्हा दाखल झाला अाहे. या प्रकरणी मुंबई पाेलिसांनी जळगावच्या मैत्रेयाज हॉटेलच्या गेटवर मंगळवारी मध्यरात्री नोटीस डकवली आहे. रात्री वाजेपर्यंत ही कारवाई सुरू हाेती. या मालमत्तेच्या संदर्भात कोणताही व्यवहार करण्यास मनाई करण्यात आल्याची ही नोटीस आहे. तत्पूर्वी जळगावातील काही व्यावसायिकांनी हे हॉटेल खरेदीसाठी पैसे दिले असल्याचीही माहिती समोर आली आहे. मैत्रेयाजच्या विरोधात राज्यात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल आहेत....
  09:36 AM
 • #तूर घ्या तूर...नेटिझन्सचा ‘हल्लाबाेल’; मुख्यमंत्री टार्गेट, भाजप सरकारविराेधात टिवटिवाट
  नाशिक - ट्विटरवर चालणाऱ्या सरकारला ट्विटरचीच भाषा कळते... या भूमिकेतून राज्यात पेटलेला तुरीचा प्रश्न अाता ट्विटरवर पोहोचला अाहे. तूर घ्या तूर हे हॅशटॅग घेऊन बुधवारी सकाळी राज्य सरकारच्या तूर खरेदी गोंधळावर ट्विटर कॅम्पेन जाहीर करण्यात आले. त्यानुसार संध्याकाळी ६ ते ९ या वेळेत तूर खरेदीच्या घोळावर ट्विटरच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करण्यात आले. तूर खरेदीबाबत राज्य सरकारने केलेली दिरंगाई, गैरव्यवस्थापन, त्यात शेतकऱ्यांचे झालेले कोट्यवधींचे नुकसान, याबाबतची...
  09:13 AM
 • चार पाेलिस ‘सुभेदारांवर’ होणार बडतर्फीची कारवाई
  नाशिक - वर्षानुवर्ष पोलिस आयुक्तालयात ठाण मांडून विविध पोलिस ठाण्यामध्ये सुभेदारी गाजवणाऱ्या चार पोलिस कर्मचाऱ्यांचे अवैध धंद्यावाल्यांशी अणि शहरातील इतर अवैध धंद्याशी असलेले अर्थपूर्ण संबधाचा पर्दाफाश झाल्याचे चार कर्मचाऱ्यासह एक निरिक्षकास थेट बडतर्फ करण्याच्या हलचाली गतीमान झाल्याचे वृत्त आहे. या वृत्ताला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला असून यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. पोलिस आयुक्तालयातील पोलिस ठाण्यात सुभेदारी गाजवणाऱ्या चार पोलिस कर्मचाऱ्यांच्या...
  08:43 AM
 • भुसावळ: आईचा वाढदिवस साजरा करून मुलाची गळफास घेऊन आत्महत्या
  भुसावळ - शहरातील हनुमान नगरमधील रहिवासी विक्की राजकुमार रत्नानी (वय ३०) याने मंगळवारी रात्री घरात गळफास घेऊन अात्महत्या केली. विशेष म्हणजेच मंगळवारी त्याच्या आईचा वाढदिवस होता. हा वाढदिवस साजरा झाल्यावर ही खळबळजनक घटना घडली. हनुमाननगरमधील रहिवासी विक्की रत्नानी यांनी मंगळवारी रात्री १२.३० ते १.१५ वाजेच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेतला. हा प्रकार उघडकीस येताच कुटुंबातील सदस्यांनी विक्कीला डाॅ. मानवतकर हाॅस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल केले. मात्र, तपासाअंती डाॅ. मानवतकर यांनी...
  08:38 AM
 • भंगार बाजाराचे पुन्हा बस्तान
  नाशिक - महापालिका निवडणुकीपूर्वी अर्थात जानेवारी २०१७ राेजी शहरासाठी अत्यंत चर्चेचा विषय झालेल्या सातपूर-अंबड लिंकराेडवरील १७ वर्षांपासूनच्या अतिक्रमित भंगार बाजारावर पालिकेने बुलडाेझर फिरविला. महापालिका अायुक्त अभिषेक कृष्णा अाणि पाेलिस अायुक्त रवींद्र सिंगल यांनी यात पुढाकार घेतला. अधिकाऱ्यांच्या ताफ्यात अाणि पाेलिस बंदाेबस्तात येथील शेकडाे दुकाने टप्प्याटप्प्याने काढण्यात अाली. मात्र, अाता पुन्हा परिस्थिती जैसे थे हाेत अाहे. महापालिकेच्या दुर्लक्षामुळे, काहीजणांच्या...
  08:29 AM
 • भाजपविराेधात संघर्षासाठी शिवसेनेचा अभ्यासवर्ग
  नाशिक - स्पष्ट बहुमतामुळे भाजपकडून महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी येणारा दबाव त्यास विराेध करून प्रभावी विराेधकाची छबी उजळवण्यासाठी शिवसेनेने अाता नगरसेवकांचा अभ्यासवर्ग घेऊन त्यांना सक्षम करण्याची धडपड चालवली अाहे. त्याचाच एक भाग म्हणून रविवारी (दि. ३०) दिवसभर नगरसेवकांचा अभ्यासवर्ग करून अागामी रणनीतीही ठरवली जाणार अाहे. महापालिका निवडणुकीत शिवसेना विरुद्ध भाजप अशी लढाई झाली. निवडणुकीपूर्वी शिवसेनेची सत्ता येईल असे चित्र हाेते. मराठवाड्याला पाणी साेडणे, एकलहरा विद्युत...
  08:27 AM
 • तीन पालिका शाळांच्या खासगीकरणाचा घाट
  नाशिक - गाेरगरीबमुलांना शिक्षण देवून सुशिक्षित करण्यासाठी धडपड करणाऱ्या महापालिकेने एकापाठाेपाठ एक शाळांचे खासगीकरणाचे धाेरण स्वीकारले असून बी. डी. भालेकर शाळेपाठाेपाठ अाता सातपूरमधील दाेन तर पंचवटीतील गणेशवाडीच्या एका शाळेचे खासगीकरण केले जाणार अाहे. दरम्यान, पालिका शाळा काेमजत असताना विद्यार्थ्यांचा टक्का वाढवण्याच्यादृष्टीने चर्चा घडवण्यापेक्षा मागील दरवाज्याने शाळांचे खासगीकरण हाेत असल्यामुळे शिवसेनेने अाक्रमक पवित्रा घेतला अाहे. महापालिकेच्या १२६ प्राथमिक शाळा तर...
  08:18 AM
 • महिलांचा रुद्रावतार; सिडकाेत मद्यविक्रीचे दुकान फाेडले तर सातपूरला फाेडल्या दुकानातील मद्य बाटल्या
  सिडको - सिडकोतील महाकाली चौक दत्त चौक येथील देशी दारु दुकानांच्या विरोधात संतप्त महिलानी आक्रमक होत या दुकानाची तोडफोड केली. मद्यपींच्या त्रासाला कंटाळलेल्या महिलांनी बुधवारी रणरागिनीचे रुप धारण केले. प्रशासन दुकान बंद करण्यास असमर्थता दर्शवित असल्याने महिलांनीच दुकानाला कुलूप लावले. मागील आठवाड्यातच या ठिकाणी काही मद्यपींनी महिलांची छेडछाड काढली होती. यामुळे संतप्त महिलांनी नगरसेवक मुकेश शहाणे यांना बोलावून महाकाली चौकातील देशी दारू दुकानासमोर मद्यपींना चाेप दिला हाेता....
  08:12 AM
 • नाशिकराेडला घरकुलासाठी गृहिणींचा रात्री ठिय्या, दिवसा रांगेत तिष्ठत उभ्या
  नाशिकरोड - पंतप्रधान आवास योजनेंतर्गत झोपडपट्टीनिहाय सर्वेक्षण आणि मागणी सर्वेक्षणाचा महापालिकानिहाय कार्यक्रम सुरू केला आहे. यासाठी महापालिकेच्या विभागीय कार्यालयामध्ये यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले आहे. विशेष म्हणजे घरकुलासाठी इच्छुकांची संख्या अधिक असल्याने आपला नंबर लागावा यासाठी महिलांना रात्रभर विभागीय कार्यालयाबाहेर मुक्काम ठोकावा लागत आहे. नाशिकरोड येथील पालिकेच्या विभागीय कार्यालयातून घरकुल योजनेचे साडेआठ हजार अर्जांची विक्री झाली आहे. हे अर्ज जमा करण्याची मुदत ३०...
  08:07 AM
 • कपाट नियमितीकरण धाेरण अाठ दिवसांत, पालिकेच्या हालचाली गतिमान
  नाशिक - ३१ डिसेंबर २०१५ पूर्वीची अनाधिकृत बांधकामे नियमितीकरणासाठी येत्या अाठ दिवसांत धाेरण मंत्रालयस्तरावर निश्चित हाेणार असून, त्याअनुषंगाने नाशिक महापालिकेलाही कपाटे नियमितीकरणासाठी तयारीत राहण्याचा संदेश मिळाला अाहे. या धाेरणात अनधिकृत बांधकामांना प्रथम कम्पाउडिंग स्ट्रक्चर असे घाेषित करून त्यानंतर नियमितीकरण करण्याबाबतचे राजपत्रही प्रसिद्ध झाले अाहे. विशेष म्हणजे, एकदा की त्याची घाेषणा झाल्यानंतर त्यांना अन्य काेणत्याही कायद्यानुसार कारवाई करता येणार नसल्यामुळे...
  07:58 AM
 • मुलीच्या फीसाठी मुख्याध्यापकाने जिल्हा बँक शाखेत घेतले कोंडून
  नाशिक - मुलीचे महाविद्यालयातील कॉलेजचे शुल्क भरण्यासाठी भविष्य निर्वाह निधीतून काढलेल्या कर्जाचे पैसे मिळवण्यासाठी महिनाभरापासून बँकेत खेटा मारूनही हाती छदामही लागत नसल्याने संतापलेल्या मुख्याध्यापकाने पंचवटी येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत स्वत:ला सपत्नीक कोंडून घेतले. हक्काचे पैसे मिळत नाहीत, तोपर्यंत बँक कर्मचाऱ्यांनाही बाहेर जाऊन देणार नाही, अशी भूमिका घेत दिव्यांग असलेल्या शिक्षकाने कोंडून घेतले. बँक व्यवस्थापक अधिकाऱ्यांशी वाद झाल्याने संतापलेल्या शिक्षकाने...
  07:53 AM
 • बंद असलेल्या निफाड बाजारात गुरुवारपासून कांदा-धान्य लिलाव, शेतकऱ्यांना रोखीने मिळणार पेमेंट
  लासलगाव (नाशिक) - चार ते पाच दिवसांपासून बंद असलेला लासलगाव बाजार समितीच्या निफाड उपबाजार आवारात गुरुवारपासून धान्य व कांदा लिलाव सुरु होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना आपला माल विकायला येणारी अडचण दूर होण्याची शक्यता आहे. का बंद होता बाजार - नाशिकमध्ये लासलगांव आणि निफाड बाजार समिति मध्ये शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीचे पैसे रोख स्वरुपात किंवा NEFT द्वारे देण्याची भुमिका लासलगाव बाजार समितीच्या प्रशासनाने लावून धरून बाजार बंद ठेवला होता. - व्यापारी शेतकऱ्यांना चेकने पेमेंट करत होते....
  April 26, 05:02 PM
 • VIDEO: शेतकर्‍यांचा चोपडा तहसील कार्यालयावर मोर्चा, कर्जमाफीसह इच्छा मरणाची मागणी
  चोपडा- मागील पंधरा दिवासापासून इच्छा मरणाची परवानगी मिळावी म्हणून चोपडा तालुका कृती समितीने एकूण लहान मोठ्या तीस गावांमध्ये सभा घेऊन मोठ्या संख्येने उपस्थिती देण्याचे आवाहन केले होते.मात्र आजच्या शेतकऱ्याच्या फायद्या साठी काढण्यात आलेल्या मोर्चालाच शेतकऱ्यांनी पाठ फिरवली होती.मोर्च्यांची वेळ सकाळी नऊ वाजेची दिली होती,मात्र त्या वेळेत केवळ कृती समितीचे पदाधिकारी आनंदराज लॉन्स शेजारी उपस्थित होते.वेळोवेळी कृती समितीचे संयोजक संजीव सोनवणे यांनी आवाहन केले की,उपस्थित शेतकऱ्यांनी...
  April 26, 01:24 PM
 
जाहिरात
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
जाहिरात
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 

हास्ययात्रा